विभाग नववा : ई-अंशुमान
ऐतरेय उपनिषद् - ऐतरेय उपनिषद हें फारच लहान आहे. त्याचे तीन अध्याय आहेत. पहिल्या अध्यायामध्यें जग हें ब्रह्मापासून निर्माण झालें असून मनुष्यप्राणी हा त्याचें अत्युच्च व्यक्त स्वरूप होय असें म्हटलेलें आहे. तसेंच मनुष्यामध्यें इंद्रियें, मन व हृदय या तीन करणांत आत्मा वास करतो. व तदनुरूप जागृति, स्वप्न स्थिति व निद्रा या तीन अवस्था उत्पन्न होतात असेहि त्यांत म्हटलें आहे. दुसर्या अध्यायांत आत्म्याच्या त्रिविध जन्मांचा विचार केला आहे. संसाराचा अंत म्हणजेच मोक्ष होय व स्वर्गांतील अमरत्व (पूर्ण स्थिति) म्हणजे मोक्ष होय असें म्हटलें आहे. तिसर्या अध्यायांत आत्म्याचें स्वरूप वर्णिलें असून प्रज्ञा म्हणजेच ब्रह्म होय असें प्रतिपादिलें आहे.