विभाग नववा : ई-अंशुमान
अँड्र्यूज थॉमस (१८१३-१८८५) - हा आयरिश रसायनशास्त्री व पदार्थवैज्ञानिक बेलफास्ट येथें १८१३ त जन्मला, व तेथेंच त्याचें प्राथमिक शिक्षणहि झालें. नंतर तो ग्लासगो येथें शिकण्यास गेला व पुढें त्यानें एडिंबरो येथें एम. डी. ची पदवी घेतली, येणेंप्रमाणें शिक्षण संपविल्यावर तो बेलफास्ट येथें वैद्यकीचा धंदा करूं लागला. यानंतर दहा वर्षांनीं तो क्वीन्स कॉलेजचा उपाध्यक्ष होऊन तेथें तो रसायनशास्त्राच्या अध्यापकाचें काम करूं लागला. कर्वद्धि प्राणिदाच्या उष्णमान, दाब व आकारमान यांनां जोडणार्या नियमांची त्यानें नीट तपासणी केली व विशेषत: वायूंचीं स्थित्यंरदर्शक (क्रिटिकल) उष्णमानें व स्थित्यंतरदर्शक दाब यांची यानें कल्पना काढली.