विभाग नववा : ई-अंशुमान
अंतालिमा - भावनगर संस्थानांतील (काठेवाड) एक ठिकाण. लोकसंख्या ६१३ (१८८१). येथें अंताळेश्वर महादेवाचें स्वयंभू देऊळ आहे. लेवाकुणब्यांनां या देवस्थाविषयीं फार आदर असून जातींमधील भांडणें मिटविण्यासाठीं ते याठिकाणीं येतात. खुमान लोकांचे येथें बरेच स्मारकदगड आहेत. अठराव्या शतकाच्या अखेरीस भावनगरच्या ठाकोर बखतसिंगजीनें हें गांव जिंकून घेतलें.