विभाग नववा : ई-अंशुमान
अंधरगांव - मध्यप्रांत. जिल्हा व तहशिल भंडारा. भंडार्याच्या उत्तरेस १६ मैलांवर हें ३००० लोकवस्तीचें गांव आहे. या ठिकाणीं रेशीमकांठीं साड्या करण्याचे कारखाने आहेत. दर बुधवारीं येथें बाजार भरत असून त्यावेळीं गुरें विक्रीकरितां येतात. आरोग्यरक्षणाकरितां एक लहानसा कर असून प्राथमिक शाळा, पोलीसठाणें, टपालघर वगैरे आहेत.