विभाग नववा : ई-अंशुमान
अंकिसा - तहशिल शिरांचा. जिल्हा चांदा. गोदावरीच्या डाव्या तीरावर शिरोंचाच्या दक्षिणेस १७ मैलांवर हें एक मोठें व सुपीक खेडें आहे. लोकसंख्या सुमारें चार हजार आहे. जमीन उत्कृष्ट असून ज्वारी व मिरच्या यांचें पीक चांगलें येतें. या ठिकाणीं दोन तळीं असून एकाचे पाण्यावर सुमारें २० एकर भाताची लागवड होत असून दुसरें पिण्याच्या पाण्याकरितां राखून ठेवलें आहे. दर गुरूवारीं येथं बाजार भरतो. येथें प्राथमिक शिक्षणची शाळा आहे.