विभाग नववा : ई-अंशुमान
ओनला, त ह शी ल.- संयुक्तप्रांत. बरेली जिल्ह्याची नैर्ऋत्य दिशेकडील तहशील. हींत ओनला, बालिआ, सनेहा, आणि शिरोली (दक्षिण हे परगणे आहेत. उ. अ. २८० १०’ ते २८० ३१’ व पू. रे. ७८० ५८’ ते ७९० २६’ यांचे दरम्यान. क्षेत्रफळ ३०७ चौरस मैल. या तहशीलींत ३ गांवें व ३२६ खेडीं आहेत. लोकसंख्या (१९११) २०७५९८. जमीनमहसूल (१९०३-४) २,७५,००० व कर ४६००० इ. स. १९०३-४ सालीं २४० चौरस मैल जमीन लागवडीखाली असून पैकीं ५६ चौ. मै. बागाइती होती.
गां व.- संयुक्तप्रांत बरेली जिल्ह्याच्या याच नांवाच्या तहशिलीचें हें मुख्य ठिकाण असून अलीगड ते बरेली शहर या दरम्यान असलेल्या औध रोहिलखंड रेल्वेचें स्टेशन आहे. यांस ओनला, अल्वला हींहि नांवें आहेत. उ. अ. २८० १७’ व पू. रे. ७९० १०’ यांवर. लो. सं (१९११) १३०२५. अन्वला नांवाच्या झाडापासून या गांवास हें नांव पडलें असावें. चौदाव्या व पंधराव्या शतकांत येथें दाट जंगल होतें. ऐनी अकबरींत हें एका परगण्याचें मुख्य ठिकाण होतें असें दाखविलें आहे. इ. स. १७३० सालीं रोहिल्यांचा पुढारी अली महमद यानें हा गांव काबीज करून आपलें राहण्याचें मुख्य ठिकाण केलें. परंतु त्याच्या मरणानंतर त्याच्या मुलांनीं निरनिराळ्या जागीं आपलीं राहण्याचीं ठिकाणें केलीं त्यामुळें या गांवाचें महत्त्व कमी झालें. अली महमदच्या वेळचा किल्ला अद्यापि अस्तित्वांत आहे.