विभाग नववा : ई-अंशुमान
औनियाति - हें गांव बंगाल प्रांतांत ब्रह्मपुत्रा नदीच्या कांठीं आहे. येथें आसाम प्रांतांतील वैष्णव पंथी लोकांचें मुख्य सत्र “धार्मिक विद्यापीठ” आहे. तेथील मुख्य गुरूस गोसाई असें म्हणतात. त्यांच्या तैनातीकरितां अहोम राजांच्या कारकीर्दींत मिळालेली २२०० एकर इनामी जमीन अद्याप त्यांच्याकडे चालू आहे. सत्रामध्यें एक मोठें प्रार्थनामंदिर व ब्रह्मचारी शिष्यांनां रहाण्याकरितां ओर्या आहेत.