प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग नववा : ई-अंशुमान

अंचलगच्छ - अंचलगच्छाची पट्टावली प्रतिक्रमणसूत्रांत आढळते. या अंचलगच्छपट्टावल्लींत महावीरानंतर १४६४ वर्षें हा उद्योतनाचा काळ (विक्रम संवत ९९४) दिलेला आहे. उद्योतनामागून त्याच्या ८४ शिष्यांपैकीं एक जो सर्वदेव त्याची ३६ वा सूरि म्हणून स्थापना झाली. यामागील सूरींची यादी खरतरगच्छ व तपागच्छ यांत दिलेली आहे. या दोन पट्टावल्लींत फरक इतकाच कीं खंरतरगच्छांत महावीर १ ला सूरि व सुधर्मा २ रा धरला आहे, तर तपागच्छांत सुधर्मा १ ला सूरि म्हंटलें आहे. सर्वदेवापूर्वीचे ३५ सूरी येणेंप्रमाणें:-

१ सुधर्मा,२ जंबु, ३ प्रभव, ४ सज्यंभव, ५ यशोभद्र, ६ संभूतविजय, ७ स्थूलभद्र व आर्य महागिरी व आर्यसुहस्तिन ९ आर्यसुस्थित व आर्यसुप्रतिबद्ध १० इंद्रदिन्न, ११दिन्न, १२ सिंहगिरि, १३ वज्र, १४ वज्रसेन, १५ चंद्र, १६ सामंतभद्र, १७ वृद्धदेव, १८ प्रद्योतन, १९ मानदेव, २० मानतुंग, २१ वीर, २२ जयदेव, २३ देवानंद, २४ विक्रम, २५ नारसिंह, २६ समुद्र, २७ मानदेव, २८ विबुघप्रभ, २९ जयानंद, ३० रविप्रभ, ३१ यशोदेव, ३२ प्रद्युन्न, ३३ मानदेव, ३४ विमलचंद्र, ३५ उद्योतन, ३६ सर्वदेव. (इं.अ‍ॅ.११).

सर्वदेवसूरीनंतर उद्योतनाचा दुसरा एक पद्मदेव नांवाचा शिष्य ३७ वा सुरि झाला. सांख्य-दर्शन्यांनां दीक्षा दिल्यामुळें याला सांख्यसूरि असें नांव पडलें; व नवीन गच्छाला शंखेश्वरगच्छ हें नांव मिळालें. राधनपुराजवळ शंखेश्वर म्हणून एक गांव आहे त्यावरून हें गच्छनाम तयार झालें (बॅनेस-इंडेक्स जिऑग्रॅफिकस इंडिकस). हें स्थल पार्श्वनाथाला अर्पण केलेलें दिसतें. पुढील सूरी: ३८ उदयप्रभसूरि ३९ प्रभागच्छसूरि-याच्या अमदानींत नानकगच्छ हें नांव पडलें. (वेबर कॅटलाग २,पा.९२६.) ४० धर्मचंद्रसूरी, ४१ सुविनयचंद्रसुरि, ४२ गुणसमुद्रसूरि, ४३ विजयप्रभसूरि, ४४ नरचंद्रसूरी, ४५ वीरचंद्रसूरि, ४६ जयसिंहसूरि, ४७ आर्यरक्षितसूरि याच्या काळीं अंचलगच्छाची स्थापना झाली (सं. ११५९).(भांडारकरांच्या १८८३-८४ च्या रिपोर्टांत व मेरूतुंगाच्या प्रबंधचिंतामणीच्या प्रस्तावनेंत दिलेली उद्योतन आर्यरक्षित यांमधील सूरींची यादी वरील यादीशीं जुळत नाहीं.).

४७ आ र्य र क्षि त सू रि - हा सं. ११३६ मध्यें दंत्राण (दंतनि) गांवीं प्राग्वाट ज्ञातीचा व्यवहारिन् द्रोण याच्या पोटीं जन्मला. सं. ११४६ (११४२ पीटरर्सन रिपोर्ट ४ बाँ. रा. ए. सो. १८९४) मध्यें दीक्षा घेतली. सं. १२०२ मध्यें आर्यरक्षित नांवानें सूरिपद पावला. याच्याच कारकीर्दीत (सं. ११६९) या गच्छाला विधिपक्षगच्छ असें नांव मिळालें. यानें ३५१७ लोकांनां दिक्षा दिल्याची माहिती मिळते. याचें मूळ नांव गोडु असें असून विजयचंद्रोपाध्याय हें त्याचें गुरूदत्त नांव होतें.

४८ ज य सिं ह सू रि - कोटिद्रव्यधनिन दाहडशेट व नेढी यांचा हा सुपुत्र कुण्कण देशांतील सोपारापुर पट्टण येथें सं.११७९ त जन्मला. धर्मदीक्षा सं. ११९३ मध्यें घेऊन हा १२०२ त सूरि झाला. सं. १२५८ मध्यें याचा अंत झाला. हा सिद्धराजाचा समकालीन असून या दोघांचा एकत्र उल्लेख जयशेखरसूरिच्या उपदेशचिंतामणी ग्रंथांतील प्रशस्तींत आढळतो (रिपोर्ट ऑन दि सर्च फॉर संस्कृत मॅनस्क्रिप्ट्स १८८३-८४ पान. ४४२).

४९ ध र्म घो ष सू रि - याचा जन्म मीहवपुरनगरांत सं. १२०८ त झाला. याचा पिता चंद्रव्यवहारिन् व माता राजलदे म्हणून होती. यानें सं. १२१६ त दीक्षा घेतली व १२३४ त आचार्यपद पावला. सं. १२६३ मध्यें यानें ''शतपदी'' ''षट्पदिका'' (पीटर्सनचा रिपोर्ट ४ बाँ. रा. ए. सो. १८९४) रचिली. धर्मघोष सं. १२६८ त कालावश झाला. यानेंच शाकंभरी येथें ''प्रथमराज'' याला जैन दीक्षा दिली असें मेरूतुंग लिहितो.

५० म हें द्र सिं ह सू रि - सर नगरांतील श्रेष्ठी देवप्रसाद व त्याची पत्‍नी स्थिरदेवी यांचा हा पुत्र सं. १२२८ त जन्मला. याला १२३७ त दीक्षा, १२६३ त आचार्यपद व १२६९ त गच्छनायकत्व मिळालें. हा १३०९ संवतांत ८२ वर्षोचा होऊन वारला. यानें आपल्या गुरूच्या शतपदीवर एक टीका लिहिली (१२९४) व तसेंच १११ प्राकृत पद्यांचें तीर्थमालास्तवन रचिलें.

५१ सिंहप्रभसूरि -विजापुरांतील श्रेष्ठी अरिसिंह व मती प्रीती यांचा पुत्र. जन्म १२८३, दीक्षा १२९१, आचार्यपद व गच्छनायकत्व १३०९ (मेरूतुंगाच्या मतें १३०८) व मृत्यु सं. १३१३ मध्यें झाला.

५२ अ जि त सिं  ह सू रि - दोद [कोक] ग्रामांतील जिनदेव व जिनदेवी यांचा हा पुत्र सं. १२८३ त जन्मला. दीक्षा १२९१ त, आचार्यपद अनहिलपुरांत १३१४ त व गच्छनायकत्व जालोर येथें १३१६ त मिळालें. सुवर्णनगरीच्या समरसिंह राजाला यानें जैनधर्मदीक्षा दिली व तसेंच १५ शिष्यांनां आचार्य केलें मृत्यु सं. १३३९.

५३ दे वें द्र सिं ह सू रि - पालनपुरांतील श्रीमालिज्ञातींत यांचा सं. १२९९ मध्यें जन्म झाला. पिता सांतूशेंट व माता संतोषश्री थिराद्रग्रामीं. १३०६ त दीक्षा मिळाली; तिमिरपुरांत सं. १३२६ त आचार्यपद पावला, १३३९ त गच्छनायक झाला व अनहिलपुरांत १३७१ त कालमुखीं पडला.

५४ ध र्म प्र भ सू रि - भिनमाल(श्रीमाल) येथील लिंबाशेट व विजयलदे यांचा पुत्र. जन्म सं. १३३१; जालोर येथें १३४१ त दीक्षाग्रहण; १३५९ त आचार्यपद व १३७१ मध्यें अनहिलपुरांत गच्छनायकत्व. याच्या वेळीं भुवनतुंगसूरि शाखा उप्तन्न झाली. जुनागडच्या रावळ खेंगाराशीं त्याचा संबंध होता. प्रज्ञातिकलसूरि हें त्याला दुसरें नाव मिळालें. आसोटी गांवी त्याला सं. १३९३ मध्यें मृत्यु आला. कालिकाचार्यकथा यानेंच रचिली [१३८९]

५५ सिं ह ति ल क सू रि - मेरूदेशांतील ऐकपुरांत अशाधरशेट व चांपलदे यांच्या पोटीं सं. १३४५ त जन्मला. १३५२ त दीक्षा ग्रहण केली, १३७१ त आनंदपुरांत आचार्यपद पावला, १३९३ मध्यें पाटणांत गच्छनायक झाला, व १३९५ त स्तंभतीर्थ [खंबायत] येथे मृत्यु पावला.

५६ म हें द्र प्र भ सू रि - नटग्रामांतील आशाशेट व जीवनदे यांचा पुत्र. जन्म सं. १३६३; दीक्षा १३७५ त विजापूर येथें; अनहिलपट्टणांत आचार्यपदप्राप्ति १३९३; व खंबायत बंदरात १३९८ मध्यें गच्छनायकत्व मिळालें. याच्या नेतृत्वाखालीं सं. १४३२ मध्यें शाखाचार्य अभयसिंहसूरीनें पार्श्वनाथाची एक मुर्ती स्थापन केली (भांडारकर रिपोर्ट १८८३-८४ पान. ३२३).

५७ मे रू तुं ग सू रि - नाणी ग्रामांतील व्होरा [वोरा] वैरसिंह व नाहूणदे यांचा पुत्र. जन्म सं. १४०३; दीक्षा १४१८; शाल येथेंच आचार्य १४२६; तेथें गच्छाचें आधिपत्य मिळालें १४४६; सं. १४७१ त एका नागाचें रक्षण करण्यासाठीं त्यानें लोलांडगांवीं जीरिकाफ्ल्लीपार्श्वनाथस्तवन रचिलें. कालिदास व माघ यांचें अनुकरण नाभिवंशसंभव काव्य, यदुवंशसंभवकाव्य व नेमिदूत काव्य ही रचिलीं शिवाय सूरिमंत्रकल्प, मेघदूतकाव्य, शतपदी समुद्वार, श्रीकण्कालयरसाध्याय यावर टीका, नवीन व्याकरण इत्यादि ग्रंथरचना केली. प्रबंधचिंतामणि, उपदेशशतक व कातंत्रव्याख्यान हीं लिहिणारा मेरूतुंग वेगळा, तो नागेंद्रगच्छाचा सूरि होय.

मेरूतुंगाच्या काळीं जयशेखरसूरि शाखाचार्य होऊन गेला. त्यानें उपदेशचिंतामणि, प्रबोधचिंतामणि संबोधसत्तरी, आत्मवबोधकुलक व इतर लहान मोठे ग्रंथ रचिले. मेरूतुंगसूरीचा शिष्य शाखाचार्य माणिक्यसुंदरसूरि यानें गुणवर्मचरित्र, सत्तरमेदीपूजाकथा, पृथ्वीचंदचरित्र, चतु:पर्वीकथा, शुकराजकथा, मलयसुंदरीकथा, संविभागव्रत कथा इत्यादि ग्रंथरचना केली.

५८ ज य कि र्ति सू रि - तिमिरपुरांत राहणार्‍या भूपालशेट व भ्रमरादे यांचा हा पुत्र सं. १४३३ त जन्मला. १४४४ मध्यें दीक्षा घेतली. १४६७ त सूरिपदाची खंबायत येथें प्राप्ति झालीं. पाटण येथें १४७३ त गच्छनायक झाला; व १५०० मध्यें मृत्यु पावला. याचा एक शिष्य शीलरत्‍न सूरि यानें सं. १४९१ त मेरूतुंगाच्या मेघदूतावर टीका लिहिली [पीटरसन्स रिपोर्ट ३ पा. २४९].

५९ ज य के स र सू रि - पांचाल देशांत श्रीथामनगरींत राहणार्‍या देवसिंहाला लाखणदेच्या पोटीं हा झाला. जन्म सं. १४६१ याचें मूळ नांव धनराज असें होतें. सं. १४७५ त याला दीक्षा मिळाली. १४९४ त आचार्य व १५०१ मध्यें चांपानेर येथें गच्छनायक झाला. व याच्या ८१ व्या वर्षी [सं. १५४२] हा वारला.

६० सि द्धां त सा ग र सू रि.- पाटण येथील सोनीज्ञातींतील जावद व पूरलदे यांचा पुत्र. मूळ नांव सोनपाल. जन्म सं. १५०६; दीक्षा १५१२; आचार्य १५४१, गच्छनायक १५४२ व मृत्यु १५६०.

६१ भा व सा ग र सू रि - मारवाड देशांतील नरसाणी गांवी वोरासांगा व सिंगारदे यांच्या पोटीं सं. १५१० त जन्मला, याचें मूळनांव भावड असें होतें. जयकेसरसूरीकडून खंबायत येथें याला दीक्षा मिळाली. १५२०. सं. १५६० त आचार्य व त्याच सालीं मंडलग्र मीं गच्छेश झाला. मृत्यु सं. १५८३

याच्या हाताखालील विनयहंसानें सं. १५७२ त दशवैकालिकावर एक वृत्ति रचिली.

६२गु ण नि धा न सू रि.- पाटण येथील श्रीमालिज्ञातिमुकुटमणि नागराजशेट व लीलादे याचा पुत्र. मूळनांव सोनपाल, जन्म सं. १५४८; सं. १५५२ मध्यें सिद्धांतसागरसूरिकडून दीक्षा; १५८४ त स्तंभतीर्थांत [खंबायत] सूरिपदप्राप्ति; मृत्यु १६०२

६३ ध र्म मू र्ति सू रि.-त्राववतींतील हंसराज वाणी व हांसलदे यांनां हा पुत्र सं. १५८५ त झाला. याला धर्मदास असें मूळ म्हणत. दीक्षा १५९९ अमदाबादेस; आचार्यव गच्छनायक १६०२ मध्यें झाला. त्यांचें त्यागी असें आणखी एक नांव आहे. याचा काळ सं. १६७० त पाटणा येथें झाला. यानें वृद्ध चैत्यवंदन व प्रद्युन्नचरित लिहिलें आहे. याच्या देखरेखीखालीं उत्तराध्ययनदीपिकेची व व्यवहारसूत्राची हस्तलिखित प्रत लिहिली गेली.

६४ क ल्या ण सा ग र सू रि - लोलाड ग्रामांतील कोठारी नानिग व तामिलदे यांचा पुत्र. मूळचें नांव कोडण. याचा जन्म सं. १६३३ त झाला. धवलपुरांत १६४२ मध्यें दीक्षा घेतली. १६९४ त अहमदाबाद येथें आचार्यपद पावला व पाटण येथें १६७० त गच्छेश झाला. कच्छच्या रावाला यानेंच दीक्षा दिली. याच्या नजरेखाली सं. १६७३ त जातकपद्धतिवुत्ति व १६८६ त अभिधानचिंतामणीवर टीका रचिली गेली. सं. १७१८ मध्यें भुजनगरात याला मृत्यु आला.

६५ अमरसारसूरि - उदयपूराच्या श्रीमालिज्ञातींतील शोधरीयोधा व सोना यांचा पुत्र. मूळनांव अमरचंद्र हा संवत १६९४ त जन्मला. दीक्षा १७०५. खंबायत येथें आचार्यपद १७१५ मध्यें व भुज येथें १७१८ त गच्छेशपद मिळालें. हा धोलका येथें सं. १७६२ त वारला. याच्या अंमलांत उपदेशचिंतामणीची एक हस्तलिखित प्रत सं. १७३९ त लिहिली गेली. (भांडारकर रिपोर्ट १८८३-८४ पा. ४४३).

६६ वि द्या सा ग र सू रि:- कच्छदेशांतल्या खीरसरा बंदरांतील कर्मसिंह व कमलादे याच्या या मुलाचें मूळनांव विद्याधर असें होतें. जन्म सं. १७४७, त दिक्षा १७५६, त आचार्यपद १७६२ (धोलका) व भट्टारकपद १७६२ त (मातरग्राम); मृत्यु १७९७. विद्यासागरसूरिस्तवन नित्यलाभानें रचिलेलें ''विधिपक्ष...... प्रतिक्रमणसूत्रांत'' प्रसिद्ध झालेलें आहे. याचा शिष्य ज्ञानसागरगणि यानें गुणधर्मचरित्र व ''चोत्रीस अतिशयनोच्छंद'' हे ग्रंथ रचिले.

६७ उ द य सा ग र सू रि - नवागरांतील कल्याणजी व जयवंतीबाई यांचा पुत्र. मूळनांव उदयचंद. जन्म सं. १७६३; दीक्षा १७७७; आचार्य व गच्छेश १७९७; व मृत्यु सुरतेस सं. १८२६ मध्यें झाला. यानें ''स्नातृपंचा शिका'' रचिली आहे.

६८ की र्ति सा ग र सू रि - कच्छ देशांतील देसलपुरांत राहणारा ओसवंशीय मालसिंह व पत्‍नी आसबाई यांचा हा पुत्र कुंवरजी पंवत १७९६ त जन्मला. १८०४ मध्यें. उदयसागरसूरिचा शिष्य झाला. १८०९ मध्यें यानें मांडवी बंदरांत धर्मदीक्षा घेतली व १८२३ त सुरतेस आचार्यपदीं विराजमान झाला. या प्रसंगीं खुशालचंद व भूखणदास यांनीं ६००० रूपये खर्च करून महोत्सव साजरा केला. किर्तिसागर अंजार येथें १८२६ त गच्छेश झाला व पुढें १८४३ मध्यें सुरत बंदरीं मरण पावला.

६९ पु ण्य सा ग र सू रि - गुजराथेंत श्री बडोदरा [बडोदे] ग्रामीं पोरवाड ज्ञातींत रमसी व मीठाबाई यांच्या पोटीं सं. १८१७ त जन्मला. याचें मूळनांव पानाचंद. हा १८२४ त किर्तिसागरसूरीचा शिष्य झाला. भुजपुरांत १८३३ साली यानें दीक्षा घेतली व १८४३ मध्यें सूरतू येथें हा आचार्य व गच्छेशपद पावला. या मोहोत्सवाची तयारी लालचंद यानें केली होती. हा सूरि पाटण येथें सं. १८७० मध्यें मृत्यु पावला.

७० रा जें द्र सा ग र सू रि - हा सूरतेस जन्मला व संवंत् १८९२ मध्यें मांडवी येथें मृत्यु पावला.

७१ मु क्ति सा ग र सू रि - उज्जनींतींल ओसवाल ज्ञातीय खीमचंद व उमेदबाई यांचा पुत्र. मूळनाव मोतीचंद. जन्म सं. १८५७; दीक्षा सं. १८६७; आचार्य व गच्छेश पद सं. १८९२. पाटण येथें महोत्सवाच्या वेळीं शेट नथुगोकलजी यानें सर्व व्यवस्था ठेविली होती. नलिनपुरांत लघुज्ञातीय व नागडागोत्रीय नरसिंहनाथनें स्थापिलेल्या जिनचैत्यांत भुक्तिसागरानें सं. १८९७ मध्यें चंद्रप्रभूची प्रतिष्ठा केली. सं. १९०५ त जीवराज रत्‍नसिंहानें स्थापिलेल्या महावीरचैत्याला यानें मंत्राभिषिक्त केलें. हा सूरि सं. १९१४ त वारला.

७२ र त्‍न सा ग र सू रि - कच्छदेशांतील मोथारा गांवकालाडणपचाण व झूमाबाई यांचा पुत्र. जन्म सं. १८९२, दीक्षा सं. १९०५, आचार्य व गच्छेश सं. १९१४. याच्या अधिकारांत लघुओसवंशीय शेट नरसिंहनाथ अंचलगच्छश्रावक बनला. सं. १९२८ त सुथरी गांवीं ३६ व्या वर्षीच हा मरण पावला.

७३ वि वे क सा ग र सू रि - सं. १९४० मधींल सूरि [संदर्भग्रंथ:- ''श्रीमद्-विधिपक्ष-गच्छीय श्रावकनाम दैवसादिक यांचे प्रतिक्रमणसूत्र'' निर्णयसागर प्रेस मुंबई सं. १९४५, १८८९. ट्रॅरन्झॅक्शनस ऑफ दि रॉयल एशियाटिक सोसायटी, ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड व्हॉ. ३(लंडन १८३५), भांडारकर-रिपोर्ट ऑन दि सर्च फॉर संस्कृत मॅनास्क्रिप्ट्स् इन बाँबें प्रेसिडेन्सी १८८३-८४. मेरूतुंग प्रबंधचिंतामणि (मुंबई प्रत १८८०). इं अं. ११,१६,१९,२३. मेरूतुंग-शतपदीसमुद्धार पीटर्सन्स रिपोट्स १-४ जे. ए. एस्. बी ५५. अर्किआलॉजिकल सर्व्हे ऑफ वेस्टर्न इंडिया २. जयसोमाचे विचाररत्‍नसंग्रह. समयसुंदराचें समाचारिशतक. बेबरचा कॅटलॉग; किलहार्न्स रिपोर्ट (१८८०-८१). बेडाल-जर्नी इन् नेपाल अँड नार्दर्न इंडिया (१८८४-८५). मित्र-कॅटलॉग ऑफ संस्कृत मेंनस्क्रिप्टस, नोटिसेस ऑफ संस्कृत मेंनस्क्रिप्ट्स् श्रावकप्रतिक्रमणादिसूत्र, मुंबई (१८८६) कुंटे-रिपोर्ट(१८८१). जाकोबीचा हस्तलिखित संग्रह ए. इं. २. जैनकाव्यप्रकाश मुंबई १८८३. खाखर रिपोर्ट. जे. बी. आर. ए. एस १८९४ बॅनेस इंडेक्स जिऑग्रॅ फिकस इंडिकस. एनसायक्लोपीडीया ऑफ रिलिजन अँन्ड एथिक्स-जौनिझम. ग्वेरिनो-एसे ऑफ दि बिब्लिओग्रॅफी जैन, पॅरिस १९०६;रिपोर्ट ऑफ दि एपिग्रॅफी जैन, पॅरिस १९०८]

   

खंड ९ : ई ते अशुमान  

 

  ईजिप्त

  ईजियन समुद्र

  ईजियन संस्कृति
  ईटन-इंग्लंड
  ईडनिंबू
  ईथर
  ईदर
  ईदिग
  ईव्हशाम
  ईशोपनिषद
  ईश्वरकृष्ण
  ईश्वरीपूर
  ईश्वरसिंग
  ईसॉप
  ईस्ट इंडिया कंपनी
  ईस्ट इंडीज
  ईस्टर
  ईस्टर बेट
  ईस्टविक्, एडवर्ड बॅक् हाऊस
  ईक्षणयंत्र
 
  उकाँग
  उकुंद
  उखाणे
  उखामंडळ
  उग्रसेन
  उचकी (हिक्का )
  उचले व भामटे
  उचाड
  उच्च-पंजाब
  उच्च शहर
  उच्च
  उच्छर
  उंज
  उज्जनी
  उज्जयन्ताद्रि
  उझानी
  उंट
  उटकटारी
  उटकमंड
  उंड
  उंडवलें
  उंडविन
  उडियासांझिया
  उडीद
  उडुपी
  उड्र
  उतथ्य
  उत्तंक
  उत्तनगरै
  उत्तमपालेयम
  उत्तर
  उत्तर अमेरिका
  उत्तरध्रुवप्रदेश
  उत्तरपाडा
  उत्तर मेरूर
  उत्तर सरकार
  उत्तरा
  उत्तरापथ
  उत्तानपाद
  उत्पल
  उत्पादन
  उत्रौला
  उदमलपेट
  उदयगिरी
  उदयन
  उदयनाचार्य
  उदयपूर
  उदयप्रभसूरि
  उदयभानु
  उदयसिंह
  उदर
  उदलगुरी
  उदाजी पवार
  उदासी
  उंदिरखेड
  उंदीर
  उदेपुरी बेगम
  उदेपूर संस्थान
  उदेपूर गांव
  उदेपूर शहर
  उदेपूर
  उदेय्यार पालेयम्
  उंदेरी
  उद्गाता
  उद्गीर
  उद्गीरची लढाई
  उद्दंड
  उद्दंडपुर
  उद्दालक
  उद्धव
  उद्धव गोसावी
  उद्धवचिद्घन
  उद्धव नाला
  उद्धव योगदेव
  उद्बोधनाथ
  उद्वेग रोग
  उन
  उन-देलवाडा
  उनबदेव
  उना
  उनियार
  उनी
  उन्कल
  उन्नाव
  उन्माद
  उन्सरी
  उपकन्चा
  उपकेशगच्छ
  उपनयन
  उपनिधि
  उपनिषदें
  उपनेत्र
  उपप्लव्य
  उपमन्यु
  उपरवार
  उपरि
  उपरिचर
  उपवेद
  उपशून्य
  उपसाला
  उपांशु
  उपेनंगडी
  उपेन्द्र परमार
  उप्पर
  उप्माक
  उप्रई
  उप्लेटा
  उंबर
  उम्बेक
  उबेरो
  उंब्रज
  उमत्तूर
  उमरकोट
  उमर खय्याम
  उमरखान
  उमरखेड
  उमरबिन खत्तब
  उमरावती
  उमरी
  उमरेठ
  उमरेड
  उमा
  उमाजी नाईक
  उमापति
  उमापति शिवाचार्य
  उमाबाई दाभाडे 
  उमीचंद
  उमेटा
  उमेदवारी
  उमेरिया
  उर
  उरगप्पा दंडनाथ
  उरण
  उरल पर्वत
  उरलि
  उरवकोंड
  उरिया, उडिया
  उरी
  उरुळी
  उरोगामी
  उर्दुबेगी
  उर्फी, मौलाना
  उर्मिया सरोवर
  उर्मिया, शहर
  उर्वशी
  उलघबेग मिरझा
  उलूक
  उलूपी
  उलेमा
  उल्का
  उल्बारिया
  उल्म
  उल्लतन
  उल्लाळ 
  उवा
  उशना, वैदिक
  उशीनर
  उकूर
  उषा
  उष्टारखाना
  उष्णता
  उष्णताजन्य विद्युत
  उष्णतामापन
  उष्णता-रसायनशास्त्र
  उष्णतावहन
  उष्णमानमापक यंत्र
  उस्का
  उस्तरण
  उस्मान
  उस्मान नगर
  उस्मानाबाद
  उळवी
 
  ऊदाइन (बेंझाईन)  
  ऊदाम्ल
  ऊदिदिन
  ऊदिन
  ऊदिल अल्कहल
  ऊदिल प्रायोज्जिद
  ऊदिल भानन
  ऊधमबाई
  ऊरूस्तंभ
  ऊर्ध्वपातनक्रिया
  ऊस
 
  ऋग्वेद
  ऋचीक
  ऋणमोचन
  ऋतु
  ऋतुपर्ण
  ऋत्विज
  ऋभु वैदिक
  ऋषभ
  ऋषि
  ऋषिऋण
  ऋषिक
  ऋषिपंचमी
  ऋषियज्ञ
  ऋषिवरण
  ऋष्यमूक
  ऋष्यवान
  ऋष्यशृंग
  ऋक्षरजा
 
  एओलिस
  एकचक्रा
  एकत
  एकतत्त्ववाद
  एकदंत भट्ट
  एकनाथ
  एकबटाना
  एकर
  एकरुक
  एकलव्य
  एकलिंगजी
  एकादशरुद्र
  एकादशी
  एकिल्
  एक्झीटर
  एक्रान
  एक्स
  एक्स-ला-चॅपेल
  एगमाँट लॅमोरल कौंट ऑफ
  एगिनकूर
  एचर्ड
  एंजिन
  एट्ना
  एट्रूरिया
  एडगर
  एडन
  एडन कालवा
  एडप्पल्ली
  एन्डर
  एडवर्ड
  एडवर्डसाबाद
  एडिंबरो
  एडेन जॉर्ज - लॉर्ड ऑकलंड
  एडेसा
  एडोम
  एड्रियन
  एदलाबाद
  एनमे
  एनॅमल
  एन्नोर
  एपिक्टेटस
  एपिक्यूरस
  एपिनस, फ्रान्झ उलरिच थिओडार
  एपीडॉरस
  एंपीडोक्लिस
  एफेसस
  एबनी (अबनूस)
  एबल सर फ्रेडरिक
  एंब्रान
  एमडेन
  एमॅन्युअल व्हिक्टर
  एमिनाबाद
  एमीन्स
  एमेअस
  एमेरी
  एम्मेट रॉबर्ट
  एरंडी
  एरंडोल
  एरन
  एरनाड
  एरवल्लर
  एरिडु
  एरिथ्री
  एरिनपुर
  एरियन
  एरिलिगारू
  एरोड
  एर्नाकुलम
  एलगंडल
  एलाम
  एलाय
  एलिआकॅपिटोलिना
  एलिचपूर
  एलिझाबेथ
  एलिस
  एलेनबरो
  एलेफन्टा
  एल्जिन
  एल्जिन लॉर्ड
  एल्फिन्स्टन मौंट स्टुअर्ट
  एल्ब
  एल्बा
  एल्युथेरापीलीस
  एल्युसिस
  एल्सिनोर
  एसर हजन
  एसेक्स परगणा
  एस्किमो
 
  ऐतरेय आरण्यक
  ऐतरेय उपनिषद्
  ऐतरेयब्राह्मण
  ऐन
  ऐनापुर
  ऐनी-अकबरी
  ऐनुद्दीन
  ऐनू
  ऐमक
  ऐयनर
  ऐरणी
  ऐरावत
  ऐहिकवाद
  ऐहोळ
 
  ओक
  ओक वामन दाजी
  ओकटिवन
  ओकपो
  ओकलंड शहर
  ओकहॅम
  ओकुमा, कौंट
  ओकू
  ओकेन, लॉरेन्झ
  ओकोनेल डॅनियल
  ओक्लाहामा
  ओच्चन
  ओजिब्वा
  ओझर
  ओझा
  ओट
  ओटावा
  ओट्टो
  ओडर नदी
  ओडेसा
  ओडोनेल हेनरी जोसेफ
  ओतारी
  ओतुर
  ओध
  ओनला
  ओनेगा
  ओन्गोले
  ओपोर्टो
  ओफीर
  ओब्रायन वुइल्यम स्मिथ
  ॐ ( ओम् )
  ओमान
  ओम्स्क
  ओयामा
  ओरई
  ओरॅंग ऊटंग
  ओरकझई
  ओरछा
  ओरावन
  ओरिसा 
  ओरिसा कालवे
  ओरिसांतील मांडलिक संस्थानें
  ओर्मेरॉड एलिअनॉर
  ओलपाड
  ओल्डहॅम
  ओल्डहॅम थॉमस
  ओल्डेनबर्ग
  ओवसा
  ओवा
  ओवेन, रॉबट
  ओवेन सर रिचर्ड
  ओव्हिड
  ओशीमा
  ओषण
  ओसवाल
  ओसाका अथका ओझावा
  ओस्कार
  ओस्टीयाक
  ओहम्, जार्ज सायमान
  ओहममापक
  ओहिओ
  ओहिंद
  ओळंबा
 
  औक अथवा अवुक जमीनदार
  औट्रम
  औतें
  औदीच्य ब्राह्मण
  औद्देहिक
  औद्योगिक परिषद
  औंध
  औंधपट्टा
  औधेलिया
  औनियाति
  औरंगझेब अलमगीर
  औरंगाबाद
  औरंगाबाद सय्यद शहर
  और्व
  औशनस
  औसले सर विल्यम
  अं
  अंक
  अंकगणित
  अंकचक्र
  अंकलगी
  अंकलेश्वर
  अंकाई टंकाई
  अंकिसा
  अंकेवालिया
  अॅंकोना
  अॅंकोबार
  अंकोर
  अंकोला
  अंग
  अंगठी
  अंगडशाहा
  अंगडि
  अंगडिपूरम
  अंगद
  अंगदशिष्टाई
  अंगदिया
  अंगरखा
  अंगापूरकर (हरि)
  अंगारा
  अंगुत्तर निकाय
  अंगुर शेफ
  अंगुळ
  अंगोरा शहर
  अॅंगोला
  अॅंग्विल्ला
  अंघड
  अंचलगच्छ
  अंज-(अॅंटिमनी)
  अंजनगांव
  अंजनगांव बारी
  अंजनगांव सुर्जी
  अंजनवेल
  अंजनी
  अंजनेरी
  अंजार
  अंजिदिव
  अंजी
  अंजीर
  अंजू
  अंजेंगो
  अॅंजलिको फ्रा
  अॅंटनान-रिव्हो
  अॅंटवर्प
  अंटिओक
  अॅंटिग्वा
  अॅंटियम
  अॅंटिलीस
  अॅन्टिव्हरी
  अन्टीगोनस गोनाटस
  अॅन्टीगोनस सायक्लॉप्स
  अॅन्टीपेटर
  अॅन्टीलिया
  अॅंटोनिनस पायस
  अॅंटोनियस ( मार्कस )
  अंडवृध्दि
  अण्डाशयछेदनक्रिया
  अॅंडीज
  अंडें
  अंडोरा
  अंडोल
  अंडोला
  अॅंड्रासी ज्युलियस
  अॅंड्रिया डेल सार्टो
  अॅंड्रोमेडा
  अॅंड्रयूज थॉमस
  अंतगड
  अंतधुरा
  अंतर इब्नशद्दाद
  अंतराल
  अंतर्गळ
  अंतर्वेदी
  अंतर्ज्ञान
  अंताजी ( उर्फ बाबुराव ) मल्हारराव बर्वे
  अंताजी माणकेश्वर
  अंताजी रघुनाथ
  अंतालिमा
  अंतुर्ली
  अंतूर
  अंतोबा गोसावी
  अंत्रपुच्छदाह
( अपेंडिसाइटीज )
  अंत्रावरणदाह
( पेरिटोनिटिस )
  अॅंथनी सुसान ब्रौनेल
  अंदमान आणि निकोबार बेटें
  अंदमान बेटें
  अंदाळ
  अंदोरी
  अंध किंवा आंध
  अंधक
  अंधत्व
  अंधरगांव
  अंधळगांव
  अंधारी नदी
  अंब
  अंबत्तन
  अंबर ( धातु )
  अंबर
  अंबर उदी
  अंबरखाना
  अंबरनाथ अथव अमरनाथ
  अंबरनाथ
  अंबरपेठ
  अंबराम्ल
  अंबरीष
  अंबलक्कारन्
  अंबलपुलई
  अंबलवासि
  अंबष्ठ
  अंबहटा
  अंबा
  अंबा, (तालुका)
  अंबागड
  अंबागडचौकी
  अंबाजी इंगळे
  अंबाजी दुर्ग
  अंबाजी पुरंधरे
  अंबाडी
  अंबा भवानी
  अंबाला
  अंबालिका
  अंबाली
  अंबासमुद्रम
  अंबिका
  अंबिका दत्त व्यास
  अंबिकापूर
  अंबुशी
  अंबूर
  अंबेर
  अंबेला
  अंबेहळद
  अंबोयना
  अंबोली
  अंभोरा
  अंशुमान
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .