विभाग नववा : ई-अंशुमान
ऐ - इ. स. पू. २ र्या शतकांतल्या हाथांगुंफा येथील लेखांत पहिल्या अवस्थेंतील ‘ए’ ला डोक्यावर आडवी रेघ काढून ‘ऐ’ बनविल्याचें दिसून येंतें दुसर्या अवस्थेंतील ‘ए’ ला मात्रा देऊन ‘ऐ’ केल्याचे उदाहरण इ. स. ६ व्या शतकांतीक उष्णीविजयधारिणीच्या पुस्तकांत आढळतें. पुढील शतकांतल्या कुयारकोट लेखांत तिसर्या अवस्थेंतील ‘ए’ ला चांगली मोठी मात्रा देऊन ऐ अक्षर काढलें आहे. दहाव्या शतकापर्यंत असाच ऐ काढीत असत असें दिसतें. १२ व्या शतकांतील हस्तलिखित पुस्तकांत हल्लींचा वळणदार ऐ पहावयास मिळतो