विभाग नववा : ई-अंशुमान
ओतुर - मुंबई इलाख्यांतील पुणें जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यांतील एक खेडें. लोकसंख्या (१९०१) ६३९२. खानदेशांतील भिल्ल लोकांनीं फार त्रास दिल्यामुळें संरक्षणार्थ बांधलेला किल्ला येथें आहे. महादेवाचें व केशवचैतन्याचें अशीं दोन देवालये येथें आहेत. येथें श्रावण महिन्यांत शेवटच्या सोमवारीं प्रतिवर्षी जत्रा भरते.