विभाग नववा : ई-अंशुमान
अंतोबा गोसावी - समर्थ रामदास स्वामींचा शिष्य. सातार प्रांतांत मेथवड म्हणून जो गांव आहे तेथील हा रहाणारा असे. समर्थांनीं यास पंढरी येथें आषाढी कार्तिकीस जात जावें म्हणून आज्ञा करून त्यास तेथें एक मठ बांधून देवविला होता. असें सांगतात कीं समर्थच या दोन्ही वार्यास कित्येक वर्षें जात असत. परंतु पुढें आपणास न बनल्यास यानें जात जावें असें सांगितल्यावरून हा जाऊं लागला (कवि चरित्र.)