विभाग नववा : ई-अंशुमान
अंतर्वेदी - एक प्रदेश. हें नांव कोणत्याहि दुआबाला लागू पडेल. परंतु हें नांव साधारणपणें गंगा व यमुना यांच्या मधला दुआब दर्शवितें. याला गंगा-यमुना अंतराळ असें म्हणतात. बृहत्संहितेंत याचा उल्लेख आला आहे (५-६५). या अर्थानें याचा उपयोग इंदूर येथील स्कंदगुप्ताच्या देणगींत केला आहे (गुप्तलेख पृ. ६९). मराठ्याच्या मोहिमांसंबंधीं पत्रांत अंतर्वेदीचा अनेक वेळा उल्लेख आढळतो.