विभाग नववा : ई-अंशुमान
ओरई , त ह शी ल:- संयुक्त प्रान्तांतील जालौन जिल्ह्याची मुख्य तहशील. क्षेत्रफळ ३०७ चौ. मै. लो. सं. (१९११)५८४६३. खेडीं १०५ व १ शहर. ओरई बेटवा नदीच्या उत्तरेस आहे. येथील जमीन फार सुपीक आहे. १८९३ सालीं बर्फवृष्टीमुळें फार नुकसानी झाली. बेटवा कालव्याची हमीरपूर शाखा ह्या तहशिलींत असून तीपासून जमीनीस पाणी मिळतें.
गां व:- संयुक्त प्रान्तांतील ओरई तहसिलीचें व जालौन जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. कानपूर सागरच्या रस्त्यावर हें आहे. लो. सं. (१९११) ९१५१. सन १८३९ सालीं हें जिल्ह्याचें मुख्य ठिकाण करण्यांत आलें. ‘बुंदेलखंड एनकंबर्ड इस्टटेस’ अॅक्टाप्रमाणें येथें स्पेशल जज्जाची नेमणूक झाली आहे. गांवाच्या दक्षिणेस एक मोठा तलाव आहे. म्यु. स्थापना १८७१. व्यपार कांहीं नाहीं.