विभाग नववा : ई-अंशुमान
अंबा, (ता लु का.) - हैद्राबाद संस्थान. भीर जिल्ह्याचा आग्नेयीकडील तालुका. क्षेत्रफळ १३४२ चौरस मैल. लोकसंख्या (१९०१) १३९३९९ यांत दोन गांवें व २६९ खेडीं असून ५१ जहागीर आहेत. जमीनमहसूल, ३८ लाख रुपये. हा तालुका उत्तरेकडे डोंगराळ आहे. हल्लीं येथें तालुक्याचें ठिकाण आहें.
अं बा गां व अ थ वा मो मि ना बा द :- हैद्राबाद संस्थान. भीर जिल्ह्यांतील अंबा तालुक्याचें मुख्य ठिकाण. उत्तर अक्षांश १८० ४१' व पूर्व रेशांश ७६० २४'. लोकसंख्या (१९११) ११०७३. या गांवाचे जीवंती नदीनें दोन भाग केले आहेत. नदीच्या नैर्ऋत्येकडील भागास मोमिनाबाद हें नांव असून इ. स. १९०३ पर्यंत हें लष्करी ठाणें होतें. अंबा येथील पंचम जैन हे चालुक्याच्या मांडलिकाचे वंशज आहेत असें म्हणतात. येथें देवगिरीचा यादव राजा सिंघन याच्या कारकीर्दीत बांधलेलें एक देऊळ असून त्यांत इ. स. १२४० सालचा एक शिलालेख आहे. जवळच पुष्कळ जैनांचीं व ब्राह्मणांचीं लेणीं आहेत. त्यांपैकीं जोगाईचें देऊळ विशेष महत्त्वाचें आहे. त्यावरून यास जोगाईचे आंबे म्हणतात.