विभाग नववा : ई-अंशुमान
अंडोला - हैद्राबाद संस्थान. गुलबर्गा जिल्ह्याचा दक्षिणेकडील तालुका. क्षेत्रफळ ७०९ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) ८८५३५. या तालुक्यांत १४९ खेडीं असून पैकीं ३० जहागिरी आहेत. इसवी सन १९०१ सालीं जमीनमहसूल २.१ लाख रुपये होता. फेरोजाबादचा पैगा तालुका याच्या उत्तरेस असून ३५०३५ लोकवस्ती आहे. यांत २९ खेंडीं व एक मोठें गांव असून क्षेत्रफळ ९६ चौरस मैल आहे.