विभाग नववा : ई-अंशुमान
अंघड - मुंबई इलाखा. रेवाकांठांतील छोटें संस्थान. मेहवामधील अगदीं दक्षिणेकडे मही नदीच्या कांठीं हें गांव आहे. याचें क्षेत्रफळ ३॥ मैल असून एका कुटुंबांतल्या सहा कोळ्यांच्या तें मालकीचें आहे; पैकीं तिघांनां कोतवाल व तिघांना पागी असें संबोधितात. अंघड कोळी प्रख्यात चोर आहेत. ५७ सालच्या बंडांत त्यांनीं इतका त्रास दिला कीं, त्यांचें गांव अधिक मोकळ्या जागेवर आणांवें लागलें.