विभाग नववा : ई-अंशुमान
एरिनपुर - राजपुतान्यांतील सिहोरी संस्थानाच्या ईशान्य भागांत एक छावणीचें ठिकाण. लो. सं. (१९०१). ३२०६.४३ नंबरच्या फौजेचें (रेजिमेन्ट) हें ठिकाण आहे. तसेंच येथें भिल्ल लोकांचीहि एक तुकडी ठेवण्यांत आली होती. १८५७ सालीं ते सर्व (भिल्ल सोडून) बंडांत सामील झाल्यामुळें एरिनपुर इरेग्युलर फोर्स उभें करण्यांत येऊन भिल्लांस त्यांचें आद्यस्थान देण्यांत आलें.
सध्यां ह्या फौजेंत शीख, मुसुलमान, (पांजाबांतील) रजपूत,मीना, मेर, मुसुलमान वगैरे आहेत.