विभाग नववा : ई-अंशुमान
अंकलगी - मुंबई इलाखा. बेळगांव जिल्हा. मार्केडेय नदीकाठीं गोकाकच्या नैर्ऋत्येस सुमारें १५ मैलांवर हें २००० लोकवस्तींचें गांव आहे. येथें लक्ष्मीचें देवालय असून लिंगाइतांचा एक मठ आहे. इ. स. १८३८ सालीं बेळगांव जिल्ह्याचें मुख्य ठिकाण झालें. त्यापूर्वी जिल्ह्याचें मुख्य ठिकाण गोकाक, माणेली, मुरगोड अंकलगी व बेळगांव यांपैकी एक असावें अशा सूचना आल्या होत्या.