प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग नववा : ई-अंशुमान

ओरिसा, वि भा ग.- बिहार-ओरिसा प्रांताचा एक विभाग. पश्चिम बंगाल ते मद्रास व छोटानागपूरची डोंगरसपाटी ते बंगालचा उपसागरपावेतों पसरलेला हा प्रदेश असून याचें मुख्य ठिकाण कटक शहर आहे ह्या विभागांत पांच जिल्ह्यांचा समावेश होतो. १९०५ सालीं मध्यप्रदेशाच्या छत्तिसगड विभागांतील सम्बलपूर जिल्हा या विभागांत घेण्यांत आला. पण त्यांतील दोन जमीनदार्‍या मध्यप्रदेशांतच ठेवण्यांत आल्या आहेत. क्षेत्रफळ १३७४३. लोकसंख्या १९२१ सालीं ४९६८८७३ होती. या लोकसंख्येपैकीं ४७७६३०३ हिंदू ११७७८९ मुसलमान व ८२०९ ख्रिस्ती आहेत. इतर धर्मांचे लोक फार थोडे आहेत. या विभागांतील जिल्ह्यांचीं नांवें:- कटक, बालासोर, अन्गुल, पुरी व सम्बलपूर हीं होत.

ओरिसा म्हणजे उडिया भाषा बोलणारे लोक ज्या भागांत रहातात तो प्रदेश होय. पण ब्रिटिश अमदानींत ही संज्ञा चिल्का सरोवरापासून तो सुवर्णरेखा नदीपर्यंतच्या प्रदेशास लावितात. ह्यांत अगोदर सांगितलेल्या पांच जिल्ह्यांचा व ओरिसा मांडलिक संस्थानांचा (हीं एकंदर २४ आहेत) समावेश होतो. ओरिसाचा कमिशनर ह्या संस्थानांचा सुपरिंटेंन्डट आहे. त्यास सेशनजज्जचा व हायकोर्टचा अधिकार आहे. पहिले चार जिल्हे छोटानागपूरच्या डोंगरसपाटीचा समुद्रापर्यंतचा प्रदेश व्यापितात. सम्बलपूर महानदीच्या खोर्‍यांत आहे. बहुतेक भागांतून उडिया भाषा बोलतात. उडिया भाषेकरितां ‘उरिया’ पहा.

इ ति हा स.- ओढ्या हें नांव ओड्रदेश या प्राचीन प्राकृत नांवावरून आलेलें आहे; ओढ्यादेश म्हणजें पूर्वेकडे बंगालचा समुद्र आणि पश्चिमेस विंध्यपर्वत याच्यामध्यें असलेला पट्टा होय. त्याची लांबी उत्तरेकडे गंगानदीच्या पश्चिममुखापासून तों दक्षिणेकडे चिल्कानामक प्रसिद्ध सरोवरापर्यंत आहे. या सरोवराचा विशेष असा आहे कीं, तें भरतीच्या वेळीं समुद्राचें पाणी आंत येऊन बनलेलें आहे इतका त्याचा प्रदेश समुद्रसपाटीच्या मानानें खोलगट आहे. पश्चिमेकडील पर्वतराशींवरून वहाणार्‍या महानदीसारख्या मोठमोठ्या नद्यांबरोबर वाहून आलेल्या गाळाचा जो अरूंद थर बसला आहे तोच काय तो समुद्र व हें सरोवर यांची हद्द होय. हा जमिनीचा पट्टा फार सुपीक असल्यामुळें प्राचीन काळापासून वेळोंवेळीं येथें बाहेरून येऊन लोकांनीं वसाहती केल्या आहेत. दंडकारण्यासारख्या निबिड प्रदेशांतहि वसाहती करण्यांत हौस मानाणार्‍या आर्यांचे धुरीण जो ब्राह्मणवर्ग तोच येथील पहिला वसाहत करणारा होय. या आर्यांनीं येथें आल्यावर आपला धर्म आणि भाषा मूळच्या अनार्य लोकांना स्वीकारावयास लाविली, व अशा रीतीनें त्यांच्यावर आपला पगडा बसविला. हे अनार्य लोक बहुतेक कैवर्त म्हणजे मच्छमारी वर्गापैकीं होते. आर्यांनीं तेथें वसाहत केल्यापासून हा प्रान्त भरभराटीस लागला. तथापि अंग, वंग आणि कलिंग या प्रदेशांप्रमाणेंच पूर्वीं तोहि शुद्ध आर्यांच्या वस्तीला निषिद्ध असाच मानीत असत. मनुस्मृतीमध्यें (१० ४४) ओड्रांनां म्लेंच्छ म्हटलें असून आर्यांनीं तेथें जाणें अप्रशस्त मानिलें आहे.

आर्यांच्या मागाहून ओढ्या प्रांतांत वसाहतीसाठीं आलेले लोक बौद्ध होत. अशोकानें ओढ्याच्या पलीकडे दक्षिणेकडील कलिंग देश जिंकून तेथील अनेक लोकांची कत्तल केली, व तेव्हांपासून त्याला उपरति होऊन तो अहिंसावादी धर्माचा अनुयायी बनला हें प्रसिद्धच आहे. अशोकापासून म्हणजे इ. सनापूर्वीं २५० पासून पुढें कित्येक शतकेंपर्यंत ओढ्या देशावर बौद्ध धर्माचें वर्चस्व होतें. पुढें इ. स. ३२० च्या सुमारास रक्तबाहु नांवाच्या कोणा राजानें तेथें येऊन बौद्धधर्मींयांचा पाडाव केला व तेथें आपलें राज्य स्थापिलें आणि त्याचा वंश तेथें इ. स. ४७४ पर्यंत नांदत होता असें सर विल्यम हंटरनें ताडपत्रावरील लेखांच्या आधारानें लिहिलें आहे.

या यवनांनीं म्हणजे ग्रीकवंशीय लोकांनीं आपल्या धर्माचें स्मारक म्हणून जीं कोरीव लेणीं करून ठेविलीं आहेत त्यांतील देव व मनुष्यें यांचें चेहरे ग्रीक वळणाचे आहेत असें पुराणवस्तुसंशोधकांचें ठाम मत आहे. एकंदर यवनांच्या हालचालीचा व या गोष्टीचा विचार करतां त्यांचे कर्ते म्हणजे ओढ्या प्रांतावर राज्य करणारे हे यवन मूळ बॅक्ट्रिया देशांतून इकडे आलेल्या ग्रीकांपैकींच होते ह्या म्हणण्याला चांगलेंच पाठबळ मिळतें. इ. स. ४७४ त या यवन राजघराण्याला ययाति केसरिनामक कोणा राजानें हुसकून लाविलें असें कांहीं ताडपत्रलेखांत म्हटलें आहे. हें नवीन केसरीघराणें मुख्यत: शिवोपासक असून विष्णूचा देखील स्थितिकर्ता म्हणून त्यांच्याकडून योग्य तो आदर होत असे. बौद्धमत व शैवमत यांचा परस्परांवर वर्चस्व संपादण्यासाठीं १५० वर्षेंपर्यंत सारखा झगडा सुरू होता. केसरी घराण्याची राजधानी भुवनेश्वर नांवाची होती व तींत शैवमताचें वर्चस्व होतें.

केसरी राजांनीं शिवाचीं प्रचंड मंदिरें बांधिलीं, इतकेंच नव्हें तर त्यांनीं ब्रह्मण धर्माच्या पुनरूज्जीवनास देखील विशेष तर्‍हेनें हातभार लाविला. मोडकळीस आलेल्या बौद्धधर्मींय विहारादिकांच्या सन्निध केसरी घराण्याच्या भुवनेश्वर या राजधानीची स्थापना झालेली होती; व जयपूर येथील वसाहत म्हणजे धर्माच्या पुनरूज्जीवनामुळें स्थापन झालेली नवी राजधानी होय. या दोन ठिकाणांमध्यें महानदीचा दुआब आहे. या नव्या जयपूर राजधानीचा हळू हळू उत्कर्ष होत गेला आणि ह्युएनत्संगानें त्या नगराला भेटहि दिली होती असें कनिंगहॅम म्हणतो. केसरी राजांपैकीं पहिले पहिले राजे आपला दरबार शिवमंदिरांनीं खचित अशा भुवनेश्वरपुरांत कधीं भरवीत, तर कधीं महानदीच्या कांठीं नवीन वसविलेल्या ब्राह्मण वस्तीच्या जयपुरांत भरवीत. पण पुढें इ. स. ९५३ ते ९६१ पर्यंत राज्य केलेल्या एका रणधीर राजानें महानदीचीं मुखें फुटण्याच्या स्थळाचें लष्करीदृष्ट्या महत्त्व ओळखून तेथें कटक नांवाची आपली राजधानी स्थापन केली व तीच अद्यापीहि ओढ्या प्रांताची राजधानी आहे. केसरीघराण्याच्या भव्य इमारती व पुरींतील पुलासारख्या वैभवचिन्हांव्यतिरिक्त राजकारणविषयक कांहीं गोष्टी आज सांगण्यासारख्या नाहींत. केसरी घराण्याचा अंमल ओढ्या प्रांतांत इ. स. ११३२ पर्यंत होता; व इ. स. १०३० त कटक शहराची स्थापना झाल्यापासून त्याची राजधानी तेथेंच होती असें प्राचीन लेखांवरून दिसून येतें. इ. स. १०३० च्या सुमारास ओढ्या प्रांतांत राज्यक्रांति होऊन केसरी घराणें नामशेष झालें. या वेळीं राज्यपक्षाबरोबर धर्मक्रांति देखील झाली व एका अर्थी वैष्णवमतरूपानें बौद्ध धर्मानेंच आपलें डोके पुन्हां वर केलें. [वैद्य-मध्ययुगीन भारत, भाग १, पृ २४०-२५१].

तदनंतर कलिंग नगरच्या चोरगंगवंशाची अमदानी सुरू झाली. हे राजे वैष्णवधर्मीय होते. पुरी येथील जगन्नाथाचें देवालय व कोनारक येथील काळें देवालय त्यांनींच बांधिलें. जयपूर व इतर स्थळीं सूर्योपासनाहि होत असे. शांतीश्वराच्या देवळांत अग्न्युपासनेचा पंथ दिसत होता (हंटरकृत ओरिसा १, १८६). यांचें मुसुलमानांशीं नेहमीं खटके उडत असत. १३६१ सालीं फिरोजशहानें ओरिसावर स्वारी केली. १४३४ मध्यें सूर्यवंशीय कपिलेश्वर देवराजानें गादी बळकावली व त्यानें दक्षिणेस पेन्नार नदीपावेतों आपला राज्यविस्तार केला. पण त्याच्या वंशजापासून गोंवळकोंड्याच्या मुसुलमान राजांनीं हळू हळू हा जिंकिलेला प्रदेश हिरावून घेतला. उत्तरेकडून मुसुलमान राजे रेटूं लागले. व शेवटीं १५६८ मध्यें शेवटचा हिंदू राजा मुकुंद देव ह्यास सुलेमानकर राणीचा सरदार कालापाहाड यानें अर्धचंद्र दिला. पुढें १५९२ पर्यंत ओरिसा अफगाण लोकांच्या ताब्यांत राहिला. व तदनंतर अकबराचा हिंदु सरदार राजा मानसिंग यानें तो मोंगल साम्राज्यास जोडला. पुझें मिदनापूर व बलासोर यांचा बंगालमध्यें समावेश करण्यांत आला. १७५१ सालीं अलिवदींखानानें ओरिसा हा प्रांत नागपूरच्या भोंसल्यास दिला (अलिवदींखान पहा). तो १८०३ पावेतों त्यांच्या ताब्यांत होता, नंतर ब्रिटिशांकडे आला. मराठ्यांनीं येथें सुव्यवस्था स्थापना करण्याचें तर मनावर घेतलें नाहींच; उलट इच्छेनुसार येथील लोकांस त्रास दिला. तेव्हां बंगाली लोकांप्रमाणें उडिया मराठ्यांनां त्रासले होते. १८०४ मध्यें या प्रांताच्या राज्यव्यवस्थेकरितां दोन कमिशनरांचें एक बोर्ड स्थापन करण्यांत आलें व पुढील वर्षीं कलेक्टराची नेमणूक करून या प्रांतास ‘कटकचा जिल्हा’ हें नांव दिलें. १८२८ मध्यें याचे तीन रेग्युलेशन जिल्हे (कटक, बालासोर व पुरी) व मांडलिक संस्थानें (नॉनरेग्युलेशन) असे भाग पाडले. नंतर १९०५ मध्यें संबलपूर जोडण्यांत आला. वेगवेगळ्या प्रांतांतून असणारे ओरसाचे भाग एकत्र करावे अशी जी उडियांची चळवळ सुरू झाली तिचा परिणाम म्हणून मध्यप्रांतांतून संबळपूर काढून ओरिसांत घेतलें असें म्हणतां येईल. मद्रास व बंगालमध्यें असणार्‍या उत्कलांनां एकत्र करण्याची खटपट चालू आहे. १९१२ मध्यें ओरिसाला बंगालमधून काढून बिहार-ओरिसा असा एक प्रांत करण्यांत आला. पण बिहारमध्येंहि राहण्यास ओरिसा खूष नाहीं असें दिसतें.

ओरिसा प्रांतांत दुष्काळापासून फार त्रास झाला. १८६५ ते ६७ सालीं तर तो बहुतेक उघडाच पडला. त्यावेळीं सर जॉन लॉरेन्स गव्हर्नरजनरल होता; पण त्यानें या भयंकर दुष्काळांतून लोकांनां वांचविण्याचे पाहिजे तसे प्रयत्‍न केले नाहींत त्यामुळें अंदाजे १० लाख लोक उपासमारीनें मेले. या प्रांतांतून आतां बंगाल-नागपूर रेल्वे जाते. कटक व व बालासोरच्या प्रदेशांत ‘ओरिसा’ कालवे सुरू केले आहेत.

येथील राज्यव्यवस्थेची माहिती बिहार प्रांतांत समाविष्ट झाली आहे. या विभागांत गांवें ८ खेडीं व १५६६७ आहेत. कटक, पुरी, बालासोर हीं मोठीं गांवें व फॉल्सपाईन्ट, चान्दबली, बालासोर, पुरी हीं बंदरें आहेत.

पुरी येथील जगन्नाथाचें देवालय प्रसिद्धच आहे. जयपुर येथील देवालयें व खंडगिरी व उद्यगिरी टेंकड्यांतील गुहा, भुवनेश्वरचे लिंगराज देवालय व कोनारक येथील काळें देवालय हे पुरातन कालचे अवशेष होत.

सध्यां ओरिसा हा एक प्रमुख हिंदू प्रांत बनून राहीला आहे. येथें ब्राह्मण वस्ती फार तिचें समाजांत वजनहि मोठें आहे. पुरी येथें वैदिक लौकिक असे ब्राह्मणांत दोन पंथ आहेत. इ. स. १२ व्या शतकांत गंगथडीहून या ठिकाणीं आलेल्या ब्राह्मणांचे वंशज ते वैदिक. वैदिकांतहि पुन्हां कुलीन व श्रौत्रिय असे दोन भेद आहेत. लौकिक ब्राह्मण प्राचीन आर्य वसाहतवाल्यांचे वंशज म्हणून गणले जातात. ख्रिस्ती व इस्लामी धर्माची या प्रांतांत फारशी डाळ शिजलेली दिसत नाहीं. ओरिसांत वन्यधर्मीय लोकहि आहेत (‘कंथ’ पहा). खेड्यांतील देवता नेहमींच्या वहिवाटीप्रमाणें स्त्रीजातीच्या असून त्यांनां ग्रामदेवता किंवा ठाकुराणी म्हणतात. ओरिसांत कांहीं मराठे जातींचीं कुटुंबें स्थायिक झालीं आहेत व एकद्देशीयांबरोबर त्यांचा कधीं कधीं लग्नव्यवहारहि होतो.

[संदर्भग्रंथ- डब्ल्यू. डब्ल्यू. हंटरनें १८७२ त प्रसिद्ध केलेले ओरिसावरचे दोन भाग फार अमूल्य आहेत. त्यांशिवाय पुढील ग्रंथ महत्त्वाचे आहेत. राजेंद्रलाल मित्र- अ‍ॅन्टीक्विटीज, ऑफ ओरिसा, कलकत्ता १८७५-८०; ए. स्टर्लिंग-ओरिसा; फर्ग्यूसन आणि बर्जेस-दि केव्ह टेंपल्स ऑफ इंडिया; गेट-सेन्सस ऑफ इंडिया, १९०१. पु. ६. १९११ पु. १.].

   

खंड ९ : ई ते अशुमान  

 

  ईजिप्त

  ईजियन समुद्र

  ईजियन संस्कृति
  ईटन-इंग्लंड
  ईडनिंबू
  ईथर
  ईदर
  ईदिग
  ईव्हशाम
  ईशोपनिषद
  ईश्वरकृष्ण
  ईश्वरीपूर
  ईश्वरसिंग
  ईसॉप
  ईस्ट इंडिया कंपनी
  ईस्ट इंडीज
  ईस्टर
  ईस्टर बेट
  ईस्टविक्, एडवर्ड बॅक् हाऊस
  ईक्षणयंत्र
 
  उकाँग
  उकुंद
  उखाणे
  उखामंडळ
  उग्रसेन
  उचकी (हिक्का )
  उचले व भामटे
  उचाड
  उच्च-पंजाब
  उच्च शहर
  उच्च
  उच्छर
  उंज
  उज्जनी
  उज्जयन्ताद्रि
  उझानी
  उंट
  उटकटारी
  उटकमंड
  उंड
  उंडवलें
  उंडविन
  उडियासांझिया
  उडीद
  उडुपी
  उड्र
  उतथ्य
  उत्तंक
  उत्तनगरै
  उत्तमपालेयम
  उत्तर
  उत्तर अमेरिका
  उत्तरध्रुवप्रदेश
  उत्तरपाडा
  उत्तर मेरूर
  उत्तर सरकार
  उत्तरा
  उत्तरापथ
  उत्तानपाद
  उत्पल
  उत्पादन
  उत्रौला
  उदमलपेट
  उदयगिरी
  उदयन
  उदयनाचार्य
  उदयपूर
  उदयप्रभसूरि
  उदयभानु
  उदयसिंह
  उदर
  उदलगुरी
  उदाजी पवार
  उदासी
  उंदिरखेड
  उंदीर
  उदेपुरी बेगम
  उदेपूर संस्थान
  उदेपूर गांव
  उदेपूर शहर
  उदेपूर
  उदेय्यार पालेयम्
  उंदेरी
  उद्गाता
  उद्गीर
  उद्गीरची लढाई
  उद्दंड
  उद्दंडपुर
  उद्दालक
  उद्धव
  उद्धव गोसावी
  उद्धवचिद्घन
  उद्धव नाला
  उद्धव योगदेव
  उद्बोधनाथ
  उद्वेग रोग
  उन
  उन-देलवाडा
  उनबदेव
  उना
  उनियार
  उनी
  उन्कल
  उन्नाव
  उन्माद
  उन्सरी
  उपकन्चा
  उपकेशगच्छ
  उपनयन
  उपनिधि
  उपनिषदें
  उपनेत्र
  उपप्लव्य
  उपमन्यु
  उपरवार
  उपरि
  उपरिचर
  उपवेद
  उपशून्य
  उपसाला
  उपांशु
  उपेनंगडी
  उपेन्द्र परमार
  उप्पर
  उप्माक
  उप्रई
  उप्लेटा
  उंबर
  उम्बेक
  उबेरो
  उंब्रज
  उमत्तूर
  उमरकोट
  उमर खय्याम
  उमरखान
  उमरखेड
  उमरबिन खत्तब
  उमरावती
  उमरी
  उमरेठ
  उमरेड
  उमा
  उमाजी नाईक
  उमापति
  उमापति शिवाचार्य
  उमाबाई दाभाडे 
  उमीचंद
  उमेटा
  उमेदवारी
  उमेरिया
  उर
  उरगप्पा दंडनाथ
  उरण
  उरल पर्वत
  उरलि
  उरवकोंड
  उरिया, उडिया
  उरी
  उरुळी
  उरोगामी
  उर्दुबेगी
  उर्फी, मौलाना
  उर्मिया सरोवर
  उर्मिया, शहर
  उर्वशी
  उलघबेग मिरझा
  उलूक
  उलूपी
  उलेमा
  उल्का
  उल्बारिया
  उल्म
  उल्लतन
  उल्लाळ 
  उवा
  उशना, वैदिक
  उशीनर
  उकूर
  उषा
  उष्टारखाना
  उष्णता
  उष्णताजन्य विद्युत
  उष्णतामापन
  उष्णता-रसायनशास्त्र
  उष्णतावहन
  उष्णमानमापक यंत्र
  उस्का
  उस्तरण
  उस्मान
  उस्मान नगर
  उस्मानाबाद
  उळवी
 
  ऊदाइन (बेंझाईन)  
  ऊदाम्ल
  ऊदिदिन
  ऊदिन
  ऊदिल अल्कहल
  ऊदिल प्रायोज्जिद
  ऊदिल भानन
  ऊधमबाई
  ऊरूस्तंभ
  ऊर्ध्वपातनक्रिया
  ऊस
 
  ऋग्वेद
  ऋचीक
  ऋणमोचन
  ऋतु
  ऋतुपर्ण
  ऋत्विज
  ऋभु वैदिक
  ऋषभ
  ऋषि
  ऋषिऋण
  ऋषिक
  ऋषिपंचमी
  ऋषियज्ञ
  ऋषिवरण
  ऋष्यमूक
  ऋष्यवान
  ऋष्यशृंग
  ऋक्षरजा
 
  एओलिस
  एकचक्रा
  एकत
  एकतत्त्ववाद
  एकदंत भट्ट
  एकनाथ
  एकबटाना
  एकर
  एकरुक
  एकलव्य
  एकलिंगजी
  एकादशरुद्र
  एकादशी
  एकिल्
  एक्झीटर
  एक्रान
  एक्स
  एक्स-ला-चॅपेल
  एगमाँट लॅमोरल कौंट ऑफ
  एगिनकूर
  एचर्ड
  एंजिन
  एट्ना
  एट्रूरिया
  एडगर
  एडन
  एडन कालवा
  एडप्पल्ली
  एन्डर
  एडवर्ड
  एडवर्डसाबाद
  एडिंबरो
  एडेन जॉर्ज - लॉर्ड ऑकलंड
  एडेसा
  एडोम
  एड्रियन
  एदलाबाद
  एनमे
  एनॅमल
  एन्नोर
  एपिक्टेटस
  एपिक्यूरस
  एपिनस, फ्रान्झ उलरिच थिओडार
  एपीडॉरस
  एंपीडोक्लिस
  एफेसस
  एबनी (अबनूस)
  एबल सर फ्रेडरिक
  एंब्रान
  एमडेन
  एमॅन्युअल व्हिक्टर
  एमिनाबाद
  एमीन्स
  एमेअस
  एमेरी
  एम्मेट रॉबर्ट
  एरंडी
  एरंडोल
  एरन
  एरनाड
  एरवल्लर
  एरिडु
  एरिथ्री
  एरिनपुर
  एरियन
  एरिलिगारू
  एरोड
  एर्नाकुलम
  एलगंडल
  एलाम
  एलाय
  एलिआकॅपिटोलिना
  एलिचपूर
  एलिझाबेथ
  एलिस
  एलेनबरो
  एलेफन्टा
  एल्जिन
  एल्जिन लॉर्ड
  एल्फिन्स्टन मौंट स्टुअर्ट
  एल्ब
  एल्बा
  एल्युथेरापीलीस
  एल्युसिस
  एल्सिनोर
  एसर हजन
  एसेक्स परगणा
  एस्किमो
 
  ऐतरेय आरण्यक
  ऐतरेय उपनिषद्
  ऐतरेयब्राह्मण
  ऐन
  ऐनापुर
  ऐनी-अकबरी
  ऐनुद्दीन
  ऐनू
  ऐमक
  ऐयनर
  ऐरणी
  ऐरावत
  ऐहिकवाद
  ऐहोळ
 
  ओक
  ओक वामन दाजी
  ओकटिवन
  ओकपो
  ओकलंड शहर
  ओकहॅम
  ओकुमा, कौंट
  ओकू
  ओकेन, लॉरेन्झ
  ओकोनेल डॅनियल
  ओक्लाहामा
  ओच्चन
  ओजिब्वा
  ओझर
  ओझा
  ओट
  ओटावा
  ओट्टो
  ओडर नदी
  ओडेसा
  ओडोनेल हेनरी जोसेफ
  ओतारी
  ओतुर
  ओध
  ओनला
  ओनेगा
  ओन्गोले
  ओपोर्टो
  ओफीर
  ओब्रायन वुइल्यम स्मिथ
  ॐ ( ओम् )
  ओमान
  ओम्स्क
  ओयामा
  ओरई
  ओरॅंग ऊटंग
  ओरकझई
  ओरछा
  ओरावन
  ओरिसा 
  ओरिसा कालवे
  ओरिसांतील मांडलिक संस्थानें
  ओर्मेरॉड एलिअनॉर
  ओलपाड
  ओल्डहॅम
  ओल्डहॅम थॉमस
  ओल्डेनबर्ग
  ओवसा
  ओवा
  ओवेन, रॉबट
  ओवेन सर रिचर्ड
  ओव्हिड
  ओशीमा
  ओषण
  ओसवाल
  ओसाका अथका ओझावा
  ओस्कार
  ओस्टीयाक
  ओहम्, जार्ज सायमान
  ओहममापक
  ओहिओ
  ओहिंद
  ओळंबा
 
  औक अथवा अवुक जमीनदार
  औट्रम
  औतें
  औदीच्य ब्राह्मण
  औद्देहिक
  औद्योगिक परिषद
  औंध
  औंधपट्टा
  औधेलिया
  औनियाति
  औरंगझेब अलमगीर
  औरंगाबाद
  औरंगाबाद सय्यद शहर
  और्व
  औशनस
  औसले सर विल्यम
  अं
  अंक
  अंकगणित
  अंकचक्र
  अंकलगी
  अंकलेश्वर
  अंकाई टंकाई
  अंकिसा
  अंकेवालिया
  अॅंकोना
  अॅंकोबार
  अंकोर
  अंकोला
  अंग
  अंगठी
  अंगडशाहा
  अंगडि
  अंगडिपूरम
  अंगद
  अंगदशिष्टाई
  अंगदिया
  अंगरखा
  अंगापूरकर (हरि)
  अंगारा
  अंगुत्तर निकाय
  अंगुर शेफ
  अंगुळ
  अंगोरा शहर
  अॅंगोला
  अॅंग्विल्ला
  अंघड
  अंचलगच्छ
  अंज-(अॅंटिमनी)
  अंजनगांव
  अंजनगांव बारी
  अंजनगांव सुर्जी
  अंजनवेल
  अंजनी
  अंजनेरी
  अंजार
  अंजिदिव
  अंजी
  अंजीर
  अंजू
  अंजेंगो
  अॅंजलिको फ्रा
  अॅंटनान-रिव्हो
  अॅंटवर्प
  अंटिओक
  अॅंटिग्वा
  अॅंटियम
  अॅंटिलीस
  अॅन्टिव्हरी
  अन्टीगोनस गोनाटस
  अॅन्टीगोनस सायक्लॉप्स
  अॅन्टीपेटर
  अॅन्टीलिया
  अॅंटोनिनस पायस
  अॅंटोनियस ( मार्कस )
  अंडवृध्दि
  अण्डाशयछेदनक्रिया
  अॅंडीज
  अंडें
  अंडोरा
  अंडोल
  अंडोला
  अॅंड्रासी ज्युलियस
  अॅंड्रिया डेल सार्टो
  अॅंड्रोमेडा
  अॅंड्रयूज थॉमस
  अंतगड
  अंतधुरा
  अंतर इब्नशद्दाद
  अंतराल
  अंतर्गळ
  अंतर्वेदी
  अंतर्ज्ञान
  अंताजी ( उर्फ बाबुराव ) मल्हारराव बर्वे
  अंताजी माणकेश्वर
  अंताजी रघुनाथ
  अंतालिमा
  अंतुर्ली
  अंतूर
  अंतोबा गोसावी
  अंत्रपुच्छदाह
( अपेंडिसाइटीज )
  अंत्रावरणदाह
( पेरिटोनिटिस )
  अॅंथनी सुसान ब्रौनेल
  अंदमान आणि निकोबार बेटें
  अंदमान बेटें
  अंदाळ
  अंदोरी
  अंध किंवा आंध
  अंधक
  अंधत्व
  अंधरगांव
  अंधळगांव
  अंधारी नदी
  अंब
  अंबत्तन
  अंबर ( धातु )
  अंबर
  अंबर उदी
  अंबरखाना
  अंबरनाथ अथव अमरनाथ
  अंबरनाथ
  अंबरपेठ
  अंबराम्ल
  अंबरीष
  अंबलक्कारन्
  अंबलपुलई
  अंबलवासि
  अंबष्ठ
  अंबहटा
  अंबा
  अंबा, (तालुका)
  अंबागड
  अंबागडचौकी
  अंबाजी इंगळे
  अंबाजी दुर्ग
  अंबाजी पुरंधरे
  अंबाडी
  अंबा भवानी
  अंबाला
  अंबालिका
  अंबाली
  अंबासमुद्रम
  अंबिका
  अंबिका दत्त व्यास
  अंबिकापूर
  अंबुशी
  अंबूर
  अंबेर
  अंबेला
  अंबेहळद
  अंबोयना
  अंबोली
  अंभोरा
  अंशुमान
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .