विभाग नववा : ई-अंशुमान
ऐहिकवाद - होलियोकच्या समाजनीतिशास्त्रविषयक मतास ऐहिकवाद हें नांव आहे. नांवाप्रमाणें व्यावहारिक नीतिशास्त्र व समाजाच्या भौतिक व नैतिक उन्नतीच्या दृष्टीनें या मताची उभारणी केली आहे. हें मत ईश्वराच्या अस्तित्व नास्तित्वासंबंधीं मुग्ध आहे. हा एक उपयुक्ततावादाचाच प्रकार आहे. होलियोकनें लंडन येथें एक मंडळ स्थापन केलें. चार्लस ब्राडलॉच्या नेतृत्वाखालीं या मंडळानें प्रचलित ख्रिस्ती संप्रदाय मोडून काढण्याचा व इतर राजकीय व सांपत्तिक सुधारणांचा पुरस्कार केला.