विभाग नववा : ई-अंशुमान
एर्नाकुलम - मद्रास इलाख्यांतील कोचीन संस्थानाची राजधानी. क्षेत्रफळ पांच चौरस मै. लो. सं. (१९०१) २१,९०१; पैकीं हिंदूची संख्या ११,१९७ कोचींन स्टेट रेल्वेचें हें अखेरचें स्टेशन आहे. हें भरभराटीचें शहर आहे. येथील सार्वजनिक इमारती दरबारहाल (दिवाणखाना), चीफ कोर्ट, राजाचें कॉलेज. दिवाणकचेरी या होत.