विभाग नववा : ई-अंशुमान
अंबासमुद्रम, ता लु का - मद्रास इलाखा. तिनेवल्ली जिल्ह्यांतील एक तालुका. उत्तरअक्षांश ८० २९' ते ८० ५७' उ व ७७० १२' ते ७७० ४०' पू. रे. सह्याद्रीच्या पायथ्याशीं हा वसलेला असून त्याचें
क्षेत्रफळ ४९८ चौरसमैल व लोकसंख्या (१९२१) १९५२८९ आहे. सन १९०३-४ सालीं एकंदर उत्पन्न ४७४००० रुपये होतें. या तालुक्यांत ताम्रपर्णी नदीच्या आसपासचा प्रदेश असून त्यांत भातशेतीची अति सुपीक जमीन आहे. या नदीस फार प्राचीन काळीं घातलेले बांध अद्यापि सुस्थितींत असून त्यांपैकीं पाणी भातशेतीस मिळत असतें. हा प्रदेश सोडल्यास तालुक्यांतील इतर जमीन खडकाळ व कमी प्रतीची आहे. या तालुक्यांत सिंगमपट्टी व उरकड या दोन जमीनदार्या आहेत. या तालुक्यांत अंबासमुद्रम् वीरवनल्लूर, कलिदैकुरिची व सर्मादेवी हीं मोठीं गांवें असून पापनाशम् नावाचें यात्रेचें ठिकाण याच तालुक्यांत आहे.
गांव - मद्रास इलाखा. तिनवेल्ली जिल्ह्यांतील अंबासमुद्रम् तालुक्याचें मुख्य ठिकाण. ८० ४२' उत्तर अक्षांश व ७७० २७' पूर्व रेखांश हा गांव ताम्रपर्णी नदीच्या वामतीरावर तिनवेल्ली गांवापासून २० मैल आहे. लो. सं. (१९२१) १४११८. येथें एक सहकारी पंचायत असून तिच्या मार्फत स्थानिक कामें चालतात.