विभाग नववा : ई-अंशुमान
उचाड - (मुंबई.) रेवाकांठामधील एक लहान संस्थान. मूळ उचाडच्या २६ चौ. मैल क्षेत्रफळाच्या दाहमा रजपुत जहागिरीचे चार विभाग पाडले आहेत; ते विरपुर, रेगन, विरायपुरा, व उचाड हे होंत. उचाडच्या पैतृक संस्थानांत हल्लीं बाराच गांवें कायतीं आहेत; व त्यांचें क्षेत्रफळहि ८।। चौरस मैलांइतकें राहिलें आहे. उत्पन्न (१८८० सालीं) सुमारें नऊ हजार रुपये असून त्यापैकीं गायकवाडला खंडणी नऊशें रुपयापर्यंत देण्यांत येते. येथें वस्ती मुख्यत: कोळ्यांची आहे. [ मुं. गॅ. पु. ६.]