विभाग नववा : ई-अंशुमान
अँग्विल्ला - अँग्विल्ला अथवा स्नेक (सर्प) हे ब्रिटिश इंडिजपैकीं एक बेट आहे. हें लीबर्ड बेटांच्या समूहापैंकीं असून सेंट किटसन्नेव्हिसच्या इलाख्यांत आहे. लोकसंख्या सुमारें चार हजार असून बहुतेक नीग्रो आहेत. हें १८० १२' उत्तर अक्षांश व ६३० ५' पश्चिम रेखांशांत असून १६ मैल लांब आहे. क्षेत्रफळ सुमारें ३५ चौ. मैल आहे. येथील वृक्षांचा नाश केल्यामुळें जंगल अगदींच कमी झालें आहे. सर्व जमीन शेतकर्यांच्या मालकीची असून ते रताळी, वाटाणे कडधान्यें, धान्य वगैरे पिकवितात व मेंढ्या व बकर्या पाळितात. गुरेंढोरें, चुन्याच्या फास्फेट, मीठ वगैरे जिनसा शेजारच्या सेंट टॉमस बेटांत जातात.