विभाग नववा : ई-अंशुमान
अंगडि - म्हैसूर संस्थान. कडूर जिल्ह्याच्या मुलगेर तालुक्यांतील ५३५ (इ. स. १९०१) लोकवस्तीचें एक खेडें. होयसल राजांचे मूळचें ठिकाण सोसेव्हूर, शाशिपूर, अथवा शशिकपूर नांवाचें जे होतें तें हेंच होय. येथें पुष्कळ जुनाट देवळे आहेत. त्यापैकीं बसंतम्माचें देऊळ या बाजूस जास्त प्रसिद्ध आहे. होयसल राजांची कुलस्वामिनी वासंतिका देवी होतीं तिचेंच हें देऊळ असावें.