प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग नववा : ई-अंशुमान

औरंगझेब अलमगीर - औरंगझेब हें (१६१८-१७०७) बादशहा शहाजहानचें अर्ज मंदबानु मुम्ताझ महाल या राणीपासून झालेलें सहावें मूल होय. याचें सबंध नांव मुहिउद्दीन मोहंमद औरंगझेब होय. जहांगीर हा अहमदनगरच्या स्वारीहून आग्र्यास परत जात असतां पंचमहाल जिल्ह्यांतील दोहद गांवीं २४ आक्टोबर १६१८ (जुनी पद्धत) रोजीं रात्रीं याचा जन्म झाला. जसा त्याचा जन्म स्वारींत झाला तसा त्याचा मृत्यु देखील स्वारींतच झाला.

ज न्मा पा सू न रा ज्या रो ह णा प र्यं त ह की क त.- (१६१८-१६५८) इराणच्या शहा अब्बासनें इ. स. १६१९ मध्यें कंदाहार घेतलें म्हणून शहाजादा खुर्रम शहाजहान) याला काश्मीरहून परत दरबारांत बोलाविलें व त्याची नेमणूक दक्षिणेंत केली; पण पावसाळ्यामुळें तो मध्येंच मांडू येथें थांबला. शहाजहान दक्षिणेंत येण्याचें कारण पुढीलप्रमाणें होतें. आग्र्याच्या दक्षिणेचें धोलपूर हें शहिरियार याला न देतां शहाजहानला दिलें त्यामुळें त्या दोघांभावांत भांडण लागलें. नूरजहाननें शहिरियारचा पक्ष घेतला व शहाजहानला दक्षिणेंत जाण्याचा हुकूम केला. पावसाळा संपला तेव्हां त्यानें नर्मदा ओलांडून अशीरगड घेऊन बर्‍हाणपुरावर चाल केली. त्यामुळें दरबारांत त्यास बंडखोर समजून त्याजवर पर्विझ राजपुत्र व मोहबतखान यांनां सैन्य देऊन पाठविण्यांत आलें. तेव्हां शहाजहान हा ओरिसा मार्गानें बंगाल्यांत गेला व तिकडे रोहतासचा किल्ला त्यानें घेतला. मात्र तेथें त्याचा बादशाही सैन्यानें पराभव केला. नंतर तो दक्षिणेंत पुन्हां परत आला. व आपले मुलगे दारा व औरंगझेब यांनां ओलीस म्हणून लाहोर येथें दरबारांत पाठवून त्यानें बादशहाशीं बोलणें सुरू केलें. हीं मुलें नूरजहानच्या दृष्टीखालीं होतीं. इतक्यांत बादशहा १६२७ मध्यें मरण पावला. नंतर शहाजहान १६२८ मध्यें गादीवर बसला. औरंगझेब व दारा हे लोहोराहून आग्र्यास आले. औरंगझेबास महिना पंधरा हजार रूपयांची नेमणूक झाली व त्याच्या शिक्षणास प्रारंभ झाला.

शिक्षण:- शहाजहानचा प्रख्यात वजीर सादुल्लाखान हा त्याचा एक पंतोजी होता. तसेंच मीरमहंमद हशीम, मुल्लासालिह हेहि दुसरे शिक्षक होते. औरंगझेबची बुद्धी तीक्ष्ण व शीघ्रग्राही होती. त्याच्या पत्रव्यवहारावरून त्याला कुराण व हदीस बरेंच अवगत होतेसें ठरतें. अरबी व फारशी या भाषा एखाद्या मौलवीप्रमाणें त्याला लिहितां व बोलतां येते. तो खासगी व्यवहार हिंदुस्तानी भाषेंत करी. हिंदीहि त्याला व्यवहारापुरतें येई बल्क व कंदाहार प्रांतांत तो कामावर असल्यानें चवताई व तुर्की याहि भाषा त्याला समजत होत्या. अरबी लिपींत त्यानें स्वत: दोन कुराणांच्या प्रती आपल्या हातानें लिहून त्या मक्का व मदिना येथें पाठविल्या होत्या. त्याचें अक्षर घोंसदार असे. वरीलप्रमाणेंच त्याची हस्तलिखित एक प्रत दिल्लीच्या निजामुद्दीन अवलियाच्या दर्ग्यांत ठेवलेली आहे. शिवाय बिनश्रमाचें अन्न खाऊं नये असा त्याचा निश्चय असल्यामुळें त्यानें बर्‍याच कुराणाच्या प्रती लिहून काढल्या होत्या. त्या व स्वत: हातानें शिवलेल्या टोप्या तो विकी व त्यांच्या उत्पन्नाचा उपयोग स्वत:च्या चरितार्थाकडे करी.

त्याच्या पत्रांतून निरनिराळ्या म्हणी व काव्यांचे उतारे येतात. परंतु खुद्द त्याला काव्याची व गायनाची फारशी आवड नव्हती इतिहासाचाहि त्याला नाद नव्हता. त्याचा आवडीचा अभ्यास म्हणजे. कुराण व त्यावरील अनेक टीका, महंमद पैगंबराच्या दंतकथा, मुसुलमानी धर्मशास्त्र, महंमद गझनीचे व इतर धार्मिक ग्रंथ होत. यामुळें दरवेशी व औलिया यांची संगति त्याला फार आवडे. चित्रकला त्याला आवडत नसे. चिनिमातीचे कुसरीचे जिन्नस त्याला आवडत. बापाप्रमाणें इमारतींचा त्याला शोक नव्हता. एकहि नांवाजण्यासारखी कलाकुसरीची इमारत व मशीद त्याच्या कारकीर्दीत बांधली गेली नाहीं. हा चौदा वर्षांचा असतांना साठमारींतील एका हत्तीनें त्याचेवर हल्ला केला असतां त्यानें मोठ्या धैर्यानें त्याला जखमी केलें होतें. या त्याच्या धाडसाबद्दल शहाजहाननें त्याची सुवर्णतुला करून त्याला २ लक्ष किंमतीचें बक्षीस व तो हत्ती नजर करून बहादूर ही पदवी दिली.

कामगिरीस प्रारंभ:- इ. स. १६३४ मध्यें त्याला लखभवन परगणा जाहगीर मिळाला (१३ दिसेंबर), दसहजारी (स्वारांची) मनसब मिळाली. शिवाय यांत चार हजार पायदळहि होतें. १६३५ मध्यें बुंदेल्याच्या स्वारीवर त्याला पाठविलें. या बुंदेल्यांनीं जहांगीरपासून मोंगली राज्यास उपद्रव देण्याचें सुरू केलें होतें. औरंगझेब त्यावेळीं १६ वर्षांचा असल्यानें तो नांवाचा सेनापति होता, खानजहान वगैरे तीन मुख्य सेनापती होते. ४ आक्टोबरला बुंदेल्यांचा पराभव होऊन त्यांची राजधानी मोंगलांनीं घेतली. बुंदेला राजा जुझर हा मारला गेला. या जयाचें बक्षीस म्हणून शहाजहाननें औरंगझेबास (१४ जुलै १६३६) दक्षिणचा सुभेदार नेमलें व तो दौलताबादेस रहाण्यास आला. या सुमारास शहाजीराजे भोंसले हे निजामशाही तगविण्याच्या उद्योगांत होते. त्यांच्यावर खानजहान यास मोंगलानें पाठविलें. पुष्कळ झटापटी होऊन अखेर निरूपायांनीं शहाजी राजांनीं मोंगलांशीं तह केला; बाल निजामशहा मोंगलांच्या हवालीं केला गेला. हा खानजहान यापुढें औरंगझेबचा मसलतगार झाला. याच सुमारास मोंगलांनीं औसा, उदगीर घेतली व बहुतेक गोंडवण प्रांतहि घेतला. इकडील कामगिरी संपल्यामुळें औरंगजेबानें आपला मोर्चा बागलाणकडे वळविला. येथील राजघराणें कनोजच्या रजपूत शाखेपैकीं होतें. सार्‍या हिंदुस्थानांत अजिंक्य म्हणून नांवाजलेले सालेर व मुल्हेर हे दोन किल्ले याच प्रांतांत होते. औरंगझेबानें  बैरामशहा (बागलाणचा राजा) वर ७ हजार सैन्यासह मालोजी व महंमद ताहीर यांनां पाठविलें. १५ फेब्रुवारीला सालेर व ४ जून १६३८ ला मुल्हेर पडले व सारा बागलाण मोंगलास मिळाला आणि बैरामशहा हा मोंगलाचा तीन हजारी सरदार बनला. शहाजीराजांचा मोड केल्याबद्दल, पातशहानें औरंगझेबाची बढती करून त्याला बाराहजारी केलें (१४ आगष्ट १६३७) आणि बागलाण घेतल्याबद्दल पुन्हां त्याला पंधराहजारी (१५ हजार घोडदळ व ९ हजार पायदळ) २३ फेब्रुवारी १६३९ मध्यें दिली. त्यानें १४ जुलै १६३६ ते २८ मे १६४४ पर्यंत दक्षिणची सुभेदारी केली. या आठ वर्षांत चारदां तो बापास भेटण्यास गेला होता. त्यावेळीं बहुधां शाहिस्तेखानास तो आपला अधिकार सुपूर्द करून जाई. खेलोजी भोंसले हा विजापूरकरांची नौकरी सुटल्यामुळें वेरूळच्या आसपास लुटालूट करून चरितार्थ चालवीत असतां औरंगझेबानें (आक्टोबर १६३९) त्याजवर सैन्य पाठविलें; त्यांत खेलोजीचा पराभव होऊन त्याचा वध झाला.

बायका व मुलें.- मोंगली बादशहा लग्नाच्या बाबतींत इराणच्या राजघराण्याशीं सोयरीक जमविण्याची खटपट नेहमीं करीत; शहाजहान, पर्विझ, सुजा यांच्या बायका इराणी सफवी राजघराण्यांतील एका शाखेंतीलच होत्या. अशाच शाखेंतील शहा नवाजखान हा मोंगलांच्या पदरीं एक सरदार होता. त्याची मुलगी दिलरस बानु, हिच्याशीं औरंगझेबचें लग्न (१४ मे १६३७) झालें. इचा मुलगा अझमशहा होय. लग्नानंतर तीन महिने आग्र्यास राहून औरंगझेब पुन्हां आपल्या दक्षिणच्या सुभेदारीवर (४ सप्टेंबर) येण्यास निघाला. औरंगझेबास या दिलरसबानू शिवाय पुढीलहि बायका होत्या. (१) रहमत-उन्-निसा (नबाबबाई), ही मूळची काश्मिरांतील राजुरी संस्थानांतील रजपूत कुमारी होय. (२) औरंगाबादीमहाल, ही औरंगाबादेस औरंगझेबाला मिळाली. (३) उदेपुरीमहाल (पहा) ही वेश्या व नर्तकी होती, हिचा मुलगा कामबक्ष. ही जॉर्जीयन जातीची असून मूळची दाराच्या जनानखान्यांतील परंतु तो मेल्यावर औरंगजेबाकडे आली. हिच्यावर त्याची अतिशय प्रीती होती. (४) हिराबाई उर्फ झैनाबादी बेगम, हिच्या सौंदर्य, अभिनयादि गुणांमुळें औरंगझेब हिच्यावर इतका भाळला होता कीं, तिनें त्याची परिक्षा घेण्याकरितां त्याला दारू पिण्यास सांगितलें असतां तो तयार झाला होता. औरंगझेबास संततीहि बरीच झाली. दिलरसबानूपासून पांच मुलें (झेब-उन-निसा, झिनात-उन् निसा, झुबदतउननिसामोहंमद अझम व मोहंमद अकबर), नबाबबाईपासून तीन मुलें (मोहंमद सुलतान, मोहंमदमुअझम उर्फ शहा अलम उर्फ बहादुरशहा १ ला व बदर-उन्-निसा), औरंगाबादीमहाल पासून एकटी मिहर-उन्-निसा, आणि उदेपुरीमहालपासून एक मोहंमद कामबक्ष, मिळून एकंदर दहा मुलें त्याला झालीं. त्याची बहीण जहानआरा भाजल्यामुळें तिला पाहण्यासाठीं, औरंगझेब हा आग्र्यास (२ मे १६४४) गेला. यानंतर तीन आठवड्यांनीं, बादशहानें त्याला नोकरीवरून बडतर्फ केलें. त्याची सुभेदारी काढून घेऊन, त्याची तनख्याची नेमणूकहि बंद केली. त्याचें कारण म्हणून खाफीखान व लाहोरी “त्याचेकडून कांहीं दुष्कृत्य घडलें” एवढेंच सांगतात. पण कोणतें दुष्कृत्य त्याचा निर्देश करीत नाहींत. मात्र खुद्द औरंगझेबाच्या पुढील एका पत्रावरून बादशहानें दाराच्या सांगण्यावरून त्याचा अपमान केल्यामुळें त्यानें आपण होऊन राजिनामा दिला असें दिसतें. पुढें जहान आराकडून पातशहाची समजूत निघाल्यानंतर, सात महिन्यांनीं औरंगझेबाची नेमणूक गुजराथच्या सुभेदारीवर झाली (१६ फेब्रुवारी १६४५). तेथें तो १६४७ च्या जानेवारीपर्यंत होता. तेवढ्या वेळांत त्यानें तेथील अनेक लुटारू व बंडखोरांचा बंदोबस्त करून, प्रांताची एकंदर व्यवस्था उत्तम लाविली. त्यानंतर त्याची नेमणूक बल्क व बदकशान या प्रांताच्या सुभेदारीवर झाली. यावेळीं पातशहानें त्याची सालिना साठ लक्ष रूपयांवर नेमणूक केली होती.

बल्कवर स्वारी :- बदकशान व बल्क हे प्रांत काबूल व ऑक्सस या नद्यांच्या मध्य भागीं ईशान्येच्या बाजूस आहेत. बदकशान प्रांतांत एके काळीं माणीक व पुष्कराज यांच्या खाणी होत्या; पण त्या यावेळीं बंद पडल्या होत्या व बहुतेक प्रांत उजाड झाला असून रानटी डोंगरी लोक त्यांत रहात असत. बल्क हा बदकशानपेक्षां जास्त सुपीक देश होता. कालव्यांच्यामुळें तेथें शेती उत्तम पिके. तथापि या प्रांतांतील हजारा व ऐमक हे लोक लुटालूट करण्यांत व प्रवाशांचे जीव घेण्यांत तरबेड असत. अशा लोकांनां सैन्याच्या जरबेखालींच व्यवस्थित ठेवतां येई. नैर्ऋत्येकडील भागांतील लोक मात्र सुधारलेले होते. इ. स. १६४२ च्या सुमारास येथील राजा नजरमहंमद होता. त्यानें रयतेस फार छळल्यामुळें येथें बंडें उद्भवत, लोकांनीं त्याला पदच्युत करून त्याच्या अबदुल अझीझ नांवाच्या मुलास गादीवर बसविलें. पण या संधीचा फायदा घेऊन शहाजहाननें, “बल्क व बदकशान हे प्रांत मूळचे बाबरचे” असें कारण दाखवून त्यांवर स्वारी केली. शहाजादा मुरादनें बल्क घेतलें (२ जुलै १६४६) परंतु मुराद लवकरच परत आल्यामुळें, तिकडे पुन्हां बंडाळी उत्पन्न झाली. तेवढ्यासाठीं पातशहानें सुजा व ओरंगझेब यांनां तिकडे पाठविण्याचें ठरविलें औरंगझेब हा लोहोरहून (१० फेब्रुवारी १६४७) निघाला त्यावेळीं त्याला दरबारनें लक्ष रूपये नजर केले. पेशावर येथें उन्हाळा येईपर्यंत त्याला थांबावें लागलें. नंतर (३ एप्रील) काबूल वरून तो बरोबर अलिमर्दान यास घेऊन २५००० सैन्यासह बल्कवर गेला (२५ मे) व हल्ला चढवून त्यानें बल्क काबीज केलें. परंतु, पुढें बदकशानकडे जात असतां, त्याच्या सैन्याचा पराभव होऊं लागला, म्हणून तो बल्ककडे परत वळला. वाटेंत, उझबेक पठाणांनीं त्याच्यावर हल्ले करून त्याचे फार हाल केले. शेवटीं तह होऊन, बल्क शहर व किल्ला नजरमहंमदच्या नातवास देऊन (१ आक्टोबर १६४७) औरंगझेब काबूलकडे परतला. या वेळींहि वाटेंत, उझबेकांनीं त्याचें फार नुकसान केलें, हिंदुकूशच्या घाटांत, वादळा मुळेंहि त्याचें बरेंचसें सैन्य गारद झालें (जवळ जवळ दहा हजार). या स्वारींत मोंगलांस एका कवडीचाहि फायदा न होतां उलट चार कोट रूपयांचा चुराडा उडाला.

यानंतर औरंगझेब यास मुलतानचा सुभेदार नेमलें (मार्च १६४८). या जागेवर तो १४ जुलै १६५२ पर्यंत होता. या वेळांत त्यानें दोन वेळां इराणी लोकांवर स्वार्‍या केल्या. पण त्यांचा तादृश कांहीं उपयोग झाला नाहीं. कारण या मोहिमांत मोगलांपेक्षां इराण्यांचा तोफखाना जास्त उत्कृष्ट ठरला. यापुढें औरंगजेबानें सिंध प्रांतांतील बंडाळी मोडली. त्यानंतर त्याची दुसर्‍यांदा दक्षिणच्या सुभेदारीवर नेमणूक झाली. वाटेंत लाहोरास बापाला भेटून व गेलेली पंधरा हजारींची मनसब पुनरपि मिळवून तो दक्षिणेकडे वळला. यावेळीं पातशहा त्याच्यावर फार रागावला. कारण कंदाहारच्या वरील दोन स्वार्‍यांत १२ कोटी रूपयांचा चुराडा होऊन व असंख्य सैन्य गारद होऊनहि कंदाहार कांहीं त्याला मिळवितां आलें नव्हतें. म्हणून या प्रसंगाबद्दल बापलेकांत अनेक उत्तरेंप्रत्युत्तरें झालीं. खरें म्हटलें तर या अपयशाचा मालक औरंगजेब नव्हता. कारण सैन्याची सर्व हालचाल काबूलहून खुद्द पातशहाच ठरवीत असे.

दक्षिणची दुसरी सुभेदारी.- दक्षिणच्या सुभेदारीवर (१७ जुलै १६५२) नेमणूक झाल्यानंतर तो प्रथम बर्‍हाणपुरास आला; परंतु त्यावेळीं तेथील राजवाडा तयार झाला नसल्यानें गांवाबाहेर कांहीं दिवस राहून नंतर तो राजवाड्यांत दाखल झाला. येथेंच त्यानें हिराबाई (झैनाबादी महाल) ला आपल्या जनानखान्यांत ओढलें. दक्षिणेंत जाण्याबद्दल पातशहाचे हुकूम वरचेवर येत असतांहि, येथें त्यानें नऊ महिने काढले. शेवटीं, बर्‍हाणपूराहून निघून दौलताबादेस तो आला (२५ नोव्हेंबर). येथें त्यानें चार वर्षें काढलीं. त्यांत विजापूर व गोवळकोंडे यांच्यांवर स्वार्‍या केल्या. येथें त्याचा मुलगा अकबर हा जन्मला (११ सप्टेंबर १६५७). येथें त्यानें आपल्या आवडत्या दिलरसबानू बेगमेस मूठमाती दिली (८ आक्टोबर १६५७) आणि येथेंच त्याची आवडती राख झैनाबादीहि मेली. येथेंच असतांना जवळील सातारे गांवचे खंडोबाचें देऊळ व मूर्ती त्यानें फोडून मुरळ्या वाहण्याची चाल बंद केली, खडकी उर्फ औरंगाबाद हें शहर बसलविलें; शिकारी; ख्यालिखुशाली, वेरूळचीं लेणी पाहाणें वगैरे कामांत त्यानें बरेच दिवस घालविले. एका छबीलराम नांवाच्या बीडच्या कानगोनें पैगंबराबद्दल कांहीं अप्रयोजक शब्द काढल्यामुळें औरंगजेबानें न्यायाचा फार्स करून त्याचा शिरच्छेद केला व त्याच्या नातलगांनीं पातशहाकडे याबद्दल अर्ज (अपील) केला असतां, त्यानें स्वत:च्या त्यावेळच्या वजीरा (सादुल्ला)स गुप्त पत्र लिहून, सदर (अपील) दाद पातशहाकडे न जाऊं देतां मधल्यामध्येंच दाबून ठेवण्याबद्दल कळविलें. याप्रमाणें हिंदूंवरील जुलुमास सुरूवात झाली. औरंगाबादेस दिलरसबानूचें जें थडगें आहे, त्याची इमारत म्हणजे ताजमहालचा एक छोटा नमुना होय.

येथें आपल्या स्वत:साठीं त्यानें एक राजवाडा बांधला व अद्यापहि तो पडक्या स्थितींत अलमगिरी महाल म्हणून दाखविला जातो. औरंगजेब जेव्हां पुन्हां तिसर्‍यानें (१६८२) दक्षिणेंत आला तेव्हां त्यानें या शहराभोंवतीं दोन कोस लांबीचा तट मराठ्यांच्या भीतीनें बाधविला. त्याला तीन लाख रूपये खर्च लागला. हा दुसर्‍यानें सुभेदार म्हणून इकडे आला त्यापूर्वीच्या गेल्या आठ वर्षांत दक्षिणेंत या मोंगली सुभेदाराच्या कारकीर्दींत सुबत्ता नांदली नाहीं, शांतता होती, लढायांची गडबड नव्हती, मात्र रयतेची शेती व सांपत्तिक स्थिति सुधारण्याऐवजीं उलट ती खराब झाली. याचें कारण सुभेदारांच्या लवकर होणार्‍या बदल्या हें होय. या आठ वर्षांत सहा सुभेदार झाले. त्यांत कांहीं तर क्रूर, रयतेला पिळणारे, दुष्काळांत सरकारी माल विकून गबर होणारे व शेतीकडे दुर्लक्ष करणारे असे होते. मोंगली दक्षिण (चार प्रांता) चा महसूल जो तीन कोटी बासष्ट लक्ष रूपये पहिल्यानें येत होता तो सन १६५२ च्या वेळीं एक कोटीवर येऊन बसला. यांपैकीं साडेसदतीस लाखांची जहागीर एकट्या औरगंजेबास होती. शिवाय त्याची पगारी नेमणुकीची रक्कम तिजोरींतून स्वतंत्र मिळत असे ती निराळीच ! यामुळें दक्षिणचा खर्च वसुलापेक्षां जास्त होई व ही तूट भरून काढण्यास माळवा अगर गुजराथच्या उत्पन्नापैकीं कांहीं रक्कम पाठवावी लागे. यामुळें औरंगजेब जेव्हां सन १६५३ त इकडे आला तेव्हां त्याला पातशहानें शेतकर्‍यांची स्थिति सुधारून व इतर उपायांनीं दक्षिणचा महसूल वाढविण्यास कळविलें. यानें त्यावर बादशहास सुचविलें कीं, हल्लीं जी २०१/३ लाखांची तूट येते ती भरून काढावयाची असल्यास इकडे जे सरंजामदार आहेत त्यांच्यापैकीं जे कुचकामाचे असतील त्यांच्या जहागिरींतून थोडीशी जहागीर सरकारजमा करावी अगर मला स्वत:ला द्यावी आणि नोकरांचा पगार वगैरे खास खर्चाची रक्कम माळवा किंवा गुजराथच्या उत्पन्नांतून पाठवावी. पैकीं पहिली सूचना पातशहानें कबूल करून दुसरी नाकारली. त्यामुळें बापलेकांत बरेच वेळां खटके उडाले शेवटीं मुर्शिदकुलीखान यास जमीनमहसुलीच्या कामावर नेमण्यांत आलें. त्यानें जवळ जवळ तोडरमल्ली पद्धतच अमलांत आणली. प्रत्यक्ष पिकाची मोजणी, आणेवारी व बाजारभाव पाहून या सार्‍याची रक्कम ठरविली जाई. त्यामुळें जमीनमहसूल वाढला व शेतकर्‍यांनां उत्तेजन मिळालें.

यानंतर औरंगजेबानें जुने अधिकारी बदलून आपल्या निवडीचे तरतरीत नवे अधिकारी नेमले. प्रत्येक स्वाराचा पगार दरमहा रू. २० ठरविला. प्रत्येक किल्ल्यांतील शिबंदी व तोफखान्याची पाहणी करून रद्दी लोक व हत्यारें नाहींशीं करून (त्यामुळें वार्षिक ५० हजार रूपयांची बचत करून) एकंदर सैन्याचा दर्जा वाढविला. त्यानें इतक्या सुधारणा केल्या असतांहि शहाजहानचें मन त्याच्याविषयीं शुद्ध नव्हते. दारा अगर इतर मंडळी त्याला त्याच्या विरूद्ध कानगोष्टी सांगत व तो त्या खर्‍या मानी. या पांच वर्षांच्या सुभेदारींत औरंगझेबाला एकदांहि त्यानें राजधानीस बोलाविलें नाहीं अगर आपल्या वाढदिवशीं ज्याप्रमाणें इतर शहाजाद्यांनां तो बक्षिसें देई त्याप्रमाणें औरंगजेबाला एकदांहि त्यानें बक्षीस दिलें नाहीं. त्यानें केलेल्या शिफारसीहि बादशहा ऐकत नसे. “विजापूर, गोवळकोंडे या दरबाराशीं होणारें राजकारण आपल्या दक्षिणच्या सुभेदारामार्फत व्हावें” अशी त्याची इच्छाहि बादशहा मानीना; एवढेंच नव्हे तर त्यानें गोवळकोंड्याच्या शहाकडून गुपचूप रीतीनें नजराणे घेतले व दक्षिणचें उत्पन्न त्याला वाढवितां आलें नाहीं असा त्याच्यावर आरोप ठेऊन बादशहानें त्याची नेमणूक रद्द करून सुजाला तेथें नेमण्याचेंहि ठरविलें होतें (यापैकीं गुपचूप नजराण्याचा आरोप खरा होता.). या प्रकारास त्रासून त्यानें आपली बहीण जहान आरा हिला लिहिलें कीं, “मी आज वीस वर्षें बादशहाची सेवा एकनिष्ठेनें बजावली असतांहि त्याचा जो विश्वास सुलेमान शुकोह (औरंगझेबाचा पुतण्या) याच्यावर आहे तितकाहि माझ्यावर नाहीं.” शहाजहानच्या हुकुमावरून औरंगझेबानें गोंडवणपैकीं देवगडच्या राज्यावर चढाई करून तें खालसा करून (जानेवारी इ. स. १६५६) तेथील राजास मांडलिक बनविलें. पुढें १७६७ च्या सुमारास या देवगडच्या राजानें मुसुलमानी धर्म स्वीकारला व औरंगझेबास मराठ्यांच्या विरूद्ध मदत केली. औरंगझेबानें त्याबद्दल त्याला बुलंदबख्त (नशीबवान) अशी पदवी दिली (१६८६). जव्हारचा राजा बादशहाला खंडणी देईना म्हणून. औरंगझेबानें त्याच्यावर राव करण यास पाठवून त्याचा पराभव करून [५ जानेवारी १६५६] त्याला मांडलिक बनविलें.

गोंवळ कोंड्याची मोहीम (इ. स. १६५६).-खंडणी थकली, कर्नाटकवरील स्वारींत मोंगलांची परवानगी घेतली नाहीं वगैरे कारणें काढून औरंगझेबानें कुतुबशहावर आपल्या मुलास पाठविलें, आणि ‘विश्वासघातानें कुतुबशहास ठार मार’ असा त्याला सल्ला दिला; पण कुतुबशहा हैद्राबादेहून पळून गोंवळकोंड्यास गेला. त्याला पुढें औरंगझेबानें वेढा दिला. दोन महिने लढाई होऊन अखेर कुतुबशहाच्या विनंतीवरून तह झाला (कुतुबशाही पहा).

इतक्यांत कर्नाटक खालसा करावा असा औरंगझेबानें बादशहास सल्ला दिला व वजीर मीर यानें त्याला भर दिली. कारण तो प्रांत फार श्रीमंत होता. शहाजहानास तें पटून त्यानें कर्नाटकहि जुम्ल्याची जहागीर आहे या सबबीवर कुतुबशहास तो देण्याचा हुकूम केला; परंतु अनेक कारणें दाखवून व शहाजहानाच्या आजारी पणाचा फायदा घेऊन कुतुबनें तो दिला नाहीं. याच वेळीं कर्नाटकाचा शेवटचा राजा श्रीरंगराय यांच्यावर कुतुबशहास व आदिलशहा या दोघांनीं स्वार्‍या केल्या, तेव्हां त्यानें औरंगझेबाची मदत मागितली असतां त्यानें बाह्यात्कारी ती कबूल केली; परंतु दोन्ही बादशहांकडून भरपूर लांच घेऊन अखेर त्यानें त्याला मदत पाठविली नाहीं.

विजापूरची मोहीम (इ. स. १६५७) -औरंगझेबास व बादशहासहि साम्राज्यविस्ताराची हांव सुटल्यामुळें त्यांनीं आदिलशहाशीं भांडण उकरून काढलें, अली आदिलशहा हा खरा वारस नाहीं असें खोटें कारण दाखवून औरंगझेबानें स्वारी केली. प्रथम बेदरचा किल्ला त्यानें घेतला. नंतर भालकी व कल्याणी येथें आदिलशहाचा त्यानें मोड केला (एप्रिल) नंतर बादशहानें हुकूम केल्यावरून त्यानें आदिलशहाशीं तह केला (सप्टेबर) परंतु या वेळीं बादशहा आजारी पडल्यानें औरंगझेब तिकडे निघाला आणि त्यामुलें तहाची अंलबजावणी झाली नाहीं (विजापूर पहा).

शिवाजी महाराजांची स्वारी (१६५७)-याच वेळीं आदिलशहाची बाजू घेऊन महाराजांनीं जुन्नर ते थेट औरंगबादपर्यंत सारा मुलूख व खुद्द अहमदनगरहि लुटलें. औरंगझेबानें त्यांच्यावर नौसिरखानास पाठविलें; पण त्याचा त्यांनीं पराभव केला (मे). नंतर विजापूरकरांनीं तह केल्यामुळें महाराजांनींहि रघुनाथपंताला पाठवून तह केला. या वेळींच औरंगझेबानें प्रथम महाराजांनां पुरतें ओळखून ठेवलें व तो दिल्लीकडे निघून गेला (शिवाजीमहाराज पहा).

वारसाची लढाई:- मुखलिसपुराहून परत आल्यानंतर (६ सप्टेंबर १६५७) शहाजहान एकाएकी मलावरोधानें अजारी पडला. राजवैद्यांनीं औषधोपचार केला तरी दुखणें उलट वाढतच गेलें. रोजचा दरबार बंद झाला. इतक्यांत तो मेल्याची खोटी बातमीहि सर्वत्र पसरली. मध्यंतरीं बादशहास थोडेसें बरें वाटून पुन्हां दुखणें उलटलें. तेव्हां त्यानें सर्व सरदारांदेखत दारास गादीचा वारस नेमलें. नंतर दिल्लीहून तो आग्र्यास आला. येथून दिल्लीस (बरा झाल्यानंतर) त्याचा जाण्याचा बेत होता; परंतु तसें न घडतां त्याची अखेर तेथेंच झाली. सार्‍या दुखण्यांत दारानें त्याची अत्यंत काळजीनें शुश्रुषा केली. संधी आली असतांहि तो गादीवर बसला नाहीं. मात्र त्यानें या आठ महिन्यांत आपली तयारी चालविली होती. त्यानें औरंगझेबाच्या बाजूचे अधिकारी कमी केले. आपल्यातर्फेंच्या लोकांनीं बढती व बक्षिसें दिलीं. नोव्हेंबरमध्यें बादशहा बरा झाला, तेव्हां सुजानें स्वत:स बादशहा पदवी घेऊन तो बंगालवरून दिल्लीस चालून येत असल्याचें दारानें शहाजहानास सांगून त्यावर सैन्य पाठविण्याचें कबूल करविलें. त्याप्रमाणें दाराचा मुलगा सुलेमान शुकोह याला राजा जयसिंहासह पाठविलें; त्यांची गांठ बनारस येथें पडली (१४ फेब्रुवारी १६५८). इकडे मुरादनेंहि आपण बादशहा बनल्याचें जाहीर करून, तख्यावर बसून (५ डिसेंबर) सुरत लुटली. तेव्हां शहाजहाननें त्याची बदली गुजराथवरून वर्‍हाडच्या सुभेदारीवर केली. यांत त्याचा डाव होता; कारण, वर्‍हाड हा सुभा औरंगजेबाच्या अंमलाखालील होता. परंतु मरादनें हुकूम पाळला नाहीं. अद्यापपर्यंत औरंगझेबानें कांहींच उचल केली नाहीं तरी दारा त्यालाच जास्त भिई. औरंगझेब मुरदास मिळाल्याचें त्याला समजल्यावरून त्यानें एक माळव्यावर (औरंगझेबास अडविण्यास) व एक गुजराथेवर (मुरादास तोंड देण्यास) अशीं दोन सैन्यें पाठविलीं. यांचें सेनापती होण्यास कोणीच कबूल होईना. अखेर राणा यशवंतसिंह राजी झाला व त्याला माळव्याचा सुभा करून औरंगझेबावर पाठविलें. व कासीमखानास गुजराथची सुभेदारी देऊन त्याला मुरादवर पाठविलें. इकडे (१६५८ जानेवारी) औरंगझेबानें मीरजुम्ल्यास, तो दिल्लीस बादशहाचे हुकूमावरून जात असतां वाटेंतच कैद केलें व शहाजहानास कळविलें कीं तो विजापूरकराशीं खलबतें करीत होता म्हणून त्याला पकडलें. परंतु खरें कारण निराळेंच होतें. यामुळें त्याच्या सार्‍या संपत्तीचा, सैन्याचा व तोफखान्याचा आयता लाभ औरंगझेबास मिळाला. ही गोष्ट जुम्ल्याच्या सल्ल्यानें झाली. औरंगझेबाची बिनी औरंगाबादेहून (२५ जानेवारी) निघाली. दारानें बादशहा आजारी असतां त्याबद्दलची बातमी बाहेर जाऊं नये म्हणून बंगाल, गुजराथ व दक्षिणेकडे जाणार्‍या सर्व पत्रव्यवहारास बंदी केली. आपल्या तिन्ही भावांच्या दरबारी वकिलावर नजर ठेविली. बादशहाची भेट दोन तीन सरदारांशिवाय इतरांस होईना; त्यामुळें शहाजहान खराच मेला व ती बातमी दारा चोरून ठेवतो असें वर्तमान देशभर पसरलें. रौशनआरानें जनानखान्यांतून औरंगझेबाच्या बाजूनें खटपट सुरू केली. देशांत या संशयित स्थितीमुळें गोंधळ व बेबंदशाही माजली. “खरी स्थिति काय आहे तें पहाण्याकरितां व बादशहा जिवंत असल्यास त्याची भेट घेण्याकरितां मी येत आहे,” असें औरंगझेबानें दारास लिहिलें. औरंगझेब मीर जुम्ल्याच्या सल्ल्यानें वागत असे. सर्वांपेक्षां त्याचा विश्वास मरिवर जास्त होता. विजापूरकरांकडून खंडणी अगर किल्ले कांहीं मिळत नाहीं असें पाहून त्याला त्याची सारी खंडणी माफ करून व किल्ले परत करून औरंगझेबानें आदिलशहाचा स्नेह संपादन केला आणि कुतुबशहालाहि थकलेली खंडणी माफ करून त्याचीहि मर्जी राखली. हंडियाला मलिक हुसेन यास पाठवून त्यानें नर्मदेवरील सार्‍या नावा ताब्यांत घेऊन दाराकडून दक्षिणेंत बादशाही सरदारांनां येणारें टपाल बंद केलें. गोंडवणच्या गोंड राजांनां मैत्रीचीं पत्रें लिहून आपल्याकडे मिळवून घेतलें. कारण त्यांच्या प्रांतांतून आग्र्याचा रस्ता जात होता. खुद्द औरंगझेबाचें सैन्य लढाईच्या दगदगीनें त्रासलें होतें त्याची त्यानें समजूत काढली. दिल्लीस दरबारांतील कांहीं अधिकारीहि त्यानें आपल्या बाजूस वळविले. बाहेरच्या प्रांतांतील फौजबंद कांहीं सरदारहि त्यानें फोडले. नवीन सैन्यभरती सुरू केली; शिपायास एक महिन्याचा पगार अगाऊ मिळूं लागला. बर्‍हाणपुरास लष्करी दारूगोळ्याची तयारी होऊं लागली. तीस हजारांपर्यंत एकंदर लष्कर जमलें. शिवाय जुम्ल्याचा तोफखाना निराळाच होता. त्यांत इंग्लिश व फ्रेंच गोलंदाज पुष्कळ होते. त्याचे सारे अधिकारीहि विश्वासू व जीवास जीव देणारे होते. औरंगाबादेस मुअज्जमला सुभेदार नेमून व त्याच्या दिमतीस दोन विश्वासु सरदार बर्‍याचशा सैन्यानिशीं ठेवून (नाहींतर चुवा शिवाजी या संधीचा फायदा घेऊन सर्व प्रांत उध्वस्त करील), नुकतेंच जन्मलेलें मूल महमंद अकबर यास जनान्यासुद्धां दौलताबादेस किल्ल्यांत ठेवून बरोबर दुसरीं मुलें, महंमद सुलतान व महमंद अझम यांनां घेऊन, औरंगाबादेहून औरंगझेब अखेरीस निघाला होता (५ फेब्रुवारी १६५८). बर्‍हाणपुरास (१८ फेब्रवारी) आल्यानंतर तेथें सर्व लष्कराची तपासणी करण्याकरितां एक महिना त्यानें मुक्काम केला. येथें दरबारांतील त्याचा वकील ईसाबेग दिल्लीहून येऊन त्याला मिळाला; त्यानें तेथील सारी हकीकत सांगितली. तेव्हां आतां जास्त दिवस घालविल्यास यशवंतसिंहाची तयारी कडेकोट होईल म्हणून लगेच त्यानें बुर्‍हाणपुर सोडलें (२० मार्च). आपला सासरा शहा नवाझखान आपल्या बंडांत मिसळत नाहीं असें पाहून औरंगझेबानें आपल्या वडील मुलाकडून त्याला कैद करविलें (२६ मार्च). तो ७ महिने बर्‍हाणपुरच्या किल्ल्यांत कैदेंत होता. बर्‍हाणपुरहून मांडवा व तेथून अकबरपुरास येऊन तेथें त्यानें नर्मदा ओलंडली. (३ एप्रील) व उज्जनकडे रोख फिरविला आणि देपाळपुरास (१३ एप्रील) येऊन, जवळ असणार्‍या मुरादास निरोप पाठविला. दुसर्‍या दिवशीं (१४ एप्रिल) उभयतां भावांची भेट होऊन, सायंकाळीं त्यांनीं धरमत येथें मुक्काम केला व दुसर्‍या दिवशीं यशवंतसिंगाशीं लढाई देण्याचें ठरविलें.

धरभतची लढाई:-(१५|४|१६५८). यशवंतसिंह उज्जनीस फेब्रुवारीच्या शेवटीं आला, परंतु त्याला औरंगझेबानें नर्मदेवरील नावा आपल्या ताब्यांत घेतल्यामुळें त्याच्याकडील (व एकंदर दक्षिणेकडील) कांहींच बातमी समजेना. मुराद गुजराथेहून आपल्यावर येत आहेसें पाहून त्यानें त्याच्या तोंडावर सैन्य पाठविलें; परंतु मुरादनें आपली बाजू कमकुवत पाहून मागें पाय काढला. इतक्यांत औरंगझेबानें नर्मदा ओलांडल्याची बातमीं धारच्या पळून आलेल्या किल्लेदारानें त्याला सांगितली. त्यामुळें गोंधळून यशवंतसिंह पुन्हां उज्जनीस परतला. येथें औरंगझेबानें त्याला निरोप पाठविला कीं, मी फक्त बादशहास भेटण्यास जात आहे. लढाई वगैरेचा माझा हेतु नाहीं, तरी तुम्ही जोधपुरास परत जावें परंतु “मी बादशहाच्या हुकुमाचा ताबेदार आहे असें सांगून यशवंतसिंहानें जाण्याचें नाकारलें, व उज्जनीहून ७ कोसांवरील धरमत गांवीं तळ दिला व औरंगझेबाचा रस्ता अडविला. यांत त्याची चूक झाली कारण, त्यामुळें मुरादला औरंगझेबास जाऊन मिळण्यास संधी सांपडली. तेव्हां यशवंतसिंहानें औरंगझेबास मी तुम्हास येऊन मिळतों म्हणून उगीचच एक निरोप धाडला, परंतु औरंगझेबानें त्याला टाळाटाळीचेंच उत्तर पाठविलें. तेव्हां निरूपायानें त्यानें लढाईची तयारी केली शहाजहानानें दोघा मुलांनां धाकदपटशहा दाखवून अखेरीस निरूपायानें लढाई देऊन त्यांनां परत लावून द्यावे असा यशवंतसिंगास हुकूम केला होता. त्यामुळें यशवंतसिंगास लढाई देतांना फार सावधगिरी ठेवावी लागली. औरंगझेबाचें तसें नव्हतें. तो बिनमुर्वत होता यशवंतसिंगाची फौजहि बेदिल होती. तिच्यांतील मुसुलमान सरदारांनां हा हिंदु सेनापति मान्य नव्हता. त्यांच्यापैकीं पुष्कळांनीं गुप्त रीतीनें औरंगझेबाशीं संधान बांधलें होतें. याचें एक ढळढळीत उदाहरम म्हणजे या धरमतच्या लढाईंत एकंदर २४ रजपूत सरदार मेले; तर उलट मुसुलमान सरदार असा एकच पडला. “खुद्द कासीमखान बादशाही सैन्यासह पळून गेला” असें तत्कालीन सरकारी पत्रकच म्हणतें. एवढेंच नव्हे तर लढाईच्या दुसर्‍या दिवशीं सारेंच्या सारें मुसुलमानी सैन्य औरंगझेबास येऊन मिळालें व त्यानें त्याला बक्षिसें वाटलीं.

सार्‍या २४ घंट्यांतील हा प्रकार काय सांगतो ? शिवाय, खुद्द यशवंत हा नामांकित सेनानी नव्हता. त्यानें निवडलेली जागा अडचणीची होती, इतकी कीं, त्याच्याच घोडदळास एकमुखी हल्ला करण्यास ती अपुरी पडली संकटाच्या वेळीं मदतीची तुकडी त्याच्याकडून वेळेवर गेली नाहीं. घनचक्कर लढाईंत त्याची सार्‍या सैन्यावरील हुकमत नाहीशीं झाली; व तो जणूं काय एखाद्याच सैन्यविभागाच्या सेनापतीसारखा वागूं लागला. औरंगझेबानें आपला सारा तोफखाना अघाडीस घातला होता; त्यावर रात्रीचा हल्ला करून तो उध्वस्त करूं म्हणून यशवंताच्या मुख्य अधिकार्‍यानें सुचविलें असतां त्यानें ऐकिलें नाहीं. त्याचा बेत तोफखान्यास बगल देऊन औरंगझेबाच्या सैन्यावर तुटण्याचा होता परंतु तें सारें फसलें. प्रथम तोफखान्यानें यशवंताचे बहुतेक रजपूत (आघाडीसच असल्यानें) गारद झाले. कांहींनीं तो मारा सहन करून बगल देऊन औरंगझेबाच्या मुख्य सैन्याची गांठ घेतली; परंतु औरंगझेबाच्या इंग्रज व फ्रेंच गोलंदाजांनीं तोफांचीं तोडें तिरकीं फिरवून त्याहि रजपुतांचा समाचार घेतला. त्यांत यशवंताची जागा अरूंद, खांच खळग्याची, दलदलीची असल्यानें त्याचा फार नाश झाला.

औरंगझेब याप्रमाणें विजयी झाल्यावर मुरादासह उज्जनीस आला. तीन दिवस त्याचा तेथें मुक्काम होता. बादशाही सैन्यापैकीं बरेचसे विश्वासघातकी लोक येथें येऊन त्यास मिळाले. नंतर तेथून निघून ग्वालेरीस तो १ महिन्यानें आला (२१ मे). येथें त्याला बादशाही सरदार नासीरीखान (याचा पराभव शिवाजी महाराजांनीं केला होता) फुटून येऊन मिळाला. त्याला त्यानें पंचहजारी केलें व खानहौरान पदवी दिली. येथें त्याला समजलें कीं, दारा हा धोलपुर येथें चंबळ अडवून मोठ्या सैन्यासह येऊन बसला आहे. चंबळेच सर्व उतार अडविले गेल्यानें, बक्षिसाच्या आशेनें एका जमीनदारानें दाखविलेल्या धोलपूरच्या पूर्वेस २० कोसांवर असलेल्या भटाउर गांवीं एका उतारानें औरंगझेब नदी उतरला (२३ मे) त्यामुळें दाराचा सारा प्रयत्‍न फसला. औरंगझेब एकदम आग्र्‍याकडे वळला. तेव्हां त्याला अडविण्यास दारानें आपला जड तोफखाना चंबळवरच टाकून तो स्वत: समुगडास गेला. यामुळें पुढील लढायांत दाराचा तोफखाना लुला झाला. दोन्ही भावांची गांठ आग्र्यापासून ५ कोसांवरील यमुनेकांठच्या (जेथें जहांगीरचा शिकारखाना होता त्या समुगड गांवीं) पडली.

स मु ग ड ची ल ढा ई-(२९ मे १६५८). शहाजहान १६५७ च्या नोव्हेंबरांत आग्र्यास होता. तेथून उन्हाळ्यामध्यें तो दिल्लीस येण्यास निघाला असतां बलुचपूर येथें त्याला धरमतच्या लढाईची हकीकत समजली (२५ एप्रिल १६५८). तेव्हां बादशहा पुन्हां आग्र्यास परत फिरला (२ मे); व दारास त्यानें सैन्य जमविण्यास सांगितलें. सर्व जहागीरदार सरदारांनां बादशाही हुकूम गेले. नवीन रंगरूटाची भरती होऊं लागली. थोडक्याच वेळांत ६० हजार फौज जमली. पण ती कसलेल्या शिपायांची नसून अर्धकच्च्या शिलेदारांची व बाजारबुणग्यांची होती. त्यांतील पुष्कळशा सेनाधिकार्‍यांनां युद्धाची प्रत्यक्ष ओळख नसून दरबारी चैनीची मात्र माहिती होती. सैन्यांतील मोंगल लोक औरंगझेबाकडे फितलेले होते; फक्त सय्यद व रजपूत दाराच्या बाजूचे होते. त्याचे सारे विश्वासू सरदार सुलेमान शुकोहच्या हाताखालीं तो आधींच पाठवून चुकला होता. तसेंच बादशहानेंहि त्याला लढाई बंद ठेवण्याबद्दल सांगितलें. म्हातार्‍याला आशा होती कीं, चारी मुलांमध्यें पुन्हां आपण सलोखा करूं. पण दारानें गर्विष्ठपणानें बापाचा सल्ला ऐकला नाहीं. त्यानें आपली बिनी (९ मे) धोलपुरास चंबळेवर पाठविली व आपण शेवटीं (१८ मे) सर्व सैन्यानिशीं निघाला. त्या वेळचें शहाजहान व दाराच्या भेटीचें वर्णन अत्यंत हृदयद्रवाक व करूणरसपूर्ण असें आढळतें. (मूळांतून वाचावें कंबू, १२ अ. मनुची, १, २६ ७ पहा). बापलेकांची ही शेवटची भेट होय. दारा धोलपुरास येऊन (२२ मे) त्यानें चंबळचे सर्व उतार ताब्यांत घेतले व स्वत:मोर्चे लावून बसला. त्याचा उद्देश औरंगझेबाची खोटी करावयाची व तेवढ्या वेळांत सुलेमान शुकोहला परत बोलावून घ्यावयाचें. परंतु मागें सांगितल्याप्रमाणें त्याचा बेत फसला. औरंगजेबनें चंबळ ओलांडून समुगडास मुक्काम केला (२८ मे) लगेच दारानें समुगडास तळ हलविला; आणि शत्रूपुढें सारा दिवस उन्हांत सार्‍या सैन्यासह तो उभा राहिला ! त्याची इच्छा कीं, औरंगझेबानें प्रथम उठाव करावा; पण युद्धशास्त्रदृष्ट्या ही त्याची मोठी चूक झाली. कारण औरंगझेबाचें सैन्य अत्यंत दमलेलें होतें. व याचें सैन्य ताजेतवानें असून, शिवाय याची संख्या जास्त होती. सारांश यानेंच लढाई केली असती तर खात्रीनें याचा जय झाला असता. परंतु, तसें न करतां त्यानें अंगावर चिलखत असल्यामुळें उन्हांत भाजत असलेलें सैन्य सारखें उभें केलें ! त्या उन्हानें पुष्कळ लोक हत्ती, घोडे, वगैरे जायबंदी झाले व उलट औरंगझेबास चांगलीच विश्रांति मिळाली. रात्रीं औरंगजेबानें आपल्या सैन्यास उत्तेजनपर आश्वासनें दिलीं.

दुसर्‍या दिवशीं (२९|५|५८)लढाईस सुरूवात झाली. दाराची जागा वाईट शिवाय तोफखाना अगदींच कमकुवत, पुष्कळ सैन्य फितूर झालेलें, शिलकी सैन्य न ठेवलेलें वगैरे अनेक कारणानें, जरी दारा व त्याचे रजपूत मोठ्या शौर्यानें लढले, तरी अखेर त्यांचा पराभव झाला. एकदां तर औरंगझेब व मुराद यांच्या हत्तींवर रजपुतांनीं थेट चाल करून त्यांनां कापून काढण्याची संधी साधली होती. पण त्यांनां आयत्या वेळीं दाराकडून मदतच आली नाहीं. औरंगझेबाच्या तोफखान्यानें त्याच्या सैन्याची फळी पार फोडली व त्याच्या बसावयाच्या हत्तीवरहि तोफांचे गोळे येऊं लागले शेवटीं निराशेनें दारा हा हत्तीवरून उतरून घोड्यावर स्वार झाला. येथेंच त्याचा शेवट झाला. तो दिसेनासा झाल्यावर त्याच्या सैन्यानें पळ काढला. शेवटीं दारा व त्याचा मुलगा सिपिहर शुकोह व थोडेसे विश्वासू लोक इतकेच कायते गोटावर राहीले; या नौकरांनीं वेळ पाहून दोघांचे घोडे धरून आग्र्याकडे चालविले. दोन तीन कोस दौड करून थोडी विश्रांति घेऊन तो रात्रीं ९ वाजतां आग्र्यास आला. औरंगझेबानें पाठलाग केला नाहीं. कारण त्याचा पुरेपुर जय झाला होता. वाटर्लुच्या वेलिंग्टनच्या वागण्याप्रमाणें या वेळीं औरंगझेबानें आपलें बचावाचें धोरण ठेवून व दारा दमल्यावर एकदम हल्ले चढवून जय मिळविला होता. (समुगड पहा).

आ ग्रा का बी ज व मु रा द ची कै द:-(जून १६५८) लढाई चालू असतां आग्र्यांत सर्वत्र लोक काळजींत होते. कोणाचा जय होतो व त्याचा काय परिणाम होतो याकडे त्यांचें लक्ष्य लागलें होतें. शेवटीं त्या दिवशीं (२९ मे) रात्रीं ९ वाजतां दारा पळून आग्र्यांत आलेला पाहून लोक व बादशहाहि दु:खांत चूर होऊन गेले. जहानआरा व सर्व जनाना शोकांत बुडाला. बादशहानें दारास आपल्यास एकदां भेटून, नंतर दुसरीकडे जाण्यास निरोप पाठविला. परंतु पराजयानें लज्जित झालेल्या दारानें भेट न घेतां करूणाजनक असें उत्तर मात्र पाठविलें व पहाटे ३ वाजतां आपल्या बायकामुलांसह दारा दिल्लीस जाण्यास निघाला. बादशहानें दिल्लीच्या किल्लेदारास त्याला सर्व प्रकारें मदत करण्यास हुकूम पाठविला. इकडे औरंगझेबानें जय झाल्यावर मुरादचें अभिनंदन करून आजपासून तुझें राज्य सुरू झालें असा त्याचा गौरवहि केला. नंतर २ दिवसांनीं तो आग्र्यास येऊन दाराच्या नूरमंझील बागेंत उतरला तेथें त्याच्या १० दिवसांच्या मुक्कामांत बहुतेक सर्व बादशाही सरदार त्याला येऊन मिळाले. त्यांनां त्यानें बक्षिसें दिलीं. व याप्रमाणें आपलें सैन्य वाढविलें. तेव्हां शहाजहाननें आपल्या हातचें पत्र पाठवून औरंगझेबास भेटीस बोलाविलें व तीन वेळ निरोप पाठविले. परंतु “बादशहा मला कैद करील” या सबबीवर त्यानें भेटीस जाण्याचें नाकारून उलट किल्ल्यास उघडपणें वेढा घातला. त्यापूर्वीं (३ जून) त्यानें आग्रा शहर ताब्यांत घेऊन तेथील कोतवालाला फांशीं दिलें. जुम्मा मशीदीवरून व दाराच्या राजवाड्यावरून मोर्चे बांधून किल्ल्यावर मारगिरी सुरू झाली. परंतु किल्ल्यांतील तोफखाना जबर असल्यानें औरंगझेबाचें कांहीं चालेना; तेव्हां किल्ल्यांतील पाण्याचा मार्गच बंद करण्याच्या उद्देशानें त्यानें नदीच्या बाजूची किल्ल्याची खिजिरी वेस एकदम हल्ला करून ताब्यांत घेतली. तेव्हां किल्ल्यांत हाहा:कार झाला. तहाननें व्याकूळ होऊन बादशहानें मुलास फारच हृदयद्रवाक पत्र लिहिलें. परंतु मुलाचें मन कळवळलें नाहीं. तेव्हां त्याच्याकडे बादशहानें पुन्हां भेटीस येण्याबद्दलचा निरोप पाठविला त्याला त्यानें उत्तर पाठविलें कीं किल्ला माझ्या ताब्यांत दिल्याशिवाय मी भेटीस येत नाहीं. तेव्हां निरूपायानें (८ जून) बादशहानें किल्ल्याचे दरवाजे उघडले व एका क्षणांत एकहि जीव न घालवितां औरंगझेबास जगांतील अफाट संपत्ति एके ठिकाणीं मिळाली. नंतर त्यानें बादशहाला नजरकैदेंत ठेवलें. जहानआरानें औरंगझेबाचें मन वळविण्याची खटपट केली; परंतु “दारावरील बादशहाचें प्रेम नाहींसें न झाल्यानें तो मला दखल करील” असें सांगून त्यानें तिचें कांहीं ऐकलें नाहीं. उलट बादशहाची कैद कडक होऊन त्याच्यावर पहारे बसले. शेवटीं औरंगझेबानें दरबार भरवून (१० जून) सर्व बादशाही सत्ता आपल्या ताब्यांत उघडपणें घेतली. दोन दिवसांत सर्वत्र आपले लोक नेमून (१३ जून) तो दिल्लीस दाराच्या पाठलागास निघाला. तत्पूर्वी त्यानें मुरादास कपटानें पकडून कैदेंत टाकलें (मुराद पहा).

औरंगझेबास दारा पळाल्याचें समजलें, तेव्हां त्यानें प्रथम अलाहाबाद घेऊन, आग्र्याची उजवी बाजू बळकट करून व मुरादाची वाट लावून तो दिल्लीकडे वळला. थोडे दिवस विश्रांति घेण्याचें ठरवून त्यानें सुलेमान शुकोहवर शाहिस्तेखानास पाठवून बहादुरखानास दारावर पाठविलें. व राज्यांत सर्वत्र आपले अधिकारी नेमून आपली बळकटी केली आणि शेवटीं आपल्या फारा दिवसांच्या इच्छेला पर्ण करण्याकरितां २१ जुलै रोजीं दिल्लीबाहेरील शालामर बागेंत स्वत: तक्तारूढ झाला फारसा समारंभ करण्यास त्यावेळीं सवड नसल्यानें फक्त अलमगीर गाझी ही पदवी स्वत:स घेऊन व जरूरीपुरते संस्कार करून (२७ जुलैला) तो ससैन्य दारावर गेला. दारा आग्र्याहून दिल्लीस गेला व तेथून लाहोरकडे पळाला; तेव्हां औरंगझेबहि लाहोरकडे गेला. दारानें लाहोरहून पळ काढला त्यावेळीं त्याचें पुष्कळ सैन्य औरंगझेबास मिळालें. दारा लाहोरहून मुलतान, सक्कर, भक्कर शिबिस्थानमधून पळत पळत अखेर गुजराथेंत गेला (दारा पहा) इकडे शुजा दिल्लीवर चालून आल्याचें समजल्यावरून औरंगझेब व त्याचें सैन्य परत फिरलें व दाराचा पाठलाग तूर्त राहिला.

खजव्याची लढाई.-(५|१|१६५९) शुजानें. शहाजहान मेल्याची बातमी ऐकून आपल्याला बादशहा म्हणवून तो आग्र्याकडे निघाला. त्याच्यावर दारानें आपला मुलगा सुलेमान याला धाडलें. लढाई काशीजवळ होऊन तींत शुजाच्या हलगर्जीपणामुळें त्याचा पराभव झाला व तो पाटण्याकडे (१६५८ जाने) पळाला. इतक्यांत धरमतची लढाई होऊन तींत दाराचा पराभव होऊन तो पळाला व त्यानें सुलेमानाला मदतीस बोलाविलें. सुलेमान तिकडे गेला. इकडे औरंगझेबानें शुजास आपल्या पक्षास राहिल्यास बहार वगैरे प्रांत देण्याचें कबूल केलें, व तो दारावर गेला परंतु ही संधि पाहून व दारानें चिथाविल्यावरून शुजा दिल्लीकडे चालून आला. त्यावर औरंगझेबानें आपला मुलगा सुलतान महंमद यास धाडलें खजवा येथें त्यांची गांठ पडली. खासा औरंगझेबहि दाराला सोडून शुजावर आला. शुजानें कांहीं दिवस रिकामे घालविले. त्यामुळें औरंगझेबाची आयती तयारी झाली. इतक्यांत मीरजुम्लाहि त्याला येऊन मिळाला. त्यामुळें त्याचें सैन्य दुप्पट झालें. शुजाच्या सैन्यांतील तीन लढाऊ हत्तींनीं प्रथम औरंगझेबाच्या सैन्याची फार नासाडी उडविली; परंतु अखेर औरंगझेबानें त्याचा पराभव केला. आयत्या वेळीं शुजा हत्तीवरून खालीं उतरल्यामुळें दारासारखीच चूक त्याच्या हातून झाली; त्याचे कांहीं सरदारहि औरंगझेबास फितूर झालेले होते. दुप्पट सैन्य असल्यानें औरंगझेबाचा जय झाला यांत मोठेंसें आश्चर्य नाहीं (शुजा पहा).

देवराईची लढाई.-(१२ ते १४ मार्च १६५९) दारा गुजराथेंत आल्यानंतर त्यानें अहमदाबाद घेतलें. तेथील सुभा शहानवाझ हा त्याला मिळाला; तेव्हां बादशाही खजिन्याच्या आधारानें त्यानें सैन्य जमविलें. इतक्यांत औरंगझेबाला सोडून आलेल्या यशवंतसिंहानेंहि त्याला अजमिरास आल्यास मदत करण्याचें कबूल केलें. तेव्हां दारा अजमीरकडे निघाला. तेवढ्यांत औरंगझेबानें यशवंतसिंहास फितविलें. त्यामुळें त्यानें दारास मदत केली नाहीं. तो एकटा राहिला. त्यानें अजमीरजवळील देवराईच्या घाटांत औरंगझेबाशीं लढाई दिली. तो मोठ्या शौर्यानें लढला. परंतु त्याचे बरेच सरदार व गोलंदाज औरंगझेबानें फितविले असल्यानें अखेर त्याचा पराभव झाला व तो तेथून पळाळा (दारा पहा).

दाराचा शेवट:- दारा पळाला तो मेरट, अहमदाबाद, कच्छ यावरून सिंधकडे गेला. दुष्काळ असल्यानें वाटेंत त्याचे फार हाल झाले. त्याच्या पाठीवर बहादुरखान व जयसिंह होते. सिंधमध्यें असतांना त्याची आवडती बेगम नदिराबानु मेली. तेव्हां तिचें प्रेत लाहोरास पुरण्यास पाठविलें; त्यावेळीं त्यानें आपलें उरलेलें सारें सैन्य प्रेताबरोबर पाठविलें आणि आपण सर्वजण नाहीं नाहीं म्हणत असतां दादरच्या मलीकजीवन या बलुच्याच्या घरीं राहण्यास गेला. त्यानें विश्वासघात करून दारास पकडून बहादुरखानाच्या हवालीं केलें त्यानें त्याला दिल्लीस नेऊन औरंगझेबाच्या ताब्यांत दिलें. औरंगझेबानें त्याची धिंड काढून व तो नास्तिक आहे म्हणून त्याचा वध करावा अशी त्याला शिक्षा दिली. अखेर (३० जून १६५९) दुसर्‍या दिवशीं रात्रीं अत्यंत क्रूरपणें औरंगझेबानें दाराचा वध करविला (दारा पहा.).

सु ले मा न शु को ह चा शे व ट.-शुजाशीं तोंड देत असतां दारानें सुलेमान शुकोह ह्यास आपल्या मदतीस तांतडीनें परत बोलाविलें (मे १६५८). शुजाशीं तह करून सुलेमान निघून कोर्‍हा येथें आला असतां, त्याला समुगडच्या दाराच्या पराभवाची बातमी समजली. ती समजतांच जयसिंह व दिलरेखान या दोघां वजनदार सरदारांनीं व पुष्कळशा सैन्यानें शुकोहचा पक्ष सोडून ते औरंगझेबाकडे निघाले. सुलेमान निराश झाला; त्याच्याजवळ फक्त सहा हजार सैन्य राहिलें. त्याचा एक निश्चय होईना; त्यामुळें जेत करण्यांत त्याचे बरेच दिवस फुकट गेले अखेर अलाहाबादेहून निघून पंजाबांत बापास जाऊन मिळण्याचें त्यानें ठरविलें त्या प्रमाणें गंगा उतरून लखनौ, मुरादाबादेवरून हरिद्वाराजवळ तो गेला. वाटेंत त्याचें सैन्य कमी कमीच होत चाललें. तेथें येऊन पाहतो तों शत्रू (औरंगझेबा) नें तेथील मार्ग रोंखलेला होता. दक्षिण व पश्चिमेचे सर्व गेगेचे उतार शत्रूच्या ताब्यात होते. यामुळें दाराची व सुलेमानाची भेट न होता बापलेकाची ताटातूट झाली. त्यावेळीं सारें २ हजार सैन्य सुलेमानाजवळ होतें. त्यानें यावेळीं श्रीनगरच्या राजाचा आश्रय मागितला व राजानेंहि तो दिला. परंतु सुलेमानाला त्याचा विश्वास न आल्यानें तो परत फिरला; तेव्हां त्याच्या सैन्यानें त्याला सोडलें. राहतां राहतां सारे १७ लोक शिल्लक राहिले. त्याच्या स्वत:च्या २०० बायका होत्या, त्या त्यानें सैनिकांनां वांटून दिल्या. शेवटीं पुन्हां मुख्य बेगम व १७ सेवक यांसह तो श्रीनगरास आला. पुन्हा तेथील राजानें त्याला आश्रय दिला. इकडे शत्रू पाठीस लागलाच होता. तरी पण एक वर्ष सुलेमान तेथें होता. औरंगझेबानें (सर्व शत्रूंचा निकाल लावल्यानंतर) तेथील राजाला निरोप पाठवून धाक दाखवून, सैन्य पाठवून शुकोहला आपल्या ताब्यांत देण्यास सांगितलें; परंतु त्याचा उपयोग झाला नाहीं. अखेरीस प्रधानाकडून राजावर विष प्रयोगाचा प्रयत्‍नहि करून पाहिला. परंतु तो कट उघडकीस आला. शेवटीं, औरंगझेबानें, हिंदु राजांचा विश्वासघात करण्याच्या कामांत नेहमीं योजण्यांत येणार्‍या जयसिंहाची योजना यावेळीं केली त्यानें राजाच्या मुलाला फितूर करून सुलेमानला आपल्या ताब्यांत घेतलें. त्यावेळीं सुलेमानानें शौर्यानें आपला बचाव केला; परंतु तो जखमी होऊन शत्रूच्या हातीं लागला; नंतर त्याला बंदोबस्तानें दिल्लीस आणलें (ता. २ जानेवारी १६६१). औरंगझेबानें प्रथम त्याचा प्राण न घेण्याचें त्याला वचन दिलें व त्याला ग्वालेरीस कैदेंत पाठवलें. पण एकच वर्षानें औरंगझेबानें आपलें वचन मोडून सुलेमानाला विष पाजून ठार मारलें. (मे १६६२). काका (मुरादबक्ष) व पुतण्या (सुलेमान) यांचीं थडगीं जवळ जवळ बांधलीं गेलीं.

शुजाचा पाठलाग:- खजव्याच्या लढाईनंतर शुजा, प्रयाग, बहादरपुर, पाटणावरून गंगेंतून आपल्या नावांच्या काफिल्यासह मोगिरास आला. त्याच्या पाठीवर औरंगझेबानें मीरजुम्ला यास पाठविलें होतें. त्यानें फितुरीनें मोंगीर घेतलें; त्याचें सैन्य शुजाच्या दुपटीच्यावर होतें. शुजा मोंगीरहून साहेबगंज, राजमहालवरून टंडा येथें आला. राजमहाल राजधानी फितुरीनेंच जुम्ल्यानें मिळविली (१३ एप्रिल). त्यामुळें गंगेच्या पश्चिमेकडील राजमहाल ते हुगळीपर्यंतचा सारा प्रदेश शुजाच्या हातून गेला. तरी पण त्यानें आपल्या आरमारामुळें पुष्कळ दिवस जुम्ल्याला दाद दिली नाहीं. अनेक खटपटी करून व हल्ले चढवून त्यानें टंडाजवळील एक बेट मात्र काबीज केलें. इतक्यांत औरंगझेबाचा मुलगा सुलतान महंमद जो जुम्ल्याबरोबर होता, तो शुजाच्या मुलीच्या लोभानें शुजास जाऊन मिळाला. शुजानें त्याला आपली मुलगी दिली (८ जून). तरी जुम्ल्यानें सैन्यांत शिस्त ठेविली. नंतर पावसाळ्यामुळें लढाया बंद राहिल्या. त्याचा फायदा घेऊन शुजानें राजमहाल काबीज केलें (२२ आगस्ट). हें ऐकून औरंगझेब स्वत: प्रयागास आला व बरेंचसें सैन्य जुम्ल्याच्या मदतीस त्यानें पाठविलें. घेरियाच्या लढाईंत जुम्ल्याचा पराभव झाला परंतु पुढें (११ जानेवारी १६६०) जुम्ल्यानें राजमहाल पुन्हां ताब्यांत घेतलें. तेव्हां शुजा टंडा येथें गेला. (शुजा पहा).

शुजाचा शेवट:- या वेळीं जुम्ल्याचें सैन्य शुजाच्या सैन्याच्या पांचपट जास्त होतें. त्यानें त्या वेळीं त्याला पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा तिन्ही बाजूंनीं वेढलें. त्याच वेळीं शुजाकडून त्याचा जांवई पळून पुन्हां जुम्ल्याकडे आला. टंजा येथें जुम्ल्यानें लढाई देऊन शुजाचा पराभव केला (५ एप्रिल). तेव्हां शुजा ढाक्याकडे पळाला. या वेळीं त्याच्या पुष्कळ विश्वासू लोकांनीं व सैन्यानें त्याला सोडिलें त्याचा खजिना लुटला. तेव्हां निरूपायानं अगदीं थोडक्या अनुचरांसह तो आराकानमध्यें पळून गेला. विश्वासघातकी भावाच्या हातीं लागून खून होण्यापेक्षां आराकानी रानटी लोकांत जाऊन राहण्याचें त्यानें पत्करिलें व हिंदुस्थानास शेवटचा सलाम करून तो तिकडे गेला (१२ मे). तिकडे त्याचा शेवट काय झाला याची नक्की बातमी पुढें केव्हांहि कोणास कळली नाहीं (शुजा पहा).

औ रं ग जे बा चा रा ज्या रो ह ण स मा रं भ.- सर्व मोंगली शहांपेक्षां, औरंगझेबाचा राज्यरोहणसमारंभ जास्त थाटाचा झाला. शहाजहान गादीवर आला तेव्हां जरी त्याचा समारंभ मोठा झाला, तरी त्यावेळीं मयूरसिंहासन तयार झालें नव्हतें व कोहिनूर हिराहि मिळाला नव्हता ! ही सारीं साधनें औरंगझेबाच्या वेळीं तयार होतीं ! या वेळीं मुराद ग्वालेरीस तळघरांत कैदी होता, शुजाचा खजवा येथें व दाराचा अजमेर येथें पूर्ण पराभव होऊन ते सारखे पळत होते ! सारांश, सर्व बाजूंनीं औरंगझेब आतां निर्धास्त झाला होता. मागें (२१ जुलै १६५८) तो तक्तारूढ झाला होता परंतु त्या वेळीं मात्र समारंभ तसाच व्हावयाचा राहिला होता, म्हणून तो आतां उरकून घेण्याचें ठरलें. तारीख ५ जून १६५९ रवीवार हा दिवस नक्की ठरला. त्या दिवशीं प्रथम सार्‍या दिल्लींतून स्वत:ची मिरवणूक काढून औरंगझेब दिवाण-ई-आममध्यें आला आणि ठरलेल्या वेळीं तक्तारूढ झाला; आमच्या मधोमध मयूरसिंहासन मांडलेलें होतें. तक्तावर बसल्यानंतर, त्याच्या नांवाचा खुत्बा पढण्यांत आला व नाणें पाडण्यांत आलें. त्यानें आपलें नांव पुढीलप्रमाणें जाहीर केलें, “अबूल मुझफ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगझिब बहादुर अलमगीर पादशाह घाझी” या वेळीं, त्याचें वय ४० च्या वर होतें. बहिण रोशनआरा व स्वत:च्या चार मुली व मुलें व बेगमा आवडते दरकदार यांनां त्यानें २५ लाखांपर्यंत देणग्या व बक्षिसें दिलीं. त्यानें हिजरी वर्ष सुरू केलें, फारशी नवरोझ बंद केला, दारू बंद केली व कांहीं कर कमी केले. दोन अडीच महिने हा समारंभ चालू होता. जुलूस (तक्तारूढ झाल्याचें सरकारी वर्ष) २३ मे १६५८ पासून धरण्यांत आला.

रा ज्या रो ह णा नं त र चा प हि ला का ळ (१६५८-१६८२):- औरंगझेब राज्यावर बसल्यानंतर मरेपर्यंतच्या कालाचे साधारण २५|२५ वर्षांचें दोन भाग पडतात. पैकीं पहिला काळ उत्तरेकडे गेला व दुसरा काळ दक्षिणेंत गेला. दक्षिणेंत गेल्यानंतर औरंगझेबानें पुन्हां दिल्लीचें तोंड पाहिलें नाहीं. त्यावेळीं त्याच्या रजपुतांनींहि तक्रार केली कीं आमच्या वंश बुडत चालला, कारण २५ वर्षें आम्ही कुटुंबापासून दूर आहों पुष्कळांनीं प्रयत्‍न केले; परंतु “मराठ्यांचीं पाळें मुळें खणून काढल्याशिवाय उत्तरेस जाणार नाहीं” अशी त्याची प्रतिज्ञा होती ! मात्र ती केव्हांहि सफल झाली नाहीं !! उलट मराठ्यांच्या युद्धाकरितां पैसा पाहिजे असल्यामुळें तो उकळण्यासाठीं लोकांवर जो जुलूम केला जाई त्यामुळें व बादशहाच्या गैरहजरीमुळें उत्तरेकडे सर्वत्र बेबंदशाही माजली. पहिल्या काळांत औरंझेबानें काबूल पासून आसामपर्यंत व तिबेटपासून आदिलशाहिपर्यंत प्रदेश जिंकण्याचा धडाका सुरू केला होता; पण याच वेळीं सह्याद्रींत एक लहानशी वायूची झुळूक सुटूं लागली होती आणि याच झुळुकीचें पुढें वादळांत व शेवटीं झंझावातांत रूपांतर होऊन तिनें मोंगली साम्राज्यरूपी वडाचा जुनाट प्रचंड वृक्ष धाडदिशीं उपटून फेंकून दिला. १६५९ त औरंगझेब तक्तावर बसल्यानंतर १६६० त सुलेमान शुकोहला पकडले. १६६१ त मुरादचा व सुलेमानचा खून केला. नंतर १६६२-६४ दोन वर्षें औरंगझेब काश्मिरांत राहिला. १६६६ त शहाजहान मेला. तेव्हां तो आग्र्यास आला. आग्र्याहून निघून १६६६-१६७४ पर्यंतचीं ७|| वर्षें तो दिल्लीसच होता. सरहद्दीवरील आफ्रिडी लोकांनीं १६६७ पासून बंड केल्यामुळें व महंमद अमीन (मुख्य बक्षी) आणि महाराणा यशवंतसिंह यांनं पाठवूनहि कांहीं उपयोग होईना (तेवढ्यापुरतीं बंडें थांबत पुन्हां सुरू होत) म्हणून त्यांच्यावर तो खुद्द (१६७४ त) गेला व आफ्रिडींचा तात्पुरता बंदोबस्त करून तो १६७६ त परत आला. १६७८-त यशवंतसिंह काबुलकडे मेल्यामुळें त्याचें राज्य घशांत घालण्याशाठीं तो अजमीरवर निघाला. याच वेळी यशवंतच्या लोकांनीं त्याचा पुत्र अजितसिंह यास गादीवर बसवून औरंगझेबाविरूद्ध उघड बंड केलें. तें मोडण्याकरितां त्यानें (३ सप्टेंबर १६७९ रोजीं) दिल्ली सोडली. ती अखेरचीच सोडली. पुन्हां त्याचें पाऊल कांहीं दिल्लीस पडलें नाहीं. दोन वर्षें राजपुतान्यांत शहाजादा अकबरसह त्यानें घालवलीं. तत्रापि त्यावेळीं सारा राजपुताना एक झाल्यामुळें (उदेपूरकर महाराण्यानें अजितचा पक्ष धरल्यामुळें) रजपुतांचा पराभव त्याच्यानें झाला नाहीं. त्यांत अकबरानेंहि बंड केलें. तो रजपुतांनां उघड मिळाला; (१ जाने. १६८१) व स्वत:ला बादशहा पुकारून बापावर अजमिरास चालून गेला. यावेळीं त्याचें वय २३ होतें. पूर्वीं उदेपूरकरानें अकबराचा सारखा पराभव केल्यामुळें बादशहानें त्याचा अपमान केला होता म्हणून तो त्याच्या विरूद्ध उठला. यावेळीं औरंगझेबापाशीं फारच थोडें सैन्य होतें. अकबरानें यावेळींच त्याच्याशीं लढी दिली असती तर त्याचा खात्रीनें जय झाला असता. पण त्यानें चैनींत दिवस घालविले. तेवढ्यांत शहानें तयारी केली व एक खोटें पत्र तयार करून अकबराच्या बरोबरच्या रजपुताच्या मनांत त्याच्याबद्दल संशय उत्पन्न करवून त्यांनां परत राजपूतान्यांत लावून दिलें. तेव्हां अकबर एकटा राहिला. तशांत त्याचें मुसुलमानी सैन्यहि बादशहास मिळालें. तेव्हां तो राजपुतान्यांत पळाला व मग तेथून दक्षिणेंत संभाजीमहाराजांकडे आला. एवढ्या वेळांत रजपुतांनींहि तयारी करून बादशहास फार त्रास दिला. तेव्हां त्यानें अखेर नाईलाजानें (सप्टेंबर १६८१) अजमीर सोडून औरंगाबादचा रस्ता धरला. पुढें १७०९ पर्यंत मारवाडावर मोंगल स्वार्‍या करीत असत, परंतु त्या स्वार्‍या फसल्या व अजीत हा मारवाडचा राजा झाला.

मध्यंतरीं १६६२ च्या दोन महिन्यांत शहा फारच आजारी झाला होता. इतका कीं, त्याची आशा लोकांनीं सोडली. त्यावेळीं त्याच्या मुलांनीं राज्य मिळविण्याविषयीं खटपटी सुरू केल्या. रौशनआरानें त्या वेळांत सर्व सूत्रें आपल्या हातीं घेतलीं. लोकांत गडबड सुरू झाली, पण थोड्याच दिवसांत तो बरा झाला व हवा पालटण्यास काश्मीरास गेला. तो तिकडून दोन वर्षांनीं परत आला. याच वेळीं पालमौ त्यानें काबीज केलें; नंतर आसाम घेतलें, कुचबिहारवर स्वारी केली; तींत त्याचें अतिशय नुकसान झालें; परंतु राजानें अखेरीस खंडणी देऊन तह केला (१६६३) याच स्वारींत मीरजुम्ला, (ज्याच्यामुळें शहाला राज्य मिळालें तो) मेला (३० मार्च १६६३). त्यामुळें आसामी लोकांनीं पुन्हां गौहत्ती वगैरे काबीज केलें. त्यांच्या वर रामसिंगास शहानें पाठविलें; ही मोहीम ७ वर्षें (इ. स. १६६९-१६७६) चालली होती. परंतु तींत विशेष फायदा झाला नाहीं. शाहिस्तेखानानें छतगांव (इ. स. १६६६) काबीज करून आराकान प्रांत घेतला. या सुमारास बारीक सारीक बंडाळीहि बरीच झाली; परंतु ती शहानें दाबून टाकली. हिंदूंनां त्याचा जाच झाल्यानें रजपूत, भिल्ल, शीख यींहि बंडें उभारलीं. त्यांत भुपालसिंग गोंडानें त्याला इतका त्रास दिला कीं, त्याच्यावर शहानें चार मोठे सेनापती पाठविले होते (१६६९). इंदरच्या राजानें तर मोगलाला सतत त्रास दिला. याच गडबडींत तोतयांचीहि भर पडली. दाराचा तोतया गुजराथेंत (१६६३); सुजाचा कुचबिहारांत (१६६९) व युसुफझाईंत (१६७४) आणि काश्मीरांत (१७०४); सुजाचा मुलगा बुलंद अखतर याचा अलाहाबादेकडे (१६९९) आणि शहाजादा अकबराचा उत्तरेकडे (१६९९) याप्रमाणें या तोतयांनीं धुमाकूळ घातला होता. बिकानेरचा राव कर्ण हा शहाला मानीना म्हणून त्यानें त्याच्यावर सैन्य धाडून त्याचा पराभव केला (१६६०) ज्यानें चंबळचा उतार औरंगझेबास दाखविला होता, तो चंपतराय बुंदेला खजत्र्याच्या लढाईपर्यंत त्याच्या बाजूस होता. त्यानंतर त्यानें औरंगझेबास सोडून स्वतंत्र राहून शहास फार उपसर्ग दिला, तीन वर्षें त्यानें शहाच्या सैन्यास दाद दिली नाहीं; परंतु अखेर एका मित्राच्या विश्वासघातानें तो धरला जात असतां त्यानें आत्महत्या केली. परंतु मुसुलमानांच्या हातीं तो लागला नाहीं चंपत गेला तर त्याचा पुत्र छत्रसाल राहिला. त्यानें प्रथम औरंगझेबास थोडास त्रास दिला. पुढें जयसिंहानें त्याला युक्तीनें शहाच्या नौकरींत घेतलें. तो दक्षिणेंत शिवाजीमहाराजांवर जयसिंहाबरोबर आला असतां महाराजांनीं त्याची गुप्त भेट घेऊन औरंगझेबाविरूद्ध लढण्याचा त्याला सल्ला दिला. तेव्हांपासून पुढें पुष्कळ वर्षें छत्रसाल हा मोंगलांच्या डोळ्यांत कांठ्यासारखा खुपत राहिला. गयेजवळ पालमौच्या प्रतापरायानें उचल केल्यामुळें शाहिस्तेखानानें त्याचा मोड केला (१६४१-४२), तरी त्यानें त्रास देणें सुरूच ठेविलें होतें. तेव्हां त्याच्यावर दाऊदखानास शहाने पाठविलें (इ. स. १६६१). त्यानें चार पांच महिने हल्ले करून अखेर प्रतापरायाचा पराभव केला; शहानें तो मुसुलमान झाल्यास त्याच्याकडे राज्य ठेवण्याबद्दल कळविलें होते; परंतु त्यानें तें न ऐकल्यानें पालमौचें राज्य खालसा केलें; प्रतापराय जंगलांत निघून गेला छत्रसाल (नवानगरचा औरंगझेबचा मांडलिक राजा छत्रसाल) यास त्याच्या रायसिंग नांवाच्या चुलत्यानें कैद करून मुसलुमान अधिकार्‍यांनां हांकलून आपण गादीव बसला. तेव्हां छत्रसालच्या मदतीस शहानें सैन्य पाठविलें. तीन महिने लढाई चालली, रायसिंगनें मुसुलमानांस दाद दिली नाहीं. अखेरीस सैन्य जास्त असल्यानें मोंगलांचा जय झाला व रायसिंगानें जोहार केला (१६६३ फेब्रुवारी). पुढें पुष्कळ वर्षें काढेवाडांत मोंगलांचा चांगलासा जम बसला नाहीं. शहानें मोरंग संस्थान (१६६४) काबीज केलें.

शहाजहानचा शेवट- शहाजहानला कैदेंत ठेवल्यापासून, त्याच्यावर औरंगझेबाची कडक नजर असे. त्याच्या परवानगीशिवाय कोणालाहि शहाजहानची भेट घेतां येत नसे. शहाजहाननें, मुरादला व औरंगझेबाचा मुलगा सुलतान महंमद याला वश करून स्वत:च्या सुटकेचा प्रयत्‍न केला होता. दारा व सुजा यांच्याशींहि त्याचा पत्रव्यवहार सतत होता. परंतु हें उघडकीस येऊन, मुलानें बापाची कैद जास्त कडक केली. आग्रा किल्ल्यांत सर्वत्र वर व खालीं शिबंदी ठेविली ! शहाजहान बाहेरच्या लोकांनां पत्रें लिही व त्यामुळें राज्यांत नसते बखेडे उत्पन्न होते, म्हणून औरंगझेबानें त्याला पत्रें लिहिण्याचीहि बंदी केली; त्याच्या जवळ असलेल्या बहुमोल जवाहिराचा लोभ औरंगझेबास सुटून नाना युक्तींनीं त्यानें तें हस्तगत करून घेतलें; औरंगझेब अत्यंत लोभी होता. त्यानें बापाला तर या बाबतींत नागविलेंच; परंतु दाराच्या मालकीचें २७ लक्षांचें जवाहीर जें बापाजवळ ठेव म्हणून ठेविलें होतें, तेंहि त्यानें लांबविलें; एवढेंच नव्हे तर, दाराच्या कंचनीहि त्यानें बळजबरीनें आपल्या जनान्यांत खेंचल्या. औरंगझेबानें शहाजहानवर खोजांचा पहारा ठेवला होता. त्याच्या दरोग्यानें तर शहाजहानचा फार छळ केला. एकदां त्यानें जोडा मागितला असतां ज्याची किंमत २ रूपयेंहि नाहीं अशा सपाता त्या दरोग्यानें त्याला पाठविल्या. या त्रासाबद्दल बाप लेकांत पुष्कळ पत्रव्यवहार होई; त्यांत मुलानें ‘आपल्याला असें वर्तन बापाच्याच आगळिकीमुळें करावें लागलें’ असा खुलासा केलेला आहे. “जिकडे तिकडे अधर्म माजल्यामुळें नाईलाजानें मला स्वधर्माच्या उद्धारासाठीं राज्यारूढ व्हावें लागलें.” असा लेकानें आपला बचाव केला आहे. शहाजहाननें त्याला स्वत:च्या भावांचा खून केल्याबद्दल लिहिलें असतां त्यानें उलट त्यालाच त्याच्या खुश्रु व पर्वीझ ह्या भावांचा आठवण दिली. याप्रमाणें बापाला पाठविलेल्या या पत्रांचाच आहेर औरंगझेबास त्याच्या मुलानें (अकबरानें) पुढें (१६८१) केला. शेवटीं शहाजहाननें आपला सारा वेळ धार्मिक कृत्यांत घालविण्याचें ठरविलें. सात वर्षें त्यानें ही कैद भोगली. तींत त्याची शुश्रुषा जहानआरा हिनें केली. शेवटीं (जानेवारी १६६६) त्याला विषमाचें दुखणें आलें. यावेळीं त्याला ७४ वें वर्षें होतें. ता. २२ जानेवारी रोजीं सायंकाळीं सर्वांची निरवानिरव करून व समाधान करून कुराणाचा पाठ चालू असतां अखेरपर्यंत सावध राहून ताजमहालकडे पहात त्यानें प्राण सोडला. त्याची प्रेतयात्रा थोड्याशा खोजांनीं व नौकरांनीं संपविली. औरंझेब मुळींच आला नाहीं, अथवा त्यानें पुढील व्यवस्थाहि केली नाहीं. जहानआरानें बापाचें प्रेत ताजमहालांत पुरविलें. शहाजहान प्रजेचा आवडता असल्यानें त्याच्या मरणानें सर्व प्रजेला फार दु:ख झालें. बापाविरूद्ध बंडें करण्याचा जणूं काय मोंगल राजघराण्यास शापच होता. जहांगिरानें अकबराविरूद्ध, तर शहाजहाननें जहांगिराविरूद्ध बंडें उभारलीं. परंतु प्रत्यक्ष बादशहा पुढें आला तर या मुलांनीं त्यावेळीं माघार घेतली होती. मात्र औरंगझेबाची या सर्वांवर कडी होती. बापाची त्यानें पर्वाच बाळगली नाहीं. त्यानें कुटुंबाचे समाजाचे सारे नियम धाब्यावर बसविले. त्याला लाजलज्या, दयामाया, भीति वगैरे कांहीं वाटत नसून तो एक निष्ठुर असा अत्यंत वाईट माणूस आहे असा त्यावेळींहि लोकांत समज होता. आपले सारे अपराध लपविण्याकरितां त्यानें मुसुलमानी धार्मिकपणाचें निव्वळ ढोंग माजविलें होतें !

द क्षि णें ती ल का म गि री.- शहाजादा औरंगझेब १६५८ च्या जानेवारींत औरंगाबाद सोडून गेला. तो दिल्लीहून बादशहा बनून १६८२ च्या मार्चांत पुन्हां आला. या २४ वर्षांत मोंगलांचा दरारा दक्षिणेंत म्हणण्यासारखा मुळींच बसला नाहीं. याचीं कारणें अनेक आहेत. पहिलें, शिवाजीमहाराजांनीं औरंगाबादच्या सुभ्यास बहुतेक आपल्या मुठींत ठेविले होतें. एकमेकांच्या लढाया होत, परंतु त्या निकाराच्या नसत. महाराजांनीं मात्र आपला फायदा बराच करून घेतला होता. दुसरें, पहिला सुभा शहाअलम याच्यावर बापाचा विश्वास नसल्यामुळें त्यानें त्याच्यावर दिल्लीरखानास गुप्त हेर म्हणून ठेविलें होतें. त्या दोघांत नेहमीं खटके होत. तिसरें, सारी बादशाही फौज महाराजांनां भ्यायली होती. खडकाळ महाराष्ट्रांत लढण्याचें तिच्या जिवावर येई. चवथें, तिच्यांतल्या हिंदू सरदारांनां या गोब्राह्मणप्रतिपालकांचा मनांतून आदर वाटे. पांचवें, मुसुलमान सरदारहि त्यानां फितूर झाले होते. त्यांच्या सैन्यांत चैन व आळस शिरला होता शिवाय भरपूर सैन्य व पैसा औरंगझेब इकडे पाठवीतहि नसे. सहावें, मराठ्यांत राष्ट्रीयत्वाचें वारें जोरानें खेळावयास लागलें होतें. सातवें, विजापुरकर व गोवळकोंडेकरांनींहि मोंगलांस थोडास विरोध केला. सारांश, इतक्या कारणांनीं या २४ वर्षांची खटपट फुकट गेली.

औ रं ग झे ब व शि वा जी म हा रा ज:- प्रथम महाराजांचा व औरंगझेबाचा संबंध विजापूवरील मोंगलाच्या स्वारींत (१६५७) आला. महाराजांनीं औरंगझेबाच्या नुसत्या थापेबाजीस न भुलतां विजापुरकरांचा पक्ष घेऊन चांभारगोंद्यावरून थेट अहमदनगर गांठून तें लुटलें (१६५७ मार्च) व इकडे जुन्नरहि लुटलें. परंतु विजापुरकरांनीं तह केल्यामुळें महाराजांनींहि औरंगझेबास सल्ल्याचें पत्र लिहिलें. यावेळीं औरंगझेब दिल्लीस जाण्याच्या घाईंत होता. त्यानेंहि वरकरणी महाराजांस गौरवाचें पत्र लिहिलें (१६५८); परंतु महाराजांनां गडबड करतां येऊं नये म्हणून बराच बंदोबस्त मागें करून ठेवला. त्यानें शाहिस्तेखानास सुभा करून औरंगाबादेस पाठविलें व महाराजांचा नाश करण्यास त्याला सांगितलें. या कामीं विजापुरकरांनींहि त्याला मदत केली. शिद्दी जोहरनें महाराज पन्हाळ्यास असतां त्यांनां वेढा दिला (आगस्ट १६६०) व इकडे शाहिस्तेखानानें औरंगबादेहून निघून (फेब्रुवारी १६६०) सुपे, बारामती, शिरवळ, शिवापुर, सासवड हीं (१ मे पर्यंत) घेतलीं. पुणें ९ मे रोजीं घेऊन त्यानें उत्तर कोंकणांतील कांहीं ठाणींहि घेतलीं; व पुण्यास सारा पावसाळा काढण्याचें ठरविलें. परंतु मराठ्यांनीं तिकडील सारीं पिकें व धान्यें सफा केल्यामुळें, तो पुणें सोडून चाकणास गेला. कारण तेथून अहमदनगर जवळ येतें. ५६ दिवस वेढा घालून अखेर चाकण घेतलें (आगष्ट). किल्लेदार फार शौर्यानें लढला खान पुन्हां पुण्यास आला व थोड्या दिवसांनीं त्यानें कल्याणभिवंडी घेतली (१६६१). दोन वर्षें बहुधा तो पुण्यासच असावा. त्यानंतर त्यानें नेताजीशीं एकदां चकमक दिली (मार्च १६६३); पुढें प्रख्यात लालमहालवरील रात्रीचा हल्ला होऊन महाराजांनीं त्याचीं बोटें कापून त्याला औरंगाबादेस पिटाळून लाविलें (५ एप्रिल १६६३) औरंगझेबानें लाजेनें शाहिस्तेखानास बंगालच्या सुभ्यावर नेमून (दिसेंबर) शहाजादा मुअझ्झमला औरंगाबादेवर पाठविलें (जाने. १६६४) ही बदलाबदली चालू असतां, महाराजांनीं सुरत शहर लुटलें (६-१० जाने.) व एक कोटीची लूट मिळविली. यामुळें औरंझेबानें १ वर्षपर्यंत तेथील सार्‍या व्यापार्‍यांनां जकात माफ केली. मुअझ्झमनें आपली सुभेदारी ख्याली खुशालींत घालविली. त्याचा दुय्यम अधिकारी जसवंतसिंग पुण्यास कांहीं दिवस होता. या सालीं (१६६४) पावसाळ्यांतहि दौड करून महाराजांनीं अहमदनगर लुटलें तेव्हां औरंगझेबानें १४ हजार सैन्यासह जयसिंहास महाराजांवर पाठविलें. तो पुण्यास (३ मार्च १६६५) आला व जसवंत दिल्लीस परत गेला. त्यानें महाराजांनां आडवण्याचें शक्य तितके सारे उपाय योजले. त्यांच्या सार्‍या शत्रूंनां मदत देऊन, त्यांची एकदम उठावणी केली. औरंगाबाद, जुन्नर, लोहोगड, पुण्यावरून तो सासवडास आला. पुरंदरास वेढा घालून (मोंगल सैन्य दसपट जास्त असल्यानें) त्यानें प्रथम वज्रगड घेतला; पण मराठ्यांनीं इतक्या शौर्यानें बचाव व चढाई चालविली होती कीं, जयसिंगानें मागितल्यावरून औरंगझेबानें नवीन तोफखाना व सैन्य मदतीस पाटविलें ! २|| महिने लढून (मुरारबाजी पडला असतांहि) किल्ला मोंगलास मिळाला नाहीं; प्रतिकूळ वेळ जाणून महाराज जयसिंहास भेटावयास आले (११ जून) व सल्ला होऊन तहाच्या अटी ठरल्या. औरंगझेबानें त्या मान्य केल्या. महाराजांनींहि वचनाप्रमाणें जयसिंहास विजापूरच्या मोहिमेंत मदत दिली. फारसें मनांत नसतां कांहीं उद्देशानें व जयसिंहाच्या आग्रहानें महाराज आग्र्यास गेले (९ मे). औरंगझेबाची भेट झाली (१२ मे) व त्यांना बंदिवास घडला. जयसिंहाच्या सूचनेवरून रामसिंगानें त्यांची बरदास्त चांगली ठेविली. पुढें महाराज पेटार्‍यांतून निसटले [१९ आगस्ट]. ते सुखरूप रायगडास आले (डिसेंबर). या प्रसंगाबद्दल औरंगझेबानें आपल्या मृत्युपत्रांत लिहून ठेवलें आहे कीं “एका क्षणाचें दुर्लक्ष केल्यास मोठें जन्माचें नुकसान होतें. शिवाजी माझ्या एका क्षणाच्या निष्काळजीनें निसटला पण त्यामुळें मला माझ्या या मृत्युकालापर्यंत सतत अडचणींत आयुष्य घालवावें लागलें.” महाराज परत आले तेव्हां जयसिंहावरील औरंगझेबाची मर्जी उडाली होती. तो परत जात असतां बर्‍हाणपुरास मेला [२ जुलै १६६७]. कोणीं म्हणतात त्याला औरंगझेबानें विषप्रयोग केला. पुढें औरंगझेबानें दिलीरखानास मुअझ्झमकडे मदतीस पाठविलें [आक्टो]. परंतु त्या दोघांत सूत नव्हतें. शहाजादा आळशी व विलासी होता. जसवंतसिंगहि इकडे आला होता. तो महाराजांच्या बाजूचा होता. दिलीरच्या सैन्यांत रजपूत राजांत मत्सर होता. शहाजाद्यानें दिलीर यास बेदरवर पाठविलें. या वेळीं आफ्रिडी लोकांवर मोंगली सैन्य गेलें होतें, त्यामुळें व वरील सार्‍या कारणानें औरंगझेबानें महाराजावर स्वारी केली नाहीं व महाराजांनांहि आपली सारी राज्यव्यवस्था लावावयाची असल्यानें त्यांनींहि २ वर्षेंपर्यंत चळवळ केली नाहीं. यावेलीं औरंगझेबानें त्यांच्याशीं तह केला होता.

या नवीन तहाप्रमाणें महाराजांनीं संभाजीला औरंगाबादेस पाठविलें (१६६८). त्याला पंचहजारी मिळाली होती व वर्‍हाडांत जहागीरहि मिळाली होती. दोहों बाजूंनीं हा तह वरवरचा होता. पुढें प्रथम औरंगझेबानें तो (१६६९) मोडला; त्यानें महाराजांच्या संभाजी आदिकरून सर्व मंडळींस कैद करण्याचा हुकूम सोडला ! परंतु ती आधींच निसटली. तह मोडल्यामुळें अर्थातच युद्धास सुरवात झाली. मराठे सर्वत्र धुमाकूळ घालूं लागले त्यांनीं बहुतेक किल्ले परत घेतले (पुरंधरच्या तहांत गेलेले); त्यांत मुख्य सिंहगड होता. चांदोर लुटलें. महारजाशीं लढण्यास फक्त दाऊदखानाशिवाय एकहि मुसलमान तयार होईना ! त्यानें मराठ्यांचा पाठलाग केला, परंतु कांहीं उपयोग होईना. मुअझ्झम व दिलीर यांत भांडणें लागलीं एकदां तर मुखझ्झमनें दिलीरवर हल्ला करण्याचेंहि ठरविलें होतें. दोघांनीं परस्परांबद्दल, दोघेहि शिवाजीस आंतून फूस देतात, असें औरंगझेबास कळविलें. त्यालाहि मुलाबद्दल संशय होताच. इकडे शहाजाद्याच्या भीतीनें दिलीर उज्जनीस पळाला त्याचा पाठलाग शहाजाद्यानें केला, त्यांत त्याला मराठ्यांनीं मदत केली ! परंतु ही आपसांतील यादवी औरंगझेबानें थांबविली. याच संधीचा फायदा घेऊन महाराजांनीं दुसर्‍यांदा सुरत लुटली (आक्टो. १६७०) व ६६ लाख लूट मिळविली. त्यावेळीं त्यांच्यावर दाऊदखान चालून आला. या सुमारास मुल्हेर येथें महाराज होते. दोघांची गांठ वणी दिंडोरीस पडली. तेथें दाऊदचा पार धुव्वा उडाला ! त्याचे मोठमोठे सरदार मेले. निशाणें हिसकावून घेतलीं व अखेर सारा गोट मराठ्यांनीं लुटला (आक्टो.) यानंतर (डिसें.) प्रतापराव गुजरानें पूर्व खानदेश व वर्‍हाड सारें लुटलें. नुसत्या कारंजा गांवींच १ कोटीची लूट मिळाली. त्यानें सर्वत्र चौथ वसूल केली. मोंगलाला प्रतिकाराला वेळच सांपडला नाहीं. इकडे मोरोपंत पेशव्यांनीं खानदेश व बागलाण लुटला. सालेर मुल्हेर हे किल्लेहि काबीज केले. त्यावेळीं दाऊदखान चालून आला पण त्याला मराठ्यांनां हटवितां येईना (जानेवारी १६७१). या सुमारास धोडप वगैरे ४|५ किल्लेहि मराठ्यांनीं घेतले. इतकें झालें तेव्हां औरंगझेब घाबरला व त्यानें मोबतखानास बरोबर बहादुरखान व दिलरिखान व बरेच रजपूत सरदार आणि अफाट सैन्य देऊन महाराजांवर धाडलें. यांची व महाराजांची गांठ चांदोरच्या टेंकड्यांत पडली, परंतु खानाकडून महाराजांचें कांहींच वांकडे झालें नाहीं. तेव्हां त्याला औरंगझेबानें परत बोलाविलें आणि दिलीर व बहादुर यांनां मुख्य नेमलें. त्यानीं सालेरीस वेढा घालून ते सुपें, पुण्याकडे आले. वाटेंत त्यांनीं लोकांची कत्तल केली (डिसें १६७१). तिकडे महाराजांनीं सालेरीस मोंगलांचा सफा नाश केला ! तेव्हां बहादुर व दिलीर हे पुण्याहून तिकडे गेले (जाने. १६७२). याप्रमाणें मोंगलांचा सर्वत्र पराभव झाला ! इकडे पावसाळ्यांत जाऊन मोरोपंतानीं जव्हार काबीज केलें १७ लाखांची लूट मिळाली (जून). रामनगर (कोळ्यांचें राज्य) हि घेतलें (जुलै). सुरत येथून ३० कोस राहिली होती, तेव्हां तेथील लोक घाबरले ! इतक्यांत पंतांनीं ४ लाख चोथेचा हुकूम तेथील फौजदारास पाठविला. नंतर पंतानीं नाशिक जिल्हा लुटला (जुलै) व काबीज केला. पुढें तेलंगण व वर्‍हाड यांत मराठे घुसले. बहादुरखान त्यांच्या मागें लागला पण त्याची कुतरओढ झाली. इकडे महाराजांनीं देशावर व कानडा आणि कोल्हापूरकडे बराच प्रांत मिळविला (१६७३). कोंकणांत दिलीरचा सडकून पराभव झाला (जाने. १६७४). यावेळीं आफ्रिडी लोकांनीं बंड केलें होतें. म्हणून औरंगझेब स्वत: सरहद्दीवर गेला व दख्खमधीलहि बरेचसें सैन्य तिकडे गेलें. त्यामुळें मराठे स्वस्थ झाले. महाराजांनीं यावेळीं राज्याभिषेक करून घेतला (जून). लागलीच (जुलै) बहादुरखानावर जाऊन महाराजांनीं त्याला लुटलें. १ कोटी लूट मिळाली. रामनगर, औरंगाबाद, खानदेश, बागलाण, कोल्हापूर, जुन्नर हे प्रांत (व दुसर्‍यानदां बहादुरखान) मराठ्यांनीं लुटले (१६७५). खोट्या तहाच्या अमिषानें महाराजांनीं बहादुरला झुलविलें व विजापुरकरांस मिळवून घेऊन आणि आपली तयारी करून मोंगलावर ते पुन्हां उलटले (१६७६); विजापुरकरांनीं महाराजांनां खंडणी देण्याचें कबूल केलें होतें परंतु ते पुढें तसे वागेनात म्हणून महाराज कर्नाटकच्या स्वारीस गेले, यावेळीं मोंगलांनीं त्यांच्याशीं सल्ला केला होता. गोवळेकोंडेकर तर त्यांच्याच बाजूचा मांडलिक होता. त्यानें आपलें सैन्य मदतीस दिलें. महाराजांनीं सर्व कर्नाटक काबीज केलें. त्याचें उत्पन्न २० लाख होतें. यावेळीं विजापूर व आदिलशहा महाराजांच्या हातांत येत होता; पण तें कार्य नासलें (१६७८). मोरोपंतानें हुबळी, नाशीक, लुटलें. इतक्यांत महाराज पन्हाळ्यास आले. यावेळीं त्यांचा भुपाळगड मोंगलांनीं घेतला [१६७९]. नंतर दिलीरनें विजापुरावर स्वारी केली, तेव्हां आदिलशहाच्यां विनंतीवरून महाराजांनीं त्याला मदत केली. पुढें राजापुर लुडून महाराज मलकापुर, धरणगांव, चोपडें, बालाघाट या मार्गें मुलुखगिरी करीत जालन्यावर गेले व तिकडे लूट मिळविली, ती घेऊन ते परत येत असतां मोंगलानें सर्व रस्ते अडविले. परंतु बहिजींनें दाखविलेल्या मार्गानें ते सुखरूप रायगडास आले आणि थोड्याच दिवासांत वारले [शिवाजी महाराज पहा].

दु स री वि जा पू र मो ही म.-(१६६५-६६) आदिलशहानें १६५७ च्या तहाच्या अटी पाळल्या नाहींत म्हणून औरंगझेबानें जयसिंहास त्याच्यावर पाठविलें; परंतु मराठ्यांच्या साहाय्यानें अदिलशहानें त्याचा पराभव केला. या स्वारींत कवडीचीहि प्राप्ति न होतां औरंगझेबास उलट १ कोटी रूपये कर्ज झालें (विजापूर पहा).

ति स री वि जा पू र मो ही म.-(१६६७-८४) यावेळीं आदिलशाहींत सर्वत्र यादवी माजली. बादशहा पोर होता त्यामुळें सत्ताधारी वजीरच झाले. या संधीचा फायदा घेऊन दिलीर यास औरंगझेबानें पाठविलें. परंतु त्याचा पराभव झाला (विजापुर पहा.)

शे व ट ची वि जा पू र मो ही म.-१६८५-८६ आदिल शाहीची स्थिति न सुधारतां दिवसेंदिवस बिघडत चालली. शेवटीं खासा औरंगझेबानें जाऊन विजापुरास ७० दिवस वेढा देऊन तें काबीज केलें. शिकंदर बादशहानें नाइलाजानें आपलें राज्य त्याच्या हवालीं केलें. याप्रमाणें आदिलशाहीचा शेवट झाला (विजापुर पहा).

गो व ळ कों ड्या चा ना श (१६२६-७२) - अबदूल कुत्बशहाच्या नंतर त्याचा जांवई अबुल हसन गादीवर आला. तो चैनी, मुर्ख असल्यानें त्याचा सारा कारभार त्याचा वजीर पहात असे. या राज्यांतील अफाट संपत्तीचा लोभ औरंगझेबास सुटून त्यानें तें जबरदस्तीनें खालसा करण्याचा बेत केला. या वेळीं कुत्बशहाचा शहाणा व मुत्सद्दी वजीर मादण्णापंत याचा शहानें खून केला होता. या संधीचा फायदा घेऊन व वरकरणी इ. स. १६५६ चा तह पाळला नाहीं हें कारण दाखवून औरंगझेबानें गोवळकोंड्यावर सैन्य धाडलें. त्यानें हैद्राबाद घेऊन (१६८६) व गोवळकोंड्यास वेढा घालून [१६८७] लढाईनें किल्ला पडत नाहीं असें पाहून फितुरी करून किल्ला काबीज केला व अबुक हसनाल कैद करून गोवळकोंड्याच्या कुत्बशाहीचा शेवट केला (२१ सप्टें. १६८७) मोंगलास एकंदर लूट ७ कोटींचीं मिळाली [कुत्बशाही पहा]

औ रं ग जे ब व सं भा जी - संभाजी गादीवर आला तेव्हां औरंगझेब राजपुतान्यांत होता. त्यानें मराठ्यांवर खानजहानास पाठविलें परंतु त्याच्यानें मराठ्यांचा पराभव झाला नाहीं; इतक्यांत शहाजादा अकबर हा त्यांनां फितुर झाला. तेव्हां औरंगझेब स्वत: मराठ्यांवर आला. त्यानें सर्वत्र मराठ्यांच्या मुलुखांत सैन्य पेरलें, परंतु संभाजीनें त्याचा सगळीकडे पराभव केला. शहाजादा शहाअलम याचें तर इतकें जबरजस्त नुकसान झालें कीं, त्याला उपासमार करीत परत औरंगाबादेस जावें लागलें. (१६८३). औरंगझेबानें सागरच्या पीड नायकाचा पराभव केल्यानंतर (१६८६) व विजापुरचें कर्नाटक हस्तगत केल्यावर अकबरावर सैन्य धाडलें; तेव्हां त्यानें पळ काढला व अखेर कांहीं चालत नाहींसे पाहून राजापुरहून इराणास निघून गेला [१६८६ अकबर पहा]. संभाजीनें १६८५-८७ पर्यंत मोंगलांशीं टक्कर दिली. त्यांत त्याचे कांहीं किल्ले मोंगलांनीं घेतले. त्यानें पन्हाळ्यास वेढा दिला असतां संभाजी हा संगमेश्वरी होता; त्याच्यावर स्वारी करून शेख निजामानें त्याला धरलें व अखेर तुळापुरीं त्याचा वध झाला [१६८९ संभाजी पहा] नंतर फितुरीनें रायगड घेऊन शाहूस कैद केलें.

औ रं ग झे ब व रा जा रा म.-यावेळीं राजारामानें इकडील सारा कारभार पंत अमात्यावर सोंपवून जिंजीचा रस्ता धरला. त्यावर झुल्फिखरखान गेला. परंतु त्याच्यानें राजारामाचा पाडाव झाला नाहीं. इकडे मराठ्यांनीं सर्वत्र रणधुमाळी माजवून दिली. तिच्यापुढें औरंगझेबानें हात टेंकले मराठ्यांनीं चौथ व सरदेशमुख्या वसूल केल्या. राजारामहि जिंजीहून निघून पन्हाळ्यास आला. मोंगल मराठ्यांचे किल्ले एकीकडे घेई तर ते मराठे लागलीच परत घेत. राजाराम वारला तरी मराठे थकले नाहींत. धनाजी, संताजी यांनीं मोंगलांस त्रासवून सोडलें [राजाराम व ताराबाई पहा].

औ रं ग झे बा चा मृ त्यु :-(२१|२|१७०७) मराठ्यांनीं इतकें सतावून सोडल्यानंतर त्यानें शाहूकडून मराठ्यांना पत्रें लिहून भेदाचा प्रयत्‍न केला, परंतु त्याचाहि उपयोग झाला नाहीं तेव्हां औरंगझेब दक्षिणेंतून अहमदनगरास परत येण्यास निघाला. त्यावेळीं मराठ्यांनीं वाटेंतच त्याच्यावर हल्ला करून त्याला लुटलें. या अपजयामुळें त्याचें दुखणें मध्यंतरी थांबले होतें तें उलटलें व अखेर तो नगर येथें मृत्यु पावला. त्यानें मृत्युपत्र करून आपलें राज्य तिघा मुलांत वाटून दिलें होतें. त्याचा शेवट अत्यंत निराशेंत झाला.

जहानआरानें दाराचा पक्ष घेतला होता. परंतु, औरंगझेब गादीवर आल्यानंतर, तिनें त्याचे मागील अपराध विसरून शहाजहानकडून त्याला क्षमा करविली. ती एखाद्या संतीणीप्रमाणें वागे. पुढें औरंगझेबानें तिची नेमणूक वाढवून तिचा मानमरातब फार चांगला ठेवला होता.

औरंगझेबानें आपल्या मुलांमुलींचीं लग्नें घरांतल्याघरांत केलीं; म्हणजे आपल्या भावांच्या मुलीमुलांशीं लाविलीं. त्यामुळें त्याची सारी तिसरी पिढी ही त्याच्या व त्याच्या खून केलेल्या भावांच्या रक्तांच्या मिश्रणाची बनली.

औरंगझेबाचा राज्यकारभार जरी मुख्य त्याच्याच तंत्रानें चाले तरी पुढील अधिकारी त्यांत प्रमुख असत. वजीर, बक्षी व खानसामान (मंत्री= वाकनीस) याप्रमाणेंच धार्मिक बाबतींत काझी-उल्-कझत (मुख्य धर्माध्यक्ष), मुहतसीब [नीतिज्ञ], सदर-उस्-सदर [मुख्य न्यायाधीश]. औरंगझेबानें कोण्याहि हिंदूला वझीर केलें नाहीं. वझिराच्या हाताखालीं दिवाण-ई-तनखा आणि दिवाण-ई-खालसा अशा दोन जागा (इनामी जहागीर व सरकारी जमीन) मुलकी खात्याच्या असत.

औरंगझेबाचें वर्तन.- औरंगझेबाचें धर्माचरण मोठें कडकडीत होतें. त्यानें संसारसुखाची फारशी पर्वा केली नाहीं. त्याचीं सर्व कृत्यें धर्मप्रेरित होतीं. गाणें बजावणें नाच तमाशें, अत्तरगुलाब वगैरे सर्व विलासांनां त्यानें रजा दिली होती. मद्यमांस यांनां त्यानें स्पर्शहि केला नाहीं. प्रत्येकानें स्वत: काम करून आपलें पोषण करावें ही इस्लामची आज्ञा पाळण्याकरितां तो स्वत: डोक्याच्या पातळ टोप्या करून विकी. त्याला सर्व कुराण पाठ येत असे. धर्माच्या केवळ मानसिक समाधानाकरितां सर्वस्वाचाहि त्याग करण्यास औरंगझेब तयार झाला ही गोष्ट विशेष आहे. त्याचा निश्चय कधीं ढळला नाहीं; त्याच्यासारखे शूर व धीट पुरूष थोडेच सांपडतील राज्यप्राप्तीच्या वेळेस केलेलीं क्रूर कृत्यें वगळलीं; तर न्यायाच्या कामांत त्यास इस्लामी कायद्याप्रमाणें फारसा दोष देतां येत नाहीं.

त्याच्या स्वभावांत अविश्वास मात्र पूर्ण भरला होता त्यानें आपली सर्व शक्ति हिंदूंचा पाडाव करून मुसुमानी धर्माची अभिवृद्धि करण्यांत खर्च केली होती. जुलमानें व दराग्रहानें त्यानें आपलें राज्य मोडकळीस आणिलें रजपुत राजांस विनाकराण दुखविणें, हिंदूंची सर्वत्र मानहानी करणें हिंदूंचीं देवळें पाडून त्यांच्यावर जिझिया बसवून त्यांचा अत्यंत छळ करणें (त्यामुळें शीख, सत्‍नामी, रजपुत, मराठे वगैरे सारे हिंदु त्याच्या विरूद्ध उठणें) विजापूर व गोंवळकोंडा येथील निरपराधी राज्यें बुडविणें, मराठ्यांचा नि:पात करण्याकरितां आपल्या सर्व शक्तीचा व्यय करणें या त्याच्या अक्षम्य चुका होत. तो हट्टी, दुराग्रही व संशयी होता; तथापि शिक्षक, सेनापति, वझीर, धर्मशास्त्रज्ञ असल्या एखाद्या कामास तो फार योग्य होता; त्याचें खासगी वर्तन साधें व पवित्र होतें. त्यास उद्योगाची आवड असून चैन व ऐषआराम नको असे. तो प्रत्येक गोष्ट स्वत: करी, त्यामुळें त्याचे कामगार केवळ यंत्रासारखे होऊन, त्यांची हुशारी बाहेर येण्यास अवकाश मिळाला नाहीं.

इराणी, पठाण, रजपूत वगैरे निरनिराळे लोक नोकरीस ठेवून त्यांच्या आपसांतील वैमनस्याच्या जोरावर एकमेकांस एकमेकांची दहशत बसावी अशी त्यानें योजना केली. फौजेंतील नेमणुका वंशपरंपरागत नसत. त्याच्या फौजेंत लहानसा तोफखाना होता. दिवाणी व लष्करी अधिकारी एकाच इसमाच्या हातांत असत. बादशहा आपल्या कामगारांच्या वारंवार बदल्या करी; यामुळें शक्य तितका पैसा उकळण्याकडे त्यांची प्रवृत्ति असे.

औरंगझेबाच्या कारकीर्दीची हकीकत म्हणजे हिंदुस्थानचा साठ वर्षांचा इतिहास आहे असें म्हटलें तरी चालेल. शिवाय १६५८-१७०७ हा कालहि आपल्या देशाच्या इतिहासांत अत्यंत महत्त्वाचा आहे. औरंगझेबाच्या कारकीर्दींत मोंगल साम्राज्याची मर्यादा काश्मीरपासून कर्नाटकपर्यंत, आणि गिझनीपासून चितगांवपर्यंत पसरलेली होती. औरंगझेब आपल्या सर्व साम्राज्याचा कारभार स्वत: नेमलेल्या नोकरांमार्फत चालवीत असे, त्याच्या कारकीर्दींत त्याचा हुकूम मोडण्याचें किंवा करवसुलीचा भरणा न करण्याचें किंवा एखाद्या प्रांतांत स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचें कोणत्याहि प्रांताच्या सुभेदाराच्या हांतून धाडस झालें नाहीं. ताप्तर्य, येवढ्या मोठ्या साम्राज्याची सर्व सत्ता एका व्यक्तीच्या हातांत एकवटलेली आहे असें अवरंगेबावांचून दुसरें उदाहरण हिंदुस्थानच्या प्राचीन व अर्वाचीन कोणत्याहि इतिहासांत नाहीं.

अवरंगझेब बादशहा येवढा बलाढ्य होता; परंतु त्याच्याच कारकीर्दीत मोंगल साम्रज्यास उतरती कळा लागून तें मोडण्याचीं चिन्हें स्पष्ट दिसूं लागलीं इराणचा नादीरशहा, अफगाणिस्तानचा अहमदशहा यांच्या स्वार्‍यांचे आघात दिल्लीवर होण्यापूर्वींच मराठी साम्राज्याचा दरारा व अम्मल मोंगल बादशहांनां जाणवूं लागण्यापूर्वीं, फार काय प्रत्यक्ष अवरंगझेब बादशाहाचे डोळे मिटण्यापूर्वींच साम्राज्याच्या खजीन्याचें व त्याच्या इभ्रतीचें दिवाळें वाजलें. राज्यकारभार विस्कळीत झाला व खुद्द अवरंगझेबानें साम्राज्यांत शांतता व व्यवस्था राखण्याच्या कामीं अपयश आल्याचें कबूल केलें.

तात्पर्य १७ व्या शतकाच्या अखेरीलाच मोंगल साम्राज्य सर्वस्वीं बिघडून गेलें होतें. मराठ्यांबरोबरच्या सामन्यांत बादशाही खजिना रिता झाला व मोंगल सैन्याला अनेकवार हार खावी लागली. बादशहाचे अधिकारी अप्रामाणिकपणें व बेपर्वाईनें वागूं लागले. खुद्द प्रधान, मंत्री व शहाजादे वगैरे मंडळींत चांगला मुत्सद्दी व हुषार कोणी निघाला नाहीं. याप्रमाणें मोंगल जातीची व घराण्याची अन्तर्बाह्य अवनती झाल्याचें दिसूं लागलें. आणि या सर्वांचें कारण काय ! खुद्द औरंगझेब बादशहाबद्दल म्हणाल तर तो स्वत: व्यसनी नव्हता, मूर्ख नव्हता, किंवा आळशीहि नव्हता. त्याची हुषारी नांवाजण्यासारखी होती. बादशहा असून सुखोप भोगाऐवजीं तो सदा सरकारी कामकाजांत दंग असे. शिस्त व व्यवस्था यांची त्याला फार आवड; स्वभावानें अत्यंत शांत व धिम्मा, दूरदूरच्या स्वार्‍यांत स्वत: पडेल ती दगदग सोसण्यास तयार, कोणत्याहि संकटाला न डरणारा किंवा कोणत्याहि हृदयद्रावक प्रसंगांत मन द्रवूं न देणारा होता. प्राचीन विद्वानांचे उपदेशपर ग्रंथहि त्याला चांगले अवगत होते. आणि प्रत्यक्ष युद्धाचा व राजकारणाचा तर बापाच्या कारकीर्दींपासून त्याला अनुभव भरपूर मिळालेला होता. सारांश अशा बहुगुणसंपन्न बादशहाच्या कारकीर्दींच्या पन्नास वर्षांच्या अखेरीस मोंगल साम्राज्यांत गोंधळ माजून तें डबघाईस यावें, हें राजनीतिशास्त्रांतलें एक मोठें कोडेंच आहे. म्हणून औरंगझेबाच्या कारकीर्दींचें ऐतिहासिकदृष्ट्या, तसेंच राजनीतिशास्त्रदृष्ट्याहि मोठें महत्त्व आहे. जदुनाथ सरकारकृत चरित्रांत याविषयावरील वाङ्‌मय आढळेल.]

   

खंड ९ : ई ते अशुमान  

 

  ईजिप्त

  ईजियन समुद्र

  ईजियन संस्कृति
  ईटन-इंग्लंड
  ईडनिंबू
  ईथर
  ईदर
  ईदिग
  ईव्हशाम
  ईशोपनिषद
  ईश्वरकृष्ण
  ईश्वरीपूर
  ईश्वरसिंग
  ईसॉप
  ईस्ट इंडिया कंपनी
  ईस्ट इंडीज
  ईस्टर
  ईस्टर बेट
  ईस्टविक्, एडवर्ड बॅक् हाऊस
  ईक्षणयंत्र
 
  उकाँग
  उकुंद
  उखाणे
  उखामंडळ
  उग्रसेन
  उचकी (हिक्का )
  उचले व भामटे
  उचाड
  उच्च-पंजाब
  उच्च शहर
  उच्च
  उच्छर
  उंज
  उज्जनी
  उज्जयन्ताद्रि
  उझानी
  उंट
  उटकटारी
  उटकमंड
  उंड
  उंडवलें
  उंडविन
  उडियासांझिया
  उडीद
  उडुपी
  उड्र
  उतथ्य
  उत्तंक
  उत्तनगरै
  उत्तमपालेयम
  उत्तर
  उत्तर अमेरिका
  उत्तरध्रुवप्रदेश
  उत्तरपाडा
  उत्तर मेरूर
  उत्तर सरकार
  उत्तरा
  उत्तरापथ
  उत्तानपाद
  उत्पल
  उत्पादन
  उत्रौला
  उदमलपेट
  उदयगिरी
  उदयन
  उदयनाचार्य
  उदयपूर
  उदयप्रभसूरि
  उदयभानु
  उदयसिंह
  उदर
  उदलगुरी
  उदाजी पवार
  उदासी
  उंदिरखेड
  उंदीर
  उदेपुरी बेगम
  उदेपूर संस्थान
  उदेपूर गांव
  उदेपूर शहर
  उदेपूर
  उदेय्यार पालेयम्
  उंदेरी
  उद्गाता
  उद्गीर
  उद्गीरची लढाई
  उद्दंड
  उद्दंडपुर
  उद्दालक
  उद्धव
  उद्धव गोसावी
  उद्धवचिद्घन
  उद्धव नाला
  उद्धव योगदेव
  उद्बोधनाथ
  उद्वेग रोग
  उन
  उन-देलवाडा
  उनबदेव
  उना
  उनियार
  उनी
  उन्कल
  उन्नाव
  उन्माद
  उन्सरी
  उपकन्चा
  उपकेशगच्छ
  उपनयन
  उपनिधि
  उपनिषदें
  उपनेत्र
  उपप्लव्य
  उपमन्यु
  उपरवार
  उपरि
  उपरिचर
  उपवेद
  उपशून्य
  उपसाला
  उपांशु
  उपेनंगडी
  उपेन्द्र परमार
  उप्पर
  उप्माक
  उप्रई
  उप्लेटा
  उंबर
  उम्बेक
  उबेरो
  उंब्रज
  उमत्तूर
  उमरकोट
  उमर खय्याम
  उमरखान
  उमरखेड
  उमरबिन खत्तब
  उमरावती
  उमरी
  उमरेठ
  उमरेड
  उमा
  उमाजी नाईक
  उमापति
  उमापति शिवाचार्य
  उमाबाई दाभाडे 
  उमीचंद
  उमेटा
  उमेदवारी
  उमेरिया
  उर
  उरगप्पा दंडनाथ
  उरण
  उरल पर्वत
  उरलि
  उरवकोंड
  उरिया, उडिया
  उरी
  उरुळी
  उरोगामी
  उर्दुबेगी
  उर्फी, मौलाना
  उर्मिया सरोवर
  उर्मिया, शहर
  उर्वशी
  उलघबेग मिरझा
  उलूक
  उलूपी
  उलेमा
  उल्का
  उल्बारिया
  उल्म
  उल्लतन
  उल्लाळ 
  उवा
  उशना, वैदिक
  उशीनर
  उकूर
  उषा
  उष्टारखाना
  उष्णता
  उष्णताजन्य विद्युत
  उष्णतामापन
  उष्णता-रसायनशास्त्र
  उष्णतावहन
  उष्णमानमापक यंत्र
  उस्का
  उस्तरण
  उस्मान
  उस्मान नगर
  उस्मानाबाद
  उळवी
 
  ऊदाइन (बेंझाईन)  
  ऊदाम्ल
  ऊदिदिन
  ऊदिन
  ऊदिल अल्कहल
  ऊदिल प्रायोज्जिद
  ऊदिल भानन
  ऊधमबाई
  ऊरूस्तंभ
  ऊर्ध्वपातनक्रिया
  ऊस
 
  ऋग्वेद
  ऋचीक
  ऋणमोचन
  ऋतु
  ऋतुपर्ण
  ऋत्विज
  ऋभु वैदिक
  ऋषभ
  ऋषि
  ऋषिऋण
  ऋषिक
  ऋषिपंचमी
  ऋषियज्ञ
  ऋषिवरण
  ऋष्यमूक
  ऋष्यवान
  ऋष्यशृंग
  ऋक्षरजा
 
  एओलिस
  एकचक्रा
  एकत
  एकतत्त्ववाद
  एकदंत भट्ट
  एकनाथ
  एकबटाना
  एकर
  एकरुक
  एकलव्य
  एकलिंगजी
  एकादशरुद्र
  एकादशी
  एकिल्
  एक्झीटर
  एक्रान
  एक्स
  एक्स-ला-चॅपेल
  एगमाँट लॅमोरल कौंट ऑफ
  एगिनकूर
  एचर्ड
  एंजिन
  एट्ना
  एट्रूरिया
  एडगर
  एडन
  एडन कालवा
  एडप्पल्ली
  एन्डर
  एडवर्ड
  एडवर्डसाबाद
  एडिंबरो
  एडेन जॉर्ज - लॉर्ड ऑकलंड
  एडेसा
  एडोम
  एड्रियन
  एदलाबाद
  एनमे
  एनॅमल
  एन्नोर
  एपिक्टेटस
  एपिक्यूरस
  एपिनस, फ्रान्झ उलरिच थिओडार
  एपीडॉरस
  एंपीडोक्लिस
  एफेसस
  एबनी (अबनूस)
  एबल सर फ्रेडरिक
  एंब्रान
  एमडेन
  एमॅन्युअल व्हिक्टर
  एमिनाबाद
  एमीन्स
  एमेअस
  एमेरी
  एम्मेट रॉबर्ट
  एरंडी
  एरंडोल
  एरन
  एरनाड
  एरवल्लर
  एरिडु
  एरिथ्री
  एरिनपुर
  एरियन
  एरिलिगारू
  एरोड
  एर्नाकुलम
  एलगंडल
  एलाम
  एलाय
  एलिआकॅपिटोलिना
  एलिचपूर
  एलिझाबेथ
  एलिस
  एलेनबरो
  एलेफन्टा
  एल्जिन
  एल्जिन लॉर्ड
  एल्फिन्स्टन मौंट स्टुअर्ट
  एल्ब
  एल्बा
  एल्युथेरापीलीस
  एल्युसिस
  एल्सिनोर
  एसर हजन
  एसेक्स परगणा
  एस्किमो
 
  ऐतरेय आरण्यक
  ऐतरेय उपनिषद्
  ऐतरेयब्राह्मण
  ऐन
  ऐनापुर
  ऐनी-अकबरी
  ऐनुद्दीन
  ऐनू
  ऐमक
  ऐयनर
  ऐरणी
  ऐरावत
  ऐहिकवाद
  ऐहोळ
 
  ओक
  ओक वामन दाजी
  ओकटिवन
  ओकपो
  ओकलंड शहर
  ओकहॅम
  ओकुमा, कौंट
  ओकू
  ओकेन, लॉरेन्झ
  ओकोनेल डॅनियल
  ओक्लाहामा
  ओच्चन
  ओजिब्वा
  ओझर
  ओझा
  ओट
  ओटावा
  ओट्टो
  ओडर नदी
  ओडेसा
  ओडोनेल हेनरी जोसेफ
  ओतारी
  ओतुर
  ओध
  ओनला
  ओनेगा
  ओन्गोले
  ओपोर्टो
  ओफीर
  ओब्रायन वुइल्यम स्मिथ
  ॐ ( ओम् )
  ओमान
  ओम्स्क
  ओयामा
  ओरई
  ओरॅंग ऊटंग
  ओरकझई
  ओरछा
  ओरावन
  ओरिसा 
  ओरिसा कालवे
  ओरिसांतील मांडलिक संस्थानें
  ओर्मेरॉड एलिअनॉर
  ओलपाड
  ओल्डहॅम
  ओल्डहॅम थॉमस
  ओल्डेनबर्ग
  ओवसा
  ओवा
  ओवेन, रॉबट
  ओवेन सर रिचर्ड
  ओव्हिड
  ओशीमा
  ओषण
  ओसवाल
  ओसाका अथका ओझावा
  ओस्कार
  ओस्टीयाक
  ओहम्, जार्ज सायमान
  ओहममापक
  ओहिओ
  ओहिंद
  ओळंबा
 
  औक अथवा अवुक जमीनदार
  औट्रम
  औतें
  औदीच्य ब्राह्मण
  औद्देहिक
  औद्योगिक परिषद
  औंध
  औंधपट्टा
  औधेलिया
  औनियाति
  औरंगझेब अलमगीर
  औरंगाबाद
  औरंगाबाद सय्यद शहर
  और्व
  औशनस
  औसले सर विल्यम
  अं
  अंक
  अंकगणित
  अंकचक्र
  अंकलगी
  अंकलेश्वर
  अंकाई टंकाई
  अंकिसा
  अंकेवालिया
  अॅंकोना
  अॅंकोबार
  अंकोर
  अंकोला
  अंग
  अंगठी
  अंगडशाहा
  अंगडि
  अंगडिपूरम
  अंगद
  अंगदशिष्टाई
  अंगदिया
  अंगरखा
  अंगापूरकर (हरि)
  अंगारा
  अंगुत्तर निकाय
  अंगुर शेफ
  अंगुळ
  अंगोरा शहर
  अॅंगोला
  अॅंग्विल्ला
  अंघड
  अंचलगच्छ
  अंज-(अॅंटिमनी)
  अंजनगांव
  अंजनगांव बारी
  अंजनगांव सुर्जी
  अंजनवेल
  अंजनी
  अंजनेरी
  अंजार
  अंजिदिव
  अंजी
  अंजीर
  अंजू
  अंजेंगो
  अॅंजलिको फ्रा
  अॅंटनान-रिव्हो
  अॅंटवर्प
  अंटिओक
  अॅंटिग्वा
  अॅंटियम
  अॅंटिलीस
  अॅन्टिव्हरी
  अन्टीगोनस गोनाटस
  अॅन्टीगोनस सायक्लॉप्स
  अॅन्टीपेटर
  अॅन्टीलिया
  अॅंटोनिनस पायस
  अॅंटोनियस ( मार्कस )
  अंडवृध्दि
  अण्डाशयछेदनक्रिया
  अॅंडीज
  अंडें
  अंडोरा
  अंडोल
  अंडोला
  अॅंड्रासी ज्युलियस
  अॅंड्रिया डेल सार्टो
  अॅंड्रोमेडा
  अॅंड्रयूज थॉमस
  अंतगड
  अंतधुरा
  अंतर इब्नशद्दाद
  अंतराल
  अंतर्गळ
  अंतर्वेदी
  अंतर्ज्ञान
  अंताजी ( उर्फ बाबुराव ) मल्हारराव बर्वे
  अंताजी माणकेश्वर
  अंताजी रघुनाथ
  अंतालिमा
  अंतुर्ली
  अंतूर
  अंतोबा गोसावी
  अंत्रपुच्छदाह
( अपेंडिसाइटीज )
  अंत्रावरणदाह
( पेरिटोनिटिस )
  अॅंथनी सुसान ब्रौनेल
  अंदमान आणि निकोबार बेटें
  अंदमान बेटें
  अंदाळ
  अंदोरी
  अंध किंवा आंध
  अंधक
  अंधत्व
  अंधरगांव
  अंधळगांव
  अंधारी नदी
  अंब
  अंबत्तन
  अंबर ( धातु )
  अंबर
  अंबर उदी
  अंबरखाना
  अंबरनाथ अथव अमरनाथ
  अंबरनाथ
  अंबरपेठ
  अंबराम्ल
  अंबरीष
  अंबलक्कारन्
  अंबलपुलई
  अंबलवासि
  अंबष्ठ
  अंबहटा
  अंबा
  अंबा, (तालुका)
  अंबागड
  अंबागडचौकी
  अंबाजी इंगळे
  अंबाजी दुर्ग
  अंबाजी पुरंधरे
  अंबाडी
  अंबा भवानी
  अंबाला
  अंबालिका
  अंबाली
  अंबासमुद्रम
  अंबिका
  अंबिका दत्त व्यास
  अंबिकापूर
  अंबुशी
  अंबूर
  अंबेर
  अंबेला
  अंबेहळद
  अंबोयना
  अंबोली
  अंभोरा
  अंशुमान
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .