विभाग नववा : ई-अंशुमान
अंभोरा - भंडारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर नागपूरच्या आग्नेयीस उमरेड तहशिलींत वाइनगंगानदीतीरीं हें २२४ लोकवस्तीचें लहानसें खेडेंगांव आहे. येथें चैतन्येश्वराचें प्रसिद्ध देवालय असून हरहर स्वामी यांची समाधि आहे. येथें तीन जत्रा भरत असून त्यांस नागपूर व भंडारा जिल्ह्यांतील लोक येतात. येथील शेतकरी यात्रेकरूंनां आपण उत्पन्न केलेले जिन्नस विकतात. देवळाची व्यवस्था पहाण्यास एक महाराष्ट्र ब्राह्मण आहे. त्याच्याकडे पूर्वापार चालत आलेल्या कांहीं मासे पकडण्याच्या जागा आहेत.