विभाग नववा : ई-अंशुमान
ओन्गोले, पो ट वि भा ग- मद्रास इलाख्यांतील गन्तूर जिल्ह्याचा एक पोटविभाग. ह्यांत ओन्गोले व बापटला तालुक्यांचा समवेश होतो.
ता लु का.- मद्रासमधील गन्तूर जिल्ह्याचा एक तालुका. क्षेत्रफळ ७९२ चौ. मै बहुतेक जमीन सपाट असून कांहीं ठिकाणीं टेंकड्या आहेत. चिमाकुर्ति हें सर्वांत उंच शिखर असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची २०७९ फूट आहे.
मुख्य नद्या - गन्डलकम्मा, भुडिगंडी, मुसी व तिची उपनदी चिलकलेरू व पलेरू या आहेत. लो. सं (१९११) २४६२७३. मोठीं गांवें ओन्गोले, कोट्टपटम, अदन्कि हीं असून खेडीं १६१ आहेत. जमीन चिकण व काळी आहे. पाऊस पाणी चांगलें पडलें तर येथें पीक फार उत्तम येतें. मुख्य पीक सोलम हें आहे.
गां व - मद्रास इलाख्यांतील गन्तूर जिल्ह्यांत ओन्गोले पोटविभागाचें व तालुक्याचें मुख्य ठिकाण. मद्रासहून १८१ मैल. लो. सं. (१९११) ११२८६. म्यु. स्थापना १८७६. येथें औद्योगिक शिक्षणसंस्था आहेत. येथें शिक्षकांकरितां ट्रेनिंग कॉलेज आहे. येथून, कडधान्यें, तूप व चामडें मद्रास व इतर ठिकाणीं पाठविलें जातें.