विभाग नववा : ई-अंशुमान
अंतूर - हैद्राबाद संस्थान. औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यांतील एक प्राचीन किल्ला. उ. अ. २०० २७' व पू. रे ७५० १५'. हा किल्ला पंधराव्या शतकांत एका मराठा संस्थानिकानें बांधला. पुढें तो अहमदनगरच्या पातशहानें जिंकला व नंतर औरंगजेबानें तो आपल्या राज्यास जोडला. किल्ल्यावर एक चतुष्कोनी स्तंभ असून त्यावर इ. स. १५८८ सालचा एक फारसी लिपींत शिलालेख आहे.