विभाग नववा : ई-अंशुमान
ओकू - एक जपानी सेनापति. १९०४-५ च्या रूसोजपानी युद्धांत ओकूनें मोठीच मर्दुमकी गाजविली. पोर्टआर्थर घेण्यापूर्वी नॅन्सन, टेलिसू व इतर ठिकाणें ओकूनें घेऊन लिआओ-यंग (मांचूरिया) कडे रशियाला हांकून लाविलें. प्रख्यात सेनापति नोगी याला ओकूची विशेष मदत होती.