प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग नववा : ई-अंशुमान

अंज - (अँटिमनी) अं,१२०२ प. भा. फार प्राचीन कालापासून डोळ्यांत अंजनें घालण्यची वहिवाट हिंदुस्थानांत आहे. अंजनाचे बरेच प्रकार असून त्यांत सौविरांजन म्हणून जें अंजन सांगितलेलें आहे तें अंज धातूचें गंधकिद [सल्फाइड] समजत असत. याचें जें सत्त्व काढीत त्यास ''वरनाग'' म्हणजे उच्च प्रतीचें शिसे असें म्हणत. अंजनाच्या [अँटिमनी] मुख्य घटकास अंज हें नांव दिलें आहे. अंजनाचा उपयोग सुरम्याकडे करतात, यावरून यास सुरम्याची धातु असेंहि नांव आहे.

लाहौलमधील शिग्री, पंजाबमधील झेलम जिल्हा व ब्रह्मदेशांतील टेनासेरिमप्रांत यामध्यें सुरम्याची धातु सांपडते. ब्रह्मदेशांतील अ‍ॅगहर्स्ट जिल्ह्यातील खाणींतहि ही धातु पुष्कळ असून तिजबरोबर सोनें मिश्रित असतें. या धातूचा मुख्य उपयोग म्हटला म्हणजे छापखान्यांतील खिळ्यांची धातु (टाइप मेटल) तयार करणें हा होय. हिंदुस्थानातील लोक या धातूचा उपयोग इतर धातूंच्या मिश्रणांत करीत नाहींत. या धातूचा बायका काजळासारखा उपयोग करितात.

अं ज(सं ज्ञा अं व परमाणूनारांक १२२.०)हें रासायनिक मुलद्रव्य आहे. मूलद्रव्यांचें जें वर्गीकरण केलेंलें आहे, त्यापैंकीं नत्र [नायट्रोजन] , स्फुर [फास्फोरस], ताल [आर्सेनिक] आणि विस्मत [बिस्मत] हीं मूलद्रव्यें ज्या वर्गांत येतात त्याच वर्गोतील अंज हे मूलद्रव्य आहे. हें मूलद्रव्य फार प्राचीन काळापासून हिंदुस्थानांत गंधकिदाच्या [सल्फाइडच्या] रूपानें माहीत आहे. तसेच पाश्चात्यांसहि हें माहित आहे.

अंज हे मूलद्रव्य सृष्टिमध्यें असंयुक्त व संयुक्त या दोन्ही रूपांत सांपडतें. गंधकिदा [सल्फाइड] च्या रूपांत हें अतिशय सांपडतें. या रूपास इंग्रजी नांव स्टिब्नाइट असे आहे. याशिवाय प्राणिदा [ऑक्साइड] च्या रूपानें हें व्हेलेन्टिनाइट, सेनारमोनाइट आणि सेर्व्हेंटाइट नांवाच्या खनिंज द्रव्यांत सांपडतें. तसेंच रजताबरोबर डिक्रसाइट खनिजांत व रजत आणि गंधक यांशी पायरारजिराइट आणि मिआरजिराइट या खनिज द्रव्यांत सांपडतें.

कृ ति :- अंज धातूचा गंधकिद अं२ ग३ खनिज रूपांत सांपडतो. त्यापासून अंज हें मूलद्रव्य काढतात. हें खनिजद्रव्य भाजून मुशींत लोंहचूर्णापाशीं मिश्र करून भरतात, नंतर मुशींवर झाकण ठेऊन तापविली म्हणजे अंज धातू निराळी होते. यांत रासायनिक क्रिया-विक्रिया होतात त्या खालील समीकरणांत दाखविल्या आहेत:-

अंजगंधकिद            लोह        लोहगंधकिद    अंज
अं    +    ३ लों =     ३ लोग         +अं.

प्रमाणाधिक्यांत झालेलें लोह काढण्यासाठीं त्यांत कोंळसा व सिंधुकर्वित, सिंधुगंधकित वगैरे गालक [प्लक्स] मिसळून त्यांत आणखी अंजगंधकिद घालतात. या रीतींनें तयार केलेल्या अंज धातूमध्यें ताल [आर्सेनिक] , लोह, गंधक व सीस किंवा ताम्र यांच्या अंशाची अशुद्धता असते. म्हणून दाहक पालाशाशी [कॉस्टिक पोट्याश] मिश्र करून व वितळून शुद्ध करतात. शींत झाल्यावर या धातूचे स्फटिक होतात ते नेचाच्या [फर्न] आकारासारखे दिसतात. हा आकार ''तार्‍या'' [स्टार] सारखा असल्यानें या धातूस कधीं कधीं ''ताराधातू'' (स्टारमेटल) असेंहि म्हणतात.

ध र्म- शुद्ध अंज धातु चकचकींत व नीळसर पांढर्‍या वर्णाची असते. ही ठिसूळ असून इचें वि. गु. ६.७१५ असतें. या धातूचे स्फटिक ताल व रक्तस्फूर [रेड-फॉस्फोरस]  यांच्या स्फटिकाच्या आकाराशीं समान असतात. या धातूचा रसबिंदु ४३२०० श व कथनबिंदु १३००० वर असून शुभ्रोष्ण मानावर तिचें ऊर्ध्वपातन होतें. हवेमध्यें ही धातु क्वचित् गंजते. परंतु रक्तोष्ण मानावर ती जळूं लागते व अंजत्रिप्राणिद [अँटिमनी ट्राय ऑक्साइड]  तयार होतों. तो पांढर्‍या धूम्ररूपानें अतिशय निघतो. ही धातू मंद उष्णतावाहक व विद्युतद्वाहक असते. या धातूवर हरचें [क्लोरिन] तीव्र कार्य होतें व अंजत्रिहरदि अंह३ व अंज पंचहरिद अंह५ हीं तयार होतात.

या धातूची बाष्पघनता [व्हेपर डेन्सिटि] १५७२० श उष्णमानावर १०.७४ व १६४०० श वर ९.७८ आहे. यावरून ताल व स्फुर धातूंच्या अणूंपेक्षां हे कमी बिकट [काँप्लेक्स]  आहेत. अंज धातु ठिसूळ असल्यानें असंयुक्त स्थितींत तिचा उपयोग फक्त उष्णता विद्युतराशी [थर्मोइलेक्ट्रिक पाइल्स] तयार करण्याकडे करतात. परंतु अंजचें दुसर्‍या धातूंशीं मिश्रण केलें म्हणजे फार उपयुक्त मिश्र धातू तयार होतात. उदाहरणार्थ, कांसें [प्युटर], ब्रिटानिया धातू, छापण्याचे खिळे [टाइप] पाडण्याची धातू वगैरे. शिशामध्यें अंजचा थोडा अंश असला म्हणजे त्या मिश्र धातूवर गंधकाम्लाची कांहीं क्रिया होत नाहीं. टाइपाच्या धातूंत ८३ भाग शिसें व १७ भाग अंज धातु असतें.

ठसे [स्टिरिओटाईप प्लेटस] करण्याकरितां ९ भाग शिसें, दोन भाग अंज आणि २ भाग बिस्मत धातु एकत्र करून मिश्र धातु केलेली असते.

हीं प्रमाणें देशपरिस्थिति, ठशाचा आकार, योजना वगैरे प्रमाणें पुष्कळ कमी जास्त वापरण्यांत येऊन शिवाय कथील वगैरे इतर धातूंचीहि त्यांत भेंसळ करण्यांत येते. परंतु साधारण धोरण शिशाचें प्रमाण शेंकडा ६० व अंजचें प्रमाण कथलापेक्षां जास्त असावें.

रक्तोष्णमानावर अंज धातूच्या योगानें पाण्याच्या वाफेचें पृथक्करण होतें. उद्-हराम्लाच्या सौम्यद्रवाचें यावर कार्य घडत नाहीं; परंतु तीव्र उद्-हराम्लांत उष्ण तीव्रगंधकाम्लांत विरघळते व अंज गंधकिद अं२ [गप्र३]  क्षार होतात. नात्राम्लाच्या योगानें अंजचें त्रिप्राणिद किंवा पंचप्राणिदांत रूपांतर होतें. अंज धातूचा गंधक आणि स्फुर यांशीं तात्काळ संयोग होतो. अंज धातु, धातूंच्या प्राणिदांबरोबर उदाहरणार्थ, सीस एकप्राणिद [लिथार्ज], पारद प्राणिद, मंगळ द्विप्राणिद यांबरोबर उष्ण केली असतां तिचें प्राणिदांमध्यें रूपांतर होतें.

सं यु क्त प दा र्थ - अंजाइन-अंज आणि उज्ज यांचा संयोंग होऊन अंजाइन (स्टिबाइन) अं.उ३ नांवाचा संयुक्त पदार्थ बनतो. याची घटना नत्र, स्फुर आणि ताल यांचा उज्जशीं संयोग होऊन जे संयुक्त पदार्थ होतात त्यांच्या घटनेंशीं समान आहे. अंज जशद यांच्या मिश्र धातूंवर उतहराम्लाची क्रिया केली किंवा अंजमन्य संयुक्त पदार्थांच्या द्रवावर नवजात (नॅसंट) उज्जची क्रिया केली म्हणजे अंजाइन तयार होतो. अशा रीतींनें तयार केलेल्या अंजाइनमध्यें उज्जवायु अतिशय मिश्र झालेला असतो. तो त्यापासून निराळा करणें असेल तर द्रवरूप हवेंत (लिक्विड एअर) शीत करावा. म्हणजे अंजाइनचा पांढरा घन पदार्थ होतो.

धर्म- अंजाइन हा वर्णहीन विषारी वायु असून त्यास फार वाइट वास येतो. याची ज्वाला निळसर पाढुरकी असते. त्याचे धर्म तालाइन [असाइन] च्या धर्माशी सद्दश आहेत. उष्णतेनें त्याचें पृथक्करण होऊन त्याचे घटक असंयुक्त होतात. उष्णतेनें झालेला अंजचा अवपात [डिपॉझिट] व तालाचा [आर्सेनिक] अवपात यांत भेद ओळखतां येतो. तालच्या अवपातापेक्षां अंजचा अवपात कमी बाष्पभावी व्हालटाइल, असून अधिक काळसर व धूसर [स्मोकी अ‍ॅपिअरन्स] असतो. अंजचा अवपात अधिहरसाम्लाइताच्या द्रवांत [हाइपोक्कोराइट्स] अविद्राव्य असून अमोनिगंधकिदाच्या द्रवांत [अ‍ॅमोनियम सल्फाइड] विद्राव्य आहे. रजतनत्रिताच्या द्रवांत अंजाइम वायु घातला म्हणजे कृष्णवर्ण निपात रजत अंजिद [सिल्व्हर अँटिमोनाइड]अं र३ येतो. अंजाइनचे पृथक्करण हरसंघातील मूलद्रव्याच्या योगानें व उज्जगंधकिदा (हायड्रोजन सल्फाइड) नें होतें. अंजाइन अंउ३ च मधील उज्जचे ३ तिन्ही परमाणू हे सेंद्रिय मूलकांनीं (ऑरगॅनिक रॅडिकल्) निविष्ट करतां येतात.

अं ज प्रा णि दें - (ऑक्साइड्स ऑफ अँटिमनी.) अंज धातूचे तीन प्राणिद आहेत ते:- अंज त्रिप्राणिद [अँटिमनी ट्रायऑक्साइड] अं२ प्र३,अंज चतु:प्राणिद [अँटिमनी टेट्राक्साइड] अं२ प्र४,अंज पंचप्राणिद [अँटिमनी पेन्टाक्साइड] अं२ प्र.

अंजत्रिप्राणिद -अं२प्र३[अँटिमनी ट्रायऑक्साइड] अंजत्रिप्राणिद अं२ प्र३ हा सृष्टिमध्यें अंजच्या अशुद्ध खनिजरूपांत सांपडतो. हा पांढरा असतो. या अशुद्ध खनिज अंजत्रिप्राणिदास ''व्हॅलेन्टिनाइट'' व ''सेनारमोन्टाइट'' अशीं इंग्रजी नावें आहेत. अंज हवेमध्यें जाळला किंवा त्यावर नत्राम्लानें प्राणिदिक्रिया केली, म्हणजे अंजत्रिप्राणिद तयार होतो. अंज हवेमध्यें जाळून तयार केलेल्या त्रिप्राणिदांत चतु:प्राणिदाचें मिश्रण असतें. त्रिप्राणिद हा उच्च उष्णमानावर पुष्कळ वेळ उष्ण केल्यास त्याचें चतु:प्राणिदामध्यें रूपांतर होतें. सिंधु उत्प्राणिदासारखीं जीं तीव्र अनाम्लें [बेसेस] आहेत त्यांचें कार्य अंज त्रिप्राणिदांवर केलें असतां त्याचें अल्मप्राणिदांप्रमाणें कार्य घडतें. परंतु याशिवाय जीं दुसरीं अनाम्लें आहेत त्यांचे कार्य केले असतां अंजत्रिप्राणिदांचे अंगीं अल्म धर्म नसतो. अति तीव्र अम्लाचें कार्य केलें तर अंजत्रिप्राणिदावर अनाम्लाप्रमाणें कार्य होतें.

अंजचतु:प्राणिद (अँटिमनी टेट्राक्साइड) अं२ प्र४,. अंजत्रिप्राणिद अं२ प्र३ हा हवेंत उच्च उष्णमानावर खूप वेळ उष्ण केला म्हणजे त्याचें रूपांतर अंजचतु:प्राणिदामध्यें होते. यापेक्षां सुलभ रीतीनें तयार करण्याकरितां अंजाम्ल (अँटिमोनिक अ‍ॅसिड) उ३अंप्र४ जाळून त्यांतून पाणी व प्राण घालविला म्हणजे अंजचतु:प्राणिद तयार होतो. साधारण उष्णमानावर अंजचतु:प्राणिद पांढरा शुभ्र असतो परंतु उष्ण केला असतां पिवळा होतो. तीव्र अनाम्लावर यांचे कार्य अनाम्लाप्रमाणें घडतें परंतु तीव्र अम्लावर यांचे कार्य सौम्य अनाम्लाप्रमाणें घडते.

अंजचतु:प्राणिद बाष्पभावी [व्हालटाइल] नाहीं. यांचे वि. गु. ६६९५२ असतें. हा पाण्यांत अविद्राव्य असतो. बहुतेक अम्लांत हा प्रणिद विद्राव्य नाहीं. तीव्र उतहराम्लांत याचा अल्पांश विद्रुत होतो. उष्ण पालाशद्विप्राक्षिताच्या [पोट्याशिअम बायटार्टेट] योगानें याचें पृथक्करण होतें.

अंजपंचप्राणिद अं२ प्र३ (अँटिमनी पेन्टाक्साईड):- अंजपंचप्राणिद तयार करण्याच्या रीती अशा:-(१) अंजंनत्राम्ल यांचे वरचेवर बाष्पीभवन (इव्हॅपोरेशन) करून तयार होणारें अंजाम्ल २७५० श उष्ण मानापेक्षां जास्त उष्णमानावर उष्ण केलें नाहीं तर अंजपंचप्राणिद तयार होतो. (२) अंज धातु व रक्त पारदप्राणिद यांचे मिश्रण पीतवर्ण होईपर्यंत उष्ण केलें म्हणजे अंजपंच प्राणिद तयार होतो. (३) अंजत्रिहरिद नत्राम्लाबरोबर बाष्पीभवनानें शुष्क केला म्हणजे प्रचप्राणिद तयार होतो.

अंजपंचप्राणिद फिकट पीतवर्ण भुकणीच्या रूपांत असतो. त्याचें वि. गु. ६.५ असतें. अंजपंचप्राणिद तीव्र उष्णतेवर उष्ण केला तर त्यांतून प्राणवायु असंयुक्त होऊन बाहेर पडतो. व त्याचें अंजचतु:प्राणिदांत रूपांतर होतें. हा पाण्यांत अविद्राव्य असून उत्-हराम्लामध्यें सावकाश विरघळतो. याच्या अंगीं थोडासा अम्लधर्म आहे. हा अल्ककर्बिताशीं मिश्र करून उष्ण केला म्हणजे मित अंजिनें तयार होतात.

अं जा म्लें (अ‍ॅसिड्स ऑफ अँटिमनी) - अंज धातूचीं तीन अम्लें आहेत ती:- (१)अंजाम्ल किंवा आसन्नअंजाम्ल उ३ अंप्र४ (अँटिमॅनिक अ‍ॅसिड किंवा आर्थो अँटिमोनिक अ‍ॅसिड; (२) मित अंजाम्ल उअंप्र३ (मेटा अँटिमॅनिक अ‍ॅसिड); (३) तिग्म अंजाम्ल उ४ अं२ प्र (पायरो अँटिमॅनिक अ‍ॅसिड).

अंजाम्ल उ अंप्र(अँटिमॅनिक अ‍ॅसिड) - हें अंजाम्ल खालील रीतीनें तयार होतें.-(१)अंज धातूवर अम्लराज (अ‍ॅक्कारेजिआ) याची क्रिया करून प्राणिदीकरणचा (ऑक्सीडेशन) शेवटल्या पायरीचा पदार्थ (२) अंज धातूच्या पालाशक्षारावर नत्राम्लाची क्रिया करून त्याचें पृथक्करण केलेला पदार्थ.(३)अंजपंचहरिदांत (पेन्टाक्लोराइड) पाणी मिळवून जो निपात (प्रेसिपिंटेट) येतो तो गंधकाम्लावर वाळविला म्हणजे जो पदार्थ तयार होतो तो (४) अंजच्या कोणत्याहि क्षारावर गंधकाम्लाची क्रिया केली म्हणजे तयार होणारा पदार्थ.

धर्म:-अंजाम्लाची पांढरी भुकटी असून ती पाण्यांत व नत्राम्लांत बहुतेक अविद्राव्य असते. यास उष्णता लाविली म्हणजे प्रथम मित अंजाम्ल उअंप्र३ व नंतर पंचप्राणिद अं२प्र५ यांत अनुक्रमें रूपांतर होतें. अंजाम्ल हें स्फुराम्लाशीं (फास्फोरिक अ‍ॅसिड)व तालाम्लाशीं(आर्सेनिक अ‍ॅसिड)समान धर्मीय आहे. व त्यांच्याप्रमाणें यापासून मित अंजाम्ल उअंप व तिग्म अंजाम्ल उ४ अं२प्र७ हीं होतात.

मित अंजाम्ल उअंप्र (मेटा अँटिपानिक असिड):-अंजाम्ल उअप्र हे १७५ श उष्णमानावर उष्ण केलें किंवा अंजधातु व अंजगंधगिद (अँटिमनी सल्फाइड) आणि सोरमीठ (पालाश नत्रित) यांचें मिश्रण हें बराच वेळ रसस्थितींत ठेवावें. नंतर हा वितळलेला गोळा पाण्यांत विरवावा. जो द्रव होईल त्यांत नत्राम्ल घालावें व जो निपात (प्रेसिपिटेट) येईल तों पाण्यानें धुवावा. म्हणजे मितअंजाम्ल उअंप्र३ होतें. मितअंजाम्लाची पांढरी भुकटी असून ती पाण्यांत बहुतेक अविद्राव्य असते. पाण्याच्या संसर्गोत हें अम्ल कांहीं वेळ राहूं दिलें म्हणजे सावकाश याचें रूपांतर अंजाम्लामध्यें होतें.

ति ग्म अं जा म्ल:- उ अं प्र [पायरो अँटिमॉनिक अ‍ॅसिड] अंजपंचहरिदाचें उष्ण पाण्यानें पृथक्करण केलें म्हणजे जो निपात (प्रेसिपिटेट) येतो तो १०० श उष्णमानावर वाळविला म्हणजे तिग्मअंजाम्ल उ अं प्र [पायरो अँटिमॉनिक अ‍ॅसिड] तयार होतें. तिग्मअंजाम्लाची पांढरी भुकटी असून ती अंजाम्लापेक्षां पाण्यांत व अम्लांत अधिक विद्राव्य असतें. या अम्लापासून दोन तर्‍हेचें क्षार होतात. एका प्रकारचे जे क्षार असतात त्यांची घटनासरणी धाअं प्र[धा=धातू] दुसर्‍या प्रकारचे जे क्षार असतात त्यांची घटनासरणीं धा४अं२प्र७ [धा=धातू] अशी असते.

अं ज धा तू चीं इ त र अ म्लें - अंज धातूंचें एक अम्ल उ अं प्र या घटनेचें असंयुक्त स्थितींत असल्याचें माहीत आहे. धुअंप्र या घटनासरणीचा एक क्षारहि आहे. हा क्षार अर्थात उअंप्र या अम्लापासून निघालेला असला पाहिजे. परंतु हें अम्ल असंयुक्त स्थितीत प्राप्त झालेलें नाहीं.

अं ज आ णि ह र यां चे सं यु क्त प दा र्थ अं ज त्रि ह रि द अंह (अँटिमनी ट्रायक्लोराईड) अंजत्रिहरिद खालीं दिलेल्या रीतीनें तयार होतों:-

(१) अंज धातुचें ज्वलन हर (क्लोरिन) मध्यें केलें असतां,(२) अंज धातूशीं पारदहरिद (मर्क्युरिक क्लोराइड) मिश्र करून त्या मिश्रणाचें पातन (डिस्टिलेशन) केलें असतां,(३)अंजचतु:प्राणिद किंवा अंजत्रिगंधकिद (अँटिमनी ट्राय सल्फाइड) हें उदहराम्लामध्यें विरवून त्यांचे आंशिक पातन (फ्रॅकशनल डिस्टिलेशन) केंले असतां व (४) अंज धातु उदहराम्लांत विद्रुत करून त्यांत नत्राम्ल घालून त्यांचें पातन केलें असतां होतें.

धर्म : अंजत्रिहरिद वर्णहीन, आर्द्रताशोषक व स्फटिकरूप पदार्थ आहे. हा लोण्याप्रमाणें मऊ असतो म्हणून यास अंजनवनीत (बटर ऑफ अँटिमनी) असेंहि नांव आहे. याचें विशिष्ट गुरूत्व ३.०६ आहे. याचा द्रवबिंदु (मेल्टिंग पॉइंट) ७३.२०श असून याचा द्रव वर्णहीन तैलरूप असतो. याचा उत्क्वथनांक (बायलिंग पाइंट) २२३० हा क्षार अल्कहल (आल्कोहल) व कर्बद्विगंधकिद (कार्बन बाय सल्फाइड) यांत बिद्राव्य असून पाणी अगदीं थोडया प्रमाणांत असल्यास त्यांत विद्राव्य आहे. परंतु पाण्यचा अतिरेक झाल्यास बहुविध प्राण्हरिदा (ऑक्सिक्लोराइडस) चा निपात येतो. हा निपात भुकणीसारखा असतो. यास इंग्रजी नांव अलगरॉथ असें आहे. हे निपात केलेले प्राणहरिद पाण्यांत सारखे उकळत ठेवले तर त्यांतील हर सर्वस्वीं नाहींसा होतो व शेवटीं अंजत्रिप्राणिदांचा अवशेष राहतो. हा क्षार अल्कहरिदाशीं संयुक्त होऊन त्यापासून द्वित क्षार होतात. त्याचप्रमाणें भार, खट, स्त्रांत व मग्न यांच्या हरिदाशीं संयुक्त होतो.

अं ज पं च ह रि द अं ह ५ (अँटिमनी पेन्टा क्लोराइड ) - अंजत्रिहरिद हा हरवायूच्या प्रवाहांत उष्ण केला म्हणजे अंजपंचहरिद तयार होतो. हा बहुतेक वर्णहीन व बाष्प जनक (फ्यूमिंग) असून त्यास असह्य वास असतो. शीततेनें याचे घन स्फटिक होतात. हे ६० श उष्णमानावर वितळतात. यास उष्णता लाविली म्हणजे यांचें पृथक्करण होऊन त्याचें त्रिहविद व हर असें रूपांतर होतें. हा क्षार पाण्याशीं संयुक्त होऊन अंह५ उ२ प्र आणि अंह५उ४प्र२ या घटनेचे उज्जित (हायड्रेट्स) होतात. हा पंचहरिद, स्फुरच्या पंचहरिदाशीं समानधर्मी आहे; परंतु यांच्यांतून हर अधिक लवकर असंयुक्त होतो. ही क्रिया खालील समीकरणांत दाखविली आहे.

अंजपंचहरिद    =    अंजत्रिहरिद    +    हर
अंह            अंह            ह

याचें अंजपंचप्राणिदाशीं पृथक्करण होण्यांत साम्य आहे. याचें त्रिपाणिद व प्राण असें पृथक्करण होतें. पंच हरिदावर पाण्याची क्रिया केली म्हणजे प्रथम त्यापासून प्राण हरिद तयार होतो. परंतु याच्यापुढें कार्य होऊं दिलें म्हणजे अंजाम्ल उ३अंप्र४ होतें.

अं ज त्रि गं ध कि द.- अं२ग३ (अँटिमनी ट्रायसल्फाइड) अंजत्रिगंधकिद अं२ग३ हा सृष्टिमध्यें खनिजरूपांत 'स्टिब्ना-इट' किंवा 'अँटिमोनाइट' नांवाच्या खनिज द्रव्यांत असतो. अंजत्रिहरिद किंवा (टारटर एमेटिक) याचा अम्लामध्यें द्रव करून त्यांत उज्जगंधकिद वायूचा प्रवाह सोडला म्हणजे नारिंगी रंगाचा लालसर निपात (प्रसिपिटेट) येतो; हा उज्जित असतो. हा गंधकिद २००० श उष्णमानावर उष्ण केला म्हणजे काळा होतो. सृष्टीमध्यें जो अंजत्रिगंधकिद असतो तो काळा
किंवा करड्या रंगाचा असतो.

अंजत्रिगंधकिद उज्जवायूच्या प्रवाहांत उष्ण केला म्हणजे त्याचें सोज्जित रूप (रिड्युस्ड) होऊन धातुरूप होतो. हा हवेंत जळतो व चतु:प्राणिदांत त्याचें रूपांतर होतें. अंजत्रि गंधकिद तीव्र उद्हराम्लांत, दाहक अल्कच्या द्रवांत व अल्कीय गंधकिदाच्या द्रवांत विद्राव्य आहे. धातुगंधकिदाच्या द्रवांत अंजत्रिगंधकिद विद्रावित होऊन गांधिक अंजसाम्लाच्या (सल्फ अँटिमोनिअस अ‍ॅसिड) क्षाररूपानें त्यांत असतो.

अंजत्रिगंधकिद व अनाम्ल (बेसिक) गंधकिद, यांच्या संयोगानें लिव्हर्स ऑफ अँटिमनी नांवाचा पदार्थ तयार होतो. हे पदार्थ तयार करण्याकरितां तज्जन्य संयुक्त पदार्थांचे मिश्रण एकत्र रस करून तयार करतात. हे काळ्या रंगाचें भुकटीरूप असतात त्यांत ज्या मानानें अंजधातूचें प्रमाण जास्त असेल त्या मानानें ते पाण्यांत जास्त अविद्राव्य असतात. या गांधिक अंजसायिता [थियो अंटिमोनाइट्स] चा उपयोग रबराच्या गंधकीकरणांत [व्हलकनायझेशन] व आगपेट्या करण्यांत येतात.

सुरक्षित आगपेट्यां (सेफ्टी मॅचेस) तील काड्या फ पेटीच्या बाजूवरच पेटतात. या काड्यांचीं टोंकें वर सांगितलेला अंजगंधकिद, पालाशहरित (पोट्याशिअम क्लोरेट) व कांचेची पूड यांच्या मिश्रणांत बुडविलेलीं असतात. यांत स्फुर (फॉस्फारस) मुळींच नसल्यामुळें नुसत्या घर्षनानें त्या पेटत नाहींत. पेटीच्या बाजूवर सरसाच्या पाण्यांत रक्तस्फुर व कांचेची पूड विद्रुत करून ते मिश्रण लाविलेले असतें म्हणून काडी बाजूवर ओढतांच पेटते.

अंजपंचगंधकिद अं (अँटिमनी पेन्टासल्फाइड) : - अंजाम्लाच्या द्रवांत किंवा अजपंचहरीदाच्या द्रवांत उज्जगंधकिद वायूचा प्रवाह सोडला म्हणजे अंजपंचगंधकिद तयार होतो. गांधिक अंजसायिाताच्या द्रवांचें तीव्र अम्लानें पृथक्करण केलें म्हणजे हा पदार्थ तयार होतो. निर्जल स्थितींत हा क्षार स्वर्ण वर्णाचा पीतवर्णी असून भुकटीच्या रूपांत असतो. ही भुकणी पाण्यांत अविद्राव्य असते. परंतु दाहक अल्क व अल्ककर्बित यांच्या जल द्रवांत ती विद्रुत होते. त्याचप्रमाणें धातूचे जे गंधकिद आहेत त्यांच्या द्रवांत ही भुकणी विद्रुत होते, व गांधिक अंजसायिताच्या रूपांत विद्रुत राहते. वातावरणांतील हवेचा संसर्ग न होऊं देतां हा अंजपंचगंधकिद उष्ण केला तर त्याचें अंजत्रिगंधकिद व गंधक असें पृथक्करण होतें.

अंजद्राक्षित (टार्ट्रेट ऑफ अँटिमनी) : - अंजद्राक्षित हा क्षार पांच भांग अंजप्राणिद, सहा भाग अम्लपालाश द्राक्षित (अ‍ॅसिड पोट्याशियम टार्ट्रेट) आणि दोन पिंट बाष्पजल (डिस्टिल्डवाटर) मिश्र करून तयार होतो. १/१६ ते १/६ ग्रेन प्रमाणांत स्वेदोत्पादक (डायफोरेटिक) म्हणून हा क्षार औषधांत देतात. एकपासून दोन ग्रेनपर्यंत वांतिकारक म्हणून देतात.

मोठ्या प्रमाणांत अंजद्राक्षित वांतिकारक आहे म्हणून यास वांतिकारक द्राक्षित (टार्टर एमेटिक) असें म्हणतात.लहान प्रमाणांत हें उत्तोजक, स्वेदोत्पादक व कफोद्धारक आहे. मोठ्या प्रमाणांत वांतिकारक आहे.

हींव, श्लेष्मलत्वचेला सूज येऊन झालेले अभिष्यंद इ. विकार, यांवर ह फार उपयुक्त आहे. कारण त्वचा व अंत:- त्वचा यांच्या मार्गानें वाहणार्‍या रसाची आंतरोत्सर्ग होण्याची क्रिया यानें उत्तेजित होते.

अंज द्राक्षित (टार्ट्रेट ऑफ अँटिमनी) :- अंज धातूचे अनेक द्राक्षित होतात. यांत फार महत्त्वाचा असा वांतिकारक द्राक्षित (टार्टरएमेटिक) आहे. हा अंज व पालाश धातूंचा द्राक्षित (टार्ट्रेट) होय. तीन भाग अंजप्राणिद, ४ भाग अम्लपालाश, द्राक्षितांत (क्रीमा ऑफ टार्टर) मिसळून त्या मिश्रणास थोड्या पाण्याबरोबर खलून त्याचा चिकट गोळा करितात, व त्यास कांहीं तास तसेंच ठेऊन नंतर ६ किंवा ८ भाग पाण्यांत घालून कढवितात. नंतर जो द्रव बनतो, तो कढत असतांनाच गाळून थंड होण्याकरितां ठेवितात. द्रव थंड होत जातो त्याप्रमाणें वांतिकारक द्राक्षिताचे चतुरस्त्र स्फटिक वेगळे होतात. हा क्षार १५ पट थंड पाण्यांत व ३ पट कढत्या पाण्यांत विद्रुत होतो. त्या द्रवास तीव्र, कडू व गदमळणारी (उमदळणारी) रुचि असते. यानें लिटमसचा निळा कागद किंचित लाल होतो. याचे स्फटिक हवेंत राहिले असतां त्यावर फुलारा फुटतो. याच्या द्रवानें फार वमन होतें, व रेचहि होऊन विषकारक परिणाम घडतो याच्या द्रवांत उज्जगंधकिदाचा प्रवाह घातला असतां गंधकिद (सल्फाइड) तळीं बसतो, आणि अल्क किंवा अल्कीयकर्बित यांच्या द्रवानें अंजप्राणिदाचा निपात (प्रेसिपिटेट) तळीं बसतो.

अं ज चा औ ष धा क रि तां उ प यो ग.- बेसिल व्हॅलेंटाइन व परासेल्सस यांच्या वेळेपासून अंज (अँटिमनी) च्या निरनिराळ्या संयुक्त पदार्थांचा औषधाकरितां उपयोग केला जात असे; पण त्याचा दुरुपयोग होऊं लागल्यामुळें पारिसच्या पार्लमेंटनें १५६६ त त्याच्या उपयोगाला बंदी केली. अँटिमनीचा उपयोग दारूकरितां पेले तयार करण्याकडे होत असे. दारूंत वांतिकारक धर्म येण्याकरितां ती कांहीं वेळ या पेल्यांत ठेवीत. अँटिमनीच्या गोळ्या नुसत्या संसर्गानें गुण देत असा समज असून त्यांचें काम झाल्यानंतर पुन्हां उपयोगांत आणण्याकरितां त्या परत घेण्यांत येत असत. अँटिमनी टार्टरित (टार्टर एमिटिक) पोटांत घेतल्यास त्याचा पोटाच्या आंतल्या बाजूवर (वॉल ऑफ दि स्टमक) तत्काल प्रत्यक्ष परिणाम होऊन वांती होते, व शोषण झाल्यानंतर अस्थिमज्जेवर परिणाम होऊन हीच क्रिया चालू रहाते. अँटिमनी टार्टरित (टार्टर एमिटिक) याच्या अंगीं नाडी मंद व सावकाशपणें चालावयास लावण्याची चांगली शक्ति आहे). त्याच्या योगानें श्वासोछवास हळू हळू कमी चालतो, व ज्यास्त प्रमाणांत घेतल्यास शरिराची उष्णता कमी होते. तें मज्जातंतुसंघाताची (नर्व्हस सिस्टिम) व विशेषत: कण्याची (स्पायनलकॉर्ड) तरतरी कमी करतें. तें आंतरोत्सर्गा बरोबर व बाह्योत्सर्गाबरोबर बाहेर जातें; व धाकट्या श्वासनळीच्या श्लेष्मलत्वचेंतून जातांनां बाह्योत्सर्गाचें प्रमाण वाढवितें. यास्तव त्याला कफकारक म्हणण्यास हरकत नाहीं. एकंदरींत, त्याचे परिणाम क्षोभकारक, व हृदयाची आणि मज्जातंतुसंघाताची तरतरी कमी करणारे आहेत. ह्यामुळें तें स्त्रिया व मुलें यांनां देऊं नये व पुरुषांनांहि क्वचितच प्रसंगी द्यावें.

वि ष वि ज्ञा न - (टॉक्झीकॉलॉजी) अंज (अँटिमनी) ही धातु विषारी असून सर्व सजीव वस्तूंचें प्राणहरण करते. हें विष पोटांत गेल्यानंतर होणारीं सर्व चिन्हें आर्सेनिक प्रमाणेंच असतात; परंतु पोटांतील आंतड्यांचा क्षोम कमी होतो व फुप्पुसें सामान्यपणें जास्त सुजतात. रोग्याला जर वांती होऊं लागली नसेल तर पोटाच्या पंपाचा उपयोग करावा किंवा जशदगंधकित [सल्फेट ऑफ झिंक १०-३०] व चमचाभर ग्रेन ट्यानिन अम्ल, पाण्यांत मिसळून वारंवार देत जावें व त्याबरोबरच चहा किंवा कॉफी अगर एखादें श्लेष्मोत्पादक पेय द्यावें. रोग्याला बिछान्यावर निजवून त्याच्या अंगावर गरम कपडे घालावे व उन पाण्याच्या बाटल्यांनीं अंग शेकावें.

   

खंड ९ : ई ते अशुमान  

 

  ईजिप्त

  ईजियन समुद्र

  ईजियन संस्कृति
  ईटन-इंग्लंड
  ईडनिंबू
  ईथर
  ईदर
  ईदिग
  ईव्हशाम
  ईशोपनिषद
  ईश्वरकृष्ण
  ईश्वरीपूर
  ईश्वरसिंग
  ईसॉप
  ईस्ट इंडिया कंपनी
  ईस्ट इंडीज
  ईस्टर
  ईस्टर बेट
  ईस्टविक्, एडवर्ड बॅक् हाऊस
  ईक्षणयंत्र
 
  उकाँग
  उकुंद
  उखाणे
  उखामंडळ
  उग्रसेन
  उचकी (हिक्का )
  उचले व भामटे
  उचाड
  उच्च-पंजाब
  उच्च शहर
  उच्च
  उच्छर
  उंज
  उज्जनी
  उज्जयन्ताद्रि
  उझानी
  उंट
  उटकटारी
  उटकमंड
  उंड
  उंडवलें
  उंडविन
  उडियासांझिया
  उडीद
  उडुपी
  उड्र
  उतथ्य
  उत्तंक
  उत्तनगरै
  उत्तमपालेयम
  उत्तर
  उत्तर अमेरिका
  उत्तरध्रुवप्रदेश
  उत्तरपाडा
  उत्तर मेरूर
  उत्तर सरकार
  उत्तरा
  उत्तरापथ
  उत्तानपाद
  उत्पल
  उत्पादन
  उत्रौला
  उदमलपेट
  उदयगिरी
  उदयन
  उदयनाचार्य
  उदयपूर
  उदयप्रभसूरि
  उदयभानु
  उदयसिंह
  उदर
  उदलगुरी
  उदाजी पवार
  उदासी
  उंदिरखेड
  उंदीर
  उदेपुरी बेगम
  उदेपूर संस्थान
  उदेपूर गांव
  उदेपूर शहर
  उदेपूर
  उदेय्यार पालेयम्
  उंदेरी
  उद्गाता
  उद्गीर
  उद्गीरची लढाई
  उद्दंड
  उद्दंडपुर
  उद्दालक
  उद्धव
  उद्धव गोसावी
  उद्धवचिद्घन
  उद्धव नाला
  उद्धव योगदेव
  उद्बोधनाथ
  उद्वेग रोग
  उन
  उन-देलवाडा
  उनबदेव
  उना
  उनियार
  उनी
  उन्कल
  उन्नाव
  उन्माद
  उन्सरी
  उपकन्चा
  उपकेशगच्छ
  उपनयन
  उपनिधि
  उपनिषदें
  उपनेत्र
  उपप्लव्य
  उपमन्यु
  उपरवार
  उपरि
  उपरिचर
  उपवेद
  उपशून्य
  उपसाला
  उपांशु
  उपेनंगडी
  उपेन्द्र परमार
  उप्पर
  उप्माक
  उप्रई
  उप्लेटा
  उंबर
  उम्बेक
  उबेरो
  उंब्रज
  उमत्तूर
  उमरकोट
  उमर खय्याम
  उमरखान
  उमरखेड
  उमरबिन खत्तब
  उमरावती
  उमरी
  उमरेठ
  उमरेड
  उमा
  उमाजी नाईक
  उमापति
  उमापति शिवाचार्य
  उमाबाई दाभाडे 
  उमीचंद
  उमेटा
  उमेदवारी
  उमेरिया
  उर
  उरगप्पा दंडनाथ
  उरण
  उरल पर्वत
  उरलि
  उरवकोंड
  उरिया, उडिया
  उरी
  उरुळी
  उरोगामी
  उर्दुबेगी
  उर्फी, मौलाना
  उर्मिया सरोवर
  उर्मिया, शहर
  उर्वशी
  उलघबेग मिरझा
  उलूक
  उलूपी
  उलेमा
  उल्का
  उल्बारिया
  उल्म
  उल्लतन
  उल्लाळ 
  उवा
  उशना, वैदिक
  उशीनर
  उकूर
  उषा
  उष्टारखाना
  उष्णता
  उष्णताजन्य विद्युत
  उष्णतामापन
  उष्णता-रसायनशास्त्र
  उष्णतावहन
  उष्णमानमापक यंत्र
  उस्का
  उस्तरण
  उस्मान
  उस्मान नगर
  उस्मानाबाद
  उळवी
 
  ऊदाइन (बेंझाईन)  
  ऊदाम्ल
  ऊदिदिन
  ऊदिन
  ऊदिल अल्कहल
  ऊदिल प्रायोज्जिद
  ऊदिल भानन
  ऊधमबाई
  ऊरूस्तंभ
  ऊर्ध्वपातनक्रिया
  ऊस
 
  ऋग्वेद
  ऋचीक
  ऋणमोचन
  ऋतु
  ऋतुपर्ण
  ऋत्विज
  ऋभु वैदिक
  ऋषभ
  ऋषि
  ऋषिऋण
  ऋषिक
  ऋषिपंचमी
  ऋषियज्ञ
  ऋषिवरण
  ऋष्यमूक
  ऋष्यवान
  ऋष्यशृंग
  ऋक्षरजा
 
  एओलिस
  एकचक्रा
  एकत
  एकतत्त्ववाद
  एकदंत भट्ट
  एकनाथ
  एकबटाना
  एकर
  एकरुक
  एकलव्य
  एकलिंगजी
  एकादशरुद्र
  एकादशी
  एकिल्
  एक्झीटर
  एक्रान
  एक्स
  एक्स-ला-चॅपेल
  एगमाँट लॅमोरल कौंट ऑफ
  एगिनकूर
  एचर्ड
  एंजिन
  एट्ना
  एट्रूरिया
  एडगर
  एडन
  एडन कालवा
  एडप्पल्ली
  एन्डर
  एडवर्ड
  एडवर्डसाबाद
  एडिंबरो
  एडेन जॉर्ज - लॉर्ड ऑकलंड
  एडेसा
  एडोम
  एड्रियन
  एदलाबाद
  एनमे
  एनॅमल
  एन्नोर
  एपिक्टेटस
  एपिक्यूरस
  एपिनस, फ्रान्झ उलरिच थिओडार
  एपीडॉरस
  एंपीडोक्लिस
  एफेसस
  एबनी (अबनूस)
  एबल सर फ्रेडरिक
  एंब्रान
  एमडेन
  एमॅन्युअल व्हिक्टर
  एमिनाबाद
  एमीन्स
  एमेअस
  एमेरी
  एम्मेट रॉबर्ट
  एरंडी
  एरंडोल
  एरन
  एरनाड
  एरवल्लर
  एरिडु
  एरिथ्री
  एरिनपुर
  एरियन
  एरिलिगारू
  एरोड
  एर्नाकुलम
  एलगंडल
  एलाम
  एलाय
  एलिआकॅपिटोलिना
  एलिचपूर
  एलिझाबेथ
  एलिस
  एलेनबरो
  एलेफन्टा
  एल्जिन
  एल्जिन लॉर्ड
  एल्फिन्स्टन मौंट स्टुअर्ट
  एल्ब
  एल्बा
  एल्युथेरापीलीस
  एल्युसिस
  एल्सिनोर
  एसर हजन
  एसेक्स परगणा
  एस्किमो
 
  ऐतरेय आरण्यक
  ऐतरेय उपनिषद्
  ऐतरेयब्राह्मण
  ऐन
  ऐनापुर
  ऐनी-अकबरी
  ऐनुद्दीन
  ऐनू
  ऐमक
  ऐयनर
  ऐरणी
  ऐरावत
  ऐहिकवाद
  ऐहोळ
 
  ओक
  ओक वामन दाजी
  ओकटिवन
  ओकपो
  ओकलंड शहर
  ओकहॅम
  ओकुमा, कौंट
  ओकू
  ओकेन, लॉरेन्झ
  ओकोनेल डॅनियल
  ओक्लाहामा
  ओच्चन
  ओजिब्वा
  ओझर
  ओझा
  ओट
  ओटावा
  ओट्टो
  ओडर नदी
  ओडेसा
  ओडोनेल हेनरी जोसेफ
  ओतारी
  ओतुर
  ओध
  ओनला
  ओनेगा
  ओन्गोले
  ओपोर्टो
  ओफीर
  ओब्रायन वुइल्यम स्मिथ
  ॐ ( ओम् )
  ओमान
  ओम्स्क
  ओयामा
  ओरई
  ओरॅंग ऊटंग
  ओरकझई
  ओरछा
  ओरावन
  ओरिसा 
  ओरिसा कालवे
  ओरिसांतील मांडलिक संस्थानें
  ओर्मेरॉड एलिअनॉर
  ओलपाड
  ओल्डहॅम
  ओल्डहॅम थॉमस
  ओल्डेनबर्ग
  ओवसा
  ओवा
  ओवेन, रॉबट
  ओवेन सर रिचर्ड
  ओव्हिड
  ओशीमा
  ओषण
  ओसवाल
  ओसाका अथका ओझावा
  ओस्कार
  ओस्टीयाक
  ओहम्, जार्ज सायमान
  ओहममापक
  ओहिओ
  ओहिंद
  ओळंबा
 
  औक अथवा अवुक जमीनदार
  औट्रम
  औतें
  औदीच्य ब्राह्मण
  औद्देहिक
  औद्योगिक परिषद
  औंध
  औंधपट्टा
  औधेलिया
  औनियाति
  औरंगझेब अलमगीर
  औरंगाबाद
  औरंगाबाद सय्यद शहर
  और्व
  औशनस
  औसले सर विल्यम
  अं
  अंक
  अंकगणित
  अंकचक्र
  अंकलगी
  अंकलेश्वर
  अंकाई टंकाई
  अंकिसा
  अंकेवालिया
  अॅंकोना
  अॅंकोबार
  अंकोर
  अंकोला
  अंग
  अंगठी
  अंगडशाहा
  अंगडि
  अंगडिपूरम
  अंगद
  अंगदशिष्टाई
  अंगदिया
  अंगरखा
  अंगापूरकर (हरि)
  अंगारा
  अंगुत्तर निकाय
  अंगुर शेफ
  अंगुळ
  अंगोरा शहर
  अॅंगोला
  अॅंग्विल्ला
  अंघड
  अंचलगच्छ
  अंज-(अॅंटिमनी)
  अंजनगांव
  अंजनगांव बारी
  अंजनगांव सुर्जी
  अंजनवेल
  अंजनी
  अंजनेरी
  अंजार
  अंजिदिव
  अंजी
  अंजीर
  अंजू
  अंजेंगो
  अॅंजलिको फ्रा
  अॅंटनान-रिव्हो
  अॅंटवर्प
  अंटिओक
  अॅंटिग्वा
  अॅंटियम
  अॅंटिलीस
  अॅन्टिव्हरी
  अन्टीगोनस गोनाटस
  अॅन्टीगोनस सायक्लॉप्स
  अॅन्टीपेटर
  अॅन्टीलिया
  अॅंटोनिनस पायस
  अॅंटोनियस ( मार्कस )
  अंडवृध्दि
  अण्डाशयछेदनक्रिया
  अॅंडीज
  अंडें
  अंडोरा
  अंडोल
  अंडोला
  अॅंड्रासी ज्युलियस
  अॅंड्रिया डेल सार्टो
  अॅंड्रोमेडा
  अॅंड्रयूज थॉमस
  अंतगड
  अंतधुरा
  अंतर इब्नशद्दाद
  अंतराल
  अंतर्गळ
  अंतर्वेदी
  अंतर्ज्ञान
  अंताजी ( उर्फ बाबुराव ) मल्हारराव बर्वे
  अंताजी माणकेश्वर
  अंताजी रघुनाथ
  अंतालिमा
  अंतुर्ली
  अंतूर
  अंतोबा गोसावी
  अंत्रपुच्छदाह
( अपेंडिसाइटीज )
  अंत्रावरणदाह
( पेरिटोनिटिस )
  अॅंथनी सुसान ब्रौनेल
  अंदमान आणि निकोबार बेटें
  अंदमान बेटें
  अंदाळ
  अंदोरी
  अंध किंवा आंध
  अंधक
  अंधत्व
  अंधरगांव
  अंधळगांव
  अंधारी नदी
  अंब
  अंबत्तन
  अंबर ( धातु )
  अंबर
  अंबर उदी
  अंबरखाना
  अंबरनाथ अथव अमरनाथ
  अंबरनाथ
  अंबरपेठ
  अंबराम्ल
  अंबरीष
  अंबलक्कारन्
  अंबलपुलई
  अंबलवासि
  अंबष्ठ
  अंबहटा
  अंबा
  अंबा, (तालुका)
  अंबागड
  अंबागडचौकी
  अंबाजी इंगळे
  अंबाजी दुर्ग
  अंबाजी पुरंधरे
  अंबाडी
  अंबा भवानी
  अंबाला
  अंबालिका
  अंबाली
  अंबासमुद्रम
  अंबिका
  अंबिका दत्त व्यास
  अंबिकापूर
  अंबुशी
  अंबूर
  अंबेर
  अंबेला
  अंबेहळद
  अंबोयना
  अंबोली
  अंभोरा
  अंशुमान
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .