विभाग नववा : ई-अंशुमान
अंबलपुलई - मद्रास इलाखा. त्रावणकोर संस्थानांतील याच नांवाच्या तालुक्याचें मुख्य ठिकाण. आलेप्पोच्या दक्षिणेस दहा मैलांवर आहे. अलेप्पे व हा गांव एका कालव्यानें जोडलेला आहे. उत्तर अक्षांश. ९० २३' व पूर्वरेखांश ७६० २२' लोकसंख्या (१९०१) १७९१.
येथें कृष्णस्वामीचें देऊळ असून तत्प्रीत्यर्थ पुष्कळ यात्रेकरू येतात. अठराव्या शतकाच्या अर्धापर्यंत हा गांव त्याच नांवाच्या राजाच्या राजधानीचें ठिकाण होतें. त्यावर चेंपकस्सरी हे नंबुद्री ब्राह्मण राजे राज्य करीत असत. ते राज्यकर्ते असल्यामुळें त्यांस देवनारायण असें विशेष नांव असे. त्यांच्यापैकीं एका राजानें त्रावणकोर राजाच्या विरुद्ध उठलेल्या कायनकुलम् येथील संस्थानिकास मदत केली. त्यामुळें त्रावणकोरच्या राजाचा प्रधान रामअय्यन दलवाइ त्यावर इ. स. १७४८ खालीं सैन्य पाठविलें त्यावेळीं राजास कैदी करण्यांत येऊन संस्थान त्रावणकोरच्या राज्यास जोडण्यांत आलें.