विभाग नववा : ई-अंशुमान
अंतराल - दक्षिण हिंदुस्थानांतील एक जात. जातिभेदाप्रमाणें जे ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यापेक्षां कमी दर्जाचे आहेत व शूद्रांपेक्षां उच्च दर्जाचे आहेत अशा (अंतराळीं असणार्या) लोकांनां अंतरल्ल म्हणतात व त्यांच्यांत नामपिदि, अंबलवासि व शामन्धर असे पोटभेद आहेत.
ना म पि दि.- हे लोक मूळचे ब्राम्हण होते. परंतु ब्राम्हणांच्या सांगण्यावरून केरलच्या राजप्रतिनिधींचा यांच्या पूर्वजानें खून केला म्हणून त्यांची गणना अंतराल जातींत होंते. नंबुद्रो लोक त्याचें पौरोहित्य करतात. हे लोक मरुमक्कथयम हा वारसाचा कायदा पाळतात.
अं ब ल वा सि - 'अंबलवासि' पहा. अंतराल्लांची तिसरी पोटजात शामन्धर होय. यांत ६ पोटभेद आहेत ते असे :-
एराडि, नेंडुन्गाडि, वेलोडि, उन्निधिरी अतियोति व नांबियार हे ते ६ पोटभेद आहेत. ह्या जातीचे लोक आपण क्षत्रिय बीजाचें आहों असें म्हणतात. यांचे रीति रिवाज नायर लोकांप्रमाणें आहेत. परंतु समाजांत त्यांचा दर्जा नायर लोकांपेक्षां उच्च आहे. त्यांच्यांत यज्ञोपवीत धारण करण्याची चाल नाहीं व त्यांचें सर्व विधी मंत्राशिवाय होतात. शामन्धर व अंबलवासि या दोन जातींत रोटीव्यवहार होत नाहीं.
अंतरालांचा मोठा वर्ग जो अंबलवासि हाच काय तो सर्वश्रुत आहे. त्यामुळें ही मूळची जात अंबलवासींत मोडली जात असून फारशीं ऐकिवांत नाहीं. हिंदुस्थानच्या खानेसुमारींतहि यांची स्वतंत्र गणना केलेली दिसत नाहीं.