प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग नववा : ई-अंशुमान

औंध - औंध हें गांव, पंतप्रतिनिधींच्या संस्थानाची राजधानी आहे पंतप्रतिनिधी मूळचे किन्हईचे. तेथील कुलकर्णी परशुराम त्र्यंबक हा या घराण्याचा मूळपुरूष औंधच्या सभोंवतीं ब्रिटिश मुलुखांतील खटाव विभाग आहे. औंध हें सातारा जिल्ह्यांत सातार्‍यापासून आग्नेयेस २६ मैलांवर आहे. ज्या घाटांतून सातारा-तासगांव रस्ता खटाव आणि कारेगांवकडे जातो, त्याच्या माथ्यावर पूर्वेकडे जो फाटा फुटतो तो औंधास जातो. गांवाच्या उत्तरेस व पूर्वेस टेंकड्या असून मध्यंतरीं खोलांत गांव आहे. संस्थानचें क्षेत्रफळ ५०१ चौ. मैल असून लोकसंख्या (१९२१) ६४५६० आहे. आणि एकंदर वसूल ३,५३,००३ रू. १५ आणे १ पै आहे. संस्थानिक हे कोणासहि (इंग्रजांस सुद्धां) खंडणी देत नाहींत. संस्थानिकांचें घराणें देशस्थ शुक्ल यजुर्वेदी आहे. हल्लींचें अधिपति श्री. भगवानराव श्रीनिवासराव उर्फ बाळासाहेस पंडित प्रतिनिधी हे बी. ए. असून उत्तम चित्रकार आहेत. जुनीं चित्रें चितारतांना तत्कालीन पोषाख व हत्यारें आणि चालीरीती कशा होत्या हें सर्व लक्ष्यांत घेऊन त्याप्रमाणें ते चित्रें काढतात. त्यासाठीं त्यांनीं बराच प्रवास केला आहे. श्रीमंत हे विद्वान, प्रजाहितदक्ष पूर्वजाभिमानी आणि पुराणमताभिमानी आहेत. त्यांनीं प्रजेच्या कल्याणासाठीं अनेक उपयुक्त संस्था काढिल्या आहेत. राज्यकारभारातहि सुधारणा केल्या आहेत. राज्यांतील एकंदर खात्यांचे सात विभाग करून प्रत्येक विभागावर एक एक सेक्रेटरी नेमून या सातहि विभागांवर मुख्य नजर श्रीमंतांची असते. या सात जणांचें एक कौन्सिल व त्याचे अध्यक्ष श्रीमंत अशी ही योजना आहे. कौन्सिलच्या सल्ल्यानें सारा कारभार चालतो. दरसाल रयतसभा भरली जाते, तिच्या पुढें संस्थानचें बजेट मांडण्याची व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करण्याची रीत नुकतीच अंमलांत आली आहे. या लोकप्रतिनिधिसभेची स्थापना श्रीमंतांच्या वाढदिवशीं (१६-२-२४ रोजीं) झाली. तींत एकंदर ३५ सभासद असून सरकारी १०, सरकांरनियुक्त ७ आणि लोकनियुक्त १८ अशी वर्गवारी आहे. म्हणजे लोकनियुक्तांची संख्या जास्त आहे. यांच्या अनुमतानें यापुढें राज्यकारभार चालणार आहे. संस्थानांत सार्वत्रिक सक्तीचें व मोफत शिक्षण बरेच दिवसापासून सुरू आहे. बालचर चळवळहि सुरू करण्यांत आली आहे. औद्योगिक धंदेशिक्षणहि संस्थानांत मिळतें. संस्थानच्या एकंदर उत्पन्नाचा दोनपंचमांश शिक्षणाकडे खर्च केला जातो. शाळेंत जाण्यायोग्य २४३३ मुलापैकीं १९२३ सालीं २२९० मुलें शाळेंत जात होतीं. विद्यार्थ्यांची संख्या वाढती आहे. श्रीमंतांनीं आपला खाजगीची खर्चहि उत्तरोत्तर कमी केला आहे. तो ७७ हजारांवरून ४० हजारांवर आणला आहे. शेतसार्‍याचा दर हलका आहे. फौज मुळीच नाहीं. पोलीस आहेत; त्यांचें प्रमाण दर १ हजार लोकांत १ शिपाई असें आहे. असें असूनहि गुन्ह्यांची संख्या उत्तरोत्तर कमी होत आहे. असें असूनहि गुन्ह्यांची संख्या उत्तरोत्तर कमी होत आहे. राज्यांत ३२ ग्रामपंचायती आहेत. त्यांनां दिवाणी, फोडदारी अधिकार असून, शाळा, आरोग्य व पाणीपुरवठा यांच्यावरहि त्यांची देखरेख असते. पंचायतींनीं दिलेल्या निकालांवर १९२३ सालीं एकहि अपील झालें नाहीं. १०० रूपयापर्यंतच्या व्यवहाराच्या फिर्यादी पंचायती तोडतात.

राज्यांतील सार्‍या म्युनिसिपालिट्या लोकनियुक्त आहेत. त्यांचें उत्पन्न कमी पडल्यास संस्थानच्या उत्पन्नांतून त्यांनां मदत मिळते. संस्थानची जमीन हलकी असल्यानें व्यापार फार कमी आहे.

हल्लीं किर्लोंस्कर बंधूंचा व ओगले कंपनीचा असे दोन कारखाने संस्थानांत आहेत. पैकीं पहिल्यांत शेतीचीं अवजारें व दुसर्‍यांत कांचमाल उत्पन्न होतो. पहिल्यानें १५ टक्के व दुसर्‍यानें ६ टक्के नफा नुकतांच भागीदारांनां वाटला दोन्ही कारखाने सध्यां भरभराटींत आहेत.

खुद्द औंधास एक रसायन प्रयोगशाळा असून तींत तेलें, आगपेट्या वगैरेंबद्दल शोध चालू आहेत. एक लोखंडी कामाचा कारखानाहि आहे.

अबकारी उत्पन्न सालीना ११ || हजारांचें असून तें परभारें इंग्रजांकडून मिळतें.

संस्थानची एक बँकहि आहे. शेतकरी, पतपेढ्या, व्यापारी वगैरेंना या बँकेकडून सढळ मदत मिळते. तिची सांपत्तिक स्थिति उत्तम आहे. गरीब विद्यार्थ्यांनांहि कर्जरूपानें बँक मदत देते.

पाश्चात्य दवाखान्यांप्रमाणें श्रीमंतांनीं आपल्या संस्थानांत देशी आयुर्वेदिक दवाखानेहि काढलेले आहेत.

संस्थानची लोकसंख्या वाढत आहे. संस्थानांत शेतकर्‍यांच्या पतपेढ्याहि आहेत. तसेंच उत्तम जनावरांची पैदासहि सरकारी खात्याकडून होत असते; आणि लोकांनीं केल्यास त्यांनां बक्षिसें देण्यांत येतात.

संस्थानांत वाचनालयेंहि आहेत. श्रीमंत दौर्‍यावर निघाले असतां गांवोगांव रयतसभा भरवून त्यांचीं गार्‍हाणी ऐकून तीं दूर करीत असतात.

संस्थानचे जे नोकर अल्पवयांत मृत्यु पावतात त्यांच्या कुटुंबांस बालपरवेशी (पेनशन) देण्याची चाल अद्यापि सुरू आहे.

परशुराम त्र्यंबक यांनां शाहुमहाराजांनीं प्रतिनिधिपदाची सनद वंशपरंपरनें दिली, त्यावेळीं राजापुरापासून दाभोळपर्यंत कोंकणपट्टी धरून, सातारा, वाई, मेढें, माण, खटाव, मिरज, कोल्हापूर वगैरे प्रांत प्रतिनिधींच्या जहागिरींत येत होते. पुढें कोल्हापुरचें राज्य निराळें होऊन मराठी साम्राज्याची वाटणी झाल्यानंतर कोल्हापुर, पन्हाळा विशाळगड हें प्रांत प्रतिनिधींच्या इलाख्यांतून जाऊन त्याऐवजीं हल्लीं असलेल्या विजापूर जिल्ह्यापैकीं बराचसा भाग आणि खानापुर व आठपाडी तालुके हे आले. पुढें रावबाजींच्या कारकीर्दींत प्रतिनिधींची जहागिरी जप्त झाली. नंतर जी सुटली तेंच हल्लींचें संस्थान. याचे ५ प्रांत आहेत. हे भौगोलिक दृष्ट्या एकमेकांपासून फार लांब लांब आहेत. त्यामुळें संस्थानला राज्यकारभाराचा खर्च जास्त येतो. श्रीमंतांच्या मनांत राज्यांत कायमधारापद्धति स्थापण्याचें आहे. न्याय व अंमलबजावणी खातीं वेगळीं करण्याचीहि योजना चालू आहे. संस्थानांत औद्योगिक व शेतकीचीं प्रदर्शनें नेहमीं भरतात.

संस्थानला दत्तकाचा अधिकार आहे. औंधास जुने २ तलाव आहेत. श्रीमंतांचा राजवाडा मराठी पद्धतीचा दुमजली व तीन चौकी आहे. दोन एकर जागा त्याच्याखालीं झांकली गेली आहे. वाड्याच्या डावीकडे प्रतिनिधींच्या कुलदेवतेचें (यमाई देवीचें) सुंदर देऊळ आहे. देवळासमोर ६० फूट उंच व १५ फूट व्यासाच्या चौथर्‍याची जुनी दिपमाळ आहे. तिची नकशी सुबक आहे. १७६ दिवे तिच्यावर लावतां येतात. औरंगजेब औंधास मूर्ती फोडण्याकरितां आला असतां त्यानें दिपमाळ शाबूत ठेविली. गांवाजवळ ८०० फूट उंचीच्या टेंकडीवर यमाईचें प्राचीन देऊळ आहे, त्याला मूळपीठ म्हणतात. देवळास तटबंदी आहे. पांच बरूज आहेत. वरपर्यंत पायर्‍या आहेत. मधोमध एक गणपतीचें देऊन आहे. टेंकडीवर माणसाळलेलीं माकडें फार आहेत. त्यांच्या पोटासाठीं कांहीं जमीन इनाम दिली आहे.

इ ति हा स - सातारा जिल्ह्यांत वर्धनगडाखालीं किन्हई गांव आहे. तेथें यमाजीपंत कुलकर्णी रहात असे. तो यजुर्वेदी, सावरणिस गोत्री होता. त्याचा धाकटा मुलगा कृष्णाजी, त्याचा धाकटा पुत्र त्र्यंबकपंत व त्याची स्त्री लक्ष्मीबाई. ही नवराबायको औंधच्या यमाबाईचे निस्सीम उपासक. यांच्या पोटीं शके १५८२ मार्ग. वद्य १ (सन १६६०) रोजीं परशुरामपंतांचा जन्म झाला. याच्या वेळीं जगदंबेनें त्र्यंबकपंताच्या बहिणीचें रूप घेऊन बाळंतपण केलें अशी दंतकथा आहे. त्र्यंबकपंतानीं किन्हईस देवीचें देऊळ बांधलें. परशुरामपंत १४ व्या वर्षी कुलकर्ण सोडून विशाळगडीं जाऊन निळो सोनदेव अमात्य यांच्या पदरीं राहिले. निळोपंतांचे चिरंजीव रामचंद्र व परशुराम यांचा स्नेह जमला. परशुरामपंतांच्या पहिल्या मर्दुमकीच्या कृत्यांची माहिती आढळत नाहीं. राजाराम महाराज जेव्हां जिंजीकडे गेले तेव्हां पंतांनां अमात्याच्या पदरीं सरदारी देऊन ठेविलें (१६९०). जिंजीस असतांना महाराजांनीं पंतांनां “समशेर बहाद्दर जंग” पदवी दिली. औरंगजेबास तोंड देऊन स्वराज्याची विसकटलेली घडी पुन्हां बसविण्याच्या तत्कालीन कामगिरीवर अमात्य सचीव यांच्याबरोबरच पंतांचीहि योजना झालेली होती त्यांनीं पन्हाळा मोठ्या शर्तींनें मोंगलांपासून घेतला (इ.स. १६९२). आणि मिरज ते रांगण्यापर्यंतचा सारा मुलूख सोडविला. पंत जसे शूर होते तसेच भगवद्भक्तहि होते. ते संस्कृत व्युत्पन्न असून कीर्तन करीत व स्वत:काव्यहि करीत. त्यांच्या संस्कृत व मराठी काव्यांचें एक बाड सांपडलें आहे. त्यांचेवर आई आदिपुरूष या सत्पुरूषाची कृपा असून तो त्यांचा गुरू होता. राजाराम महाराज असतांच त्यांनीं पंतास प्रतिनिधीपद तात्पुरतें (इ. स. १६९९) शके १६२१ फाल्गुनमासांत दिलें. त्यावेळीं पदाचीं वस्त्रें दिलीं तीं:- भरगच्ची मंदील, चादर, पटका, किनखापाचें ठाण व महमुदीचें ठाण, शिरपेंच, कंठी, चौकडा, तुरा, जिगा, शिक्केकटार, चौघडा, तीन हत्ती व सोन्याच्या दांडीची चवरी, ढाल, तरवार, जरीपटका, घोडा व सोन्याच्या काठीचा भालदार. प्रतिनिधी म्हणजे ‘राजाची प्रतिमा’ (व्हॉइसराय) होय. मध्यंतरीं पंतांचें प्रतिनिधीपद काढून तिमाजीपंत हणमंते यांस तें देऊन पंतांनां पेशव्याचें पद दिलें (शके १६२१). औरंगजेबानें परळीस वेढा दिला असतां तेथें पंत होते. त्यांनीं किल्ला शौर्यानें पुष्कळ दिवस टिकविला होता. शाहु महाराजांनीं पंतांस प्रतिनिधीपद “एकनिष्ठपणाची सीमा केली, महत्कार्यें करून राज्यरक्षण केलें म्हणून वंशपरंपरेनें ‘वतनी’ करून दिलें (शके १६३२).” यांच्याशिवाय कोणत्याहि अष्टप्रधानाला त्याचें पद “वतनी” दिलेलें नाहीं, यावरून पंतांची योग्यता समजते. शाहुमहाराज देशीं आले तेव्हां ताराबाईनें दुसर्‍या सरदारांबरोबर पंतासहि पाठविलें होतें. धनाजीराव सेनापति व इतर मंडळी शाहूस मिळाली, परंतु पंत मिळाला नाहीं. शेवटपर्यंत लढला; नंतर सातारचा किल्लाहि त्यांनीं अखेरपर्यंत लढविला; पुढें शेखमिर्‍यानें भेदानें किल्ला शाहूस दिला. हा शेख पंताचा मित्र होता. पंत कैदेंत होते. शाहूनें त्यांनां आपल्याला मिळण्याबद्दल खूप खटपट केली पण पंत ऐकेना. त्यांचें वचन ताराबाईस गेलेलें होतें. अखेर कोल्हापूरचें राज्य स्वतंत्र झाल्यानंतर पंत शाहु महाराजांचे नौकर बनले. याच वेळीं त्यांनां प्रतिनिधीपद दिलें. सरंजामास १६ प्रांत व ३५ किल्ले दिले. मध्यंतरीं पंत हे कोल्हापूरकरास सामील असल्याच्या संशयावरून त्यांचें पद काढून त्यांनां महाराजांनीं कैदेंत टाकिलें (स. १७११). यावेलीं पंतांचे चिरंजीव कृष्णाजी यांनीं कोल्हापूरातर्फें शाहूमहाराजांच्या राज्यांत दंगा केल्यानें पंतावर रागाऊन त्यांचे डोळे काढून त्यांनां ठार मारण्याची आज्ञा महाराजांनीं दिली, तेव्हां खंडोबा चिटणिसानें महाराजांची समजूत घालून आज्ञा फिरविली याचवेळीं कृष्णराव खटावकराचा पराभव बाळाजी विश्वनाथ यांनीं केला; त्या स्वारींत पंतांचे दुसरे चिरंजीव श्रीपादराव यांनीं चांगली तरवार गाजविल्यानें महाराजांनीं पंतांनां कैदेंतून सोडवून वंशपरंपरेनें प्रतिनिधीपद दिलें (स. १७१४) यापुढें पंतावर महाराजांची मर्जी सतत बसली व पंतांनीहि राज्याची सेवा इमानानें केली. त्यामुळें महाराजांनीं त्यांनां वेळोवेलीं इनामें दिलीं. त्यांचा मृत्यु सातारा येथें शके १६४० ज्येष्ठ शु. ८ रोजीं झाला. त्यांचें वृंदावन संगम माहुलीस आहे. त्यांनां पांच मुलगे व दोन मुली होत्या. कृष्णराव, त्र्यंबकराव, श्रीनिवास (उर्फ श्रीपत) राव, सदाशिवराव व जगज्जीवन (उर्फ दादोबा) हीं मुलांचीं नांवें होत. कृष्णराव हे कोल्हापूरकरांचे प्रतिनिधी होऊन विशाळगडकरांचे मूळ पुरूष झाले. श्रीनिवासराव यांनां शाहु महाराजांनीं प्रतिनिधी केलें. हेहि शूर व धार्मिक होते. यांनीं १० लक्षांचा मुलूख धर्मादायांत (इनामें वगैरे) लावून दिला. कर्नाटकांत व निजामाशीं, हपशांशीं, कोल्हापूरकराशीं लढाया देऊन त्यांनीं मुलूख मिळविला. यांच्या स्त्रीचे नांव राधाबाई. वास्तविक हे परशुरामपंतांनीं आपल्या (माधवराव नांवाच्या) बंधूस दत्तक दिले होते. परंतु शाहु महाराजांनीं तें विधान रद्द करविलें. हे (१७४६) वारल्यानंतर यांच्या जगज्जीवन (दोदोबा) बंधूस महाराजांनीं पद दिलें. महाराज वारल्यानंतर पेशवे व प्रतिनिधी यांचें न जमल्यानें पेशव्यांनीं दोदोबास धरून किन्हईस कैदेंत ठेविलें पुढें दोन वर्षांनीं त्यांनां सोडलें ते लवकरच (१७५४ मध्यें) वारले. यांच्या नंतर श्रीपतराव हे निपुत्रिक झाल्यामुळें यांचा चुलत नातु (कृष्णाजी परशुरामाच्या गंगाधर नांवाच्या पुत्राचा मुलगा) श्रीनिवास उर्फ भवानराव यांस पद मिळालें. मध्यंतरीं दादासाहेब पेशवे यांनीं १ वर्ष हें पद नारोशंकर यांस दिलें होतें भवानराव हे पेशव्यांविरूद्ध उठले होते; व निजामासहि जाऊन मिळाले होते. राक्षसभुवनाच्या लढाईनंतर ह्यांची समजूत पटून हे परत फिरले. पुढें पेशव्यांचा आग्रह पडला कीं प्रतिनिधींनीं पुण्यास रहावें. परंतु यांनीं तें ऐकलें नाहीं. तेव्हां भगवंतराव त्र्यंबक यांस वस्त्रें देऊन पुण्यास ठेविले. नंतर भवानराव या गोष्टीस राजी झाल्यामुळें पुन्हां त्यांनां वस्त्रें दिलीं (स. १७६८) भगवंतरावास खानापूर वगैरे जहागीर दिली. या दोघांत नेहमीं लढाया होत. त्या भगवंतराव वारल्यानंतर (१७७५ थांबल्या. त्यांच्या स्त्रिया राजसबाई यांनां दहा हजारांची नेमणूक करून विट्यास ठेविलें. भवानराव हे बारभाईंत असून नानांच्या मर्जीतील होते. हे स. १७७७ मध्यें वारले. त्यावेळीं त्यांच्या दोन स्त्रिया काशीबाई व यमुना बाई; यांपैकीं काशीबाई ही त्याच दिवशीं (३१ आगस्ट १७७७) प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. त्याचें नांव परशुरामपंत उर्फ थोटेपंत. यास पदाचीं वस्त्रें मिळून नाना फडणिसांनीं त्यांचा कारभारी म्हणून कृष्णराव जोशी सातारकर यास नेमिलें. हे पंत खर्ड्याच्या लढाईंत होते. यांचा यांच्या आईशीं व कुटुंबाशीं बेबनाव झाला होता. यांनीं रामोशी चाकरीस ठेवून मुलुखांत दंगाधोपा आरंभिला. मादक पदार्थांचें व्यसन यांनां जडलें. हे माणसांच्या कानांत व नाकांत दारू घालून त्यांचा छळ करीत. तमासगिरांचा त्यांनां छंद लागला. “रमा (ताई) तेलीण” म्हणून यांनीं एक नाटकशाळा बाळगली होती. ती फार शूर होती. यांच्या आईनें यांनां पुष्कळ उपदेश केला. परंतु तो फुकट गेल्यानंतर व यांच्या बायका लक्ष्मीबाई व रमाबाई या विशाळगडास गेल्यावर आईनें पेशव्यांकडे तक्रार नेली तेव्हां त्यांनीं बापू गोखले यांनां पंतावर पाठविलें. त्यांची यांची लढाई मसुरेस होऊन पंतांचा हात तुटून (या मुळेंच यांनां थोटेपंत म्हणत) त्यांनां धरून बापूनीं पुण्यास कैदेंत ठेविलें. रमा तेलणीनें थोडासा प्रतिकार यावेळीं केला. तिनें वासोटा किल्ला लढविला (याचप्रसंगाची पुढील प्रसिद्ध आर्या प्रचारांत आहे. “श्रीमंत पंतप्रतिनिधी यांचा किल्ला अजिंक्य वासोटा | तेलिण मारी सोटा, बापू गोखल्या संभाळ कासोटा ||)’ परंतु तिलाहि कैद करून बापूंनीं पुण्यास धाडिलें; आणि प्रतिनिधींची सारी जहागीर जप्त केली. पैकीं (स. १८०७). पुढें (स. १८१२) प्रतिनिधीस सोडून त्यांनां २ लक्षांची जहागीर दिली. पंत कर्‍हाडास आले, परंतु वृत्ति पालटली नाहीं. पेशवाई गेल्यानंतर पंतांनां सातारकर छत्रपतींच्या निसबतीस नेमून दिलें. तेव्हां मात्र पंतांची वृत्ति स्थिर झाली. अखेर ते १८४८ त वारले. त्यांनां औरस संतति नसल्यानें भाऊबंदांपैकीं एक मुलगा दत्तक घेऊन त्याला गादीवर बसविलें व शेवटचे छत्रपती शहाजीराजे यांनां पदाचीं वस्त्रें दिलीं. (यापुढील पंतांनां इंग्रजांकडून वस्त्रें मिळालीं आहेत). यांचें नांव श्रीनिवासराव. यांच्या अमलांत हुन्नमली गांव इंग्रजाकडे जाऊन मोबदला गांव करून दिले. यावेळीं कर्‍हाड गेल्यामुळें राजधानी औंधास आली. हे पंत सुशील व सदाचारी होते. हे १९०१ सालीं वारले. नंतर यांचे वडील पुत्र परशुरामराव हे गादीवर आले ते १९०५ सालीं मृत्यु पावल्यानंतर त्यांचे चिरंजीव श्री. गोपाळकृष्णराव उर्फ नानासाहेब हे तक्तनशीन झाले. हे फार करारी होते. दोन वर्षांनीं त्यांच्यावर दिवाणास मारण्याचा प्रयत्‍न केल्याचा आरोप आला व इंग्रज सरकारनें त्यांनां पदच्युत केलें (स. १९०७) हल्लीं ते धारवाडास असतात. त्यानंतर दोन वर्षांनीं विद्यमान संस्थानिक श्री. भवानराव उर्फ बाळासाहेब हे (४-११-०९) गादीवर बसले. हे सुशिक्षित, विनयसंपन्न, कुशल चित्रकार प्रजाहिततत्पर असून, यांनीं महाभारताची एक शास्त्रशुद्ध प्रत छापून निघण्यासाठीं (भां. प्रा. सं. सं. ला.) द्रव्यद्वारें मदत केलेली आहे. यांच्याविषयीं महाराष्ट्रांत सर्वत्र माहिती आहे.

परशुरामपंतांच्या वेळीं संस्थानचें एकंदर उत्पन्न ३० लक्षांचें होतें. पुढें जगजीवनरावांच्या वेळीं पेशव्यांनीं यापैकीं बराच मुलुख जप्त केला. भवानरावांच्या वेळीं पांच लाखांचा सरंजाम मिळाल्याचा उल्लेख आहे. त्यांचे चिरंजीव परशुरामपंताच्या वेळीं १८ लक्षांचें उत्पन्न होतें. प्रतिनिधीकडे जमा होणार्‍या वसुलास “जिल्हे बाब” म्हणत.

[संदर्भग्रंथ.-चतु. सं. वृ. (भा. इ. सं. मं.); कैफियती यादी; अष्टप्रधानांचा इति. (भिडे) परशुराम त्र्यंबक प्र. चें चरित्र (बा. प. मेहेंदळेकृत); संस्थानचा वा. रिपोर्ट; १९२२-२३; ज्ञा. प्र. सातारा ग्याझि.]

   

खंड ९ : ई ते अशुमान  

 

  ईजिप्त

  ईजियन समुद्र

  ईजियन संस्कृति
  ईटन-इंग्लंड
  ईडनिंबू
  ईथर
  ईदर
  ईदिग
  ईव्हशाम
  ईशोपनिषद
  ईश्वरकृष्ण
  ईश्वरीपूर
  ईश्वरसिंग
  ईसॉप
  ईस्ट इंडिया कंपनी
  ईस्ट इंडीज
  ईस्टर
  ईस्टर बेट
  ईस्टविक्, एडवर्ड बॅक् हाऊस
  ईक्षणयंत्र
 
  उकाँग
  उकुंद
  उखाणे
  उखामंडळ
  उग्रसेन
  उचकी (हिक्का )
  उचले व भामटे
  उचाड
  उच्च-पंजाब
  उच्च शहर
  उच्च
  उच्छर
  उंज
  उज्जनी
  उज्जयन्ताद्रि
  उझानी
  उंट
  उटकटारी
  उटकमंड
  उंड
  उंडवलें
  उंडविन
  उडियासांझिया
  उडीद
  उडुपी
  उड्र
  उतथ्य
  उत्तंक
  उत्तनगरै
  उत्तमपालेयम
  उत्तर
  उत्तर अमेरिका
  उत्तरध्रुवप्रदेश
  उत्तरपाडा
  उत्तर मेरूर
  उत्तर सरकार
  उत्तरा
  उत्तरापथ
  उत्तानपाद
  उत्पल
  उत्पादन
  उत्रौला
  उदमलपेट
  उदयगिरी
  उदयन
  उदयनाचार्य
  उदयपूर
  उदयप्रभसूरि
  उदयभानु
  उदयसिंह
  उदर
  उदलगुरी
  उदाजी पवार
  उदासी
  उंदिरखेड
  उंदीर
  उदेपुरी बेगम
  उदेपूर संस्थान
  उदेपूर गांव
  उदेपूर शहर
  उदेपूर
  उदेय्यार पालेयम्
  उंदेरी
  उद्गाता
  उद्गीर
  उद्गीरची लढाई
  उद्दंड
  उद्दंडपुर
  उद्दालक
  उद्धव
  उद्धव गोसावी
  उद्धवचिद्घन
  उद्धव नाला
  उद्धव योगदेव
  उद्बोधनाथ
  उद्वेग रोग
  उन
  उन-देलवाडा
  उनबदेव
  उना
  उनियार
  उनी
  उन्कल
  उन्नाव
  उन्माद
  उन्सरी
  उपकन्चा
  उपकेशगच्छ
  उपनयन
  उपनिधि
  उपनिषदें
  उपनेत्र
  उपप्लव्य
  उपमन्यु
  उपरवार
  उपरि
  उपरिचर
  उपवेद
  उपशून्य
  उपसाला
  उपांशु
  उपेनंगडी
  उपेन्द्र परमार
  उप्पर
  उप्माक
  उप्रई
  उप्लेटा
  उंबर
  उम्बेक
  उबेरो
  उंब्रज
  उमत्तूर
  उमरकोट
  उमर खय्याम
  उमरखान
  उमरखेड
  उमरबिन खत्तब
  उमरावती
  उमरी
  उमरेठ
  उमरेड
  उमा
  उमाजी नाईक
  उमापति
  उमापति शिवाचार्य
  उमाबाई दाभाडे 
  उमीचंद
  उमेटा
  उमेदवारी
  उमेरिया
  उर
  उरगप्पा दंडनाथ
  उरण
  उरल पर्वत
  उरलि
  उरवकोंड
  उरिया, उडिया
  उरी
  उरुळी
  उरोगामी
  उर्दुबेगी
  उर्फी, मौलाना
  उर्मिया सरोवर
  उर्मिया, शहर
  उर्वशी
  उलघबेग मिरझा
  उलूक
  उलूपी
  उलेमा
  उल्का
  उल्बारिया
  उल्म
  उल्लतन
  उल्लाळ 
  उवा
  उशना, वैदिक
  उशीनर
  उकूर
  उषा
  उष्टारखाना
  उष्णता
  उष्णताजन्य विद्युत
  उष्णतामापन
  उष्णता-रसायनशास्त्र
  उष्णतावहन
  उष्णमानमापक यंत्र
  उस्का
  उस्तरण
  उस्मान
  उस्मान नगर
  उस्मानाबाद
  उळवी
 
  ऊदाइन (बेंझाईन)  
  ऊदाम्ल
  ऊदिदिन
  ऊदिन
  ऊदिल अल्कहल
  ऊदिल प्रायोज्जिद
  ऊदिल भानन
  ऊधमबाई
  ऊरूस्तंभ
  ऊर्ध्वपातनक्रिया
  ऊस
 
  ऋग्वेद
  ऋचीक
  ऋणमोचन
  ऋतु
  ऋतुपर्ण
  ऋत्विज
  ऋभु वैदिक
  ऋषभ
  ऋषि
  ऋषिऋण
  ऋषिक
  ऋषिपंचमी
  ऋषियज्ञ
  ऋषिवरण
  ऋष्यमूक
  ऋष्यवान
  ऋष्यशृंग
  ऋक्षरजा
 
  एओलिस
  एकचक्रा
  एकत
  एकतत्त्ववाद
  एकदंत भट्ट
  एकनाथ
  एकबटाना
  एकर
  एकरुक
  एकलव्य
  एकलिंगजी
  एकादशरुद्र
  एकादशी
  एकिल्
  एक्झीटर
  एक्रान
  एक्स
  एक्स-ला-चॅपेल
  एगमाँट लॅमोरल कौंट ऑफ
  एगिनकूर
  एचर्ड
  एंजिन
  एट्ना
  एट्रूरिया
  एडगर
  एडन
  एडन कालवा
  एडप्पल्ली
  एन्डर
  एडवर्ड
  एडवर्डसाबाद
  एडिंबरो
  एडेन जॉर्ज - लॉर्ड ऑकलंड
  एडेसा
  एडोम
  एड्रियन
  एदलाबाद
  एनमे
  एनॅमल
  एन्नोर
  एपिक्टेटस
  एपिक्यूरस
  एपिनस, फ्रान्झ उलरिच थिओडार
  एपीडॉरस
  एंपीडोक्लिस
  एफेसस
  एबनी (अबनूस)
  एबल सर फ्रेडरिक
  एंब्रान
  एमडेन
  एमॅन्युअल व्हिक्टर
  एमिनाबाद
  एमीन्स
  एमेअस
  एमेरी
  एम्मेट रॉबर्ट
  एरंडी
  एरंडोल
  एरन
  एरनाड
  एरवल्लर
  एरिडु
  एरिथ्री
  एरिनपुर
  एरियन
  एरिलिगारू
  एरोड
  एर्नाकुलम
  एलगंडल
  एलाम
  एलाय
  एलिआकॅपिटोलिना
  एलिचपूर
  एलिझाबेथ
  एलिस
  एलेनबरो
  एलेफन्टा
  एल्जिन
  एल्जिन लॉर्ड
  एल्फिन्स्टन मौंट स्टुअर्ट
  एल्ब
  एल्बा
  एल्युथेरापीलीस
  एल्युसिस
  एल्सिनोर
  एसर हजन
  एसेक्स परगणा
  एस्किमो
 
  ऐतरेय आरण्यक
  ऐतरेय उपनिषद्
  ऐतरेयब्राह्मण
  ऐन
  ऐनापुर
  ऐनी-अकबरी
  ऐनुद्दीन
  ऐनू
  ऐमक
  ऐयनर
  ऐरणी
  ऐरावत
  ऐहिकवाद
  ऐहोळ
 
  ओक
  ओक वामन दाजी
  ओकटिवन
  ओकपो
  ओकलंड शहर
  ओकहॅम
  ओकुमा, कौंट
  ओकू
  ओकेन, लॉरेन्झ
  ओकोनेल डॅनियल
  ओक्लाहामा
  ओच्चन
  ओजिब्वा
  ओझर
  ओझा
  ओट
  ओटावा
  ओट्टो
  ओडर नदी
  ओडेसा
  ओडोनेल हेनरी जोसेफ
  ओतारी
  ओतुर
  ओध
  ओनला
  ओनेगा
  ओन्गोले
  ओपोर्टो
  ओफीर
  ओब्रायन वुइल्यम स्मिथ
  ॐ ( ओम् )
  ओमान
  ओम्स्क
  ओयामा
  ओरई
  ओरॅंग ऊटंग
  ओरकझई
  ओरछा
  ओरावन
  ओरिसा 
  ओरिसा कालवे
  ओरिसांतील मांडलिक संस्थानें
  ओर्मेरॉड एलिअनॉर
  ओलपाड
  ओल्डहॅम
  ओल्डहॅम थॉमस
  ओल्डेनबर्ग
  ओवसा
  ओवा
  ओवेन, रॉबट
  ओवेन सर रिचर्ड
  ओव्हिड
  ओशीमा
  ओषण
  ओसवाल
  ओसाका अथका ओझावा
  ओस्कार
  ओस्टीयाक
  ओहम्, जार्ज सायमान
  ओहममापक
  ओहिओ
  ओहिंद
  ओळंबा
 
  औक अथवा अवुक जमीनदार
  औट्रम
  औतें
  औदीच्य ब्राह्मण
  औद्देहिक
  औद्योगिक परिषद
  औंध
  औंधपट्टा
  औधेलिया
  औनियाति
  औरंगझेब अलमगीर
  औरंगाबाद
  औरंगाबाद सय्यद शहर
  और्व
  औशनस
  औसले सर विल्यम
  अं
  अंक
  अंकगणित
  अंकचक्र
  अंकलगी
  अंकलेश्वर
  अंकाई टंकाई
  अंकिसा
  अंकेवालिया
  अॅंकोना
  अॅंकोबार
  अंकोर
  अंकोला
  अंग
  अंगठी
  अंगडशाहा
  अंगडि
  अंगडिपूरम
  अंगद
  अंगदशिष्टाई
  अंगदिया
  अंगरखा
  अंगापूरकर (हरि)
  अंगारा
  अंगुत्तर निकाय
  अंगुर शेफ
  अंगुळ
  अंगोरा शहर
  अॅंगोला
  अॅंग्विल्ला
  अंघड
  अंचलगच्छ
  अंज-(अॅंटिमनी)
  अंजनगांव
  अंजनगांव बारी
  अंजनगांव सुर्जी
  अंजनवेल
  अंजनी
  अंजनेरी
  अंजार
  अंजिदिव
  अंजी
  अंजीर
  अंजू
  अंजेंगो
  अॅंजलिको फ्रा
  अॅंटनान-रिव्हो
  अॅंटवर्प
  अंटिओक
  अॅंटिग्वा
  अॅंटियम
  अॅंटिलीस
  अॅन्टिव्हरी
  अन्टीगोनस गोनाटस
  अॅन्टीगोनस सायक्लॉप्स
  अॅन्टीपेटर
  अॅन्टीलिया
  अॅंटोनिनस पायस
  अॅंटोनियस ( मार्कस )
  अंडवृध्दि
  अण्डाशयछेदनक्रिया
  अॅंडीज
  अंडें
  अंडोरा
  अंडोल
  अंडोला
  अॅंड्रासी ज्युलियस
  अॅंड्रिया डेल सार्टो
  अॅंड्रोमेडा
  अॅंड्रयूज थॉमस
  अंतगड
  अंतधुरा
  अंतर इब्नशद्दाद
  अंतराल
  अंतर्गळ
  अंतर्वेदी
  अंतर्ज्ञान
  अंताजी ( उर्फ बाबुराव ) मल्हारराव बर्वे
  अंताजी माणकेश्वर
  अंताजी रघुनाथ
  अंतालिमा
  अंतुर्ली
  अंतूर
  अंतोबा गोसावी
  अंत्रपुच्छदाह
( अपेंडिसाइटीज )
  अंत्रावरणदाह
( पेरिटोनिटिस )
  अॅंथनी सुसान ब्रौनेल
  अंदमान आणि निकोबार बेटें
  अंदमान बेटें
  अंदाळ
  अंदोरी
  अंध किंवा आंध
  अंधक
  अंधत्व
  अंधरगांव
  अंधळगांव
  अंधारी नदी
  अंब
  अंबत्तन
  अंबर ( धातु )
  अंबर
  अंबर उदी
  अंबरखाना
  अंबरनाथ अथव अमरनाथ
  अंबरनाथ
  अंबरपेठ
  अंबराम्ल
  अंबरीष
  अंबलक्कारन्
  अंबलपुलई
  अंबलवासि
  अंबष्ठ
  अंबहटा
  अंबा
  अंबा, (तालुका)
  अंबागड
  अंबागडचौकी
  अंबाजी इंगळे
  अंबाजी दुर्ग
  अंबाजी पुरंधरे
  अंबाडी
  अंबा भवानी
  अंबाला
  अंबालिका
  अंबाली
  अंबासमुद्रम
  अंबिका
  अंबिका दत्त व्यास
  अंबिकापूर
  अंबुशी
  अंबूर
  अंबेर
  अंबेला
  अंबेहळद
  अंबोयना
  अंबोली
  अंभोरा
  अंशुमान
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .