विभाग नववा : ई-अंशुमान
ऐरावत (१) - एक नाग. (तपस्य श. पहा.) हा कद्रुपुत्र होय.
(२) पृथ्वीच्या आसमंतात आठहि दिशांकडे जे दिग्गज आहेत त्यांतील पूर्वेकडील दिग्गज हा सर्व दिग्गजांचा स्वामी, व इंद्राचा वाहनरूप होय. हा शुभ्र वर्णाचा असून यास चार दांत आहेत.
(३) समुद्रमंथनकालीं निघालेला जो चवदा रत्नांतील गज तो हा होय.