विभाग नववा : ई-अंशुमान

अँकोबार - अबिसीनिया देशांतील शोआ प्रांतांतील शहर. हें एके पेळीं शोआ प्रांताचें राजधानींचे शहर होतें. हें आडिस आबाबाच्या ईशान्येस ९० मैलांवर असून उत्तर अक्षांश, ९ ,३४' व पूर्व रेखांश ३९ ,५४' यांच्या दरम्यान आहे. १८९० सालीं दुसर्‍या मेनेलेकनें राजकीय कैदी या ठिकाणीं ठेवण्याची चाल पाडली. येथील लोकसंख्या सुमारें २,००० आहे.