विभाग नववा : ई-अंशुमान
अंबिकापूर - मध्य प्रांत सुरगुजा संस्थानची राजधानी. येथील राजवाडा सुंदर असून त्यांत विजेच्या दिव्यांची योजना केली आहे. हें गांव आधुनिक पद्धतीवर वसविलें असून सडका व घरांच्या रांगा नीटनेटक्या आहेत. येथें व्यापारी पेठ व बाजार आहे; आणि शाळा, कचेरी, रहदारी बंगला, न्याय कोर्ट यासारख्या संस्था आहेत.