विभाग नववा : ई-अंशुमान
अंकोर - कांबोजमधील प्राचीन ख्मेर संस्कृतीचा अवशेष म्हणून असलेल्या पडक्या झडक्या इमारतींच्या समूहाला हें नांव आहे. टॉन्ले-सप या महासरोवराच्या उत्तरेस असणार्या जंगलांत हे अवशेष असून त्यांपैकीं प्रमुख म्हणजे अंकोरधोम हें गांव आणि अंकोर-वात नांवाचें देवालय हीं दोन्हीं टॉन्ले-सपला मिळणार्या सियेमरीप नदीच्या दक्षिण किनार्यावर आहेत. इतर याच तर्हेचे अवशेष नदीच्या किनार्यावर जवळच इकडे तिकडे पडले आहेत.
अंकोरथोम हें नदीपासून अजमासें पाव मैलावर आहे. आयमेनियरच्या मतें तिसर्या जयवर्मनच्या कारकीर्दीत (इ. स.८६० त) या शहराच्या वसाहतीला सुरूवात होऊन ९०० च्या सुमाराला याचें काम पुरें झालें. हें गांव चौकोनी आकाराचें असून याचें क्षेत्रफळ सुमारें चार चौरस मैल आहे. याच्या भोंवतीं २० ते ३० फूट उंचीचा एक तट आहे. तटाला पांच मोठे दरवाजे असून त्याच्या आंत वर जुगल वाढलेले असे देवालयांचे व वाड्यांचे अवशेष आहेत. त्यांपैकीं मुख्य म्हणजे:-
(१) भोवतालीं तट असलेल्या राजवाड्याचे अंश तटावर फिमीनकस म्हणून निमूळतें देवळासारखें बांधकाम आहे. याच्या पूर्वेस उत्तम नक्षीकाम असलेली एक गच्ची आहे.
(२) बेयोनचें देवालय खांबाच्या गॅलरी असलेला एक चौरस प्रकार असून त्यांच्या आंत दुसरे चौकोनी सज्जे आहेत. त्यांमध्यें क्रूससारख्या आकाराची एक इमारत व त्या इमारतीच्या मधोमध बुडाशीं वर्तुळाकार असणारें एक मोठें शिखर आहे. सज्जावर मधून मधून बांधलेलीं अशीं पन्नास शिखरें असून त्यांवर ब्रम्ह्याचीं चार तोंडें काढून त्यांनां बरीच शोभा आणिली आहे. एकंदरीत हें देवालय ख्मेर अवशेषांतील विशेष लक्ष वेधण्यासारखें आहे असें म्हणतां येईल.
ख्मेर कलाकौशल्याचें अति उत्तम राखून ठेविलेलें उदाहरण म्हणजे अंकोर-वात होय. अंकोर-थोमच्या दक्षिणेस एका मैलाच्या आंत एका चौकोनी प्रकारांत हें आहे. प्राकाराभोवतीं खंदक असून त्याची बाह्य सीमा ६,६६० यार्ड आहे. पश्चिम बाजूस खंदकावरून जाणारा एक पाव मैलाचा फरसबंदी रस्ता मुख्य इमारतीच्या मोठ्या दरवाज्याशीं नेऊन सोडला आहे. मूळचें हें देवालय ब्रम्ह्याचें होतें; पण पुढें त्यांत बुद्धोपासना सुरू झाली. ख्रि. श. १२ व्या शतकाच्या पूर्वाधात हें बांधिलें असा आयमोनियरचा तर्क आहे. याला तीन मजले असून त्यांचा एकमेकांशीं बाहेरच्या जिन्यांनीं संबंध ठेवला आहे. हे जिने अनेक आहेत; मजले वरच्या बाजूस आकारानें कमी होत गेले आहेत. अगदीं टोंकाला एक निमुळतें शिखर आहे. वरच्या दोन मजल्यांच्या गच्च्यांवर कोंपर्यांशीं शिखरें बांधिलीं आहेत. दुसरा मजला आणि पश्चिमेकडील तीन द्वारें यांनां जोडणार्या तींन गॅलरी आहेत; त्यांवर खांबावर उभारलेलें कमानदार छप्पर आहे. एक आडवी गॅलरी काढून या गॅलरी जोडल्या आहेत. रव्मेर-शिल्प गच्च भरलेलें पण एकजात असून त्यांत मुख्यत: माणसें, जनावरें व देव यांच्या प्रतिमा आढळतात. पुराणांतील प्रसंग, युद्धें, हे बहुधा या चित्रांचे विषय असतात. वेलपत्ती काठांकरितां राखून ठेवलेली असते; खांबांच्या डोक्यांवर किंवा लांकडांवर, भांड्यांवरहि वेलपत्ती काढतात. निरनिराळ्या रंगांचे वाळूचे दगड इमारतीच्या कामी बहुधा वापरण्यांत येत. एक प्रकारचा जांभळा दगडहि वापरीत. या दगडाचे मोठमोठे ठोकळे करून सिमेंटशिवाय ते अगदीं बरोबर एकमेकांनां जोडण्यांत येत.
[ लंडन येथील ''डेलीमेल'' वर्तमानपत्राच्या २३ डिसेंबर १९२१ च्या ''अंकांत सिटी दॅट वॉज ए जंगल'' नांवाचा अंकोरविषयीं एक लेख आला आहे. त्यांतील काहीं माहिती पुढें दिली आहे].
आ ज चें अं को र : -गेल्या पंधरा वर्षोतच फ्रेंच इंडोचीन मधील अंकोर या प्राचीन शहरांतील मजा चांगल्या उघडकीस आल्या आहेत. स्फिंक्स एवडे मोठाले युद्धाचे (ब्रम्ह्याचे पाहिजे असें वाटतें) दगडी तोंडावळे ज्यांत आहेत असे पुष्कळ अवशेष परवांपर्यंत अफाट जंगलांतील गर्द झाडींत लोपून गेल्यानें जगाच्या निदर्शनास आले नव्हते. १९०७ सालीं बटम बँग आणि सियेमरीप हे प्रांत फ्रान्सच्या ताब्यांत गेल्यावर फ्रेंच इंजिनियर लोकांचें पहिलें काम या अवशेषांवरील जंगलाचें अफाट आवरण काढण्यांचें होऊन बसलें. हें काम हलकें सलके नसून अजमासें एक हजार वर्षोची सृष्टीची वाढ त्यांना उपटून टाकावयाची होती.
यांतील लोक अकेडेमीच्या देखरेखीखालीं येथें काम करीत होते. या घोर जंगलांतून मार्ग काढीत असतां त्यांनी वाघ, सर्प व इतर विचित्र क्रूर पशू भेटले; पण शेवटी त्यांनीं पुतळे, देवळे व पुष्कळ जुन्या काळांतील गोष्टी सेशोधिल्या. त्या सर्वांवर हिरवळ वाढली होती.
पण आजचे अंकोर शहर कसें आहे? जंगलांतील पायवाटाऐवजी मोटार रस्ते दिसतात. वाघ, सर्प वगैरे प्राणी दिसत नाहींत. या शहराचें सौंदर्य जगाला स्पष्ट दिसत आहे. व प्राचीन अवशेषाशेजारीच एक अर्वाचीन बंगला झाला आहे. दरवर्षी या शहराला येणार्यांची संख्या वाढती आहे. जगातील अपूर्व देखाव्यापैकीं हा एक आहे यांत शंका नाहीं.