विभाग नववा : ई-अंशुमान
अंदाळ (अंडाळ) - अळवारां (तामिळ वैष्णव संत) पैकीं एक ही स्त्री असून विष्णूचित्त नांवाच्या पुरुषाला लहानपणीं बागेंत सांपडली. हिला लहानपणापासनूच कविता करण्याचा नाद असे. ही मुलगी देवाची आवडती आहे असें तिच्या लक्षणांवरून सर्वांनां कळून आलें होतें. ही मैत्रिणी जमवून कृष्णासारख्या क्रीडा करी व कृष्णभक्तीपर पदें रची. पुढें रंगनाथ देवाबरोबर हिचें लग्न करण्यांत आलें. पण देवळांत नेल्यावर ही अदृश्य झाली असें सांगतात. या वैष्णवसंतिणीची मूर्ति दक्षिणेंत कांहीं देवळांतून दिसून येते.