विभाग नववा : ई-अंशुमान
ओझा - हे लोक गोंडाचे शकुन सांगणारे जोशी व त्यांचे भाट आहेत. पण यांची आतां स्वतंत्र उपजात झाली आहे. ओझा शब्दाचा अर्थ ओझ-आतडें असा आहे. रोमन लोकांत जे पुरोहित असत ते बळी दिलेल्या प्राण्यांचीं आंतडीं काढून पाहून त्यांवरून शकुन, भविष्य वगैरे वर्तवीत असत. तशीच कदाचित यांच्याकडे कामगिरी असेल. यांची संख्या ५००० आहे हे लोक सातपुड्यांत कोरकू लोकांचेहि जोशी बनले आहेत. यांपैकीं कांहीं लोक पक्षी पकडतात व म्हणून त्यांस मोधियाहि म्हणतात.