विभाग नववा : ई-अंशुमान
औशनस - (१) उशना ऋषीचे पुत्र (शंडामर्क श.) पहा. (२) भारतवर्षीय तीर्थ. येथें उशना ऋषीनें तप करून नीतिविषयक अनेक सूत्रेंहि रचिलीं म्हणून यास हें नांव पडलें. या तीर्थास कपालमोचन असेंहि नांव आढळतें (भार. शल्य. अ. ३९).
(३) गौतमांगिरसवंशमालिकेंतील एक ऋषि व त्याचें कुल. (अंगिरा शब्द पहा.).