विभाग नववा : ई-अंशुमान
अंडोल - हैद्राबाद संस्थान. मेदक जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुका. क्षेत्रफळ ४५० चौरस मैल. लोकसंख्या (१९११) ११३३२०. या तालुक्यांत १७२ खेडीं आहेत. पैकीं ३४ जहागीरे आहेत. या तालुक्यांत इ. स. १९०५ सालीं टेक्माळ तालुक्याचा अंतर्भाव करण्यांत आला. वरील आंकड्यांत त्या तालुक्याचाहि समावेश केला आहे. त्या तालुक्याचें क्षेत्रफळ १६२ चौरस मैल व ३४४२५ लोकसंख्या होती. इ. स. १९०१ सालीं जमीनमहसूल ३.५ लाख रुपये होता.