विभाग नववा : ई-अंशुमान
ओशीमा - हा जपानच्या ताब्यांत असलेला एक तीन बेटांचा द्विपसमूह आहे. हा किऊशिऊच्या दक्षिणेस उत्तर अक्षांस ३०० ५०’ व पूर्व रेखांश १३०० वर आहे. यांतील बेटांची नांवें पश्चिमेपासून पूर्वेकडे कुरोशिमा, ओशिमा व टाकाशीमा अशीं आहेत. ओशीमा बेटावर २४८० फूट उंचीचा जिवंत ज्वालामुखी पर्वत आहे. हा द्वीपसमूह उत्तरेकडील आयझू नोशीचीटो अथवा, लूचू समूहाहून भिन्न आहे. जपानांत ओशीमा नांवांचीं दुसरींहि अनेक बेटें आहेत.