प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग नववा : ई-अंशुमान

अंधत्व - (सामान्य विवेचन). व्याख्या.- अंधत्व याचा अर्थ पहाण्याचा अगर चक्षुरिंद्रियाचा अभाव. अंधत्व हें निरनिराळ्या प्रकारचें असतें. जेव्हां एखाद्या मनुष्याला स्थूल वस्तु दिसत असून देखील छापील अगर हस्तलिखित शब्द ओळखतां येत नाहीं. तेव्हां त्या स्थितीला शब्दगत अंधत्व म्हणतात. जेव्हां एखाद्या मनुष्याला स्थूल वस्तू दिसत असून देखील त्या वस्तू ओळखतां येत नाहींत तेव्हां तशा प्रकारच्या स्थितीला मानसिक अंधत्व असें म्हणतात. ज्या वेळीं दोन्ही डोळ्यांच्या अगर एका डोळ्याच्या अर्ध्या भागाला दिसत नाहीं त्याला अर्धगत अंधत्व अशी संज्ञा आहे.

अं ध त्वा चीं का र णें.- नेत्रामधील दुखापतीमुळें अगर दृड्मज्जामंडळापासून तों मेंदूपर्यंत जाणार्या मार्गाला झालेल्या जखमेमुळें अगर मेंदूतील क्षतामुळें अंधत्व प्राप्त होतें.

(१) नेत्रक्षत - बाह्यगोलाच्या तारकाविधानांतील स्पष्ट पणाच्या अभावामुळें कांचेच्या रसाच्या अस्वच्छतेमुळें, पूय अगर रक्तप्रवाहामुळें, बाहुलीच्या मार्गशोषणामुळें, डोक्यांतील वाढत्या ताणाच्या योगानें होणार्या फरकामुळें आणि अशाच प्रकारच्या इतर कारणांमुळें मनुष्याला अंधत्व प्राप्त होतें. एका डोळ्याला दृष्टिबंधकदाह होत असला तर बहुतेक अंशीं संवेदनासादृश्यामुळें दुसर्या डोळ्यास दाह उत्पन्न होतोच. जन्माच्या वेळेलाच जो सांसर्गिक दाह होतो तें लहान मुलांच्या अंधत्वाच्या करणांपैकीं एक प्रमुख कारण आहे.

(२) दृड्मज्जामंडळापासून मेंदूकडे जाणार्या मार्गांतील क्षत-तेजोवह दृड्मज्जातंतुदाह हें अंधत्वाचें एक प्रमुख कारण आहे. या दाहामुळें दृग्बिंबांचा श्वेतवर्णी अपोषणक्षय होतो अगर डोळ्यामध्यें तंतु उत्पन्न होऊं लागतो. पिंगट वर्णाचा अपोषणक्षय दाहामुळें होत नसून मुळांतच उत्पादक शक्तीच्या प्रभावामुळें होतो.

(३) मेंदूक्षत  :- तेजोवहतंतू हे मेंदूच्या शीर्षपृष्ठभागामधील कानाच्या पाळींत गेलेले असतात. आणि कोणत्याहि पाठीच्यामधील दृष्टीमध्यें एकदां नाश पावला कीं, पूर्ण आंधळेपण प्राप्त होतें. डाव्या पाळीमधील जखम झाली असतां शब्दांधत्व अथवा चित्तांधत्व प्राप्त होतें. अशा रीतीचा फरक पडण्याचें कारण हें कीं वाणीच्या सर्व कार्यांचा उगम फक्त मेंदूच्या डाव्या भांगांतूनच होतो. शिवाय दृष्टीचे जे खास मध्य असतात त्यांमध्यें जखम न होतां मेंदूच्या कोणत्याहि भागांतूनच एखादी जखम झाली असतां दृड्मज्जातंतुदाह उत्पन्न होऊन अंधत्व प्राप्त होतें.

अंधत्वाचें प्रमाण पावसाशीं व्यस्त प्रमाणांत आढळून येतें. पंजाब, बलुचिस्तान आणि संयुक्तप्रांत यांसारख्या कोरड्या हवेंमध्यें अंधत्वाचें प्रमाण फार आहे; आणि आसाम, बंगाल आणि मद्राससारख्या पाऊस अतिशय पडणार्या प्रदेशांमध्यें हें प्रमाण कमी आहे. पण ज्या ठिकाणीं हें प्रमाण फार असतें त्या ठिकाणीं दुसरींहि पुष्कळ कारणें असतात. हिंवाळा अतिशय असतो, घरें विटांचीं बांधलेलीं असतात व हवा चांगली खेळत नसते व त्यातच स्वयंपाकाच्या वेळचा चुलीचा धूर लागल्यामुळें डोळ्याला फार इजा होते. याचें उदाहरण म्हणजे आसाम व ब्रह्मदेश यांमधील कांहीं डोंगराळ प्रदेशाचें व विशेषत: काश्मीरचें होय. कांश्मीरमध्यें हिंवाळ्यांत लोक महिनेच्या महिने लहान, ठेंगण्या व धुरकट झोंपडीमध्यें रहातात. अव्यस्थितपणा व धूळ यांमुळे अंधत्वाचें प्रमाण वाढतें असें ब्लंटचें म्हणणें आहे. समशीतोष्ण प्रदेशापेक्षां उष्ण प्रदेशांतील अंधत्वाचे प्रमाण मोठे आहे. समशीतोष्ण प्रदेशांतील अंधत्वाचें प्रमाण सरासरी १००० स १ या प्रमाणांत आहे. हिंदुस्थानामध्यें अंधळ्यांचें प्रमाण दहा हजारांस १४ आहे व यूरोपीय देशांमध्यें ८।९ आहे. पूर्व यूरोपमध्यें म्हणजे रशियामध्यें १०००० स १९ प्रमाण आहे. अलीकडे सुधारलेल्या देशांत अंधत्वाचें प्रमाण कमी होत चाललेलें दिसतें. उदाहरणार्थ युनायटेड किंग्डममध्यें सन १८५१ मध्यें ९७९:१ असें अंधत्वाचें प्रमाण होतें, पण आतां तें १२८५:१ असें पडतें. साधारणत: वरच्या जातींत अंधत्वाचें प्रमाण कमी आढळतें व कनिष्ट जातींत फार आढळतें. हिंदुस्थानामध्यें पुरुषांपेक्षा पुष्कळ ठिकाणीं बायकांत अंधत्वाचें प्रमाण अधिक आढळून येतें. याचें कारण पुष्कळ अंशीं धुरांत वगैरे वावरावें लागतें; वैद्यकोपचार चांगले होत नाहींत हें होय. उद्योदधंद्याच्या श्रमामुळें बायकांपेक्षां पुरुषांमध्यें अंधत्वाचें प्रमाण अधिक आहे असें पाश्चिमात्त्य देशांमध्यें आढळतें. १९०१ सालीं झालेल्या इंग्लंड व वेल्समधील खानेसुमारीमध्यें खालील प्रकारें कोष्टक आढळून येतें:-

माणसें    संख्या पुरुष बायका
अंध २५३१७ १३१३६ १२१८१
जन्मान्ध ४६२१ २४६८ २१५३
अंधळे, बहिरे, मुके  ५८ ३६  २२
अंधळे, मुके  २३ १४
अंधळे, बहिरे ३८९ १४५  २५४
एकंदर ३२५०७८४३ १५,७८,६१३  १६७७९२३०

१८९० सालीं युनायटेड स्टेट्समध्यें अंधत्वाचें प्रमाण खालीलप्रमाणें होतें. गोरे लोक व इतर मिळून अंधत्वाची संख्या ५०५६८; त्यांपैकीं गोरे ४३३५१; नीग्रो ७०६०; इतर १५७; पुरुष २८०८०, बायका २२,४८८; गोरे रहिवाशी ३४,२०५; परदेशी ९१४६. एका डोळ्यानें आंधळे असलेल्यांची संख्या ९३,९८८.

प्रो.मेयो स्मिथ यांनीं आपल्या 'आंकडेशास्त्र आणि समाजशास्त्र' या ग्रंथांतील २१३ व्या पानामध्यें १०००००० स निरनिराळ्या प्रदेशांतील अंधत्वाचें प्रमाण काय आहे हें दिलेलें आहे तें खालीलप्रमाणें.-

ऑस्ट्रिया ८०६; इंग्लंड आणि वेल्स ८०९; हंगेरी १०५१ आयर्लंड ११३५; नॉर्वे १२८९; स्कॉटलंड ६९५; स्वीडन ८२५; यूनायटेड स्टेट्स ८०५; नॉर्थ अ‍ॅटलांटिक डिव्हिजन ७७७; सॉउथ अ‍ॅटलांटिक डिव्हिजन ८८८; नॉर्थ सेंट्रल डिव्हिजन ७८३; साउथ सेंट्रल डिव्हिजन ६९५; वेस्टर्न डिव्हिजन ५६१; हिंदुस्थान १४००, इ. स. १९११ च्या सेन्सस रिपोर्टप्रमाणें हिंदुस्थानांतील आंधळ्यांची संख्या
४,४३,६५३ असून त्यांपैकीं पुरुष २२१९१६ व बायका २१,७३७ होती.

आं ध ळ्या लो कां च्या म ना ची स्थि ति.- एकंदर आंधळ्यांच्या संख्येमध्यें मोठेपणीं आंधळे झालेल्यांची संख्या अधिक भरते; व अशा स्थितींत त्यांच्या मनोवृत्तीमध्यें कांहीं विशिष्ट तर्‍हेचा फरक आढळून येतो असें नाहीं. पण लहानपणीं अंधत्व प्राप्त झालेल्यांच्या बाबतींत मात्र गोष्ट निराळी आहे. सर्व आयुष्यभर या मुलांनां दृष्टीवांचून ज्ञानवृद्धि, अभिरुचि, नाना संवयी प्राप्त करून घ्यावयाच्या असल्याकारणानें या अंधत्वाचा त्यांच्या मनावर कांहीं तरी खास परिणाम झाला असला पाहिजे हें उघड आहे. आणि तो काय होतो हें पहाणेंहि महत्त्वाचें व मनोरंजक आहे.

या अंध वालकांमध्यें पहिला विशेष दिसून येतो तो हा कीं त्यांच्यामध्यें शारीरिक श्रमाच्या अभावाची इच्छा उत्पन्न होते. एखादें डोळस मूल एक घटकाभर देखील एके ठिकाणीं रहावयाचें नाहीं. पण या आंधळ्या बालकाची प्रवृत्ति एके ठिकाणीं पुष्कळ तास बसण्याकडे दिसून येते. आंधळ्या बालकाच्या खेळामध्यें तरतरी दिसून येत नाहीं. अर्थातच या विधानाला बरेच वैयक्तिक अपवाद सांपडतील. पण सामान्यत: अशा प्रकारची प्रवृत्ति दिसून येते. आणि विशेषत: दोन्ही डोळ्यांनीं आंधळ्या असणार्‍या व प्रकाशनभिज्ञ असलेल्या मुलांच्या बाबतींत तर ही प्रवृत्ति ठळक रीतीनें नजरेस आल्याविना रहात नाहीं. कर्मप्रवृत्त करणारा प्रकाश त्यांनां दिसत नसल्यामुळें हें आलस्य अंगीं येतें असें पुष्कळांचें म्हणणें आहे. मज्जातंतुरचनेला चलन देणारा प्रकाश आहे यांत शंका नाहीं. कारण अर्धवट प्रकाशाच्या खोलींत पुष्कळ वेळ घालविणार्‍या बालकांनां अशक्तता व दुर्बलता येते. हें आलस्य अंगीं बाणण्याचें दुसरें एक कारण म्हणजें प्रत्यक्ष आईबापच त्यांच्या हातून कांहीं काम करून घेण्याऐवजीं त्यांच्या सर्व गरजा भागविण्यासाठीं झटतात हें होय.

या शरीराच्या श्रमाभावाच्या मन:प्रवृत्तीमुळें मानसिक स्थितीवरहि फार परिणाम घडतो. एका अन्धत्वावरील लेखकानें असें म्हटलेलें आहे कीं, 'आंधळ्याच्या बाबतींत मनोव्यापारांची उत्कटता, सातत्य व विवेचनाची तीव्रता क्वचितच दिसून येतें, त्यांच्या बुद्धीमध्यें तडफ दिसून येत नसून शांतपणा, सावधगिरी व आलस्य वगैरें दिसून येतें. तेजस्वितेपेक्षां प्रगल्भता त्यांच्या ठायीं अधिक दिसून येते. इतर लोकांच्या बाबतींत अनेक कारणांमुळें परस्परांमध्यें जें आकर्षण अगर ज्या आसक्ती उत्पन्न होतात तशा प्रकारच्या स्थिती यांच्यामध्यें दिसत नसून शांत चित्तानें विचार करून त्यांचे स्नेहसंबध जुळतात. तसेंच प्रेमाच्या तीव्र भावनाहि यांच्यामध्यें उचंबळत नाहींत व व्यापक मनाचा व रंगेलपणाचाहि यांच्या मनामध्यें अभाव दिसून येतो '(नेटिव्ह रिव्ह्यू १८६०)

बाह्य जगाचें ज्ञान मिळविण्यासाठीं आंधळ्या लोकांना स्पर्शशक्तीचा इतका अवलंब करावा लागतो कीं ही शक्ति पुढें अत्यंत तीव्र होते. आंधळ्या मनुष्यांच्या स्पर्शज्ञानाच्या बाबतींत अनेक आश्चर्यकारक गोष्टी प्रसिद्ध आहेत. प्रत्यक्ष डोळस लोकांच्या नजरेस ज्या पत्यावरील खुणा दृष्टीस पडल्या नाहींत त्या ओळखून त्यांच्या साहाय्यानें पत्ते खेळलेल्या आंधळ्यांचीं उदाहरणें आहेत. संवईमुळे बोटांची स्पर्शज्ञानशक्ति फार जलद तीव्र होते आणि अशा प्रकारें ती नेहमीं तीव्र राखण्याकरितां बोटांच्या टोंकावरील कांतडें अगदीं मऊ व गुळगुळीत ठेवण्याची आंधळे लोक वारंवार खबरदारी घेतात. ज्या ठिकाणीं या बोटांचा कांहीं उपयोग होत नाहीं अशा वेळीं बोटांहून अतिशय तीक्ष्ण अशा ओष्ठांचा व जिव्हाग्राचा ते उपयोग करतात. जड वस्तूंच्या सांन्निध्यांत असतांनां त्यांच्या मुखाची कातडी फार संवेदनाशील होते आणि अस्पष्ट अशा वायुलहरी देखील जाणण्याचें सामर्थ्य त्यांच्या कानावरील पडद्याच्या ठायीं वास करतें. मिस्टर डब्ल्यु हँक्स लेव्ही नांवाच्या एका आंधळ्या ग्रंथकारानें जवळच्या वस्तू ओळखण्याची शक्ति स्वत:ला कशी प्राप्त झाली याची मजेशीर हकीकत दिलेली आहे. तो म्हणतो की ''घरामध्यें काय किंवा खुल्या जागेंत काय मी जरी पूर्ण आंधळा असलों तरी मी एखाद्या वस्तूच्या समोर उभा राहिलों आहे किंवा नाहीं हें मला ओळखतां येतें. आणि तसेंच ती वस्तु उंच अगर लहान, जड अगर हलकी आहे हेंहि मला ओळखतां येते. त्याप्रमाणेंच समोर असलेली वस्तु एकच आहे किंवा अनेक आहेत, जाळीदार आहे किंवा बिनजाळीदार आहे लांकडाची आहे अगर विटांची आहे वगैरे सर्व मला जाणतां येतें. माझ्या खांद्याच्या पेक्षां कमी उंच असणारी वस्तु मात्र मला साधारणत: ओळखतां येत नाहीं. पण क्वचित तीहि प्रयासानें ओळखतां येते. ही शक्ति फक्त माझ्या चेहर्‍यामध्येंच आहे व ती प्रयोगानें पैदा केलेली आहे. ही स्पर्शज्ञानशक्ति माझे कान बंद केल्यानें कमी होत नाहीं पण तोंडावर एखादा बुरखा घेतल्यानें मात्र नाहींशी होते'' (अंधत्व लंडन १८८२).

आंधळ्यासंबंधी लिहिणारे कांहीं ग्रंथकार आंधळ्यांनां अवकाशाची कांहीं कल्पना नसते व आपल्या हाताच्या पंज्याच्या आंत जेवढी जागा असते तेवढाच अवकाश त्यांनां माहीत असतो, अशीं विधानें करतात; पण वरील लेव्हीचें म्हणणें वाचल्यानंतर या विधानाच्या असत्यतेबद्दल शंका रहात नाहीं. निरनिराळे प्रदेश व त्या ठिकाणीं असणारे सृष्टीचे देखावे पाहण्याला आंधळे लोक उत्सुक असतात हें लक्षांत घेतलें म्हणजे वरील विधानांत अर्थ नाहीं असें खात्रीनें वाटूं लागतें. डोंगर चढण्यांत देखील आंधळ्यांनां आनंद वाटतो व नुकतेच माउंट ब्लँकच्या शिखरावर गेलेल्या एका आंधळ्या मनुष्यानें आपल्या प्रवासाविषयीं वर्तमानपत्रांत लिहितांना असें म्हटलें आहे कीं 'येथील देखावा मला जितका मजेनें अनुभवतां आला तितका इतर डोळस लोकांनांहि अनुभवतां आला नसेल. तात्पर्य डोळस मनुष्याच्या पृथ्वीच्या कल्पनेमध्यें व आंधळ्याच्या कल्पनेमध्यें जरी पुष्कळ फरक असला तरी त्याला देखील पृथ्वीची कांहीं कल्पना असते हें खास.

तसेंच आंधळ्या मनुष्याला आपल्या पलीकडचें जाणण्यासाठीं आवाजाची देखील मदत होते, व एखादी वस्तु दूर गेली म्हणजे आपल्याला ज्याप्रमाणें ती कमी कमी दिसूं लागते त्याप्रमाणें आंधळ्या मनुष्याला वस्तु दूर किंवा नजीक आहे हें आवाजावरून कळून येतें. आंधळा मनुष्य फिरावयाला बाहेर पडला असतांना आपणांस ज्याप्रमाणें देखावा पाहून आनंत होतो त्याप्रमाणें त्याला परिचित आवाज ऐकून मनाला आल्हाद वाटतो. आपल्यापासून वस्तु किती अंतरावर आहे हेंहि त्याला चटकन आणि अगदीं बिनचूक सांगतां येतें व एका आंधळ्या मनुष्याची अशी गोष्ट सांगतात कीं, अगदीं बिनचूक रीतीनें तो लक्ष्यवेध करीत असे फक्त तें लक्ष्य कोठें आहे तें त्या लक्ष्याच्या बरोबर मागें घंटा वाजवून त्याला सांगावें लागें.

संभाषण हें तर स्वाभाविकपणेंच आंधळ्यांनां करमणुकीचें व प्रिय वाटतें. आपल्यापेक्षां देखील त्यांनां तें अधिक प्रिय वाटतें; कारण आपल्याला हावभावावरून जें बोलणार्‍याचें हृदत कळतें तें त्याच्या बाबतींत फक्त शब्दांच्या आवाजावरूनच कळतें. वस्तूंच्या दृश्य स्वरूपाच्या वर्णनामध्यें आंधळ्यांनां फार आनंद होतो हा एक त्यांच्या स्वभावांतील चमत्कारिक विशेष आहे. आपल्या भाषाणामध्यें दृश्य वस्तूंच्या कल्पनेंतच ते बोलत असतात व अमकी वस्तु पाहिली पाहिजे, अमकें स्थळ पाहिलें पाहिजे असें सांगत असतात. याचें कारण ज्या वस्तू पहावयाला मिळत नाहींत त्या वस्तूंचाच हव्यास मनुष्याला असतो हें होय. आंधळ्यांनां शिकविणार्‍या एका शिक्षकानें म्हटलें आहे कीं आंधळे लोक दृक्शास्त्राविषयीं जितकें काळजीपूर्वक लक्ष्य देतात तवेढें इतर शास्त्राविषयीं देत नाहींत.

आंधळ्यांच्या मनाची प्रवृत्तिा संघटनक्षम (सिंथेटिकल) असते असें कांहीं म्हणतात. तर दुसरे कांहीं पृथक्करणक्षम (अ‍ॅनालिटिकल) असत असें म्हणतात. डब्ल्यू. जेम्स 'मानस शास्त्राचीं तत्त्वें' या ग्रंथांत म्हणतो:-

''डोळस मनुष्याच्या व आंधळ्या मनुष्याच्या कल्पनेमध्यें जो फरक असतो तो हा कीं, आंधळ्या मनुष्याचें मन संघटनाक्षम असतें. डोळस मूल प्रथमत: सर्व खोलीकडे पाहील व नंतर निरनिराळ्या भागाकडे पाहील. पण आंधळें मूल खोलीच्या प्रत्येक भागाचें ज्ञान मिळवून नंतर त्या प्रत्येक भागाच्या ज्ञानानें सर्व खोलीची कल्पना करील.''

याच्या उलट एम डूफॉ असें लिहितो. ''आंधळा मनुष्य व डोळस मनुष्य हे एखाद्या वस्तूचें (उदा. लतेचें) ज्ञान कसें संपादन करतात याकडे पाहिलें तर आपल्याला असें आढळून येईल कीं डोळस मनुष्य त्या लतेकडे एकदम पाहून त्या लतेचें ज्ञान करून व तशाच प्रकारची लता दृष्टीस पडली की तो अमकी लता आहे असें ओळखील. पण आंधळा मनुष्य त्या लतेचा प्रत्येक अवयव (फांद्या, फुलें, पानें वगैरे) चांचपून पाहील. कारण त्याशिवाय त्याला दुसरी त्याच प्रकारची लता आहे असें सांगतां येणार नाहीं. अशा रीतीनें पृथक्करण करून पहाण्याची संवय त्याला स्वाभाविकच होईल''
(डूफॉ डे अ‍ॅव्ह्यूग्ले १८५०).

वरील दोघां विद्वानांचीं मतें आपल्याला सत्कृद्दर्शनीं परस्पर विरोधी वाटतात पण तीं तशीं नाहींत. व कांहीं अंशीं तीं दोन्हीं खरीं आहेत. आपल्याभोंवतालच्या जगाचें स्वरूप समजून घेण्याला आंधळ्या मनुष्याला पृथक्करण करावें लागेल व पृथक्करणानंतर संघटना करावी लागेल. या दोन्ही क्रिया त्याला अधिक व्यवस्थित रीतीनें व काळजीपूर्वक कराव्या लागतील. या पृथक्करण संघटनाक्षम मनोवृत्तीमुळेंच त्यांनां सूक्ष्म रीतीनें निरीक्षण करता येतें व याचमुळें एखाद्या शिकलेल्या आंधळ्याला काल्पनिक काव्यापेक्षां शास्त्रीय निरीक्षण करणें अधिक आवडतें.

वृद्धपणीं दृष्टी परत आल्याचीं उदाहरणें अर्थांतच फार नाहींत. पण जीं आहेत तीं मजेशीर होतील यांत शंका नाहीं. मोलीन्क्सच्या सिद्धांताकडे याचमुळें लोकांचें लक्ष्य लागलेलें आहे. हा सिद्धांत पुढीलप्रमाणें आहे:-

''समजा कीं एखादा मनुष्य जन्मांध असून बराच मोठा झाला आहे. स्पर्शज्ञानानें त्याला घनवस्तु आणि वर्तुळाकार वस्तु कोणती आहे हें शिकविलें. नंतर त्या वस्तू जवळच्या मेजावर ठेवल्या व त्याला विचारलें कीं स्पर्श न करतां वर्तुळाकार वस्तु कोठें आहे व घन वस्तु कोठें आहे हें सांग, तर त्याला तें सांगतां येईल किंवा नाहीं?''

या प्रश्नाचें मोलीन्क्सनें नकारार्थी उत्तर दिलें. लॉकनें हेंच मत व्यक्त केलें पण याच्या उलट डॉ. फ्रँझ आणि हॅमिल्टन यांनीं आपला अभिप्राय दिला. या अभिप्रायानंतर डॉ. फ्रँझ याला लवकर आपलीं मतें पडताळून पहाण्याचा योग आला. एक रोगी डोळ्याचें ऑपरेशन करून घेण्याकरितां आला. त्यावेळीं त्याचें वय १७ वर्षांचें असून तो भूमिति शिकलेला होता. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला एक उभी व आडवी रेघ दाखविण्यांत आली व त्यानें कोणती उभी व कोणती आडवी आहे हें बिनचूक सांगितलें. पण त्याला जेव्हां ती दाखीव म्हणून सांगितलें त्यावेळीं त्यानें प्रथमत: बरोबर दाखविली नाहीं; पण कांही वेळानंतर विचार करून त्यानें बरोबर दाखविली. प्रथमत:चूक होण्याचें कारण अर्थातच असें होतें कीं दृष्टींद्रियामध्यें व स्प्रर्शेद्रियांमध्यें जितकी संगति जुळायला पाहिजे तितकी झाली नव्हती. नंतर त्याला ६ इंचाच्या 'बाजू' ची एक चौकोनाकृति दाखविली. या चौकोनामध्यें एक वर्तुळ असून त्या वर्तुळामध्यें एक त्रिकोण होता. त्याला या कोणत्या आकृती आहेत तें सांगण्यास सांगितलें असतां त्यानें बराच वेळ विचार केल्यावर बिनचूक रीतीनें सांगितलें.

अशाच प्रकारची एक गोष्ट ग्लॉसगोचे डॉ. ए. मेटलंड रॅमसे यांनीं सांगितलेली आहे. त्यांच्याकडे एक तीस वर्षांचा जन्मांध रोगी होता. त्याला रात्र व दिवस मात्र ओळखतां येत असे. बाह्यगोल भिंग काढण्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर कांहीं दिवसांनीं त्याला अगदीं दिपल्यासारखें होऊन त्याला आपण पहातों आहे किंवा नाहीं हेंहि समजेनासें झालें. त्याच्या खोलीमध्यें त्याला सर्वच मोठें दिसावयास लागल्यामुळें त्याला बिनचूक रीतीनें वस्तु ओळखतां येईना. त्याला चेंडू कोणता व वीट कोणती हें ओळखावयास सांगितलें असतां त्यानें बराच वेळपर्यंत त्यांच्याकडे टक लावून
पाहून नंतर बरोबर सांगितलें. अनेक वस्तू हातांत घेऊन ओळखण्याची संवय झाल्यामुळें वस्तूंच्या आकाराबद्दल डोक्यामध्यें प्रकाश चटकन पडतो असें त्यानें सांगितलें.

आं ध ळया चें शि क्ष ण व शु श्रु षा.- आंधळ्याच्यासंबंधीं चांगल्या रीतीनें त्यांनां वागविण्यासंबंधानें बायबलमध्यें उदगार आलेले आहेत. पण समाजानें आंधळ्यांच्या रक्षणाकरितां जबाबदारी पत्करण्याची कल्पना पुष्कळ अलीकडची आहे. १२६५ सालीं एकच आंधळ्यांची शाळा असून त्यांत नवव्या सेंट लुईनें धर्मयुद्धामध्यें डोळे गेलेल्या ३०० सरदारांची सोय केलेली होती. स्पर्शज्ञानाच्या द्वारें आंधळ्यांनां शिक्षण देण्याची कल्पना प्रथमत: १७८३ मध्यें बिकॉर्डी येथें रहणारा हायुई याच्या डोक्यांत आली. उठावदार अक्षरांच्या योगानें आंधळ्यांनां शिक्षण देतां येतें हें सिद्ध झाल्यावर लोकांमध्यें त्याविषयीं जागृति उत्पन्न होऊन हायुईला १७८५ मध्यें पहिली 'आंधळ्या तरुणांची शाळा' काढतां आली. त्यानंतर अशाच प्रकारची संस्था तपासण्याची विनंति रशियन सरकारकडून केली गेल्यामुळें हायुई हा सेन्टपीर्टसबर्गला गेला. १७९१ मध्यें लिव्हरपूल येथें आंधळ्यांकरतां एक शाळा निघालीं; व थोडक्याच दिवसांनीं म्हणजे दोन वर्षांनीं 'एडिंबरो अंधाश्रम' नांवाची एक जगप्रसिद्ध संस्था स्थापण्यांत आली. या शाळा सुव्यस्थित रीतीनें चालल्यानंतर त्याच धर्तीवर जिकडे तिकडे पुष्कळ संस्था निघाल्या. आंधळ्यांनां उठावदार अक्षरांच्या साहाय्यानें या शाळांमधून शिक्षण मिळतें व इतर शाळांसारखेच त्यांनां विषय शिकविण्यांत येतात. तसेंच त्यांनां आपलें स्वत:चें पोट भरतां यावें हें ध्यानांत ठेवून त्यांनां निरनिराळ्या धंद्यांचें शिक्षण देण्यात येतें. कांहीं थोड्या शाळांतून म्हणजे उदाहरणार्थ नॉर्मल कॉलेज अगर अ‍ॅकॅडमी फॉर मयूझिक मध्यें, एखाद्या खास धंद्याचें पूर्ण शिक्षणहि देण्यांत येतें.

आंधळ्यांनां वाचण्यास शिकविण्याच्या पद्धतीचाहि इतिहास मोठा मनोरंजक आहे. प्रथमत: हायुईनें रोमन लिपीचाच उपयोग केला. यानंतर उठावदार अक्षरांचें निरनिराळे प्रकार अस्तित्वांत आले. यांपैकीं पहिली पद्धत १८२७ मध्यें एडिंबरो येथील जेम्स गॉलनें शोधून काढली. यानें रोमन अक्षरांचाच उपयोग केला. फक्त अक्षरांची ओळख लवकर व्हावी यासाठीं त्यानें अक्षरांचें वक्र वळण काढून टाकून त्या जागीं अक्षरें कोनाकार केलीं. या अक्षरपद्धतीमध्यें १८३४ सालीं सेंट जॉनचें धर्मपुस्तक छापण्यांत आलें. आंधळ्यासाठीं उठावदार अक्षरांत धर्मग्रंथ छापण्यांत आलेला हा प्रथमचाच होय. या रोमन अक्षरांमध्यें थोडा फेरफार करून होवे, अ‍ॅल्स्टन आणि फ्लाय यांनीं आपल्या पद्धती अंमलांत आणल्या. लघुलिपि व शीघ्रलिपीच्या पद्धतीहि पुष्कळ निर्माण झाल्या. पण त्या विशेष फायद्याच्या ठरल्या नाहींत. एक ओळ वाचून दुसर्‍या ओळींकडे बिनचूक जातां येण्यासंबंधींची अडचण लक्षांत आणून फ्रेरेनें आपली एक पद्धत काढली. त्या पद्धतीप्रमाणें आंधळा वाचक एका ओळींच्या शेवटीं आपल्या बोटाच्या साहाय्यानें वाचीत गेल्यावर ओळीच्या शवेटीं जो एक वक्र दुसर्‍या ओळीला मिळविला असतो त्या वक्राच्या साहाय्यानें दुसर्‍या ओळीच्याकडे जाऊन उलट्या रीतीनें पुन: वाचीत यावयाचें व पुन: तसाच एक वक्र घेऊन त्याच्या सहाय्यानें पुन: तिसरी ओळ वाचावयाची अशा रीतीनें उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे अशी ही पद्धत आहे.

मूनची लोकप्रिय झालेली पद्धत ही रोमन अक्षरांमध्यें थोडा फेरफार करून केलेली आहे पण कांहीं स्वतंत्र खुणा देखील अंमलांत आणलेल्या आहेत. फ्रेरेची 'परत ओळी' ची पद्धत यानें कायम ठेवली होती तरी पण त्याची उलट्या तर्‍हेनें वाचण्याची पद्धत मात्र काढून टाकलेली होती. अद्यापि देखील मूनची पद्धत बरीच उपयोगांत आणली जाते; आणि आंधळे लोक रस्त्यांतून जे धर्मग्रंथ वाचत जातात ते याच पद्धतीनें छापलेले असतात. तरी पण या पद्धतींत दोन मोठे तोटे आहेत. एक तर या तर्‍हेनें छापलेलीं पुस्तकें फार महाग असतात व शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे ती फार जड असतात. एकच धर्मपुस्तक म्हणजे एक जड ओझें असतें.

या अशा निरनिराळया पद्धती अंमलांत आल्यानें अर्थातच पुष्कळ गैरसोई होऊं लागल्या. एखाद्या आंधळ्यास एका पद्धतीनें एखादें पुस्तक वाचतां आलें म्हणजे दुसर्‍या पद्धतीनें छापलेलीं पुस्तकें कांहीं वाचतां येत नसत व त्या तर्‍हेनें शिकलेल्या माणसामध्येंच त्या तर्‍हेचीं छापलेलीं पुस्तकें
खपत असत. अशी अडचण ध्यानांत आणून 'ब्रिटिश अँड फॉरिन ब्लाइंड अ‍ॅसोसिएशन' नांवाची एक संस्था स्थापन झाली; व त्या संस्थेनें आपलें ध्येय अत्यंत सुंदर अशी एकच पद्धत चोहोंकडे अंमलांत आणण्याचें ठरविलें. आतांपर्यंतच्या ज्या पद्धती अंमलांत होत्या त्यांमध्यें सर्व प्रकारच्या सोईंची अशी एकहि पद्धत नव्हती. अशा प्रकारचें संशोधन करतां करतां १८६८ सालीं इंग्लंडमध्यें एक नवीन पद्धत अस्तित्त्वांत आली. ही पद्धत ४० वर्षांमागें एका फ्रेंच आंधळ्या मनुष्यानें काढलेली होती व त्याच्याच नांवानें ही पद्धत प्रसिद्ध झाली. ही पद्धत म्हणजे ब्रेले पद्धत होय. या पद्धतीचे फायदे असे आहेत कीं यांतील अक्षरें झटकन ओळखतां येतात. या पद्धतीचीं अक्षरें खुद्द आंधळ्यांनां देखील स्वत:ला व दुसर्‍यांनां समजण्याइतकीं स्पष्ट लिहितां येतात व हीमध्यें छापून निघालेलीं पुस्तकें पुष्कळ हलकीं व स्वस्त असतात.

ल हा न अं ध बा ल कां ब द्द ल क र्त व्य.- मूल लहानपणींच आंधळें झालें असतां शाळेंत पाठविण्याच्या पूर्वीं मुलाला आईबापानीं पुष्कळ शिकवण्यासारखें आहे. आंधळ्या मुलांच्या शिक्षकांची अशी कुरकुर नेहमीं असते कीं या लहान मुलांनां आपल्या हाताचा उपयोग कसा करावा हें कळत नसतें. त्यांच्यामध्यें आत्मविश्वासाचा अभाव असतो. त्यांचे स्नायू बळकट नसतात, व त्या बालकांनां शिक्षण देण्यापूर्वीं त्यांच्याकडून कांहीं महिने व्यायाम करून घ्यावा लागतो. त्यांच्या आईबापांनीं याविषयीं कांहींच काळजी घेतलेली नसते हें याचें मुख्य कारण होय. तीं त्या मुलाला कांहीं काम करूं देत नाहींत. तो आंधळा आहे म्हणून त्याला खेळूं देत नाहींत. अशा प्रकारच्या नसत्या भीतीनें त्या मुलाला त्यांचे आईबाप निरुपयोगी करून ठेवतात. पण वास्तविक पहातां त्याच्या आईबापांनीं त्याला अगदीं याच्या उलट वागविलें पाहिजे. एका वाक्यांत सांगावयाचें असल्यास डोळस मुलाप्रमाणेंच या आंधळ्या मुलालाहि वागविलें पाहिजे. त्याला खेळूं दिलें पाहिजे, फिरूं दिलें पाहिजे, खोलींतील सामान धुंडाळूं दिलें पाहिजे; जिने उतरूं चढूं दिले पाहिजेत. स्वाभाविकपणेंच आंधळ्याच्या आईबापाला त्याला कांहीं तरी जखम होईल यामुळें भीति वाटेल हें उघढच आहे. पण त्या मुलाच्या अंगात आत्मविश्वास उत्पन्न होण्यासाठीं त्यानें स्वत:ला थोडी फार दुखापत करून घेतली तरी ती सहन केली पाहिजे. मुलगा मोठा झाल्याबरोबर त्याचे त्याला कपडे घालण्यास, कपड्यांची घडी घालण्यास व खेळ खेळण्यास शिकविलें पाहिजे. ब्रेलेपद्धत शिकण्याला मणि वगैरे हातांत घेऊन मोजणें वगैरे पद्धत माहीत असणेंहि अवश्य आहे.

ज्यावेळीं मोठेपणीं कांहीं कारणांमुळें अगर रोगांमुळें दृष्टी हळू हळू मंद होऊं लागून अंधत्व येणार असें पक्कें वाटूं लागतें त्यावेळीं अशा माणसांनीं आपलें इतर कोणतें तरी इंद्रिय, विशेषत: स्पर्शेंद्रिय तीक्ष्ण संवेदनाशील करण्यास लागलें पाहिजे. किंचित दिसत असतांना ब्रेले अक्षरपद्धति शिकून घ्यावी. ब्रेलेअक्षरलेखनपद्धतीचाहि अभ्यास करावा. दररोजचीं कपडे घालणें इत्यादि कामें डोळें मिटून करण्याची संवय ठेवावी, व खरोखरच कोठें अडचण भासली तर डोळे क्षणभर उघडावे. पण अशीं डोळे मिटून सर्व कामें करण्याची अगाऊ तयारी ठेवली असतां अंधत्व आल्यावर फारसा त्रास पडत नाहीं.

आं ध ळ्यां क रि तां हिं दु स्था नां त नि घा ले ल्या सं स्था.- मुंबईस ताडदेव भागांत व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल; अमेरिकन मिशन स्कूल, दादर; कलकत्त्यास औद्योगिक भुवनाला जोडून आंधळ्यांची शाळा आहे; अलहाबाद व अहमदाबाद या ठिकाणीं अंधगृहें आहेत; लाहोरला एक सरकारी व एका रेल्वेची शाळा आहे. राजपुतान्यांत अंध ख्रिस्ती मुलांकरितां 'दि नॉर्थ इंडियन होम' नांवाचें गृह आहे. म्हैसूर संस्थानांत आंधळे व बहिरे यांकरितां एक संस्था आहे. यांखेरीज रांची, पलमकोट्टा (तिनेवेल्लिा), बैतलपूर (द्रुग मध्यप्रांत) इत्यादि ठिकाणीं आन्धळ्यांकरितां शाळा आहेत.

जगांतील कांहीं इतिहासप्रसिद्ध आंधळीं माणसें खालीं दिलीं आहेत.

शहाअलम बादशहा - हा मोंगल बादशहा आंधळा होता. डिडिमय ऑफ अ‍ॅलेक्झांड्रिया- (३०४ -३९५) हा गणिती, अनेकभाषाकोविद व धर्मशास्त्रपारंगत होता.

निकेस ऑफ मॅलिनेस - (मृत्यू १४९२); हा कोलोन विश्वविद्यालयांत कायद्याचा प्रोफेसर होता.

जॉन मिल्टन - (१६०८-१६७४) हा इंग्लंडमधील नामांकित कवि होता.

एडवर्ड रशटन - (जन्म १७५६)- याचे बाळपणींचे शिक्षण लिव्हरपुल येथें झालें. नंतर तो व्यापार करण्याकरितां पश्चिम हिंदुस्थानांत येण्यास निघाला. वाटेंत त्याचें जहाज फुटल्यामुळें, त्याला जलसमाधि मिळावयाची. पण एका नीग्रोनें त्याला आपला जीव धोक्यांत घालून वांचविलें; यामुळें नीग्रोबद्दल त्याच्या मनांत कायमचा आदरभाव राहून नीग्रोच्या उद्धाराकरितां त्यानें पुष्कळ खटपट केली. डोमीनीकाला जात असतांना मार्गांत जहाजावर रोगाची सांथ पसरून त्यांत त्याची दृष्टि नाहींशीं झाली.

याच्यानंतर त्यानें आपला व्यवसाय, वाङ्मयविषयक लेख लिहिण्यांत व काव्यें रचण्यांत घालविला.

डॉ. टी. आर आर्मिटेज  - हा वैद्यकीचा अभ्यास करण्याकरितां किंग्स कॉलेज व तसेंच पॅरीस व व्हिएन्ना या ठिकाणीं राहिला होता. वयाच्या ३६ व्या वर्षी तो आंधळा झाल्यामुळें त्यानें वैद्यकीचा धंदा सोडून आंधळ्यांच्या कल्याणासाठीं आपलें आयुष्य वेंचण्याचा निश्चय केला. त्यानें आंधळ्यांसाठीं, 'दि इंडिजंड ब्लाइंड व्हिझिटिंग सोसायटी; ब्रिटिश अँड फॉरिन ब्लाइंड अ‍ॅसोशिएशन; व रॉयल नॉर्मल कॉलेज इत्यादि संस्था स्थापन केल्या.

एलिझाबेथ गिलबर्ट - ही चिचेस्टरच्या धर्मगुरूची मुलगी होती. वयाच्या तिसर्‍या वर्षी हिला अंधत्व प्राप्त झालें. तिचें शिक्षण घरगुती तर्‍हेनें झालें. २७ व्या वर्षापासून इंग्लंमधील अनाथ अंधळ्यांची स्थिति सुधारण्याकडे तिचें लक्ष वेधलें. १८५६ मध्यें तिनें आंधळ्यांच्या कल्याण्यासाठीं एक संस्था स्थापन केली.

हेन्री फॉसेट- हा केंब्रीज येथें अर्थशास्त्राचा प्रोफेसर असून पोस्टमास्तर जनरलचीहि जागा त्याला मिळाली होती.

[सं द र्भ ग्रं थ - लेव्ही-ब्लाइंडनेस अ‍ॅन्ड दि ब्लाइंड (१८७२); जे वुइल्सन-बॉयॉग्राफी ऑफ दि ब्लाइंड. (१८३८); ब्लेयर-एज्युकेशन ऑफ दि ब्लाइंड (१८६८);  अ‍ॅनॉग्नास-एज्युकेशन ऑफ दि ब्लाइंड (१८८२); एच. जे वुइल्सन-इन्स्टिटयूशन्स, सोसायटीज अ‍ॅन्ड क्लासेस फॉर दि ब्लाइंड इन इंग्लड अ‍ॅन्ड वेल्स (१९०७); डॉ.रोथ-प्रिव्हेशन्शन ऑफ ब्लाइंडनेस (१८८५); गॉव्हिन डगलस-रिमार्केबल ब्लाइंड पर्सन्स (१८२९); इलिगवर्थ-मेथड्स ऑफ एज्युकेटिंग दि ब्लाइंड; ड्रमंड-एज्यूकेशन ऑफ दि ब्लाइंड (१८९९), हेलरन केलर-दि स्टोरी ऑफ माय लाईफ (१९०३); डॉ. एमिली जॅव्हल.- दि ब्लाइंड मॅन्स वर्ल्ड (१९०४)].

वै द्य की य उ प प त्ति व इ ला ज.- सर्व सुधारलेल्या देशांतील आंधळ्यांच्या संख्येचे कित्येक वर्षे परिश्रमपूर्वक मनन करून आंकडेशास्त्रज्ञांनीं असें अनुमान काढलें आहे कीं या देशांत आंधळ्यांची संख्या कमी होत आहे याचीं कारणें, वैद्यक शास्त्रांतील सुधारणा, आरोग्याच्या नियमानुसार राहणी, डोळ्यांत जंतुघ्न औषधें घालणें, सांथीच्या रोगांचें शमन करण्याची शक्ति व गिरण्या बाजार येथील आरोग्यसंबंधीं सुव्यवस्था हीं होत. उष्ण देश व समुद्रकिनार्‍यापासून दूर असलेल्या देशांतून हीं संख्या अधिक असलेली आढळून आली. याचा प्रतिबंध होण्यासारखीं कारणें पुढें दिल्या प्रमाणें:-

पू य वि शि ष्ट बा ल ने त्र दा ह:- पुष्कळ आंधळे असे आढळून येतात कीं त्यांनां थोडेसे योग्य इलाज वेळेवर केले असते तर त्यांच्या जन्माचें अंधत्व टळलें असतें. म्हणून साधारण जनसमूहांत या प्रतिबंधक सोप्या उपायांची माहिती जितकी होईल तितकी करून देणें फार जरूरीचें आहे. शेंकडा ४० अंधळ्यांनां अंधत्व या सोप्या प्रतिबंधक इलाजाच्या आज्ञानामुळें व उत्तम नेत्रवैद्याचा सल्ला न मिळाल्यामुळें आलेलें असतें. दुसर्‍या एका विद्वानाच्या मतें शेकडा ३६ रोग्याचें डोळे खात्रीनें बरे करतां आले असते व तोच म्हणतो कीं शेकडा ३८ माणसांची दृष्टी बहुतकरून बचावतां आली असती. ज्यावर कांहींहि इलाज चालला नसता असे आंधळे शेंकडा २४ फार तर असतील असा एका विद्वानानें अजमास केला आहे. या सर्वांचें म्हणणें विचारांत घेऊन असा निष्कर्ष निघतो कीं सुमारें १००० आंधळ्यांपैकीं ४०० आंधळ्यांची दृष्टी प्रतिबंधक उपयांच्या ज्ञानानें किंवा योग्य माणसांकडून इलाज होऊन खास बचावली असती. या आंकड्यावरून याविषयाचें महत्त्व ध्यानांत येईल. अंधत्वाचें मुख्य कारण म्हणजे पूययुक्त बालनेत्रदाहानें डोळे येणें. मूल उपजण्याच्या वेळीं त्याच्या डोळ्यांत योनींतील स्त्राव वगैरे शिरतात. नंतर ते डोळे औषध घालून स्वच्छ करण्यांत येत नाहींत व त्यामुळें डोळा लाल होऊन गळूं लागतो व पुवाची वृद्वि होऊन डोळ्यांवरून सारा फूल इत्यादि दुसरे विकार होऊन आंधळेपण येतें ह्या रोगाचा एक विशिष्ट जंतु असतो व मूल जन्मल्यावर त्याच्या डोळ्यांत काडीखाराचे एक औंस पावसाच्या पाण्यांत ४ ग्रेन या प्रमाणांत तयार कलेलें औषध घातलें असतां मुलाच्या दृष्टीस धोका रहात नाहीं. जर्मनींत असा कायदाच आहे कीं, मुलांच्या डोळ्याचा लहानसहान रोग जरी असला तरी त्यास सुइणीनें औषध देऊं नये. व डोळे बिघडलेलीं मुलें नजरेस येतांच त्यांच्या आईबापांस सांगून योग्य डाक्तरांकडून इलाज करविण्याविषयीं त्यांस सुचविलें पाहिजे व तें दुर्लक्ष करतील तर त्या गांवच्या अधिकार्‍याकडे तिनें स्वत:च वर्दी पोंचवावी असाहि कायदा आहे. म्हणजे मग सरकारी डाक्तर येऊन औषध देतो. यांत कोणीं हलगर्जीपणा केल्यास शिक्षा करतात. अमेरिकन संयुक्त संस्थानांपैकीं बहुतेकांत असा कायदा आहे कीं, सुईणीच्या नजरेस डोळ्यांची लाली, सूज, गळ इत्यादि प्रकार दिसून येतांच सहा तासांच्या आंत तिनें नेमलेल्या अगर इतर डाक्तरास वर्दी दिलीच पाहिजे. आणि असें न केल्यास कैदेची किंवा दंडाची शिक्षा करतात. अमेरिकन मेडिकल सभेपुढें एका नेत्ररोगचिकित्सकानें याविषयीं निबंध वाचला. त्यांतील थोडे निवडक वेचे येथें देण्यासारखे आहेत :- ''एखादें सुधारलेलें आणि आपणांस ज्ञानी समजणारें राष्ट्र आपल्या लोकसंख्येपैकीं कित्येक हजारो लोकांनां आंधळे होऊं देतें यास काय म्हणावें? यांपैकीं एकचतुर्थांश लहान बालकें असतात व त्यांपैकीं दोनपंचमांश लोक थोड्याशा इलाजानें साफ बरे होण्यासारखे खास असतात. ही कल्पना डोक्यांत आली म्हणजे मन थक्क होतें. इतके हजारों लोक माणसांतून उठल्यासारखें होऊन निरुपयोगी व्हावे हा देशाचा मोठा तोटा होय. यांत हलगर्जीपणा लोकांकडे, डाक्तर व सुईण वर्गाकडे व सरकारकडेहि आहे. दुसरें असें कीं, या लोकांस पुढें आंधळ्यांच्या शाळा काढून शिक्षण द्यावेंच लागतें. व या कामीं एकट्या न्यू यार्क शहरींच एक लक्ष डॉलरपेक्षां जास्त पैसा प्रतिवर्षी सरकारास खर्चावा लागतो. या दृष्टीनें देखील राष्ट्राचें केवढें नुकसान होतें हें लक्षांत येईल. ही प्रतिबंधक डोळयांचीं औषधें डॉक्टरांस व  सुईणींस फुकट वाटण्यांत यावीं. हा क्षुल्लक दिसणारा नेत्ररोग फैलावूं दिल्यापासून होणारे अनर्थ ज्यांत वर्णिले आहेत अशीं हस्तपत्रकें जनसमूहांत नेहमीं वाटावीं.

खु प र्‍या  :- हा रोग तर या देशांत सर्वांच्या पूर्ण परिचयाचा आहे व यामुळेंहि पुष्कळ रोग्यांनां शेवटीं अंधत्व येतें. पापण्या उलटून पाहिलें असतां त्यांवर बारीक लाल दाणेदार दिसणार्‍या खुपर्‍या आपल्या माहितीच्या असल्यामुळें त्यांचें विशेष वर्णन नको. यापासून डोळ्यांच्या पापणींत खडा रुतल्यासारखी खूप, आग, लाली, दीप इत्यादि लक्षणें बरींच वर्षें प्रथम चालतात. पण अंधत्व नसतें. यापासून गळणारा स्त्राव संसर्गकारी असल्यामुळें दुसर्‍या अनेकांच्या डोळ्यांत अंधत्वाचें बीज पेरलें जातें. रोग चिकट दीर्घकालीन असल्यामुळें या स्त्रावाची किळस वाटेनाशी होऊन डोळे टिपण्यानें सर्व कपडे दूषित होऊन रोग पसरवितात. गलिच्छ राहणी व कोंदट घरें असलीं म्हणजे रोग जास्तच फैलावतो. मिसर देशांत सर्व लोकसंख्येपैकीं शेंकडा १० लोक या रोगानें त्रस्त असतात. हीच स्थिति इतर उष्णप्रदेशांत आहे. नेपोलियननें मिसर देशावर ३२००० सैन्यानिशीं स्वारी केली खरी. पण बहुतेक सर्व जणांनां म्हटलें तरी चालेल हा नेत्ररोग चांगलाच भोंवला. व पुढील वीस वर्षांत यूरोपांतील इतर देशांच्या सैन्यांतहि बळावत गेला. बेलजियन शिपायांत दर पांच जणांत एक याप्रमाणें हा रोग इ. स. १८३२ त पसरला व ४००० शिपाई दोन्ही डोळ्यांनीं, व १०००० शिपाई एका डोळ्यानें आंधळे झाले. बराकी, गरिबांच्या चाळी व वस्ती, अनाथाश्रम, वसतिगृह असलेल्या शाळा हीं याचीं प्रियवास्तव्यस्थानें होत. मागें वर्णन केलेला पूयनेत्रदाह बरा होण्यास सुलभ तरी असतो. पण हा रोग बरा होण्यास फारच चिकट व हट्टी असून शेवटीं अंधत्व येतें. एवढ्याकरितां त्याच्या प्रसारांस प्रतिबंध करणें म्हणजे लोकांवर महदुपकार करणें होय. अशीं नेत्ररोगाचीं माणसें चांगल्या माणसांपासून अगदीं वेगळ्या जागेंत अगर खोलींत ठेवल्यापासून मोठा उपयोग होतो.

सं वे द न ने त्र दा ह:- एका डोळ्यास मार, धक्का वगैरे प्रकारची इजा होऊन जे रोगी आंधळे होतात त्यांतील निमे या रोगानें दोन्ही डोळ्यांनींही आंधळे होतात असा अनुभव आहे. एखादा जबर अपघात एका डोळ्यास होऊन तो जातो. परंतु तो निरुपयोगी डोळा तसाच ठेवावासा वाटतो. पण असें केल्यानें दुसरा डोळाहि दाह होऊन कांहीं दिवसांनीं जाण्याची धास्ती बहुमकरून असतेच हें त्या रोग्यास कळत नाहीं.

कां च बिं दू :- या रोगाचा शेवट आंधळेपणांत व्हावयाचा हें बहुतेक निश्चितच असतें. पण रोगी योग्यवेळीं डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन लवकर एक लहानशी शस्त्रक्रिया करून घेईल तर बहुधा अंधत्व टळतें.

दृ ष्टि र्‍हे स्व ता.- म्हणजे लांबचें न दिसणें. हा रोग मुलांनां सात पासून नवव्या वर्षांपर्यंत बहुधा होतो. कधींकधीं आईबापांत तो असल्यामुळें त्यांस उपजतच असतो. एक दोन वर्षें हयगय होऊन इलाज न केल्यानें डोळ्याची फारच खराबी होते. एकाग्रतेनें, जवळच्या पदार्थावरच नेहमीं टक लावून पहाण्यानें अगर वाचनानें हें व्यंग चांगल्या दृष्टीच्या मनुष्यांसहि नवीन होऊं शकतें. यास
प्रतिबंधक उपाय:- मुलांना लहानपणापासून लांबचे पदार्थ ओळखून ते वर्णन करण्याची संवय लावावी. नेहमीं कामधंदा, लेखन वाचन घरांत बसून न करतां उघड्या मोकळ्या जागेंत करावें. निदान ज्या मुलाची दृष्टी अधु असण्याकडे कल आहे त्या मुलांचें शिक्षण तरी अशा प्रकारें व्हावें.

इ. स. १९०६ मध्यें एडिंबरो शहरीं सुमारें ५२,५०० मुलांच्या दृष्टीची नेत्रवैद्यांकडून परीक्षा करण्यांत आली. त्यांत शेंकडा ३५ मुलें उत्तम दृष्टीची जी मर्यादा आहे त्यापेक्षां कमी दृष्टी असलेलीं आढळलीं. नंतर १८५०० मुलांनां अंधार्‍या खोलींत नेऊन त्यांच्या नेत्रांची अंत:परीक्षा केली. तींत असें समजलें कीं त्या मुलांपैकीं शेंकडा २१ मुलांच्या डोळ्यांच्या आंतील रचनेस विकृती झालेल्या होत्या. त्यांत हेंहि स्पष्ट दिसून आलें कीं गरिबांचीं दाट वस्तींत रहाणारीं मुलें अगर जुन्या कोंदट इमारतींत भरत असलेल्या शाळांतून अधु दृष्टीचीं मुलें अधिक होतीं व उलट पक्षीं हवा व उजेड भरपूर असलेल्या व विरल वस्ती असलेल्या शहराच्या हद्दीच्या आसपास असलेल्या शाळांतील मुलांची दृष्टि अधिक चांगली होती. डोळ्यांच्या इतर विकृती असलेलीं मुलें वगळलीं असतां अशी एक गोष्ट ध्यानांत येते कीं, पुढें दिलेल्या कारणांनीं मुलांची दृष्टि बिघडते:- (१) दूरचे पदार्थ पहाण्याचा सरावं व संवयीचा अभाव, (२) कमी उजेडांत वाचल्यानें व काम केल्यानें येणारा नेत्रांचा थकवा. (३) स्वच्छ हवापाणी व पुरेषा पौष्टिक अन्नाची कमतरता.

उ प यु क्त सू च ना.- अगदीं लहान मुलाच्या अभ्यासक्रमांतून शिवणकाम काडून टांकण्यांत यावें. कारण त्यापासून कोंवळ्या दृष्टीस खास अपाय होतो. (२) इतर खेळांच्या शर्यती जशा लावतात तशा २० फुटांपेक्षां अधिक अंतरावर असणारे बारीक पदार्थ ओळखण्याच्या शर्यती लावाव्या. (३) प्रतिवर्षी शिक्षकवर्गानें याप्रमाणें मुलांमध्यें दृष्टिरक्षणाची ईर्षा उत्पन्न करून त्यांच्या नेत्रांची व दृष्टीची तज्ज्ञ डॉक्टराकडून परीक्षा करीत जावी. निदान जीं मलें अधु दृष्टीचीं आहेत असें वरील प्रकारच्या शर्यतींत कळून आलें असेल त्यांची तरी काळजी घेऊन त्यांची दृष्टि संभाळावी. असा कायमचा क्रम ठेविल्यानें वेळींच इलाज होऊन मुलांचें हित होतें व प्रतिवर्षी नवीन नवीन मुलें येतात त्यांतील अधु दृष्टीचीं मुलें चटकन ओळखून काढण्याची संधि मिळते. या अधु दृष्टीच्या मुलांमध्यें न जाणों अति बुद्धिमान् व शोधक पुरुष अगर स्त्री निर्माण कशावरून होणार नाहीं? याकरितां राष्ट्रहिताची दृष्टि आपण बाळगून शाळांच्या चालकांनीं हीं सर्व आपलींच मुलें आहेत अशी भावना ठेवून दृष्टिरक्षणाचें पवित्र कार्य समजून करावें व तें केलें म्हणजे कान, नाक, त्वचा, दांत इत्यादि इंद्रियें निर्मळ राखण्याची आवश्यकता व आवड मुलांमध्यें व त्यांच्या पालकांमध्यें सहजीं वाढून सुखोत्पत्ति व उत्कर्ष अधिक होतो.

   

खंड ९ : ई ते अशुमान  

 

  ईजिप्त

  ईजियन समुद्र

  ईजियन संस्कृति
  ईटन-इंग्लंड
  ईडनिंबू
  ईथर
  ईदर
  ईदिग
  ईव्हशाम
  ईशोपनिषद
  ईश्वरकृष्ण
  ईश्वरीपूर
  ईश्वरसिंग
  ईसॉप
  ईस्ट इंडिया कंपनी
  ईस्ट इंडीज
  ईस्टर
  ईस्टर बेट
  ईस्टविक्, एडवर्ड बॅक् हाऊस
  ईक्षणयंत्र
 
  उकाँग
  उकुंद
  उखाणे
  उखामंडळ
  उग्रसेन
  उचकी (हिक्का )
  उचले व भामटे
  उचाड
  उच्च-पंजाब
  उच्च शहर
  उच्च
  उच्छर
  उंज
  उज्जनी
  उज्जयन्ताद्रि
  उझानी
  उंट
  उटकटारी
  उटकमंड
  उंड
  उंडवलें
  उंडविन
  उडियासांझिया
  उडीद
  उडुपी
  उड्र
  उतथ्य
  उत्तंक
  उत्तनगरै
  उत्तमपालेयम
  उत्तर
  उत्तर अमेरिका
  उत्तरध्रुवप्रदेश
  उत्तरपाडा
  उत्तर मेरूर
  उत्तर सरकार
  उत्तरा
  उत्तरापथ
  उत्तानपाद
  उत्पल
  उत्पादन
  उत्रौला
  उदमलपेट
  उदयगिरी
  उदयन
  उदयनाचार्य
  उदयपूर
  उदयप्रभसूरि
  उदयभानु
  उदयसिंह
  उदर
  उदलगुरी
  उदाजी पवार
  उदासी
  उंदिरखेड
  उंदीर
  उदेपुरी बेगम
  उदेपूर संस्थान
  उदेपूर गांव
  उदेपूर शहर
  उदेपूर
  उदेय्यार पालेयम्
  उंदेरी
  उद्गाता
  उद्गीर
  उद्गीरची लढाई
  उद्दंड
  उद्दंडपुर
  उद्दालक
  उद्धव
  उद्धव गोसावी
  उद्धवचिद्घन
  उद्धव नाला
  उद्धव योगदेव
  उद्बोधनाथ
  उद्वेग रोग
  उन
  उन-देलवाडा
  उनबदेव
  उना
  उनियार
  उनी
  उन्कल
  उन्नाव
  उन्माद
  उन्सरी
  उपकन्चा
  उपकेशगच्छ
  उपनयन
  उपनिधि
  उपनिषदें
  उपनेत्र
  उपप्लव्य
  उपमन्यु
  उपरवार
  उपरि
  उपरिचर
  उपवेद
  उपशून्य
  उपसाला
  उपांशु
  उपेनंगडी
  उपेन्द्र परमार
  उप्पर
  उप्माक
  उप्रई
  उप्लेटा
  उंबर
  उम्बेक
  उबेरो
  उंब्रज
  उमत्तूर
  उमरकोट
  उमर खय्याम
  उमरखान
  उमरखेड
  उमरबिन खत्तब
  उमरावती
  उमरी
  उमरेठ
  उमरेड
  उमा
  उमाजी नाईक
  उमापति
  उमापति शिवाचार्य
  उमाबाई दाभाडे 
  उमीचंद
  उमेटा
  उमेदवारी
  उमेरिया
  उर
  उरगप्पा दंडनाथ
  उरण
  उरल पर्वत
  उरलि
  उरवकोंड
  उरिया, उडिया
  उरी
  उरुळी
  उरोगामी
  उर्दुबेगी
  उर्फी, मौलाना
  उर्मिया सरोवर
  उर्मिया, शहर
  उर्वशी
  उलघबेग मिरझा
  उलूक
  उलूपी
  उलेमा
  उल्का
  उल्बारिया
  उल्म
  उल्लतन
  उल्लाळ 
  उवा
  उशना, वैदिक
  उशीनर
  उकूर
  उषा
  उष्टारखाना
  उष्णता
  उष्णताजन्य विद्युत
  उष्णतामापन
  उष्णता-रसायनशास्त्र
  उष्णतावहन
  उष्णमानमापक यंत्र
  उस्का
  उस्तरण
  उस्मान
  उस्मान नगर
  उस्मानाबाद
  उळवी
 
  ऊदाइन (बेंझाईन)  
  ऊदाम्ल
  ऊदिदिन
  ऊदिन
  ऊदिल अल्कहल
  ऊदिल प्रायोज्जिद
  ऊदिल भानन
  ऊधमबाई
  ऊरूस्तंभ
  ऊर्ध्वपातनक्रिया
  ऊस
 
  ऋग्वेद
  ऋचीक
  ऋणमोचन
  ऋतु
  ऋतुपर्ण
  ऋत्विज
  ऋभु वैदिक
  ऋषभ
  ऋषि
  ऋषिऋण
  ऋषिक
  ऋषिपंचमी
  ऋषियज्ञ
  ऋषिवरण
  ऋष्यमूक
  ऋष्यवान
  ऋष्यशृंग
  ऋक्षरजा
 
  एओलिस
  एकचक्रा
  एकत
  एकतत्त्ववाद
  एकदंत भट्ट
  एकनाथ
  एकबटाना
  एकर
  एकरुक
  एकलव्य
  एकलिंगजी
  एकादशरुद्र
  एकादशी
  एकिल्
  एक्झीटर
  एक्रान
  एक्स
  एक्स-ला-चॅपेल
  एगमाँट लॅमोरल कौंट ऑफ
  एगिनकूर
  एचर्ड
  एंजिन
  एट्ना
  एट्रूरिया
  एडगर
  एडन
  एडन कालवा
  एडप्पल्ली
  एन्डर
  एडवर्ड
  एडवर्डसाबाद
  एडिंबरो
  एडेन जॉर्ज - लॉर्ड ऑकलंड
  एडेसा
  एडोम
  एड्रियन
  एदलाबाद
  एनमे
  एनॅमल
  एन्नोर
  एपिक्टेटस
  एपिक्यूरस
  एपिनस, फ्रान्झ उलरिच थिओडार
  एपीडॉरस
  एंपीडोक्लिस
  एफेसस
  एबनी (अबनूस)
  एबल सर फ्रेडरिक
  एंब्रान
  एमडेन
  एमॅन्युअल व्हिक्टर
  एमिनाबाद
  एमीन्स
  एमेअस
  एमेरी
  एम्मेट रॉबर्ट
  एरंडी
  एरंडोल
  एरन
  एरनाड
  एरवल्लर
  एरिडु
  एरिथ्री
  एरिनपुर
  एरियन
  एरिलिगारू
  एरोड
  एर्नाकुलम
  एलगंडल
  एलाम
  एलाय
  एलिआकॅपिटोलिना
  एलिचपूर
  एलिझाबेथ
  एलिस
  एलेनबरो
  एलेफन्टा
  एल्जिन
  एल्जिन लॉर्ड
  एल्फिन्स्टन मौंट स्टुअर्ट
  एल्ब
  एल्बा
  एल्युथेरापीलीस
  एल्युसिस
  एल्सिनोर
  एसर हजन
  एसेक्स परगणा
  एस्किमो
 
  ऐतरेय आरण्यक
  ऐतरेय उपनिषद्
  ऐतरेयब्राह्मण
  ऐन
  ऐनापुर
  ऐनी-अकबरी
  ऐनुद्दीन
  ऐनू
  ऐमक
  ऐयनर
  ऐरणी
  ऐरावत
  ऐहिकवाद
  ऐहोळ
 
  ओक
  ओक वामन दाजी
  ओकटिवन
  ओकपो
  ओकलंड शहर
  ओकहॅम
  ओकुमा, कौंट
  ओकू
  ओकेन, लॉरेन्झ
  ओकोनेल डॅनियल
  ओक्लाहामा
  ओच्चन
  ओजिब्वा
  ओझर
  ओझा
  ओट
  ओटावा
  ओट्टो
  ओडर नदी
  ओडेसा
  ओडोनेल हेनरी जोसेफ
  ओतारी
  ओतुर
  ओध
  ओनला
  ओनेगा
  ओन्गोले
  ओपोर्टो
  ओफीर
  ओब्रायन वुइल्यम स्मिथ
  ॐ ( ओम् )
  ओमान
  ओम्स्क
  ओयामा
  ओरई
  ओरॅंग ऊटंग
  ओरकझई
  ओरछा
  ओरावन
  ओरिसा 
  ओरिसा कालवे
  ओरिसांतील मांडलिक संस्थानें
  ओर्मेरॉड एलिअनॉर
  ओलपाड
  ओल्डहॅम
  ओल्डहॅम थॉमस
  ओल्डेनबर्ग
  ओवसा
  ओवा
  ओवेन, रॉबट
  ओवेन सर रिचर्ड
  ओव्हिड
  ओशीमा
  ओषण
  ओसवाल
  ओसाका अथका ओझावा
  ओस्कार
  ओस्टीयाक
  ओहम्, जार्ज सायमान
  ओहममापक
  ओहिओ
  ओहिंद
  ओळंबा
 
  औक अथवा अवुक जमीनदार
  औट्रम
  औतें
  औदीच्य ब्राह्मण
  औद्देहिक
  औद्योगिक परिषद
  औंध
  औंधपट्टा
  औधेलिया
  औनियाति
  औरंगझेब अलमगीर
  औरंगाबाद
  औरंगाबाद सय्यद शहर
  और्व
  औशनस
  औसले सर विल्यम
  अं
  अंक
  अंकगणित
  अंकचक्र
  अंकलगी
  अंकलेश्वर
  अंकाई टंकाई
  अंकिसा
  अंकेवालिया
  अॅंकोना
  अॅंकोबार
  अंकोर
  अंकोला
  अंग
  अंगठी
  अंगडशाहा
  अंगडि
  अंगडिपूरम
  अंगद
  अंगदशिष्टाई
  अंगदिया
  अंगरखा
  अंगापूरकर (हरि)
  अंगारा
  अंगुत्तर निकाय
  अंगुर शेफ
  अंगुळ
  अंगोरा शहर
  अॅंगोला
  अॅंग्विल्ला
  अंघड
  अंचलगच्छ
  अंज-(अॅंटिमनी)
  अंजनगांव
  अंजनगांव बारी
  अंजनगांव सुर्जी
  अंजनवेल
  अंजनी
  अंजनेरी
  अंजार
  अंजिदिव
  अंजी
  अंजीर
  अंजू
  अंजेंगो
  अॅंजलिको फ्रा
  अॅंटनान-रिव्हो
  अॅंटवर्प
  अंटिओक
  अॅंटिग्वा
  अॅंटियम
  अॅंटिलीस
  अॅन्टिव्हरी
  अन्टीगोनस गोनाटस
  अॅन्टीगोनस सायक्लॉप्स
  अॅन्टीपेटर
  अॅन्टीलिया
  अॅंटोनिनस पायस
  अॅंटोनियस ( मार्कस )
  अंडवृध्दि
  अण्डाशयछेदनक्रिया
  अॅंडीज
  अंडें
  अंडोरा
  अंडोल
  अंडोला
  अॅंड्रासी ज्युलियस
  अॅंड्रिया डेल सार्टो
  अॅंड्रोमेडा
  अॅंड्रयूज थॉमस
  अंतगड
  अंतधुरा
  अंतर इब्नशद्दाद
  अंतराल
  अंतर्गळ
  अंतर्वेदी
  अंतर्ज्ञान
  अंताजी ( उर्फ बाबुराव ) मल्हारराव बर्वे
  अंताजी माणकेश्वर
  अंताजी रघुनाथ
  अंतालिमा
  अंतुर्ली
  अंतूर
  अंतोबा गोसावी
  अंत्रपुच्छदाह
( अपेंडिसाइटीज )
  अंत्रावरणदाह
( पेरिटोनिटिस )
  अॅंथनी सुसान ब्रौनेल
  अंदमान आणि निकोबार बेटें
  अंदमान बेटें
  अंदाळ
  अंदोरी
  अंध किंवा आंध
  अंधक
  अंधत्व
  अंधरगांव
  अंधळगांव
  अंधारी नदी
  अंब
  अंबत्तन
  अंबर ( धातु )
  अंबर
  अंबर उदी
  अंबरखाना
  अंबरनाथ अथव अमरनाथ
  अंबरनाथ
  अंबरपेठ
  अंबराम्ल
  अंबरीष
  अंबलक्कारन्
  अंबलपुलई
  अंबलवासि
  अंबष्ठ
  अंबहटा
  अंबा
  अंबा, (तालुका)
  अंबागड
  अंबागडचौकी
  अंबाजी इंगळे
  अंबाजी दुर्ग
  अंबाजी पुरंधरे
  अंबाडी
  अंबा भवानी
  अंबाला
  अंबालिका
  अंबाली
  अंबासमुद्रम
  अंबिका
  अंबिका दत्त व्यास
  अंबिकापूर
  अंबुशी
  अंबूर
  अंबेर
  अंबेला
  अंबेहळद
  अंबोयना
  अंबोली
  अंभोरा
  अंशुमान
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .