प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग नववा : ई-अंशुमान

एलिझाबेथ (१)-(१५३३-१६०३) एलिझाबेथ ही आठव्या हेनरीची अ‍ॅनबुलिनपासून झालेली मुलगी होय. आपल्या पाठीमागें एलिझाबेथलाच इंग्लंडचें राज्य मिळावें अशी प्रथम हेनरीची इच्छा होती व त्याप्रमाणें पहिल्या बायकोपासून झालेली थोरली मुलगी मेरी इच्या ऐवजीं एलिझाबेथलाच राज्य मिळावें अशी त्यानें व्यवस्था केली होती. पण मध्यंतरीं अ‍ॅनबुलनिवर त्याची खप्पा मर्जी झाल्यामुळें हेनरीनें तिच्याशीं घटस्फोट केला व त्यामुळें एलिझाबेथचा राज्यावरील हक्क आपोआपच नाहींसा झाला. याच सुमारास हेनरीला एक पुत्र होऊन त्याचें नांव एडवर्ड हें ठेवण्यांत आलें. अर्थातच हेनरीच्या मागें एडवर्ड व एडवर्डच्या नंतर मेरी ही गादीवर बसली. यामुळें एलिझाबेथचें बालपण विशेष सुखांत गेलें नाहीं. ती प्रॉटेस्टंटपंथी होती. मेरीच्या कारकीर्दीत तिला फार त्रास सोसावा लागला. मेरीला एलिझाबेथ ही आपल्या मार्गांतील कांटा आहे असें नेहमीं वाटत असे. मेरी ही कॅथोलिकपंथाची असल्यामुळें व स्पॅनिश लोकांशीं तिचें सख्य असल्यामुळें स्पॅनिश लोकांनीं एलिझाबेथचा शिरच्छेद करण्याविषयीं फार आग्रह धरिला. एलिझाबेथला १५५४ मध्यें ‘टॉवर’ मध्यें कैदेंत ठेवण्यांत आलें, पण लोकांची ट्यूडर घराण्याबद्दल सहानुभूति असल्यामुळें एलिझाबेथचा शिरच्छेद करणें शक्य नव्हतें. दोन महिने टॉवरमध्यें राहिल्यानंतर तिला वुडस्टॉक येथें सर हेनरी बेडिंगफिल्डच्या ताब्यांत ठेवण्यांत आलें. १५५५ मध्यें ती हॅटफील्ड येथें आली. व त्या ठिकाणीं तिनें मेरीच्या उरलेल्या कारकार्दीत आपले दिवस घालविले.

मेरी ही कॅथोलिक पंथाची पुरस्कर्ती असल्यामुळें तिनें धर्मवेडाच्या भरांत प्रॉटेस्टंटपंथानुयायांपैकीं प्रमुख लोकांनां ठार मारलें. यामुळें इंग्लंडमधील लोकांनां फार चीड उत्पन्न झाली होती. तसेंच तिच्या मुर्खपणामुळें कॅले शहर इंग्लिशांच्या ताब्यांतून फ्रेंचांकडे गेलें. यामुळें तर इंग्लंडांतील लोक खवळून गेले. पण इतक्यांत मेरी मरण पावल्यामुळें व तिलाहि संतति नसल्यामुळें एलिझाबेथकडे गादीचा वारसा आला. एलिझाबेथ गादीवर आल्यामुळें इंग्लंडंतील लोकांनां आनंद झाला.

एलिझाबेथ ही अस्सल इंग्लिश स्त्री होती. इंग्रज लोकांचे गुणदोष तिच्या अंगीं पूर्णपणानें वास करीत होते. याशिवाय, इटालियन कल्पनांची तिच्यावर बरीच छाप पडलेली होती. त्यामुळें मुत्सद्दीगिरीपणांत ती अत्यंत निष्णात अशी झाली होती. धर्मविधींचा ती मनांतून तिटकारा करीत असे; पण आपले राजकीय हेतु साध्य करून घेण्यासाठीं जरूर पडेल तेव्हां ती हे धर्मविधी पाळण्यास मागेंपुढें पहात नसे. राज्यशकट चांगला चालण्यासाठीं जे धर्मगुरू सहाय्य करतील त्यांनांच ती मान देत असे.

एलिझाबेथ गादीवर बसली तेव्हां इंग्लंडची स्थिति अत्यंत वाईट झाली होती. फ्रान्स देशाशीं युद्ध करून मेरीनें राज्याचा खजिना रिकामा केला होता. आयर्लंडांत अंतस्थ यादवी माजली होती. स्कॉटलंडची राणी मेरी स्टुअर्ट हिनें फ्रान्सच्या युवराजाशीं विवाह केला होता. ती “एलिझाबेथ ही सशास्त्र लग्नाच्या बायकोपासून झालेली नाहीं” असें उघड बोलूं लागली, आणि इंग्लंडची गादी आपणास मिळाली पाहिजे असा तिनें दावा मांडला. यूरोपखंडांत कॅथोलिक्स आणि प्रॉटेस्टंट्स यांच्या दरम्यान मोठा झगडा चालला होता. अशा बिकट परिस्थितींत तिला राज्यशकट हांकावयाचा होता. तिला गादीवरील आपली स्थिति कायम राखावयाची होती. याशिवाय इंग्लंडचे परकीय शत्रू, जबर कर, व अंतस्थ दुफळी यांपासून इंग्लंडचें रक्षण करून तें बलाढ्य करण्याची तिची इच्छा होती. अर्थातच हें सर्व साधण्याला ज्या ज्या युक्तया व डावपेंच करणें तिला भाग पडत असे त्या त्या सर्व युक्तया ती योजीत असे. तिनें निरनिराळ्या लोकांवर मोहपाश टाकले ते सर्व राजकीय डावपेचाच्या स्वरूपाचे होते असें म्हणण्यास हरकत नाहीं. कांहीं अंतस्थ शारिरीक व्यंगामुळें तिला लग्न करणेंच शक्य नव्हतें असें म्हणतात. ती स्वरूपानें जरी सुंदर होती तरी तिच्यांत मेरीप्रमाणें मोहकपणा नव्हता. चैनबाजी, सुंदर पोषाख, नखरेबाजपणा, लटकी फुशारकी यांची तिला फारच आवड असे. पण बाहेरून जरी स्त्रीस्वभावानुरूप नट्टापट्टा करण्याची तिला संवय होती तरी तिच्या अंगीं स्त्रियांनां लागणारें मार्दव मुळींच नव्हतें. तथापि या नखरेबाजपणाचा तिनें राजकारणाकडे चांगला उपयोग करून घेतला. मेरी स्टुअर्ट अगर फ्रान्स यांच्यापासून इंग्लंडला अगर तिला स्वत:ला भीति उत्पन्न होण्याचा प्रसंग उत्पन्न झाला कीं, ती लगेंच आपल्या शत्रूंनां गप्प बसविण्यासाठीं ऑस्ट्रियाच्या आर्चड्यूकशीं लग्न लावण्याची हूल उठवीत असे. फिलिपनें मेरी स्टुअर्टशीं लग्न लावल्याबरोबर तिनें दोघा फ्रेंच राजपुत्रांनां आपल्या मोहपाशांत गुंतविण्यांची शक्कल काढिली. तात्पर्य तिनें आपल्या सौंदर्याचा राजकारणाकडे उपयोग केला; व कांहीं वेळां तिच्या शीलाला डाग लागण्याचा जरी प्रसंग आला तरी तिच्या वर्तणुकींतील वरील हेतु लक्षांत आणून तिच्या स्वभावांतील दोषांकडे बरेच ग्रंथकार दुर्लक्ष करतात.

आपल्या पाठीमागें राज्याचा वारसा कोणाकडे असावा यासंबंधींहि तिला काळजी वाटे. मेरीला आपल्यामागें राज्य देण्यांत यावें असें तिला सांगण्याची छाती होईना. कारण त्यामुळें प्रॉटेस्टंट लोकांनां तोंडघशीं पाडल्यासारखें झालें असतें. त्याच सुमारास मेरीवर कट करण्याचा आरोप प्रस्थापित होऊन तिला मृत्यूची शिक्षा फर्मावण्यांत आली.

मेरीच्या शिरच्छेदानें तिच्यावरचा एक प्रसंग टळला; पण स्पेनपासून तिला याच सुमारास दुसरें संकट प्राप्त झालें. स्पेनचा यूरोपमध्यें मोठ्या प्रमाणावर व्यापार चालू होता. दक्षिण अमेरिकेंत स्पॅनिश लोकांनीं वराच मुलूख काबीज केला होता, व त्या ठिकाणीं त्यांनां सोनें वगैरे विपुल मिळत असे. पण १५७२ व १५७७ या सालीं ड्रेक या नांवाच्या इंग्लिश चांच्यानें स्पॅनिश लोकांच्या मुलुखांत जाऊन तेथून सोन्यानें भरलेलीं जहाजें लुटून विपुल सोनें इंग्लंडांत आणलें. एलिझाबेथनें व इंग्लिश लोकांनीं याबद्दल ड्रेकचा सत्कार करून त्याला ‘नाइट’ ही पदवी बहाल केली. पुढें पुन्हां ड्रेकबरोबर २५ जहाजें देऊन एलिझाबेथनें दक्षिण अमेरिकेकडे ड्रेक यास पाठविलें. या गोष्टीमुळें चिडून जाऊन स्पेननें इंग्लंडवर स्वारी करण्याचा घाट घातला. शेवटीं दोन्ही राष्ट्रांमध्यें आरमारी युद्ध होऊन स्पेनचा त्या युद्धांत पराभव झाला.

अशा रीतीनें इंग्लंडवर येणार्‍या संकटाचा नाश झाल्यावर तिनें अंतस्थ सुधारणेकडे आपलें लक्ष पुरविलें. इंग्लंडच्या परदेशांशीं होणार्‍या व्यापाराला तिनें उत्तेजन दिलें. साहसी नांविकांनां व संशोधकांनांहि तिनें चांगलें उत्तेजन दिलें. त्यामुळें इंग्लंडला चांगले भरभराटीचे दिवस आले व इंग्लंडचें नांव सर्व राष्ट्रांच्या मुखीं झालें.

पण एलिझाबेथचे शेवटचे दिवस सुखासमाधानांत गेले नाहींत. ती अविवाहित असल्यानें व आप्तेष्टांमध्येंहि तिच्या जिव्हाळ्याचें कोणी माणूस नसल्यानें तिला आपल्या आयुष्यांतील शेवटचे दिवस कंटाळवाणे जावेत यांत नवल नाहीं. तशांत लीस्टर, बर्ले, एसेक्स वगैरे तिचे आवडते लोक वारल्यामुळें तिला अधिकच अस्वस्थता प्राप्त झाली. अशा स्थितींत ती १६०३ मध्यें मार्च महिन्याच्या २४ व्या तारखेस मरण पावली.

एलिझाबेथच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या गोष्टीबद्दल ‘इंग्लंडचा इतिहास’ हा लेख पहा.

[संदर्भ ग्रंथ.-बिशप केटन-क्विन एलिझावेथ (१८९६); ल्यूसी ऐकिन-मेमॉयर्स ऑफ दि कोर्ट ऑफ क्वीन इलिझाबेथ (१८१८); राइट-क्वीन एलिझाबेथ अ‍ॅन्ड हर टाईम्स (१८३८)].

(२)-(१७०९-१७६२) एलिझाबेथ ही रशियाची बादशाहीण. पीटर दि ग्रेट व मार्था स्कोव्हराँस्काया यांची मुलगी असून मास्को येथें १७०९ डिसेंबर १८ रोजीं जन्मली. लहान वयांतहि तिची बुद्धि चांगली दिसत होती; परंतु दुर्दैवानें तिला शिक्षण अपुरें व अव्यवस्थित रीतीनें मिळालें. पीटर दि ग्रेटला व्यवसायातिशयामुळें फावत नसे व मातोश्री स्वत:च अशिक्षित पडल्या. म्हणून एक फ्रेंच गव्हर्नेस नेमिली होती. पुढें एलिझाबेथला इटालियन, जर्मन, स्वीडीश या भाषासुद्धां चांगल्या बोलतां येऊं लागल्या होत्या. दिसण्यांत मात्र लहानपणापासूनच एलिझाबेथ फार सुंदर व प्रफुल्लित दिसत असे. पीटर दी ग्रेटच्या मनांत तिला फ्रान्सच्या १५ व्या लुईला देण्याचें होतें. पण लुईला बोर्बोन घराण्याचा अभिमान असल्यामुळें त्याला असलें नातें आवडेना. नंतर पुष्कळ स्थळांबद्दल वाटाघाट झाली, परंतु एलिझाबेथच्या मनास त्यांपैकीं कोणीच येईना. पुढें १७२७ मध्यें तिची आई वारली व आवडती बहिण अ‍ॅन होलस्टीनला निघून गेली. तेव्हां वयाच्या अठराव्या वर्षी ती स्वत: सिद्ध बनली. त्यावेळीं दुसरा पीटर राज्यावर होता. आणि मेनशिकोव्ह प्रधान होता तोपर्यंत तिला तिच्या दर्जाप्रमाणें उदारपणानें वागविण्यांत आलें. परंतु लवकरच डोलगोरूकिस प्रधान झाला. तो पीटर दि ग्रेटचा द्वेषी होता; त्यानें पीटरच्या या मुलीला दरबारांत बहुतेक मज्जावच केला. पीटरच्याप्रमाणें त्याची मुलगी एलिझाबेथ हीहि विषयीवृत्तीची होती; शिवाय कोणी वडील माणसांचा दाबहि उरला नव्हता. मग काय विचारतां? सौंदर्य, तारूण्य व राजैश्वर्य यांनीं मदोन्मत्त होऊन ती विषयोपभोगांत स्वैर स्वछंदपणें मौजा मारूं लागली. ऐन विशीच्या अंगलांत पीटर दि ग्रेटची ही राजकन्या सैन्यांतल्या एका अ‍ॅलेक्झियस शुबिन नांवाच्या सार्जंटावर आषक होऊन त्याच्याशीं रमूं लागली! पुढें अ‍ॅन राणीच्या हुकूमानें या सार्जंटाला जीभ कापून जेव्हां लांब सैबेरियांत हांकून लावण्यांत आलें तेव्हां हिनें राझुमोव्हस्की नांवाचा एक सुंदर तरूण कोसॅक शिपाई गांठला व त्याच्याबरोबरच तिनें लग्न लाविलें. आपली चुलत बहीण अ‍ॅन हिच्या कारकीर्दीत (१७३०-१७४०) एलिझाबेथ बहुतेक अज्ञातवासांतच होती. पुढें अ‍ॅन लिओपोल्डोव्हना ही कारभार पाहात असतां विशिष्ट राजकीय परिस्थितीनें या खुपसुरत व आलस्यप्रिय राजकन्येला हालवून कार्योद्युक्त केलें. राज्याधिकारारूढ सर्व माणसांनां स्थान भ्रष्ट करून स्वत:रशियाची बादशाहीण होण्याचा या कर्तृत्ववान सुंदरीनें बेत केला. त्यावेळीं रशियन दरबारावर पगडा बसविण्याचें आस्ट्रियाचें कारस्थान सुरू होतें. तें हाणूंन पाडण्याकरितां तत्कालीन फ्रेंच वकिलानें वरील कल्पना एलिझाबेथच्या डोक्यांत शिरवून दिली हें खरें आहे. पण ही कल्पना सुचवून मदतीकरितां २००० ड्युकॅट देण्यापलीकडे मात्र फ्रेंच वकीलानें त्या कटांत भाग घेतला नव्हता. या अद्भुत कांतीचें सर्व श्रेय एकट्या एलिझाबेथलाच आहे. तिला आजन्म एका मठांत कोंडून ठेवण्याचा विचार चालू होता. तसली घोर आपत्ति टाळण्याकरितां तिनें आपल्यामधील अद्भुत सामर्थ्य एकदम प्रकट केलें. १७४१ डिसेंबर ६ रोजीं मध्यरात्रीच्या समयास बरोबर कांहीं मित्रमंडळी म्हणजे तिचा वैद्य, खासगी कारभारी, भावी पति व आणखी दोघे इसम घेऊन ती प्रीओब्रॅझेस्की गार्डस यांच्या छावणींत गेली व तेथें स्फूर्तिदायक भाषण करून तिनें आपल्या कार्यांत त्यांची सहानुभूति मिळविली व त्यांना बरोबर घेऊन विंटर पॅलेसकडे निघाली; वाटेनें तिनें सर्व मंत्र्यांनां कैद केलें; आणि राजवाड्यांत शिरून कारभारीण अ‍ॅन व तिचीं मुलें यांनां आंथरूणांतच गाठून पकडलें व सर्व बड्या लोकांची सभा बोलाविली. ही सर्व राज्यक्रांति तिनें एका रात्रींत इतक्या झटपट व बिनबोभाट रीतीनें घडवून आणिली कीं, खुद्द त्या शहरांतील लोकांनांहि सकाळीं आठ वाजेपर्यंत त्याचा मागमूस नव्हता. अशा तर्‍हेनें केवळ तीस-तेहेतीसाव्या वर्षी सुखालस्यांत लोळणार्‍या या स्त्रीनें राजव्यवहाराचें फारसें ज्ञान व मुळींच अनुभव नसतांहि रशियन साम्राज्याच्या बादशाहिणीचें पद प्राप्त करून घेतलें ! तो काळ तर रशियन साम्राज्याला मोठा आणीबाणीचा होता. पण सुदैवाची गोष्ट अशी कीं, पीटर दि ग्रेटच्या या मुलीमध्यें जरी बरेच दोष होते, तरी बापाचें राजकारणकौशल्यहि बरेंच उतरलें होतें. तिची तीक्ष्ण न्यायबुद्धि व कारस्थानपटुत्व पाहिलें कीं पीटर दि ग्रेटचीच आठवण होते. तिच्या वर्तनांत दिसणारा अनिश्चितपणा किंवा दीर्घसूत्रीपणा हे खरोखर दोष नव्हते तर सुनिश्चय होण्याकरतां ती प्रसंगविशेषीं मुद्दाम कालावधी लावीत असे; व आपल्यामधील स्त्रीस्वभावसहज दुर्ग्रहांनां बळी न पडतां ती आपलीं साम्राज्यविषयक कर्तव्यें बरोबर ओळखीत असे.

तिनें प्रथम पीटर दि ग्रेटच्या नमुन्यावर सेनेट सभा स्थापन केली. स्वीडनपासून आपल्या नव्या कारस्थानकुशल बेस्तुझेवर्यूमिन नांवाच्या व्हाइस चॅन्सेलरच्या करामतीनें फिनलंडचा दक्षिण भाग मिळवून तिकडील भांडण मिटविलें. नंतर बेस्तुझेवनें फ्रँको-प्रशियन दोस्तीचें धोरण सोडून देऊन अँग्लो-आस्ट्रो-रशियन दोस्तमंडळ स्थापन केलें. हें एलिझाबेथचें धोरणहि रशियाच्या अत्यंत हिताचें होतें. तिनें सैन्यहि जय्यत तयार ठेवलें होतें. यामुळें स्वीडन, पोलंड, टकीं वगैरे सर्व बाजूंनां रशियाचें वजन वाढून प्रशियाच्या फ्रेडरिक दि ग्रेटचे हातपाय जखडल्यासारखे झाले. याचें श्रेय बेस्तुझेवला आहे तितकेंच एलिझाबेथला आहे; कारण पुष्कळांनीं त्याच्याविरूद्ध कान फुंकले असतांहि त्याच्यावर तिनें अढळ विश्वास टाकला होता. एलिझाबेथच्या उत्तरावधींतील सप्तवार्षिक युद्ध हें महत्त्वाचें प्रकरण होय. त्यांत दोस्तीचे पूर्वकरार धाब्यावर बसवून ब्रिटन प्रशियास मिळालें तेव्हां एलिझाबेथनें फ्रँको-आस्ट्रो-रशियन दोस्ती करून १७५७ मे मध्यें कोनिंग्जबर्गवर ८५००० हजार सैन्य धाडलें. युद्ध चालू असतां ती आजारी पडली, बेस्तुझेव अधिकारच्युत झाला व खुद्द सेंट पीटर्सबर्ग येथें परराष्ट्रांनीं अनेक कुलंगडीं उपस्थित केलीं. पण युद्ध नेटानें चालवून कुनेर्सडार्फला प्रशियाचा जंगी पराभव करून तिनें फ्रेडरिकचा सफा नाश करण्याची वेळ आणली. तेव्हांपासून फ्रेडरिकनें जयाबद्दल निराश होऊन धास्तीच घेतली. तथापि रशियन व आस्ट्रियन सेनापतींत कांहीं कलह होऊन रशियाचे बेत ढिले पडले. तरी १७६१ पर्यंत एलिझाबेथनें रशियाच्या फायद्याच्या दृष्टीनें फ्रेडरिकच्या राज्यमर्यादा निश्चित ठरवून व त्याला ‘एलेक्टरां’ च्याच यादींत लोटून शेजार्‍यांस त्याच्या साम्राज्याकांक्षेचा उपद्रव होणार नाहीं असा बंदोबस्त करण्याची खटपट चालविली होती. फ्रेडरिकनेंहि १७६० मध्यें “माझे उपाय थकले, युद्ध चालू राहिल्यास मी ठार बुडणार!” असे उद्गार काढले परंतु १७६०-६१ हीं सालें फ्रान्स व आस्ट्रिया यांस यशस्वी न झाल्यामुळें त्यांनीं तहपरिषद भरविण्याचा रशियाला तगादा लावला. तरी १७६१ त रशियन सैन्यानें कोलबर्ग किल्ला जिंकून घेतलाच. त्यामुळें फ्रेडरिक पूर्ण निराशेंत असतां एकाएकीं मोठी आनंदाची बातमी त्याला मिळाली कीं, १७६२ जानेवारी ५ रोजीं ही रशियन बादशाहीण ख्रिस्तवास्ती झाली.

एलिझाबेथ अत्यंत स्वेच्छाचारी दिसत असली तरी तिच्या अंगीं अलौकिक गुण होते. ती पूर्ण स्वदेशाभिमानी असून जर्मनांनां पार हांकून लाविण्याचा तिचा बेत या गुणास अनुसरूनच होता. पीटरच्या वंशांत त्याचें नांव काढणारी तिच्याखेरीज दुसरी कोणी व्यक्ति झाली नाहीं. इंग्लंडच्या एलिझाबेथमध्यें हिच्यासारखे कांहीं अवगुण होते पण राजकारणपटुत्वाचा अभाव होता. तेव्हां ही रशियन सम्राज्ञी शहाणपणा मुत्सद्देगिरी या बाबतींत स्त्रीजातीला ललामभूत आहे यांत शंका नाहीं [राबर्ट निस्बेट बेन-दि डॉटर ऑफ पीटर दि ग्रेट; सर्गिई-हिस्टरी ऑफ रशिया पु २०-२२]

   

खंड ९ : ई ते अशुमान  

 

  ईजिप्त

  ईजियन समुद्र

  ईजियन संस्कृति
  ईटन-इंग्लंड
  ईडनिंबू
  ईथर
  ईदर
  ईदिग
  ईव्हशाम
  ईशोपनिषद
  ईश्वरकृष्ण
  ईश्वरीपूर
  ईश्वरसिंग
  ईसॉप
  ईस्ट इंडिया कंपनी
  ईस्ट इंडीज
  ईस्टर
  ईस्टर बेट
  ईस्टविक्, एडवर्ड बॅक् हाऊस
  ईक्षणयंत्र
 
  उकाँग
  उकुंद
  उखाणे
  उखामंडळ
  उग्रसेन
  उचकी (हिक्का )
  उचले व भामटे
  उचाड
  उच्च-पंजाब
  उच्च शहर
  उच्च
  उच्छर
  उंज
  उज्जनी
  उज्जयन्ताद्रि
  उझानी
  उंट
  उटकटारी
  उटकमंड
  उंड
  उंडवलें
  उंडविन
  उडियासांझिया
  उडीद
  उडुपी
  उड्र
  उतथ्य
  उत्तंक
  उत्तनगरै
  उत्तमपालेयम
  उत्तर
  उत्तर अमेरिका
  उत्तरध्रुवप्रदेश
  उत्तरपाडा
  उत्तर मेरूर
  उत्तर सरकार
  उत्तरा
  उत्तरापथ
  उत्तानपाद
  उत्पल
  उत्पादन
  उत्रौला
  उदमलपेट
  उदयगिरी
  उदयन
  उदयनाचार्य
  उदयपूर
  उदयप्रभसूरि
  उदयभानु
  उदयसिंह
  उदर
  उदलगुरी
  उदाजी पवार
  उदासी
  उंदिरखेड
  उंदीर
  उदेपुरी बेगम
  उदेपूर संस्थान
  उदेपूर गांव
  उदेपूर शहर
  उदेपूर
  उदेय्यार पालेयम्
  उंदेरी
  उद्गाता
  उद्गीर
  उद्गीरची लढाई
  उद्दंड
  उद्दंडपुर
  उद्दालक
  उद्धव
  उद्धव गोसावी
  उद्धवचिद्घन
  उद्धव नाला
  उद्धव योगदेव
  उद्बोधनाथ
  उद्वेग रोग
  उन
  उन-देलवाडा
  उनबदेव
  उना
  उनियार
  उनी
  उन्कल
  उन्नाव
  उन्माद
  उन्सरी
  उपकन्चा
  उपकेशगच्छ
  उपनयन
  उपनिधि
  उपनिषदें
  उपनेत्र
  उपप्लव्य
  उपमन्यु
  उपरवार
  उपरि
  उपरिचर
  उपवेद
  उपशून्य
  उपसाला
  उपांशु
  उपेनंगडी
  उपेन्द्र परमार
  उप्पर
  उप्माक
  उप्रई
  उप्लेटा
  उंबर
  उम्बेक
  उबेरो
  उंब्रज
  उमत्तूर
  उमरकोट
  उमर खय्याम
  उमरखान
  उमरखेड
  उमरबिन खत्तब
  उमरावती
  उमरी
  उमरेठ
  उमरेड
  उमा
  उमाजी नाईक
  उमापति
  उमापति शिवाचार्य
  उमाबाई दाभाडे 
  उमीचंद
  उमेटा
  उमेदवारी
  उमेरिया
  उर
  उरगप्पा दंडनाथ
  उरण
  उरल पर्वत
  उरलि
  उरवकोंड
  उरिया, उडिया
  उरी
  उरुळी
  उरोगामी
  उर्दुबेगी
  उर्फी, मौलाना
  उर्मिया सरोवर
  उर्मिया, शहर
  उर्वशी
  उलघबेग मिरझा
  उलूक
  उलूपी
  उलेमा
  उल्का
  उल्बारिया
  उल्म
  उल्लतन
  उल्लाळ 
  उवा
  उशना, वैदिक
  उशीनर
  उकूर
  उषा
  उष्टारखाना
  उष्णता
  उष्णताजन्य विद्युत
  उष्णतामापन
  उष्णता-रसायनशास्त्र
  उष्णतावहन
  उष्णमानमापक यंत्र
  उस्का
  उस्तरण
  उस्मान
  उस्मान नगर
  उस्मानाबाद
  उळवी
 
  ऊदाइन (बेंझाईन)  
  ऊदाम्ल
  ऊदिदिन
  ऊदिन
  ऊदिल अल्कहल
  ऊदिल प्रायोज्जिद
  ऊदिल भानन
  ऊधमबाई
  ऊरूस्तंभ
  ऊर्ध्वपातनक्रिया
  ऊस
 
  ऋग्वेद
  ऋचीक
  ऋणमोचन
  ऋतु
  ऋतुपर्ण
  ऋत्विज
  ऋभु वैदिक
  ऋषभ
  ऋषि
  ऋषिऋण
  ऋषिक
  ऋषिपंचमी
  ऋषियज्ञ
  ऋषिवरण
  ऋष्यमूक
  ऋष्यवान
  ऋष्यशृंग
  ऋक्षरजा
 
  एओलिस
  एकचक्रा
  एकत
  एकतत्त्ववाद
  एकदंत भट्ट
  एकनाथ
  एकबटाना
  एकर
  एकरुक
  एकलव्य
  एकलिंगजी
  एकादशरुद्र
  एकादशी
  एकिल्
  एक्झीटर
  एक्रान
  एक्स
  एक्स-ला-चॅपेल
  एगमाँट लॅमोरल कौंट ऑफ
  एगिनकूर
  एचर्ड
  एंजिन
  एट्ना
  एट्रूरिया
  एडगर
  एडन
  एडन कालवा
  एडप्पल्ली
  एन्डर
  एडवर्ड
  एडवर्डसाबाद
  एडिंबरो
  एडेन जॉर्ज - लॉर्ड ऑकलंड
  एडेसा
  एडोम
  एड्रियन
  एदलाबाद
  एनमे
  एनॅमल
  एन्नोर
  एपिक्टेटस
  एपिक्यूरस
  एपिनस, फ्रान्झ उलरिच थिओडार
  एपीडॉरस
  एंपीडोक्लिस
  एफेसस
  एबनी (अबनूस)
  एबल सर फ्रेडरिक
  एंब्रान
  एमडेन
  एमॅन्युअल व्हिक्टर
  एमिनाबाद
  एमीन्स
  एमेअस
  एमेरी
  एम्मेट रॉबर्ट
  एरंडी
  एरंडोल
  एरन
  एरनाड
  एरवल्लर
  एरिडु
  एरिथ्री
  एरिनपुर
  एरियन
  एरिलिगारू
  एरोड
  एर्नाकुलम
  एलगंडल
  एलाम
  एलाय
  एलिआकॅपिटोलिना
  एलिचपूर
  एलिझाबेथ
  एलिस
  एलेनबरो
  एलेफन्टा
  एल्जिन
  एल्जिन लॉर्ड
  एल्फिन्स्टन मौंट स्टुअर्ट
  एल्ब
  एल्बा
  एल्युथेरापीलीस
  एल्युसिस
  एल्सिनोर
  एसर हजन
  एसेक्स परगणा
  एस्किमो
 
  ऐतरेय आरण्यक
  ऐतरेय उपनिषद्
  ऐतरेयब्राह्मण
  ऐन
  ऐनापुर
  ऐनी-अकबरी
  ऐनुद्दीन
  ऐनू
  ऐमक
  ऐयनर
  ऐरणी
  ऐरावत
  ऐहिकवाद
  ऐहोळ
 
  ओक
  ओक वामन दाजी
  ओकटिवन
  ओकपो
  ओकलंड शहर
  ओकहॅम
  ओकुमा, कौंट
  ओकू
  ओकेन, लॉरेन्झ
  ओकोनेल डॅनियल
  ओक्लाहामा
  ओच्चन
  ओजिब्वा
  ओझर
  ओझा
  ओट
  ओटावा
  ओट्टो
  ओडर नदी
  ओडेसा
  ओडोनेल हेनरी जोसेफ
  ओतारी
  ओतुर
  ओध
  ओनला
  ओनेगा
  ओन्गोले
  ओपोर्टो
  ओफीर
  ओब्रायन वुइल्यम स्मिथ
  ॐ ( ओम् )
  ओमान
  ओम्स्क
  ओयामा
  ओरई
  ओरॅंग ऊटंग
  ओरकझई
  ओरछा
  ओरावन
  ओरिसा 
  ओरिसा कालवे
  ओरिसांतील मांडलिक संस्थानें
  ओर्मेरॉड एलिअनॉर
  ओलपाड
  ओल्डहॅम
  ओल्डहॅम थॉमस
  ओल्डेनबर्ग
  ओवसा
  ओवा
  ओवेन, रॉबट
  ओवेन सर रिचर्ड
  ओव्हिड
  ओशीमा
  ओषण
  ओसवाल
  ओसाका अथका ओझावा
  ओस्कार
  ओस्टीयाक
  ओहम्, जार्ज सायमान
  ओहममापक
  ओहिओ
  ओहिंद
  ओळंबा
 
  औक अथवा अवुक जमीनदार
  औट्रम
  औतें
  औदीच्य ब्राह्मण
  औद्देहिक
  औद्योगिक परिषद
  औंध
  औंधपट्टा
  औधेलिया
  औनियाति
  औरंगझेब अलमगीर
  औरंगाबाद
  औरंगाबाद सय्यद शहर
  और्व
  औशनस
  औसले सर विल्यम
  अं
  अंक
  अंकगणित
  अंकचक्र
  अंकलगी
  अंकलेश्वर
  अंकाई टंकाई
  अंकिसा
  अंकेवालिया
  अॅंकोना
  अॅंकोबार
  अंकोर
  अंकोला
  अंग
  अंगठी
  अंगडशाहा
  अंगडि
  अंगडिपूरम
  अंगद
  अंगदशिष्टाई
  अंगदिया
  अंगरखा
  अंगापूरकर (हरि)
  अंगारा
  अंगुत्तर निकाय
  अंगुर शेफ
  अंगुळ
  अंगोरा शहर
  अॅंगोला
  अॅंग्विल्ला
  अंघड
  अंचलगच्छ
  अंज-(अॅंटिमनी)
  अंजनगांव
  अंजनगांव बारी
  अंजनगांव सुर्जी
  अंजनवेल
  अंजनी
  अंजनेरी
  अंजार
  अंजिदिव
  अंजी
  अंजीर
  अंजू
  अंजेंगो
  अॅंजलिको फ्रा
  अॅंटनान-रिव्हो
  अॅंटवर्प
  अंटिओक
  अॅंटिग्वा
  अॅंटियम
  अॅंटिलीस
  अॅन्टिव्हरी
  अन्टीगोनस गोनाटस
  अॅन्टीगोनस सायक्लॉप्स
  अॅन्टीपेटर
  अॅन्टीलिया
  अॅंटोनिनस पायस
  अॅंटोनियस ( मार्कस )
  अंडवृध्दि
  अण्डाशयछेदनक्रिया
  अॅंडीज
  अंडें
  अंडोरा
  अंडोल
  अंडोला
  अॅंड्रासी ज्युलियस
  अॅंड्रिया डेल सार्टो
  अॅंड्रोमेडा
  अॅंड्रयूज थॉमस
  अंतगड
  अंतधुरा
  अंतर इब्नशद्दाद
  अंतराल
  अंतर्गळ
  अंतर्वेदी
  अंतर्ज्ञान
  अंताजी ( उर्फ बाबुराव ) मल्हारराव बर्वे
  अंताजी माणकेश्वर
  अंताजी रघुनाथ
  अंतालिमा
  अंतुर्ली
  अंतूर
  अंतोबा गोसावी
  अंत्रपुच्छदाह
( अपेंडिसाइटीज )
  अंत्रावरणदाह
( पेरिटोनिटिस )
  अॅंथनी सुसान ब्रौनेल
  अंदमान आणि निकोबार बेटें
  अंदमान बेटें
  अंदाळ
  अंदोरी
  अंध किंवा आंध
  अंधक
  अंधत्व
  अंधरगांव
  अंधळगांव
  अंधारी नदी
  अंब
  अंबत्तन
  अंबर ( धातु )
  अंबर
  अंबर उदी
  अंबरखाना
  अंबरनाथ अथव अमरनाथ
  अंबरनाथ
  अंबरपेठ
  अंबराम्ल
  अंबरीष
  अंबलक्कारन्
  अंबलपुलई
  अंबलवासि
  अंबष्ठ
  अंबहटा
  अंबा
  अंबा, (तालुका)
  अंबागड
  अंबागडचौकी
  अंबाजी इंगळे
  अंबाजी दुर्ग
  अंबाजी पुरंधरे
  अंबाडी
  अंबा भवानी
  अंबाला
  अंबालिका
  अंबाली
  अंबासमुद्रम
  अंबिका
  अंबिका दत्त व्यास
  अंबिकापूर
  अंबुशी
  अंबूर
  अंबेर
  अंबेला
  अंबेहळद
  अंबोयना
  अंबोली
  अंभोरा
  अंशुमान
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .