विभाग नववा : ई-अंशुमान
ऐनापुर - मुंबई इलाखा. बेळगांव जिल्हा. अथणीच्या नैर्ऋत्येस सुमारें १३ मैलांवर अथणी-कागवाड रस्त्यावर हा एक गांव आहे. लोकसंख्या सुमारें चार हजार.
गांवाबाहेर एका मोठ्या तलावाजवळ पीर काजी फकीराचें थडगें आहे. इ. स १६३९ तील फ्रेंच प्रवासी मंदेलस्लो यानें याचा एनाटूर म्हणून उल्लेख केलेला आहे. मिरजच्या पटवर्धन घराण्यापैकीं गोपाळराव हे निपुत्रिक मरण पावल्यामुळें इ. स. १८४२ सालीं हा गांव व इतर आठ खेडीं ब्रिटिश मुलुखांत समाविष्ट झालीं.