विभाग नववा : ई-अंशुमान
एल्युथेरापीलीस - हें पॅलेस्टाईनमधील प्राचीन शहर यरूशलेमपासून २५ मैलांवर गाझाच्या रस्त्यावर आहे. इ. रॉबिन्सनच्या मतें हें आधुनिक बैत जिब्रीन असावें. टॉलेमी याला बेटॉगॅब्रा नांव देतो. यास सेप्टिमीअस सेव्हेरस (इ. स. २०२) हा सिरियांत गेला त्या वेळेपासून एल्यूथेरापोलीस नांव मिळालें. इ. स. ७९६ त याचा नाश झाला होता. ११३४ त धर्मयोध्यांनीं हें पुन्हां वसविलें. येथील प्रसिद्ध गुंफा आजूबाजूच्या डोंगरांत आहेत. जवळच अपोलोफानेझची कबर आहे.