विभाग नववा : ई-अंशुमान
ओच्चन - मारन लोकांनां किंवा तामिळ देशांतील वाद्यवादकांनां दिलेलें नांव. या जतीची लोकसंख्या सुमारें सहा हजार (१९११) आहे. कांहीं हिंदु देवालयांत हे पुजार्यांचें काम करतात. ते प्राय:शैव असतात. देवालयांत असेपर्यंत कांहींजण यज्ञोपवीत धारण करतात. त्रावणकोरमध्यें राजकृपेनें द्योतक म्हणून ओच्चन ही पदवी देण्यांत येते. यांच्या मृतांस पुरण्याची चाल आहे.