विभाग नववा : ई-अंशुमान
ओळंबा - एका दोरीला गोटीसारखें एक वजन लोंबकळत ठेवून दोरी स्थिर झाल्यावर सिद्ध होणारा उभा लंब. याचा उपयोग उभी पातळी लंब रेषेंत आहे किंवा नाहीं हें तपासून पाहण्याकडे करतात. याच कामासाठीं उपयोगांत येणारी लांकडी पट्टीहि असते. तिची एक कड उभ्या पातळीस टेंकून ती तपासतात. ‘प्लम लेव्हल’ म्हणून एका टोंकांस स्पिरिटचा बुडबुडा असलेली नळी असलेलें एक हत्यार असतें. यानेंहि उभ्या पातळीचा पडताळा पाहतां येतो.