विभाग नववा : ई-अंशुमान
उंडविन – उत्तर ब्रह्मदेश. मेकटिला जिल्ह्यांतील आग्नेयीकडील तालुका. हा मंडाले रंगून रेल्वेच्या दोन्ही बाजूनें असून ४७० चौ. मैल क्षेत्रफळ आहे. तालुक्यांत खेड्यांची संख्या १३६ असून लो. सं. १९११ सालीं ६९२७३ होती. तालुक्याच्या पूर्व भागावरून सामन नदी गेलेली आहे. तालुख्याचें मुख्य ठिकाण उंडविन हें असून त्याची लो. सं. १०९० आहे.